आरोग्य सेवक अभ्यासक्रम
Table of Contents
आरोग्य सेवक अभ्यासक्रम:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
आरोग्य सेवक होण्यासाठी काय करावे लागते ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
नवीनतम प्रकाशित भरती :-
- NHM Nashik Recruitment 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025
- Bank Of India Bharti 2025-खुशखबर ! बँक ऑफ इंडिया भरती 2025
- CISF Driver Recruitment 2025 । कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदाच्या 1124 जागा
- UCO Bank LBO Recruitment 2025 | युको बँक भरती 2025
- NHM beed recruitment 2025 | पगार 75000/-₹ ते 85000/-₹
आरोग्य सेवक अभ्यासक्रम
महाराष्ट्रामधील बहुतांश स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा वर्ग आरोग्य सेवक भरतीची वाट पाहत असतो.त्यापैकी बहुतेक उमेदवारांना आरोग्य सेवक पद भरती परीक्षेचे स्वरूप,परीक्षा पद्धती,अभ्यासक्रम (मुख्यतः तांत्रिक अभ्यासक्रम) इत्यादी गोष्टींबद्दल माहिती नसते.अशा परिस्थितीमध्ये दिशाहीन पद्धतीने केलेला अभ्यास कधीही यश मिळवून देऊ शकत नाही.
कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळवायचे असेल तर त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने केलेला अभ्यास फार फायदेशीर ठरतो.आरोग्य सेवक या पदाचा तुम्हाला असाच नियोजनबद्धरित्या अभ्यास करता यावा यासाठी हि पोस्ट बनवण्यात आलेली आहे.
यापोस्टमध्ये तुम्हला आरोग्य सेवक या पदाचा सविस्तर अभ्यासक्रम,पदासाठी आवश्यक पात्रता,पदवेतन/पगार, आरोग्य सेवक पदाची कामे अशा अनेक महत्वपूर्ण गोष्टींची माहिती मिळणार आहे.तर बघूया आरोग्य सेवक या पदाची सविस्तर आणि मुद्देसूद माहिती जी देईल तुम्हाला येणाऱ्या आरोग्य सेवक पदाच्या परीक्षेमध्ये हमखास यश!
आरोग्य सेवक syllabus
अ.नं. | विषय | प्रश्नसंख्या | गुण |
---|---|---|---|
१. | मराठी | १५ प्रश्न | ३० गुण |
२. | इंग्रजी | १५ प्रश्न | ३० गुण |
३. | सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | १५ प्रश्न | ३० गुण |
४. | बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित | १५ प्रश्न | ३० गुण |
५. | तांत्रिक प्रश्न | ४० प्रश्न | ८० गुण |
एकूण | १०० प्रश्न | २०० गुण |
arogya sevak syllabus in marathi
वरील तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे,परीक्षेमध्ये एकूण पाच विषय असतात.
- मराठी (काठिण्य पातळी इयत्ता १० वी)
- इंग्रजी (काठिण्य पातळी इयत्ता १० वी)
- सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी –
- बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित –
- तांत्रिक प्रश्न –
आता आपण या विषयांमध्ये कोणते कोणते घटक येतात ते पाहू.
- मराठी-
- व्याकरण
- शब्द संग्रह
- वाक्यप्रचार
- प्रयोग
- म्हणी व म्हणींचे अर्थ
- उताऱ्यावरील प्रश्न.
- इतर व्याकरण घटक
- इंग्रजी-
- General Vocabulary
- Sentense and Structure
- Grammer
- Idioms and Phrases-their meaning and uses
- Comprehension .etc
- सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी-
- आधुनिक भारताचा इतिहास
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
- भारताचा भूगोल
- महाराष्ट्राचा भूगोल
- भारतीय अर्थव्यवस्था
- महाराष्ट्रातील समाज सुधारक
- ग्राम प्रशासन,जिल्हा प्रशासन,राज्य प्रशासन तसेच त्यांची रचना आणि कार्य.
- चालू घडामोडी इत्यादी.
- बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित-
- सामान्य बुद्धिमापन आणि आकलन यावर आधारीत प्रश्न
- तर्क आधारित प्रश्न
- अंकगणितावर आधारित प्रश्न इत्यादी.
- तांत्रिक प्रश्न- तांत्रिक प्रश्न यावर आपण थोडं सविस्तर जाणून घेणार आहोत कारण,या विषयामध्ये अभ्यास करतांना उमेदवारांना जास्त अडचणी येत असतात.

आरोग्य सेवक तांत्रिक अभ्यासक्रम
आरोग्य सेवक या पदाच्या परीक्षेचा अभ्यास करत असतांना उमेदवारांना तांत्रिक या विषयामध्ये कोणकोणते घटक येतात याची पुरेशी माहिती नसते म्हणून आपणआरोग्य सेवक तांत्रिक अभ्यासक्रम या मुद्द्यामध्ये याची सविस्तर माहिती घेणार आहोत.
5.तांत्रिक प्रश्न- तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी मागील झालेल्या आरोग्य सेवक भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे.म्हणून तुम्ही मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास नक्की करा.
तांत्रिक या विषयामध्ये खालील घटकांचा समावेश होतो.
- तांत्रिक प्रश्न
- आपत्ती व्यवस्थापन
- पर्यावरण व्यवस्थापन
- सूक्ष्म जीवशास्त्र
- प्राण्यांचे वर्गीकरण
- अनुवंशिकता आणि उत्क्रांती
- पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान
- सजीव जीवन प्रक्रिया भाग -१
- सजीव जीवन प्रक्रिया भाग -२
- गुरुत्वाकर्षण
- मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
- विद्युतधारेचे परिणाम
- रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे
- उष्णता
- प्रकाशाचे अपवर्तन
- कार्बन संयुगे
- भिंगे त्यांचे उपयोग
- अवकाश मोहीम
- जुन्या प्रश्नपत्रिकांमधील तांत्रिक प्रश्न इ .
arogya sevak tantrik
महत्वाची टिप्स:- तांत्रिक या घटकाशी संबंधित जे घटक वरील लिस्ट मध्ये नमूद केलेले आहेत ते तुम्हाला इयत्ता १० वी च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -१ व विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ या पुस्तकामध्ये मिळून जातील.याचा अवश्य अभ्यास करा.
आरोग्य सेवक पात्रता
आरोग्य सेवक शैक्षणिक पात्रता
आरोग्य सेवक शैक्षणिक पात्रता :- इयत्ता १० वी
arogya sevak qualification
वयोमर्यादा :-
- अराखीव प्रवर्ग – किमान १८ वर्ष ते कमाल ३८ वर्ष
- राखीव प्रवर्ग – किमान १८ वर्ष ते कमाल ४३ वर्ष
आरोग्य सेवक पगार
आरोग्य सेवक पदाचा पगार मेट्रो सिटी/महानगर/ग्रामीण अशा भागानुसार बदलू शकतो.कारण आरोग्य सेवक पदाचा मूळ पगार जरी सारखा असला तरी घर भत्ता,वाहतूक भत्ता इत्यादीमुळे पगारामध्ये तफावत आढळू शकते.तरी शासन वेतनानुसार खालील प्रमाणे वेतन मिळते.
आरोग्य सेवक पगार – शासन आरोग्य सेवक या पदावरील कर्मचाऱ्याला 25,500 रु. ते 81,100 रु. या दरम्यान मासिक वेतन देते,या व्यतिरिक्त महागाई भत्ता,घरभाडे भत्ता,वाहतूक भत्ता असे भत्तेदेखील शासनाकडून दिले जातात.
arogya sevak salary
Arogya Sevak Salary 25,500 Rs. to 81,100 Rs.
आरोग्य सेवक कामे
- प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र हद्दीमधील गावांना किंवा विभागांना महिन्यातून दोनदा गृहभेटी देणे.
- गृहभेटीमध्ये लोकांना संसर्गजन्य आजारांवर जसे कि सर्दी,ताप तसेच डोकेदुखी,अंगदुखी,पोटदुखी यांसारख्या आजारांवर औषधे आणि गोळ्या देणे.
- प्रथमोपचार देणे.
- आवश्यक असल्यास संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेणे व ते परीक्षणासाठी पाठवणे.
- महिला व लहान बालकांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या लसींचे लसीकरण करणे आणि त्याच्या नोंदी ठेवणे.
- रोगप्रतिबंधक कामे करणे.
- नेमून दिलेल्या हद्द किंवा विभागामध्ये जनजागृती करणे.
- कुटुंब नियोजनाबद्दल जनजागृती करणे.
- शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवणे, इत्यादी.
arogya sevak syllabus in marathi
अशा प्रकारे आपण आरोग्यसेवक या पदाबद्दल आणि परीक्षेबद्दल मराठीमधून माहिती घेतली. तुमच्या मनामध्ये तरीही काही प्रश्न असतील तर खालील FAQ अवश्य वाचा जेणेकरून तुमच्या जर काही शंका असतील तर त्यांचे निरसन होईल.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
आरोग्य सेवक ला पगार किती असतो?
महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवक ला 25,500 रु. ते 81,100 रु (+भत्ते) एवढा पगार असतो.
महाराष्ट्रात आरोग्य सेवकाचे काम काय?
महाराष्ट्रात आरोग्य सेवकाचे प्रथमोपचार,लसीकरण,गृहभेटी,जनजागृती अश्या प्रकारची कामे असतात.
महाराष्ट्र आरोग्य विभागाचे अधिकृत संकेतस्थळ काय आहे?
महाराष्ट्र आरोग्य विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://arogya.maharashtra.gov.in हे आहे.
आरोग्य विभाग महाराष्ट्राची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
आरोग्य विभाग महाराष्ट्राची https://arogya.maharashtra.gov.in हि अधिकृत वेबसाइट आहे.
महाराष्ट्रात किती प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत?
उपलब्ध असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये 846 आरोग्य केंद्र आहेत
आरोग्य सेवकाची दैनंदिन कामे काय असतात?
रुग्णांची तपासणी करणे, त्यांना औषधे देणे, लसीकरण करणे , लसीकरणाच्या नोंदी ठेवणे अशी अनेक दैनंदिन कामे आरोग्य सेवकाला करावी लागतात .
आरोग्य सेवकासमोर कोणत्या प्रकारची आव्हाने असतात?
अपुरे मनुष्यबळ, ग्रामीण भागामधील परिस्थिती आणि कनेक्टिव्हिटीची कमतरता, कामकाजाचा ताण अशी अनेक प्रकारची आव्हाने आरोग्य सेवकासमोर असतात .
आरोग्य सेवकाला कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते ?
आरोग्य सेवकाला दैनंदिन कामकाजामध्ये उपयुक्त असणाऱ्या विविध गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते ज्यामध्ये लसीकरण, बाल आरोग्य, आरोग्य शिक्षण, प्राथमिक आरोग्य सेवा यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो .
आरोग्य सेवक म्हणून करिअर मध्ये पदोन्नती कशी करता येते?
जर तुम्ही आरोग्य सेवक म्हणून नियुक्त झालात आणि तुम्हाला त्यापेक्षा उच्च पद मिळवायचे असेल तर तुम्ही पदाचा अनुभव घेऊन आणि उच्च शिक्षण घेऊन पद मिळवू शकता .
आरोग्य सेवकांना कोणत्या प्रकारच्या सुरक्षा उपाययोजनांची गरज असते?
आरोग्य सेवकांचा अनेक रुग्णांशी संपर्क येत असतो त्यामुळे त्यांनाही संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य सेवकांनीही स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य सेवकांनी स्वतः काळजी घेण्यासाठी PPE किट वापरणे, मास्क वापरणे, ग्लोव्ज वापरणे ,नियमित स्वतःची आरोग्य तपासणी करून घेणे, लसीकरण घेणे गरजेचे आहे .
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"