अंगणवाडी सुपरवायझर भरती 2024
Table Of Content
Table of Contents
अंगणवाडी सुपरवायझर भरती 2024:- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार मुख्य सेविका गट क (सुपरवायझर) पदाच्या एकुण 102 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात. सदर भरतीसाठी फक्त महिला उमेदवार पात्र आहेत याची नोंद घ्यावी.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. एकात्मिक बाल विकास सेवा विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर2024 (23:55) असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.
ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!
अंगणवाडी सुपरवायझर भरती 2024
एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS Bharti 2024) योजना अंतर्गत 102 जागांची भरती 2024
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 102 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार ” मुख्य सेविका गट क (सुपरवायझर)” या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 (23:55)असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.
anganwadi supervisor vacancy 2024
अंगणवाडी Related Post :-
- अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम । सामान्य ज्ञान विषयातील हे आहेत महत्वाचे घटक जे ठरवतात तुमचं मेरिट…!
- अंगणवाडी सेविका पात्रता : जाणून घ्या अंगणवाडी सेविका होण्याची कशी असते प्रक्रिया, नक्की वाचा.
- अंगणवाडी मदतनीस पात्रता, कामे, महत्वाची कागदपत्रे,वेतन इ. बद्दल संपूर्ण माहिती.
नवीनतम प्रकाशित भरती :-
- NHM Nashik Recruitment 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025
- Bank Of India Bharti 2025-खुशखबर ! बँक ऑफ इंडिया भरती 2025
- CISF Driver Recruitment 2025 । कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदाच्या 1124 जागा
- UCO Bank LBO Recruitment 2025 | युको बँक भरती 2025
- NHM beed recruitment 2025 | पगार 75000/-₹ ते 85000/-₹

अधिकृत जाहिरात क्रमांक :- ESTT/DEPT/01/2024
पदाचे नाव :– मुख्य सेविका गट क (सुपरवायझर)
रिक्त पदसंख्या :- 102 पदे
anganwadi supervisor bharti 2024 maharashtra
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेमधील पदवीधर महिला उमेदवार.
वयोमर्यादा (वयाची अट ):-
- अराखीव / खुला प्रवर्ग : किमान 21वर्ष ते कमाल 38 वर्ष
- राखीव / मागास प्रवर्ग : किमान 21 वर्ष ते कमाल 43 वर्ष
- प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त : किमान 21 वर्ष ते कमाल 45 वर्ष
- खेळाडू प्रवर्ग : किमान 21 वर्ष ते कमाल 43 वर्ष
- अंशकालीन पदवीधर : किमान 21 वर्ष ते कमाल 55 वर्ष
- दिव्यांग : किमान 21 वर्ष ते कमाल 45 वर्ष
नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज शुल्क (फी):-
- अराखीव / खुला प्रवर्ग : 1000/-₹
- राखीव / मागास प्रवर्ग : 900/-₹
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 2024 (23:55)
वेतनमान :- S-13 : 35400/-₹ ते 112400/-₹
अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे :-
anganwadi bharti 2024 documents required
कागदपत्रांचे नाव |
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र |
जात प्रमाणपत्र |
जात वैधता प्रमाणपत्र (निवडीनंतर ६ महिन्यांच्या आत सादर करू शकता ) |
दहावी प्रमाणपत्र |
पदवीधर असल्याचा पुरावा |
इतर शैक्षणिक पात्रता पुरावा |
आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा |
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र |
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत |
दिव्यांग असल्यास पुरावा |
SSC मध्ये नावात बदल असल्यास पुरावा |
संगणक ज्ञान प्रमाणपत्र |
परीक्षा :- संगणकावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा.
- परीक्षा वेळ : 90 मिनिटे (दीड तास) । उमेदवार दिव्यांग असल्यास : 120 मिनिटे
- परीक्षेचे स्वरूप : संगणकीय वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा
anganwadi mukhya sevika exam syllabus
लेखी परीक्षेचे स्वरूप
अ.नं. | विषय | भाषा | प्रश्नसंख्या | गुण |
---|---|---|---|---|
1. | मराठी | मराठी | 10 प्रश्न | 20 गुण |
2. | इंग्रजी | इंग्रजी | 10 प्रश्न | 20 गुण |
3. | सामान्य ज्ञान | मराठी | 20 प्रश्न | 40 गुण |
4. | एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे | मराठी | 20 प्रश्न | 40 गुण |
5. | पोषण अभियान | मराठी | 10 प्रश्न | 20 गुण |
6. | गणित , बुद्धिमत्ता व अंकगणित | मराठी | 20 प्रश्न | 40 गुण |
7. | संगणक ज्ञान | मराठी | 10 प्रश्न | 20 गुण |
एकूण | – | 100 प्रश्न | 200 गुण |
मुलाखत :- महसूल व वन विभाग शासन निर्णय व सामान्य प्रशासन शासन निर्णय यामधील तरतुदीनुसार सदर पदासाठी मौखिक परीक्षा (मुलाखत) घेण्यात येणार नाही.
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-
अंगणवाडी सुपरवायझर भरती 2024 last date
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 2024 (23:55)
महत्वाच्या लिंक्स :-
anganwadi bharti 2024 official website
अंगणवाडी भरती फॉर्म 2024 महाराष्ट्र pdf download
maharashtra anganwadi supervisor bharti 2024 online form date
महत्वाच्या सूचना
अंगणवाडी भरती २०२४ मध्ये “मुख्य सेविका गट क (सुपरवायझर)” या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही सूचना आणि माहिती
- उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
- उमेदवाराने आपला आवेदन अर्ज दिनांक 03 नोव्हेंबर2024 (23:55) पर्यंत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
- उमेदवाराने स्वतःची सही आवेदन अर्जामध्ये अपलोड करतांना व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावी व ती सही लक्षात राहील याची काळजी घ्यावी.
- उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
- अर्ज करत असतांना उमेदवाराने शक्यतो खूप पूर्वीचा फोटो वापरू नये. असे केल्याने उमेदवाराला आपली स्वतःची ओळख पर्यवेक्षक यांना पटवून देण्यात कदाचित अडचण येऊ शकते.
- आवेदन अर्ज सादर करतांना उमेदवाराने जो इ-मेल आयडी , लॉगिन पासवर्ड व मोबाईल नंबर ई. जी माहिती अर्जामध्ये नमूद केलेली असेल ती माहिती उमेदवाराने लक्षात ठेवावी. सदर माहिती उमेदवाराला भरतीच्या पुढील कोणत्याही टप्प्यामध्ये लागू शकते.
अंगणवाडी सुपरवायझर पगार किती?
अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी महाराष्टामध्ये 35400/-₹ ते 112400/-₹ इतके वेतन दिले जाते.
महाराष्ट्रात अंगणवाडी पर्यवेक्षकाची पात्रता काय आहे?
महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी “कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर” अशी शैक्षणिक पात्रता आहे.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"
Non crimilayer milal nahi .nantar sadar kele tar chaalel ka…form bharlekla nahi .tar to bharnyasathi लवकरात लवकर कळवा .
Maza application form download hot nahi ……help me
माझं फॉर्म मध्ये cast vjA ऐवजी OBC असं झालं आहे…. संपूर्ण कगद पत्र जसे की, cast tc, non CRIMILIER, cast validity ext.. VjA चे aplod … तर पुढे जाऊन problem hoyil ashi bhiti vatat ahe tar kay options ahet
Form bharke hote pan aadesh dila nahi navin arma karava lagel
hall ticket release date