अंगणवाडी सेविका पात्रता
Table of Contents
अंगणवाडी सेविका पात्रता:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. या पोस्टमध्ये आपण अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय पात्रता असते आणि अंगणवाडी सेविका कसे होता येते याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. या आधीच्या पोस्टमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस होण्यासाठी काय पात्रता आवश्यक असते याची सविस्तर माहिती पाहिली होती. त्यामुळे आता यापोस्टमध्ये आपण फक्त अंगणवाडी सेविका या पदाबद्दल माहिती घेणार आहोत.यामध्ये तुम्हाला मुख्यतः खालील प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होईल,
- अंगणवाडी सेविका होण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे?
- अंगणवाडी सेविका होण्यासाठी शैक्षणिक पात्रता किती आहे?
- अंगणवाडी सेविका होण्यासाठी परीक्षा असते कि नसते?
- अंगणवाडी सेविका या पदावर नियुक्ती मिळण्यासाठी गुणांचे डिस्ट्रिब्युशन कसे केले जाते?
- अंगणवाडी सेविका पदासाठी कागदपत्रांच्या आधारे कसे मूल्यांकन केले जाते?
- अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करणारी उमेदवार विधवा असल्यास किती गुण अतिरिक्त दिले जातात?
- अंगणवाडी सेविका होण्यासाठी जात प्रवर्गानुसार कोणत्या प्रवर्गासाठी किती गुण आले जातात?
अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पोस्टमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेली आहेत. ज्याचा उपयोग तुम्हाला अंगणवाडी सेविका या पदावर नियुक्ती मिळवण्याच्या प्रवासामध्ये होणार आहे. “अंगणवाडी सेविका पात्रता” हि पोस्ट वाचल्यानंतर तुमच्या मनातील अंगणवाडी सेविका या पदाबद्दल असणाऱ्या बहुतेक शंकांचं निरसन होणार आहे त्यामुळे हि महत्वपूर्ण पोस्ट लक्ष देवून वाचा आणि त्यानुसार नियोजन करा.
तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
नवीनतम प्रकाशित भरती :-
- NHM Nashik Recruitment 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025
- Bank Of India Bharti 2025-खुशखबर ! बँक ऑफ इंडिया भरती 2025
- CISF Driver Recruitment 2025 । कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदाच्या 1124 जागा
- UCO Bank LBO Recruitment 2025 | युको बँक भरती 2025
- NHM beed recruitment 2025 | पगार 75000/-₹ ते 85000/-₹
अंगणवाडी स्पेशल पोस्ट्स :-
- अंगणवाडी सुपरवायझर भरती 2024 | Anganwadi Bharti 2024
- अंगणवाडी मदतनीस पात्रता, कामे, महत्वाची कागदपत्रे,वेतन इ. बद्दल संपूर्ण माहिती.
अंगणवाडी सेविका पात्रता
महाराष्ट्रातील बहुसंख्य महिला आणि गृहिणी वर्ग यांची आवडती नोकरी म्हणजे अंगणवाडी सेविका. महिला वर्ग आणि गृहिणी यांना ही नोकरी आवडण्याची अनेक करणे आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे अंगणवाडी सेविकेची नोकरी तुम्ही जेथील स्थानिक रहिवासी असता तेथे हि नोकरी करू शकता. स्थानिक रहिवासी ठिकाणी अंगणवाडी सेविका होता येते याचा अर्थ , अंगणवाडी सेविकेसाठी अर्ज करणारी महिला ज्या महानगरपालिका / नगर पंचायत / महानगरपालिकेच्या हद्दीमधील रहिवासी असेल फक्त त्याच क्षेत्रामध्ये अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज करू शकते.
जर सदर महिला ज्या अंगणवाडीसाठी अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज करत आहे त्या क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी नसेल तर त्या महिलेचा आवेदन अर्ज रद्द केला जाऊ शकतो आणि भरती प्रक्रियेमधून बाद केले जाऊ शकते.त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी असाल त्याच क्षेत्रामधील पालिका/पंचायत हद्दीतील अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज करा जेणेकरून तुम्ही अपात्र होणार नाहीत.
अंगणवाडी सेविका माहिती
अंगणवाडी सेविका या पदासाठी पूर्वी १० वी पास हि शैक्षणिक पात्रता लागत होती. परंतु शासनाच्या “महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र.एबावि.-२०२२/प्र.क्र. ९४/का.०६” नुसार हि शैक्षणिक पात्रता वाढवून अंगणवाडी सेविका या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता हि इयत्ता १२ वी उत्तीर्ण एवढी करण्यात आलेली आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविका या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अंगणवाडी सेविका या पदासाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकतात. अंगणवाडी सेविका होण्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जात नाही मात्र शैक्षणिक पात्रतेच्या निकषावर आणि कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून पात्र महिला उमेदवाराला नियुक्ती दिली जाते.
अंगणवाडी सेविका या पदासाठी एकूण १०० गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर केली जाते आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी करून संबंधित महिला उमेदवाराला नियुक्ती दिली जाते. या १०० गुणांपैकी ७५ गुण हे शैक्षणिक अर्हतेच्या आधारे दिले जातात तर उर्वरित २५ गुण अतिरिक्त निकषावर अवलंबून असतात.आता आपण शैक्षणिक पात्रतेच्या निकषावरून आणि अतिरिक्त निकषावरून कसे मूल्यांकन/ गुण दिले जातात याची सविस्तर माहिती घेऊ,
अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय करावे लागेल
एकूण गुण : 100
शैक्षणिक अर्हतेनुसार देण्यात येणारे गुण :- 75 गुण
इयत्ता 12 वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या (%) आधारे उमेदवाराला देण्यात येणारे गुण
उमेदवारांना त्यांनी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे खालीलप्रमाणे गुण दिले जातात.
- जर उमेदवाराला इयत्ता 12 वी मध्ये 80% किंवा त्याहून अधिक गुण असतील तर त्या उमेदवाराला 60 गुण दिले जातात.
- जर उमेदवाराला इयत्ता 12 वी मध्ये 70.01 % ते 80% या दरम्यान गुण असतील तर त्या उमेदवाराला 55 गुण दिले जातात.
- जर उमेदवाराला इयत्ता 12 वी मध्ये 60.01% ते 70% या दरम्यान गुण असतील तर त्या उमेदवाराला 50 गुण दिले जातात.
- जर उमेदवाराला इयत्ता 12 वी मध्ये 50.01% ते 60% या दरम्यान गुण असतील तर त्या उमेदवाराला 45 गुण दिले जातात.
- जर उमेदवाराला इयत्ता 12 वी मध्ये 50% ते 40% या दरम्यान गुण असतील तर त्या उमेदवाराला 40 गुण दिले जातात.
- आणि जर उमेदवाराला 40% पेक्षा कमी गुण असतील तर अशा उमेदवाराला सरासरी 35 गुण देण्यात येतात.
उमेदवार जर पदवीधर असेल तर पदवीला मिळालेल्या गुणांच्या आधारे देण्यात येणारे गुण: 5 पर्यंत
जर उमेदवार पदवीधर असेल तर उमेदवाराने पदवीला मिळवलेल्या गुणांच्या आधारे खालीलप्रमाणे गुण देण्यात येतात.
- जर उमेदवार पदवीधर असेल आणि पदवीमध्ये 80% किंवा त्याहून अधिक गुण असतील तर त्या उमेदवाराला 05 गुण दिले जातात.
- जर उमेदवार पदवीधर असेल आणि पदवीमध्ये 70.01 % ते 80% या दरम्यान गुण असतील तर त्या उमेदवाराला 04 गुण दिले जातात.
- जर उमेदवार पदवीधर असेल आणि पदवीमध्ये 60.01% ते 70% या दरम्यान गुण असतील तर त्या उमेदवाराला 03 गुण दिले जातात.
- जर उमेदवार पदवीधर असेल आणि पदवीमध्ये 50.01% ते 60% या दरम्यान गुण असतील तर त्या उमेदवाराला 02 गुण दिले जातात.
- जर उमेदवार पदवीधर असेल आणि पदवीमध्ये 40.01% ते 50% या दरम्यान गुण असतील तर त्या उमेदवाराला 01 गुण दिला जातो.
जर उमेदवार पदव्युत्तर असेल तर मिळालेल्या गुणांच्या आधारे देण्यात येणारे गुण = 04
जर उमेदवार पदव्युत्तर असेल त्या अशा उमेदवारास खालील प्रमाणे गुण दिले जातात.
- उमेदवाराचे डी.एड. झालेले असल्यास = 02 गुण
- उमेदवाराचे बी.एड. झालेले असल्यास = 02 गुण
- उमेदवाराचे MS-CIT झालेले असल्यास = 02 गुण
या व्यतिरिक्त उमेदवाराला अतिरिक्त अर्हतेनुसार देखील गुण दिले जातात त्याबद्दलची माहिती खाली देण्यात आलेली आहे.
अंगणवाडी सेविका पात्रता महाराष्ट्र
अतिरिक्त अर्हतेनुसार उमेदवाराला देण्यात येणारे गुण :- 25
- उमेदवार विधवा किंवा अनाथ असल्यास = 10 गुण
- उमेदवार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास = 10 गुण
- उमेदवार इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जाती / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग यामधून असल्यास = 05 गुण
- जर संबंधित अर्जदार महिला उमेदवाराने अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणून किमान 02 वर्ष काम केल्याचा अनुभव असल्यास = 05 गुण
अशा प्रकारे एकूण १०० गुणांवर तुमची नियुक्ती अवलंबून असते.जास्तीत जास्त गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून त्यांना नियुक्ती देण्यात येते.

अंगणवाडी सेविका मानधन
महाराष्ट्र सरकारच्या माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी सभागृहामध्ये दिलेल्या भाषणानुसार महाराष्ट्रामधील अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे.याआधी महाराष्ट्रामधील अंगणवाडी सेविका यांना सुमारे 8,325/- रुपये प्रतिमाह एवढे वेतन दिले जात होते परंतु मानधनात वाढ केल्यानंतर हे मानधन 8,325/- रुपये वरून सुमारे 10,000/- एवढे करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे मिनी अंगणवाडी सेविका यांच्याही मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यापूर्वी मिनी अंगणवाडी सेविका यांना 5,975/- रुपये प्रतिमाह इतके वेतन दिले जात होते परंतु आता या मानधनामध्ये वाढ करून आता अंगणवाडी सेविका यांना 7,200/- रुपये प्रतिमाह इतके वेतन दिले जाणार आहे असा दावा मुख्यमंत्री यांनी केलेला आहे.
अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळणार काय
मार्च २०२४ रोजी विधानसभेमध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी पेन्शन योजना राबवण्यात यावी असा प्रस्ताव मांडण्यात आला होता, यासाठी संपही करण्यात आलेले होते .त्याचवर्षी जुलै महिन्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मिळावी असाही प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार अंगणवाडी सेविका आणि त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस यांना पेन्शन तसेच ग्रॅज्युइटी देण्याच्या तयारीमध्ये आहे. ग्रॅज्युइटीची अंदाजे रक्कम 1,55,000/- ते 1,76,000/- रुपये यादरम्यान आहे, ज्याचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळू शकतो, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आलेला आहे.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
महाराष्ट्रात अंगणवाडी पर्यवेक्षकाची पात्रता काय आहे?
महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्याची किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर अशी आहे.
अंगणवाडीला इंग्रजीत काय म्हणतात?
अंगणवाडीला इंग्रजीमध्ये विविध नावे आहेत जसे कि, Courtyard Shelter / Early Childhood Care Center किंवा Pre-School Center.
अंगणवाडीचे मुख्य कार्य काय आहे?
लसीकरण, आरोग्य तपासणी आणि बालकांना पोषक आहार देणे हे अंगणवाडीचे मुख्य कार्य आहे.
मिनी अंगणवाडी म्हणजे काय?
मिनी अंगणवाडी हा एकात्मिक बाल विकास योजनेचाच एक भाग आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागामधील लहान बालकांना पूर्व शालेय शिक्षण, पोषक आहार आणि आरोग्य तपासणी यांसारख्या सुविधा मिनी अंगणवाडीमार्फत दिल्या जातात.
गर्भवती महिलांसाठी अंगणवाडीचे काय फायदे आहेत?
गर्भवती महिलेच्या नवजात बालकाला लसीकरण हि महत्वाची सुविधा अंगणवाडीमार्फत दिली जाते तसेच पोषक आहार देखील दिला जातो.
अंगणवाडी सेविका बनण्यासाठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे?
अंगणवाडी सेविका बनण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता आधी 10 वी उत्तीर्ण एवढी होती परंतु सध्या हि पात्रतां वाढवून 12 वी उत्तीर्ण इतकी करण्यात आलेली आहे.
अंगणवाडी सेविकेने स्वतःची क्षमता कशी वाढवावी?
अंगणवाडी सेविकांसाठी विविध प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित केल्या जात असतात त्यामार्फत अंगणवाडी सेविका आपल्या कामकाजाची कार्यक्षमता वाढवू शकतात.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"