12 वी Arts नंतर काय करावे ।
Table of Contents
12 वी Arts नंतर काय करावे:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.12 वी कला शाखेमधून पास झाल्यानंतर विद्यार्थी तसेच पालकांना पडणारा प्रश्न म्हणजे “12 वी Arts नंतर काय करावे”.
कला शाखेमधून म्हणजेच आर्टस् शाखेमधून उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या समोर अनेक नव-नवीन करिअरच्या संधी उपलब्ध असतात.पण त्यापैकी कोणते करिअर आपल्यासाठी योग्य असेल हे कळण्यास मात्र अवघड जाते.परंतु जर आपण काही महत्वाच्या गोष्टींचा नीट विचार केला तर करिअर निवडणे सोपे होऊ शकते.
जसे कि तुम्ही तुमची आवड काय ,तुमच्याकडे स्वतःच्या करिअरला देण्यासाठी वेळ किती आहे,तुमच्यात कोणते कौशल्य गुण आहेत,तुमचे स्ट्रॉंग अँड वीक पॉईंट्स काय आहेत,तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे इत्यादी गोष्टींचा विचार जर तुम्ही केला तर करिअर निवडणे अधिक सोपे होऊ शकते.यामुळे तुमचा वेळ वाचण्यास मदत होते व योग्य दिशा मिळण्यासहि मदत मिळते.
हा लेखामध्ये आपण “12 वी Arts नंतर काय करावे ?” या बद्दल माहिती घेणार आहोत.तसेच सध्या लोकप्रिय असणाऱ्या करिअर ऑप्शन्स बद्दलही थोडक्यात माहिती घेणार आहोत.
12 वी Arts नंतर काय करावे । 12 vi arts nantar kay karave
बारावी आर्टस् शाखेमधून उत्तीर्ण झाल्यानंतर आपण खालील क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. त्याची लिस्ट खालील प्रमाणे.

- उच्च शिक्षण :- १२ वी आर्ट्स मध्ये पास झाल्यानंतर तुम्ही उच्च शिक्षणाचा पर्याय निवडू शकता जेणे करून भविष्यामध्ये तुम्ही उच्च शिक्षणाची नोकरी करू शकता.तसेच उच्च पदावर व जबाबदारीचे काम करू शकता. उदा. बी.ए.
- शिक्षक :- जर तुम्हाला शिक्षक होण्याची इच्छा असेल तर तुम्ही डी .एड करून तुमचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता व येणाऱ्या पिढीला शिकवून एक समाजकार्य सुद्धा करू शकता.
- पत्रकार :- जर तुम्हाला पत्रकारिता करणे आवडत असेल व ग्राउंड रिपोर्टींग करून जनतेसमोर ती परिस्थिती हुबेहूब मांडण्याची क्षमता व कला तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करू शकता.यासाठी तुम्हाला बैचलर ऑफ जर्नलिज्म एंड मास कम्युनिकेशन म्हणजेच BJMC हा 03 वर्ष कालावधीचा कोर्स करावा लागेल.
- हॉटेल मॅनेजमेंट :- जर तुम्ही हॉटेल व्यवसाय किंवा हॉटेल मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही BHM म्हणजेच बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि MHM म्हणजेच मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून हॉटेल मॅनेजमेंट फिल्ड मध्ये चांगले करिअर करू शकता.
- व्यायसायिक प्रशिक्षण :- व्यावसायिक शिक्षणामध्ये विविध करिअर क्षेत्रांचा समावेश आहे जसे कि , नृत्य ,फिल्म निर्मिती आणि डायरेक्शन ,फॅशन डिझायनिंग , अभिनय व कला अशा अनेक प्रकारच्या कोर्सेस च्या माध्यमातून आपण आपले करिअर घडवू शकता.
- स्पर्धा परीक्षा :- स्पर्धा परीक्षा तयारी मध्ये वेगवेगळे विभाग व त्या विभागाच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात.जसे कि MPSC ,UPSC, रेल्वे , SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन , बँकिंग इत्यादी. तुमच्या आवडीनुसार व कौशल्यानुसार तुम्ही पद निवडून त्या पदाचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता.
- इतर कोर्सेस :- इतर कोर्सेस मध्ये तुम्ही चालू ट्रेंड्स नुसार करिअर निवडून संबंधित विषयाचा कोर्स करू शकता.यामध्ये खूप सारे पर्याय आता उपलब्ध आहेत जसे कि डिजिटल मार्केटिंग,ग्राफिक्स डिझाईन,इव्हेंट मॅनॅजमेण्ट तसेच Freelancing हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो.
- सामाजिक कार्य : जर तुम्हाला समाजासाठी काही मदत करायची असेल तर सामाजिक कार्य हा हि पर्याय तुम्ही निवडू शकता पण त्या आधी तुम्ही स्वतः स्वावलंबी असणे महत्वाचे आहे.
12 vi nantar diploma । 12 वी नंतर डिप्लोमा
बारावी आर्टस् नंतर जर तुमच्याकडे पुरसा वेळ नसेल व लवकर नोकरीची गरज असेल तर अशा वेळेस डिप्लोमा कोर्स करणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो.तुम्ही तुमच्या आवडीनुसार शाखा निवडून त्यामध्ये डिप्लोमा करू शकता व लवकर नोकरी मिळवून शकता.
- डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअरिंग :- तुम्ही जर रोड, ब्रिज , बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन यासारख्या विषयांमध्ये तुमची रुची असेल तर तम्ही डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअरिंग हा तीन वर्षांचा कोर्स करून नोकरी किंवा कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय करू शकता.तसेच पुढे उच्च शिक्षण घेऊ इच्छित असाल तर बी.ई. किंवा बी.टेक. करू शकता.
- डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनीअरिंग :- तुम्हाला जर ऑटोमोबाईल,मशीन्स,कंपनी मॅनुफॅक्चरिंग,मेंटेनंस यांसारख्या विषयाची आवड असेल तर तुम्ही डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनीअरिंग करू शकता .तसेच पुढे उच्च शिक्षण घेऊ इच्छित असाल तर बी.ई. किंवा बी.टेक. करू शकता.
12 vi nantar diploma
- डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग :- तुम्हाला जर इलेक्ट्रिकल फिल्ड मध्ये आवड असेल तर तुम्ही डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग हा तीन वर्षांचा कोर्स करू शकता.तसेच पुढे उच्च शिक्षण घेऊ इच्छित असाल तर बी.ई. किंवा बी.टेक. करू शकता.
- डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग :- तुम्हाला जर कॉम्पुटर ची आवड असेल तर तुम्ही डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग हा तीन वर्षांचा कोर्स करू शकता.तसेच पुढे उच्च शिक्षण घेऊ इच्छित असाल तर बी.ई. किंवा बी.टेक. करू शकता.व आय टी फिल्ड मध्ये जाऊ इच्छित असाल तरी जाऊ शकता.
- डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग:- जर तुम्ही designing, fabricating, testing या सारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करू इच्छित असाल तर डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
12 vi nantar mpsc ।12 वी नंतर MPSC
12 वी नंतर जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सरकारी नौकरी हवी असेल तर तुम्ही MPSC परीक्षा पास होऊन तुमचे हे स्वप्न पूर्ण करू शकता.महाराष्ट्रामध्ये MPSC विभागामार्फत अनेक पदांसाठी जाहिराती निघत असतात.त्यापैकी तुम्हाला आवडणारी व योग्य असणारी पोस्ट निवडून तुंम्ही अभ्यास करू शकता व नोकरी मिळवू शकता.
MPSC च्या परीक्षेमार्फत तुम्ही PSI, STI, ASO यांसारख्या पदांसाठी तयारी करू शकता. जर तुम्हाला या पदांसाठी तयारी करायची असे तर तुम्हाला खालील काही गोष्टी तयारीमध्ये मदत करतील.
समजा जर तुम्ही शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असे ठरवले असेल व त्यानुसार शालेय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल तर तुम्हला mpsc च्या परीक्षा इतरांएवढ्या अवघड वाटणार नाही.परंतु जर तुम्ही बारावी पास झाल्यानंतर mpsc किंवा स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हीही अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करून तुमच्या स्वप्नाची ध्येय पूर्ती करू शकता. तुम्हाला अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन यासाठी काहि टिप्स तुमच्यासाठी खाली देत आहोत.जेणेकरून तुम्हाला तुमच्या ध्येयाचे नियोजन करता येईल.
- सर्वात आधी सिलॅबस समजून घ्या :- कोणतिही परीक्षा देण्याआधी त्या परीक्षेचा व त्या विशिष्ट पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्या. यामध्ये अंकगणित,बुद्धिमत्ता चाचणी,मराठी किंवा इंग्रजी व्याकरण,सामान्य ज्ञान , चालू घडामोडी अशा विषयांची गुण विभागणी कशा प्रकारे केलेली आहे याची संपूर्ण माहिती घ्या.व त्या नुसार नियोजन करा.
- बेसिक पक्के करा :- आता तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे सर्व विषय समजल्यानंतर तुम्ही तुमचे बेसिक ज्ञान पक्के करून घ्यावे.यामध्ये पाढे,वर्ग,बेसिक व्याकरण,भूगोल,इतिहास इत्यादी विषयांचा समावेश असू शकतो.
- चालू घडामोडीवरती लक्ष असू द्या.:- यासाठी दैनंदिन वृत्तपत्रे वाचन करू शकता,तसेच साप्ताहिके वाचू शकता.चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे याकडे दुर्लक्ष करू नका.
- प्रश्नपत्रिका सराव :-mpsc विभागाच्या होऊन गेलेल्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा तसेच नमुना प्रश्नपत्रिका सोडवा व समजून घ्या.प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी लागलेला वेळ व नोकरी विभागाकडून मिळणार वेळ याचा आढावा घ्या व वेळोवेळी नियोजनामध्ये सुधार व बदल करत राहा.
अशा प्रकारे आपण “12 वी Arts नंतर काय करावे “ ह्या प्रश्नाबद्दल माहिती घेतली.तरीही तुम्ही निवडलेल्या करिअर ऑप्शन मध्ये जे तज्ञ व अनुभवी व्यक्ती असतील त्यांचा व पालकांचा तसेच शिक्षकांचा सल्ला अवश्य घ्या.
मास मीडिया म्हणजे काय ?
मास मीडिया मध्ये विविध क्षेत्रांचा समावेश होतो जसे कि,चित्रपट,चित्रवाहिनी,वर्तमान पत्रे,मासिके,साप्ताहिके यांचा आपण मास मीडिया असं म्हणतो.
महत्वाच्या लिंक्स:-
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"