आय आय टी विषयी माहिती
Table of Contents
आय आय टी विषयी माहिती:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
आय आय टी विषयी माहिती ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
आय आय टी विषयी माहिती
सन १९५१ मध्ये भारतामध्ये पश्चिम बंगाल मधील खडगपूर येथे एका स्वायत्त शिक्षण संस्थेची (ऑटोनॉमस) स्थापना झाली त्या संस्थेचे नाव म्हणजे आय आय टी ज्याला आपण Indian Institute of Technology असे म्हणतो.
हि एक अशी शिक्षण संस्था आहे जिथे प्रवेश मिळाल्यानंतर समाजामध्ये तुमची व तुमच्या परिवाराची प्रतिष्ठा उंचावली जाते.इंजिनियरिंग चा अभ्यास करण्यासाठी IIT हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.परंतु हा पर्याय जितका लोकप्रिय आहे तेवढीच यामध्ये स्पर्धा देखील आहे.
जेव्हा तुम्ही IIT मधून शिक्षण घेऊन उत्तीर्ण होता तेव्हा तुम्हाला करोडोचे पॅकेज मिळतात.IITians विद्यार्थ्यांना भारतात तसेच परदेशातही भरपूर मागणी आहे.ज्याची उदाहरणे तुम्ही पाहू शकता जसे कि, खूप साऱ्या कंपन्यांचे CEO हे भारतीय आहेत तसेच त्यांनी त्यांचे शिक्षण IIT मधून पूर्ण केलेले आहे.
बारावी झालेले बहुतेक विद्यार्थी IIT मध्ये प्रवेश मिळावा यासाठी अहोरात्र कठोर मेहनत घेत असतात.त्यातील सर्वानाच यश मिळते असे नाही.पण ज्या विद्यार्थ्यांनी आय आय टी च्या प्रवेश प्रक्रियेचा अभ्यास केलेला असतो त्यांना भविष्यामध्ये त्या केलेल्या अभ्यासाचा भरपूर फायदा होतो.
आय आय टी म्हणजे काय
यश-अपयश आपल्या हातात नसते पण आपण १००% प्रामाणिकपणे कठोर मेहनत करणे हे नक्कीच आपल्या हातात असते. तुम्हाला तुमच्या याच मेहनतीमध्ये थोडीशी मदत म्हणून हि पोस्ट बनवत आहोत.
या पोस्ट मध्ये तुम्हाला आय आय टी च्या प्रवेश प्रक्रियेची सर्व महत्वाची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, तुम्ही याचा फायदा अवश्य घ्या आणि यश मिळवा.
iit mhanje kay
IIT म्हणजे Indian Institute of Technology ज्याला आपण मराठी मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था असे म्हणतो.भारतात एकूण २३ IIT कार्यरत आहेत.
आय आय टी चा फुल फॉर्म
आय आय टी चा फुल फॉर्म Indian Institute of Technology असा आहे.आता पाहूया IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काय प्रवेश प्रक्रिया असते.
iit exam information in marathi
IIT मध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला IIT ची प्रवेश परीक्षा द्यावी लागते.ज्या परीक्षेचे नाव आहे JEE Mains आणि JEE Advance. ह्या परीक्षा देण्यासाठी तुम्हाला १०+२ म्हणजेच इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
IIT ची प्रवेश परीक्षा JEE Mains आणि JEE Advance हि दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते.तसेच ह्या परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतल्या जातात.प्रत्येक सत्रामध्ये दोन पेपर असतात.पेपर १ आणि पेपर २ .
जर तुम्हाला B.E / B.Tech मध्ये प्रवेश घ्यावयाचा असेल तर तूम्हाला JEE Mains Paper 1 हा पेपर द्यावा लागतो आणि जर तुम्हाला B.Arch / B.Plan मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला JEE Mains Paper 2 हा पेपर द्यावा लागतो.
- पहिले सत्र :- जानेवारी
- दुसरे सत्र :- एप्रिल
- पेपर १:- JEE Mains Paper 1–
- B.E (Bachelor of Engineering)
- B.Tech(Bachelor of Technology)
- पेपर २:- JEE Mains Paper 2–
- B.Arch (Bachelor of Architecture)
- B.Plan (Bachelor of Planning)
- पेपर १:- JEE Mains Paper 1–
- JEE Mains:-जर तुम्ही BE किंवा B.Tech करू इच्छित असाल तर तुम्हाला पेपर १ द्यावा लागतो आणि जर तुम्हाला B.Arch किंवा B.Plan करायचे असेल तर तुम्हाला पेपर २ द्यावा लागतो.
आता आपण पेपर १ आणि पेपर २ याची सविस्तर माहिती घेऊ.
JEE Mains Paper 1– पहिला पेपर BE आणि B.Tech साठीचा असतो यामध्ये भौतिक शास्त्र , रसायन शास्त्र आणि गणित यांचा समावेश असतो.यामध्ये भौतिक शास्त्र , रसायन शास्त्र आणि गणित यांचे प्रत्येकी ३०-३० प्रश्न असतात.असे एकूण ९० प्रश्न विचारले जातात.हे ९० प्रश्न एकूण ३०० गुणांसाठी विचारले जातात. या पेपरसाठी साधारण विद्यार्थ्यांना ३ तास तर अपंग विद्यार्थ्यांना ४ तास एवढा वेळ दिला जातो.
या परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थी JEE Advance या पुढील परीक्षेस पात्र असतात.
JEE Mains Paper 1 (BE आणि B.Tech) | |
---|---|
परीक्षा पद्धत | ऑनलाईन |
प्रश्न | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) |
विषय | रसायन शास्त्र,भौतिक शास्त्र आणि गणित |
प्रश्न संख्या | रसायन शास्त्र- ३० प्रश्न भौतिक शास्त्र- ३० प्रश्न गणित- ३० प्रश्न |
एकूण प्रश्नसंख्या | ९० प्रश्न |
वेळ | ३ तास । १८० मिनिटे अपंग – ४ तास |
एकूण गुण | ३०० गुण |

iit course information in marathi
JEE Mains Paper 2– या पेपरमधील परीक्षेचे विषय थोडे वेगळे असतात.B.Arch आणि B.Plan या दोन पेपरमध्ये काय फरक असतो ते तुम्हाला खालील तक्त्यामध्ये दिसून येईल.
B.Arch :- B.Arch च्या पेपरमध्ये ऍप्टिट्यूड ,गणित आणि ड्रॉईंग या विषयांचा समावेश असतो.यामध्ये ऍप्टिट्यूड-३० प्रश्न, गणित-५० प्रश्न, आणि ड्रॉईंगचे – ०२ प्रश्न असे एकूण १०५ प्रश्न असतात. हे १०५ प्रश्न एकूण ४०० गुणांसाठी विचारले जातात. या पेपरसाठी ३ तास एवढा वेळ दिला जातो.
B.Plan:-B.Plan च्या पेपरमध्ये ऍप्टिट्यूड, गणित आणि प्लॅनिंग या विषयांचा समावेश असतो.यामध्ये ऍप्टिट्यूड-५० प्रश्न, गणित-३० प्रश्न, आणि प्लॅनिंगचे – २५ असे एकूण ८२ प्रश्न असतात. हे ८२ प्रश्न एकूण ४०० गुणांसाठी विचारले जातात. या पेपरसाठी ३ तास एवढा वेळ दिला जातो.
JEE Mains Paper 2 (B.Arch) | JEE Mains Paper 2 (B.Plan) | |
---|---|---|
परीक्षा पद्धत | ऑनलाईन + ऑफलाइन ऑनलाईन- ऍप्टिट्यूड आणि गणित ऑफलाइन- ड्रॉईंग | ऑनलाईन- ऍप्टिट्यूड, गणित आणि प्लॅनिंग |
विषय | ऍप्टिट्यूड गणित आणि ड्रॉईंग | ऍप्टिट्यूड, गणित आणि प्लॅनिंग |
प्रश्न संख्या | ऍप्टिट्यूड – ३० गणित -५० ड्रॉईंग – ०२ | ऍप्टिट्यूड – ५० गणित -३० प्लॅनिंग – २५ |
एकूण प्रश्नसंख्या | ८२ प्रश्न | १०५ प्रश्न |
वेळ | ३ तास । १८० मिनिटे | ३ तास । १८० मिनिटे |
एकूण गुण | ४०० गुण | ४०० गुण |
या परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थी JEE Advance या पुढील परीक्षेस पात्र असतात.
आय आय टी अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध गाव
बिहार राज्यामधील गया या जिल्ह्यातील पटवाटोली हे गाव आयआयटीयन्सचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
आय आय टी अभ्यासक्रमासाठी कोटा हे ठिकाण भारतामध्ये प्रसिद्ध आहे.
यापुढील पोस्ट मध्ये आपण JEE Mains आणि JEE Advance यांचा अभ्यासक्रम काय असतो हे पाहणार आहोत.तसेच JEE Advance ची परीक्षा प्रक्रिया काय असते हे देखील पाहणार आहात.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
आयआयटीची खासियत काय आहे?
आय आय टी हि स्वायत्त शिक्षण संस्था आहे.जर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळाला तर तुम्हाला अनेक सुविधा मिळतात.जसे कि, कॅम्पस मधील खाजगी रेस्टोरंटसमध्ये १०-१५% सूट,औषधोपचार त्याच बरोबर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या मोठ्या पॅकेजच्या नौकऱ्या आणि परदेशात नोकरी करण्याची संधी.
आयआयटी काय काम करते?
आयआयटी आपल्या देशातील हुशार तरुण तरुणींना उच्च दर्जाचे शिक्षण देते.
आयआयटी प्रवेशाची प्रक्रिया काय आहे?
आयआयटी मध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Mains आणि JEE Advance या परीक्षा द्याव्या लागतात.
आयआयटी का निवडायची?
कमी खर्चामध्ये अत्यंत उच्च प्रतीचे शिक्षण घेऊन स्वतःचा आणि देशाचा विकास करायचा असेल आणि यासाठी कठोर मेहनत करायची तुमची तयारी असेल तर तुम्ही आयआयटी निवडू शकता.
भारतात किती आयआयटी आहेत?
भारतात एकूण २३ आयआयटी आहेत.
IIT परीक्षा म्हणजे काय?
IIT म्हणजे Indian Institute of Technology ज्याला आपण मराठी मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था असेही म्हणतात. हि परीक्षा JEE Mains आणि JEE Advanced या दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते.
IIT परीक्षेसाठी पात्रता काय आहे?
IIT म्हणजेच Indian Institute of Technology ची प्रवेश परीक्षा देण्यासाठी उमेदवार किमान इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबतच 12 वी मध्ये भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र आणि गणित हे विषय असणे देखील आवश्यक आहे.
IIT परीक्षेचे महत्व काय आहे?
इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकी क्षेत्रात उत्तम करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी IIT ची प्रवेश परीक्षा घेतली जाते. हि परीक्षा उत्तीर्ण झाल्यास अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी उमेदवारांसाठी उपलब्ध होतात ज्यातून उमेदवारांचे उज्वल करिअर घडवण्यास मदत होते.
IIT प्रवेश प्रक्रिया कशी होते?
IIT ची प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते. पहिला टप्पा JEE Mains आणि दुसरा टप्पा JEE Advanced हा असतो.
स्ट्रेस कसा मॅनेज करावा?
अभ्यासाचा स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी तुम्ही विविध टेक्निक्स वापरू शकता जसे कि अभ्यासादरम्यान थोडा वेळ ब्रेक घेणे आणि त्या वेळेमध्ये स्ट्रेचिंग करणे किंवा वॉकिंग करणे. तसेच अभ्यासाचा स्ट्रेस आणि ताण कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम, योग, ध्यान हेही करू शकता. पण लक्षात ठेवा कि स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला पुरेश्या विश्रांतीची आणि झोपेचीही गरज असते.
महत्वाच्या लिंक्स:-
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"