सहायक कक्ष अधिकारी माहिती |MPSC मधून (ASO) सहायक कक्ष अधिकारी कसं होता येईल याची संपूर्ण माहिती.

माहिती शेअर करा.

सहायक कक्ष अधिकारी माहिती

Table of Contents

सहायक कक्ष अधिकारी माहिती:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

सहायक कक्ष अधिकारी माहिती ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

नवीनतम प्रकाशित भरती :-

सहायक कक्ष अधिकारी माहिती

या पोस्ट मध्ये आपण सहायक कक्ष अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते या बद्दल माहिती घेणार आहोत.या पोस्टमध्ये तुम्हाला सहायक कक्ष अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,परीक्षा पद्दत, परीक्षेचे स्वरूप,नियुक्ती,कामाचे स्वरूप,पदोन्नतीच्या संधी,वेतन अशा अनेक बाबींबद्दल माहिती मिळणार आहे.

म्हणून हि माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अभ्यासाचे नियोजन करून आगामी सहायक कक्ष अधिकारी च्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हा.

सहायक कक्ष अधिकारी होण्यासाठी तुम्हाला MPSC मार्फत घेण्यात येणारी MPSC Combine Group B and Group C हि परीक्षा द्यावी लागते.हि परीक्षा दोन भागांमध्ये विभागलेली असते.

शैक्षणिक पात्रता :- पदवीधर

mpsc aso post information in marathi

MPSC मधून सहायक कक्ष अधिकारी होण्यासाठी उमेदवाराला खालील प्रमाणे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या २ परीक्षा द्याव्या लागतात. परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची माहिती, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा अभ्यासक्रम, परीक्षेमध्ये अवलंबली जाणारी निगेटिव्ह मार्किंग पद्धती इ. ची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

या परीक्षेमध्ये १/४ निगेटिव्ह मार्किंग पद्धती अवलंबली जाते.म्हणजेच ४ चुकीच्या उत्तरांसाठी १ गुण वजा करण्यात येतो. म्हणून दिलेल्या प्रश्न काळजीपूर्वक वाचून मगच दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्याय निवडावा अन्यथा गुण वजा केले जाऊ शकतात.

aso information in marathi

पूर्व परीक्षा :- पूर्व परीक्षा हि एकूण १०० गुणांची असते.यामध्ये यामध्ये इतिहास,भूगोल,राजकारण,अर्थव्यवस्था,विज्ञान,अंकगणित आणि बुद्धिमत्ता,चालू घडामोडी या विषयांचा समावेश असतो.पूर्व परीक्षेमध्ये या सर्व विषयांशी संबंधीत एकूण १०० प्रश्न विचारले जातात.हे १०० प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवाराला एकूण १ तास/६० मि. एवढा वेळ दिला जातो.

मुख्य परीक्षा :- मुख्य परीक्षेमध्ये एकूण २ पेपर असतात.पेपर क्रमांक १ हा २०० गुणांसाठी आणि पेपर क्रमांक २ हा देखील एकूण २०० गुणांसाठी घेतला जातो.

अश्या प्रकारे मुख्य परीक्षा हि एकूण ४०० गुणांची असते. यामधील पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक २ ची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

पेपर क्रमांक १ :-पेपर १ हा एकूण २०० गुणांसाठी घेतला जातो.यामध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन विषयांचा समावेश असतो.पेपरमध्ये मराठी विषयाशी संबंधीत एकूण ५० प्रश्न विचारले जातात आणि इंग्रजी विषयाशी संबंधित एकूण ५० प्रश्न विचारले जातात.असे एकूण १०० प्रश्न पेपर क्रमांक १ मध्ये विचारले जातात.

प्रत्येक प्रश्न प्रत्येकी २ गुणांसाठी विचारला जातो. हे १०० प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवाराला एकूण १ तास/६० मि. एवढा वेळ दिला जातो.

या परीक्षेमध्ये देखील १/४ हि निगेटिव्ह मार्किंग पद्धत अवलंबली जाते.म्हणजेच ४ चुकीच्या उत्तरांसाठी १ गुण वजा करण्यात येतो.त्यामुळे दिलेल्या पर्यायांमधून उत्तर निवडत असताना काळजी आणि खबरदारी घ्यावी अन्यथा मिळालेल्या गुणांमधून चुकीच्या उत्तरासाठी कपात केली जाऊ शकते.

म्हणून उत्तराच्या दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडतांना आधी खात्री करावी मगच पर्याय निवडावा अन्यथा गुणांचे नुकसान होऊ शकते.

सहायक कक्ष अधिकारी माहिती
सहायक कक्ष अधिकारी माहिती

पेपर क्रमांक २ :- पेपर क्रमांक २ मध्ये एकूण १०० प्रश्न विचारले जातात.प्रत्येक प्रश्न प्रत्येकी २ गुणांसाठी विचारला जातो.यामध्ये खालील विषय असतात.

सहायक कक्ष अधिकारी म्हणजे काय

सहायक कक्ष अधिकारी याच पदाला ASO म्हणजेच Assistant Section Officer असे म्हणतात.

aso work in maharashtra in marathi । mpsc aso post information in marathi

पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यामधून निवड झाल्यानंतर उमेदवाराला मुंबई येथे मंत्रालय किंवा MPSC कार्यालय या ठिकाणी नियुक्ती दिली जाते.नियुक्ती मिळाल्यानंतर कार्यालयीन कामकाजामध्ये खालील कामांचा समावेश होतो.

  • दैनंदिन कामकाजाचे नियोजन करून अधिकारी,कर्मचारी यांच्याशी संपर्क साधणे.
  • कक्ष अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार व नियमानुसार प्रस्ताव बनवणे.
  • प्रस्ताव मंत्री किंवा सचिव (सेक्रेटरी) यांच्याकडे सादर करणे.
  • माहिती आणि नोंदी यांचे संग्रहण करणे.
  • कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला निर्णय घेण्यात कायदेशीर सल्ला देणे. इत्यादी

सहायक कक्ष अधिकारी पगार

सहायक कक्ष अधिकारी यांना अंदाजे 38,600 ते 1,22,800 रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाते याव्यतिरिक्त शासनाकडून इतर भत्ते देखील दिले जातात.पगारामध्ये व भत्यांसाठी मिळणाऱ्या रकमेमध्ये नियुक्ती मिळालेल्या जिल्ह्यानुसार आणि शासकीय निर्णयानुसार बदल आढळू शकतो.

पदोन्नतीच्या / प्रमोशनच्या संधी :- जर तुम्ही सहायक कक्ष अधिकारी या पदावर नियुक्त झालात तर तुम्हाला भविष्यामध्ये सहायक कक्ष अधिकारी पदावरून कक्ष अधिकारी या पदावर पदोन्नती दिली जाऊ शकते.

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-

ASO चांगली नोकरी आहे का?

हो, ASO म्हणजेच Assistant Section Officer हि चांगली नोकरी आहे कारण मंत्रालय किंवा इतर सरकारी कार्यालयांमध्ये ASO अधिकारी कक्ष अधिकारी यांचे सहायक म्हणून काम करत असतात.

MPSC मध्ये ASO म्हणजे काय?

MPSC मध्ये ASO म्हणजे Assistant Section Officer याच पदाला मराठीमध्ये सहायक कक्ष अधिकारी असेही म्हणतात.

aso आणि sti म्हणजे काय?

MPSC मध्ये ASO म्हणजे Assistant Section Officer आणि STI म्हणजे State Tax Inspector.

MPSC मध्ये ASO म्हणजे काय?

MPSC मध्ये ASO म्हणजे Assistant Section Officer यालाच मराठीमध्ये सहायक कक्ष अधिकारी असे म्हणतात.

सहायक कक्ष अधिकारी होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते ?

सहायक कक्ष अधिकारी होण्यासाठी उमेदवाराला MPSC मार्फत घेण्यात येणारी MPSC Combine Group B and Group C हि परीक्षा द्यावी लागते

सहायक कक्ष अधिकारी पदाची परीक्षा किती भागांमध्ये घेतली जाते ?

सहायक कक्ष अधिकारी पदाची परीक्षा दोन टप्प्यांमध्ये विभागलेली आहे . त्यापैकी पूर्व परीक्षा हा पहिला टप्पा असतो तर मुख्य परीक्षा हा दुसरा टप्पा असत्तो .

सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का ?

होय , सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत असते. निगेटिव्ह मार्किंग १/४ याप्रमाणे असते त्यानुसार ४ चुकीच्या उत्तरांसाठी १ गुण वजा केला जातो .

सहायक कक्ष अधिकारी यांचे काम काय असते ?

दैनंदिन कामकाजाचे नियोजन करणे, अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांच्याशी संपर्क साधणे,
प्रस्ताव बनवणे, माहिती आणि नोंदी ठेवणे इत्यादी कामे सहायक कक्ष अधिकारी या पदावरील अधिकाऱ्यांना करावी लागतात.

सहाय्यक म्हणजे काय?

सहाय्यक या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे त्यानुसार सहाय्यक म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या सहकाऱ्यांना कामामध्ये मदत करते .

सहायक कक्ष अधिकारी पगार पदावरील व्यक्तीला किती पगार दिला जातो ?

सहायक कक्ष अधिकारी या पदावरील व्यक्तीला अंदाजे 38,600 रुपये ते 1,22,800 रुपये एवढे वेतन प्रतिमहिना दिले जाते.या पगारामध्ये नियुक्तीचे ठिकाण ,अनुभव यानुसार बदल आढळू शकतो.

ASO परीक्षेची तयारी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

ASO म्हणजेच Assistant Section Officer या पदाच्या परीक्षेची तयारी करतांना अभ्यासासोबतच तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे अवश्य लक्ष द्या आणि मिळालेल्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करा.

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment