Nursing Course Information in Marathi
Table Of Content
Table of Contents
Nursing Course Information in Marathi:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. सदर पोस्टमध्ये आपण नर्सिंग या क्षेत्राबद्दलची सर्व महत्वपूर्ण माहिती घेणार आहोत. ज्यामध्ये मुख्यतः तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत मिळणार आहे.
- नर्सिंग म्हणजे काय ?
- नर्सिंग हे क्षेत्र फक्त महिलांसाठी किंवा फक्त मुलींसाठीच असते का ?
- नर्सिंग कोर्सेस करण्यासाठी किती शैक्षणिक पात्रता आवश्यक असते?
- नर्सिंग कोर्स करण्यासाठी किती वयोमर्यादा असते?
- नर्सिंग मध्ये कोणकोणते कोर्सेस आणि पदवी अभ्यासक्रम आहेत?
- नर्सिंग मधील कोर्सेस पूर्ण केल्यानंतर करिअरच्या संधी काय आहेत?
- जर आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर नर्सिंग मधील कोणता कोर्स करणे कमी खर्चिक असेल? इत्यादी.
प्रश्नांची उत्तरे आणि मार्गदर्शन तुम्हाला “नर्सिंग कोर्स डिटेल्स मराठी ” ह्या पोस्टमध्ये मिळणार आहे.या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल.त्यामुळे हि पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि नर्सिंग मधील योग्य कोर्स निवडून आणि यशस्वीरीत्या अभ्यासक्रम पूर्ण करून करिअरची नवी सुरुवात करा.
तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
Nursing Course Information in Marathi
Nursing Course Information in Marathi या पोस्टची सुरुवात आपण एका गैरसमजाला दूर करून करूयात.,आणि तो गैरसमज म्हणजे बहुतेक विद्यार्थी आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना असे वाटते कि “नर्सिंग हे क्षेत्र फक्त महिलांसाठी आणि मुलींसाठीच आहे.” परंतु असे नाहीए.
नर्सिंग या क्षेत्रामध्ये पुरुष किंवा मुले देखील कोर्स आणि अभ्यासक्रम पूर्ण करून चांगले करिअर करू शकतात. नर्सिंग या क्षेत्राला जेवढी महिला वर्गाची गरज आहे तेवढीच गरज पुरुष वर्गाची देखील आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या अनेक सुवर्ण संधी दोन्ही वर्गांसाठी आहेत. चला तर मग, आपल्या मूळ मुद्याकडे वळूयात.
नर्सिंग व्याख्या मराठी
आपण नर्सिंग या क्षेत्राची आणि त्यामधील करिअर संधींची माहिती घेणार आहोत. याची सुरुवात आपण करू, “नर्सिंग म्हणजे नेमकं काय?” या प्रश्नापासून.
नर्सिंग म्हणजे नेमकं काय ? नर्सिंग ची व्याख्या काय आहे? Nursing mhanje kay in marathi
“नर्सिंग हे असे वैद्यकीय व्यावसायिक क्षेत्र आहे ज्या क्षेत्राच्या माध्यमातून वैद्यकीय कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देऊन रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, रुग्णांना आजारामधून बरे करण्यासाठी त्यांची वैद्यकीय आणि मानसिक पद्धतीने मदत केली जाते आणि त्यांना सेवा दिली जाते तसेच त्यांना आरोग्यविषयक शिक्षणही दिले जाते.”
रुग्णांना वरील सेवा देण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी घडवण्याचे महत्वपूर्ण काम नर्सिंग या क्षेत्रामार्फत केले जाते आणि त्यांना व्यावसायिक वैद्यकीय प्रशिक्षण दिले जाते.
नर्सिंग कोर्स डिटेल्स मराठी
आता नर्सिंग या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी कोणकोणते कोर्सेस आहेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.नर्सिग या क्षेत्रामध्ये मुख्यतः तीन कोर्सेस आहेत आणि ते म्हणजे,
nursing full form in marathi
- ANM (Auxiliary Nurse Midwife)
- GNM (General Nursing and Midwifery)
- B.Sc. Nursing (Bachelor of Science in Nursing)
वरील सर्व कोर्सेसची आपण आता एकेक करून थोडक्यात माहिती घेऊ.
नर्सिंग साठी काय करावे लागते

1] ANM :- ANM या कोर्सचे पूर्ण रूप Auxiliary Nurse Midwife असे आहे. हा एक डिप्लोमा लेव्हलचा नर्सिंग कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला आरोग्यसेवा, लसीकरण, नर्सिंगचे मूलभूत ज्ञान, मानवी शरीर, आहार आणि पोषण, माता आणि बाल आरोग्य यांसारख्या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
Nursing Course Marathi
जर तुम्हाला ग्रामीण भागातील लोकांची सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही हा कोर्स पूर्ण करून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करू शकता आणि तुमची सेवा येऊ शकता.
- किमान शैक्षणिक पात्रता : ANM हा नर्सिग कोर्स करण्यासाठी तुम्ही किमान इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- कोर्सचा कालावधी : ANM हा कोर्स 2 वर्ष कालावधीचा कोर्स आहे.
- आवश्यक वयोमर्यादा : ANM हा कोर्स पूर्ण करण्यासाठी किमान 17 वर्ष ते कमाल 35 वर्ष वय असणे आवश्यक आहे.
- करिअरच्या संधी : Max Hospital, Manipal Hospital, Apollo Hospital या आणि यांसारख्या अनेक हॉस्पिटलमध्ये तसेच आरोग्य केंद्रांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.
जर तुमची आर्थिक परिस्थिती ठीक नसेल आणि लवकर अभ्यासक्रम पूर्ण करून कमी खर्चामध्ये नोकरी मिळवायची असेल तर ANM हा कोर्स करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
नर्सिंग कोर्स विषयी माहिती
2] GNM :- GNM या कोर्सचे पूर्ण रूप General Nursing and Midwifery असे आहे. हा देखील डिप्लोमा लेव्हलचा नर्सिंग कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला रुग्णांची काळजी घेणे, गर्भवती महिला आणि नवजात शिशूंची काळजी घेणे, आधारभूत सुविधा जसे कि , आरोग्य शिक्षण देणे, लसीकरण देणे इत्यादी बद्दलचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच अभ्यासक्रमामध्ये जैविक विज्ञान, संसर्गजन्य रोग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, पेडियाट्रिक नर्सिंग यांसारख्या विषयांचा समावेश असतो.
Nursing Course in Marathi
- किमान शैक्षणिक पात्रता : नर्सिंग मधील GNM या कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमधून किमान 40 % गुणांनी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- कोर्सचा कालावधी : GNM हा कोर्स 3 वर्ष कालावधीचा नर्सिंग कोर्स आहे.
- करिअरच्या संधी : हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आरोग्य केंद्रामध्ये, रुग्णालयामध्ये, नर्सिंग होममध्ये काम करण्याची आणि सेवा देण्याची संधी मिळते.
नर्सिंग कोर्स ची माहिती
3] B.Sc. Nursing :- B.Sc. Nursing या कोर्सचे पूर्ण रूप Bachelor of Science in Nursing असे आहे. हा एक पदवी लेव्हलचा नर्सिंग कोर्स आहे. या कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला नर्सिंग या वैद्यकीय क्षेत्रामधील विविध विषयांचे सखोल ज्ञान आणि प्रशिक्षण दिले जाते. ज्यामुळे हा नर्सिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामधील उच्च पदांवर काम करण्याची संधी मिळते आणि त्यामुळे उच्च वेतन आणि आर्थिक स्थेर्य मिळण्यास मदत होते.
या पदवी स्तरीय कोर्समध्ये तुम्हाला बायोकेमिस्ट्री, मानसशास्त्र, सुक्षजीवशास्त्र, समाजशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, चाईल्ड हेल्थ नर्सिंग यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान आणि प्रशिक्षण दिले जाते.
- किमान शैक्षणिक पात्रता : नर्सिंग मधील B.Sc. Nursing या कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि इयत्ता 12 वी च्या अभ्यासक्रमध्ये Physics, Chemistry आणि Biology हे विषय असणे आवश्यक आहे.
- कोर्सचा कालावधी : GNM हा कोर्स 3 वर्ष कालावधीचा नर्सिंग कोर्स आहे.
- करिअरच्या संधी : हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आरोग्य केंद्र, रुग्णालयामध्ये, नर्सिंग होममध्ये काम करण्याची आणि सेवा देण्याची संधी मिळते.
scope of nursing in marathi
नर्सिंग मधील करिअरच्या विविध संधी :-
Nursing Sathi kay karave lagte
- वैद्यकीय महाविद्यालये : नर्सिंग कोर्स पूर्ण केल्यांनतर तुम्ही विविध सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करू शकता.
- रुग्णालये : नर्सिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही खाजगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये स्टाफ नर्स, स्टाफ नर्स सुपरवायझर, असिस्टंट नर्सिंग सुपरवायझर म्हणून काम करू शकता.
- क्लिनिक : नर्सिंग कोर्स केल्यांनतर तुम्ही एखाद्या क्लिनिकमध्येही काम करू शकता.
- नर्सिंग होम : नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून काम करू शकता.
- ग्रामीण आरोग्य केंद्र : ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये काम करू शकता.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
परिचर्या शिक्षण म्हणजे काय?
परिचर्या शिक्षण म्हणजे असे शिक्षण ज्यामध्ये रुग्णांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय ज्ञान आणि प्रशिक्षण दिले जाते
नर्स ला मराठी तुन काय म्हणतात?
नर्स हा एक इंग्रजी शब्द आहे ज्याचा मराठीमध्ये अर्थ परिचारिका असा होतो.
नर्स होण्यासाठी काय करावे लागेल?
नर्स होण्यासाठी तुम्ही किमान 12 वी विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
नर्सिंगसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
नर्सिंगमधील कोर्स साठी प्रवेश घेण्यासाठी किमान 40 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावे लागते आणि 12 वीला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषय घेतलेले असणे आवश्यक आहे.
नर्सिंग कोर्स किती वर्षाचा आहे?
नर्सिंग कोर्स मध्ये विविध कोर्सेस आहेत ज्यांचा कालावधी सामान्यतः 2 वर्ष ते 4 वर्ष दरम्यान असू शकतो.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"