12 वी नंतर काय करावे।12 वी नंतर करता येण्यासारखे व डिमांड मध्ये असणारे कोर्सेस आणि ट्रेण्डिंग करिअर ऑप्शन्स..

माहिती शेअर करा.

12 वी नंतर काय करावे

12 वी नंतर काय करावे : नमस्कार मित्रांनो, १० वी १२ वी पास झाल्यावर बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येणारा व सर्वांकडून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे “12 वी नंतर पुढे काय करणार आहे ?”.याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या लेखामध्ये मिळणार आहे.हा लेख वाचल्यानंतर आपल्याला विविध करिअर ऑप्शन्स बद्दल माहिती मिळणार आहे.

परंतु हि माहिती घेण्याआधी करिअरच गांभीर्य लक्षात घेणं फार महत्वाचं आहे.करिअरच गांभीर्य या बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर, तुम्ही जो करिअर ऑप्शन निवडणार आहात ते काम करतांना तुम्हाला भविष्यात काय मोबदला मिळणार आहे व त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी सोडाव्या किंवा त्यागाव्या लागणार आहेत याचा एकदा व्यवस्थित विचार करा.जर ध्येय उच्च असेल तर संघर्षही तेवढाच मोठा असणार आहे याचा विचार करून व आपली मानसिक तयारी करून करिअर निवडा.

तसेच तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये काय-काय करायचं आहे त्याचा एकदा विचार करा व निवडलेल्या करिअर ऑप्शन ने तुमचे ते ध्येय साध्य होऊ शकते का हे पाहून घ्या.

उदाहरणार्थ:- जर तुम्हाला फिरायला, वेगवेगळी ठिकाणे पाहायला आवडत असेल आणि तम्ही जर असा जॉब करत आहात ज्यामध्ये पैसे तर फार आहे परंतु जीवनशैली फार व्यस्त आहे.असे असेल तर तुम्ही खुश व समाधानी कसे राहू शकता?

परंतु त्याऐवजी तुम्ही जर असे क्षेत्र निवडले ज्यामध्ये तुमचा छंद जोपासला जाऊ शकतो जसे कि, traveling, traveling influencer, Traveling Guide इ .तर तुम्ही अधिक समाधानाने राहू शकता.

करिअर मध्ये तुमची स्वतःची आवड व तुमचे समाधान फार महत्वाचे असणार आहे तेच तुम्हाला तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यास प्रोत्साहित करणार आहे.त्यामुळे 12 वी नंतर करिअर निवडतांना काळजीपूर्वक विचार करून मगच त्या क्षेत्रामध्ये प्रवेश घ्या अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

12 वी नंतर करिअर मार्गदर्शन |बारावी नंतर काय करावे

आता पर्यंत आपण करिअर च गांभीर्य याबद्दल थोडक्यात पाहिलं आता आपण माहिती घेऊया त्या प्रश्नाची ज्या प्रश्नाच्या उत्तरासाठी हा लेख बनवण्यात आलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे “12 वी नंतर काय करावे?.या पोस्टमध्ये तुम्हाला अशा करिअर ऑप्शन्सबद्दल माहिती मिळणार आहे ज्यामध्ये करिअर करण्यासाठी तुम्ही 12 वी नंतर प्रवेश घेऊ शकता.

या करिअर ऑप्शन्समध्ये तुम्हाला पदवी, डिप्लोमा, आय टी आय, NDA, Defence, डिप्लोमा कोर्सेस, सर्टिफिकेशन कोर्सेस, सरकारी नौकरी , MPSC, UPSC, SSC, Railway, Banking, स्वतःचा व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांबद्दल माहिती मिळणार आहे.म्हणून हि पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्यासाठी योग्य असणाऱ्या क्षेत्रातील पर्यायाला निवडून तयारीला लागा.

12 वी नंतर काय करावे

12 वी नंतर काय करावे
12 वी नंतर काय करावे

12 वी नंतर सामान्यतः आपल्यासमोर खालील पर्याय उपलब्ध आहेत .

  1. पदवी (Degree): बारावी झाल्यांनतर आपण खालील शाखांमध्ये पदवी करु शकता.ज्यातून तुमच्यासाठी विविध नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील.तुम्हाला शेवटी काय व्हायचं आहे हे लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या शाखेची निवड करायची आहे.यामध्ये सामान्यतः कला शाखा , वाणिज्य शाखा व विज्ञान शाखा यांचा समावेश आहे.
    • कला (Arts)पदवी -B.A :- कला शाखेमधून शिक्षण घेऊन तुम्ही शिक्षक,पत्रकार यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम करू शकता.तसेच सरकारी नोकऱ्यांचीही तयारी करू शकता.तसेच इतर काही कोर्सेस खालील प्रमाणे.
      • BFA :- (Bachelor of fine arts)
      • मास मीडिया अँड जर्नालिझम :- BMM । BJMC
      • डिझाईन अँड फॅशन :- B.Des. | B.F tech
    • वाणिज्य (Commerce)पदवी -B.Com:- १२ वी पास झाल्यानंतर तुम्ही जर वाणिज्य शाखा म्हणजेच कॉमर्स शाखा निवडल्यास तुम्ही सी ए होऊ शकता , बँकेमध्ये नौकरी करू शकता , व्यवसाय करू शकता , कंपनी मध्ये काम करू शकता, सरकारी नोकऱ्यांसाठी अप्लाय करून सरकारी नौकरी मिळवू शकता. तसेच इतर काही कोर्सेस खालील प्रमाणे.
      • BBA ((Bachelor of bussiness administration)
      • BBM (Bachelor of bussiness studies)
      • BCA (Bachelor of Computer Applications)
    • विज्ञान (Science) पदवी-B.Sc:- विज्ञान शाखेमध्ये जर तुम्हाला पदवी मिळवायची असेल तर पदवी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही विविध शाखेमधून इंजिनीअरींग करू शकता जसे कि BE/Btech. इन (सिव्हील,मेकॅनिकल ,इलेक्ट्रिकल इ .). तसेच तुम्हाला जर डॉक्टर व्हायचे असेल तर तुम्ही खालील शाखांमध्ये पदवी मिळवून डॉक्टर होऊ शकता.तसेच फार्मसी करून तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये देखील जाऊ शकता.जर आपल्याला विज्ञान शाखेमधुन पदवी मिळवून सरकारी रुग्णालयात नोकरी करायची असेल तर आपण ती नोकरी करण्यास पात्र असू शकता.
      • इंजिनिअरिंग :-
        • BE/Btech. :- (सिव्हील,मेकॅनिकल ,इलेक्ट्रिकल इ .)
      • वैद्यकीय क्षेत्र :-
        • MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery.)
        • BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery)
        • BHMS (Bachelor of Homeopathic Medicine and Surgery.)
        • BPT (Bachelor of Physiotherapy)
        • B.Sc (Bachelor of Science)
        • B.Sc Nursing
        • B.Pharm इ
  2. डिप्लोमा: जर बारावी नंतर तुम्हाला लवकर शिक्षण पूर्ण करून नौकरी मिळवायची असेल तर डिप्लोमा करणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो.तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोर्स निवडून डिप्लोमा कोर्स पूर्ण करून नौकरी मिळवू शकता.साधारणतः डिप्लोमा ३ वर्ष कालावधीचा असतो.तसेच १० वी नंतरहि तुम्ही डिप्लोमा ला ऍडमिशन घेऊ इच्छित असाल तर तुम्ही प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ शकता.
    • डिप्लोमा इन सिव्हील इंजिनीअरिंग (Civil)
    • डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग (Mechanical)
    • डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (Electrical)
    • डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन (E&TC)
  3. आय टी आय :
    • Wireman
    • Turner
    • Electrical इ . आय टी आय च्या सर्व कोर्सेस च्या लिस्ट ची लिंक आपल्याला या लेखाचा शेवटी देण्यात आलेली आहे.आपण ती लिस्ट वाचून योग्य असणारा कोर्स निवडू शकता.

12 vi nantar kay karave

  1. डिप्लोमा कोर्सेस:- बदलत्या ट्रेंड नुसार करिअरच्या संधी सुद्धा बदलत चालल्या आहेत.खूप सारे नवीन करिअर ऑप्शन्स उदयास आलेले आहेत.बहुतेक विद्यार्थ्यांचा कल अजूनही ट्रॅडिशनल एजुकेशन वर म्हणजेच पारंपारिक शिक्षण पद्धतीकडे असल्याचे पाहायला मिळते.अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही नवीन ट्रेंड्स नुसार स्वतःला बदलू इच्छित असाल व काळानुसार बदलत्या ट्रेंड्स मध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही खालील कोर्सेस करू शकता.
    • फोटोग्राफी
    • ग्राफिक्स डिझाईन
    • इंटेरिअर डिझाईन इ .
  2. सर्टिफिकिटे कोर्सेस- वेगवेगळ्या कालावधीचे वेगवेगळे कोर्सेस बाजारात उपलब्ध आहेत आपण ते कोर्सेस करून खालील फिल्ड मध्ये करिअर करू शकतो.
    • डिजिटल मार्केटिंग
    • डेटा सायन्स
    • नेटवर्किंग
    • Chat-GPT इ.
  3. इतर पर्याय :
  4. सरकारी नौकरी
    • पोलीस भरती :- 12 वी पास झाल्यानंतर आपण पोलीस भरतीची तयारी करून वर्दीची सरकारी नौकरी मिळवू शकता.जर आपण पोलीस भरतीची शारीरिक व शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर आपण पोलीस होऊ शकता. पोलीस भरती कसे होता येईल याची संपूर्ण माहिती आम्ही मागील लेखामध्ये पब्लिश केलेली आहे.खालील लिंक व क्लीक करून आपण ती माहिती वाचू शकता.
    • पोलीस होण्यासाठी काय करावे लागते |ह्या गोष्टी करा आणि 2024 मध्ये महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल चे आपले लक्ष्य साकार करा!
    • MPSC- महाराष्ट्रामध्ये जर आपण सरकारी नौकरी करू इच्छित असाल तर mpsc एक चांगला करिअर ऑप्शन असू शकतो.पण जर या ऑप्शन मध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुमच्या अंगी सय्यम, सातत्य व अभ्यासामध्ये कष्ट करण्याची धमक हवीच.खूप साऱ्या वेगवगळ्या पदांसाठी mpsc विभागाकडून नोकरीच्या जाहिराती येत असतात. आम्हिही त्या नोकरी भरतीच्या जाहिराती आपल्यापर्यंत पोहचवू .पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल.
    • UPSC- तुम्ही जर जिल्हाधिकारी,IAS , IPS यांसाख्या क्लास वन च्या पोस्ट मिळवू इच्छित असाल तर UPSC एक उत्तम पर्याय मानला जातो.परंतु जगातील सर्वात अवघड असणाऱ्या परीक्षांच्या यादीमध्ये वरील पोस्टच्या परीक्षा म्हणजेच UPSC च्या परीक्षा ३ ऱ्या क्रमांकावर आहेत ,हे हि तेवढाच महत्वाचं आहे.प्रत्येक व्यक्त्तीने जीवनामध्ये एकदा तरी ह्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे असे प्रसिद्ध शिक्षकांचे मत आहेत.
    • SSC- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघणाऱ्या विविध परीक्षांचा अभ्यास करून तुम्ही चांगल्या पगाराची नौकरी मिळवू शकता.आमच्या या संकेतस्थळवर स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघणाऱ्या सर्व अधिकृत जाहिराती आम्ही तुम्हाला इथे उपलब्ध करून देऊ.
    • Railways- RRB मार्फत विविध पदांसाठी जाहिराती प्रकाशित केल्या जातात.या पदांसाठी व्यवस्थित तयारी व अभ्यास करून तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी मिळवू शकता.रेल्वे विभागामधील नोकरी हि सेंट्रल गव्हर्नमेंट ची म्हणजेच केंद्र सरकारीची नौकरी असते.
    • Banking- बँकिंग परीक्षांचा अभ्यास करून देखील तुम्ही विविध सरकारी व खाजगी बँकांमध्ये काम करू शकता. व एस बी आय , पंजाब नॅशनल बँक,महाराष्ट्र बँक,बँक ऑफ इंडिया इ . सारख्या नॅशनलाईज बँकांमध्ये काम करू शकता.व नोकरी लागल्यानंतर वरील पदाचा अभ्यास करून बढती मिळवू शकता.
    • NDA- NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी होय. हि परीक्षा UPSC मार्फत घेतली जाते. वर्षातून दोनदा NDA ची प्रवेश परीक्षा घेतली जाते.याची नोटीफिकेशन एकदा जानेवारीमध्ये येते ज्याला NDA -1 म्हंटले जाते व दुसरी नोटीफिकेशन अंदाजे जून – जुलै दरम्यात येते.
    • Defenses
      • Border Security Force
      • Indian Coast Guard
      • Indian Army
      • Indian Air Force
      • Central Reserve Police Force
      • Indian Navy
  5. स्वतःचा व्यवसाय:- आज-काल खूप तरुण तरुणींचा कल व्यवसायाकडे वाढत चालला आहे.नव-नवीन टेक्नॉलॉजी नुसार नवीन बिसनेस आयडिया येत आहेत.जर तुम्हीही असे काही करू इच्छित असाल स्वतः चा व्यवसार करणे हा सुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो.

टीप :- वरील सर्व माहिती मी माझ्या ज्ञानानुसार व मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे.तरीही आपण आपले पालक,आपले नातेवाईक व तज्ञ व्यक्ती यांचा सल्ला अवश्य घ्यावा व आपले करिअर निवडावे.तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.

12 vi nantar kay karave

बारावी पास झाल्यानंतर काय करावे ?

बारावी पास झाल्यानंतर आपण बी ए, बी.कॉम, बी.एस सी मध्ये पदवी करू शकता. तसेच डिप्लोमा किंवा शॉर्ट टर्म कोर्स देखील करू शकता.

बारावी अयशस्वी झाल्यानंतर काय?

जर कोणी विद्यार्थी बारावीमध्ये अयशस्वी झाला/झाली असेल तर अशावेळी संबंधित अपात्र विद्यार्थी १० वी च्या शैक्षणिक पात्रतेवर घेता येऊ शकणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतो जसे की, आय.टी.आय किंवा डिप्लोमा.

मी बारावीत नापास झाल्यास काय करावे?

बारावीमध्ये नापास झाल्यास पुन्हा बारावीचे पेपर देऊ शकता किंवा डिप्लोमा, आय टी आय यांसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता.

12वी नंतर किती वर्षांनी पदवी पूर्ण करायची?

12 वी नंतर 3 ते 4 वर्षांनी तुम्ही पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवीधर होऊ शकता.

बारावीनंतर नोकरी करता येईल का?

होय , बारावीनंतर तुम्ही खाजगी तसेच सरकारी नोकरी करू शकता.

महत्वाच्या लिंक्स:-

आय टी आय कोर्से लिस्ट लिंक

पोलीस होण्यासाठी काय करावे लागते |ह्या गोष्टी करा आणि 2024 मध्ये महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल चे आपले लक्ष्य साकार करा!

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment