विक्रीकर निरीक्षक म्हणजे काय | विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा देण्याआधी हि सर्व माहिती एकदा नक्की वाचा.

माहिती शेअर करा.

विक्रीकर निरीक्षक म्हणजे काय

Table of Contents

विक्रीकर निरीक्षक होण्यासाठी काय करावे:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

विक्रीकर निरीक्षक होण्यासाठी काय करावे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बहुतेक उमेदवारांची विक्रीकर निरीक्षक हि ड्रीम पोस्ट मानली जाते.म्हणून विक्रीकर निरीक्षक या पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थी व उमेदवारांना पुरेशी माहिती मिळावी व असणाऱ्या शंकांचं निरसन व्हावं यासाठी सदर पोस्ट बनवण्यात आलेली आहे.या पोस्ट मधील माहिती व्यवस्थित वाचून उमेदवाराने तयारी करावी आणि आपली “विक्रीकर निरीक्षक” हि ड्रीम पोस्ट मिळवावी हा या पोस्ट चा उद्देश आहे.

विक्रीकर निरीक्षक म्हणजे काय

आधी STI या पदाला Sales Tax Inspector असे म्हणले जायचे परंतु GST आल्यानंतर STI याच पदाला State Tax Inspector असे म्हणले जाऊ जगले.

विक्रीकर निरीक्षक म्हणजेच Sales Tax Inspector किंवा State Tax Inspector यालाच आपण विक्रीकर निरीक्षक असेही म्हणतो.महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे घेण्यात येणाऱ्या MPSC Combine Group B and Group C या परीक्षेमार्फत हे पद भरले जाते.

ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला खालील बाबींची माहिती व काही प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

  • विक्रीकर निरीक्षक या पदाची तयारी कशी करावी?
  • विक्रीकर निरीक्षक होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागत?
  • विक्रीकर निरीक्षक होण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षेला कोणते विषय असतात,किती गुण असतात,निगेटिव्ह मार्किंग असते का?
  • विक्रीकर निरीक्षक या पदासाठी आवश्यक पात्रता काय आहे?
  • विक्रीकर निरीक्षक या पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखत असते का?
  • विक्रीकर निरीक्षक या पदावरील अधिकाऱ्याची कर्तव्ये आणि कामे काय असतात.
  • विक्रीकर निरीक्षक अधिकाऱ्याच्या कामाचे स्वरूप कसे असते?
  • विक्रीकर निरीक्षक पदाचे ट्रेनिंग कसे होते?
  • विक्रीकर निरीक्षक हा पदाचा पगार?

अशा अनेक प्रकारच्या मुद्द्यांबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामुळे हि पोस्ट लक्षपूर्वक वाचा आणि विक्रीकर निरीक्षक या पदाच्या तयारीला लागा.

sti patrata in marathi

STI पदासाठी किमान पात्रता:- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर

sti full form in marathi

Sales Tax Inspector / State Tax Inspector

sti honyasathi kay karave

विक्रीकर निरीक्षक किंवा STI होण्यासाठी तुम्हाला MPSC द्वारे घेण्यात येणारी MPSC Combine Group B and Group C हि परीक्षा द्यावी लागते.ह्या परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे.

विक्रीकर निरीक्षक होण्यासाठी तुम्हाला MPSC Combine Group B and Group C ची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तुमचे सिलेक्शन केले जाते. विक्रीकर निरीक्षक हिण्यासाठी कोणत्याही प्रकारची शारीरिक पात्रता चाचणी नसते किंवा मुलाखत नसते.

यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा कशा स्वरूपाची असते हे पाहू,

विक्रीकर निरीक्षक म्हणजे काय
विक्रीकर निरीक्षक म्हणजे काय

पूर्व परीक्षा:- विक्रीकर निरीक्षक होण्यासाठी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा हि एकूण 100 गुणांची असते.पूर्व परीक्षेच्या पेपर मध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात.हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तास वेळ दिला जातो.हे 100 प्रश्न खालील विषयासंदर्भात विचारले जातात.

sales tax inspector information in marathi

मुख्य परीक्षा:- पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागते.मुख्य परीक्षा 400 गुणांची असते.यामध्ये 2 पेपर असतात.पेपर 1 आणि पेपर 2. मुख्य परीक्षा दोन्ही पेपर मिळून एकूण 400 गुणांची असते.

पेपर 1 आणि पेपर 2 मधील विषय खालीलप्रमाणे

विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा

विक्रीकर निरीक्षक च्या मुख्य परीक्षेमधील दोन्ही पेपरचे विषय खालील प्रमाणे.

  • पेपर 1:- या पेपर मध्ये १०० प्रश्न विचारले जातात, प्रत्येक प्रश्न २ मार्कांसाठी विचारला जातो अश्याप्रकारे एकूण २०० गुणांची हि परीक्षा असते.त्यामधील विषय खालील प्रमाणे
    • मराठी:- मराठी विषयाचे एकूण ५० प्रश्न प्रत्येकी २ मार्कांसाठी विचारले जातात.यानुसार मराठी विषयाचे ५० प्रश्न १०० मार्कांसाठी विचारले जातात.
    • इंग्रजी:-इंग्रजी विषयाचे एकूण ५० प्रश्न प्रत्येकी २ मार्कांसाठी विचारले जातात.यानुसार इंग्रजी विषयाचे ५० प्रश्न १०० मार्कांसाठी विचारले जातात.
  • पेपर 2:- हा पेपर देखील २०० गुणांचा असतो.१०० प्रश्न २०० गुणांसाठी विचारले जातात.पेपर २ मध्ये एकूण १० विषय असतात.ते खालीलप्रमाणे,

अशा प्रकारे पूर्व परीक्षा एकूण १०० गुणांची असते आणि मुख्य परीक्षा एकूण ४०० गुणांची असते.

या परीक्षांमध्ये १/४ या प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग असते.

sti post information in marathi

ट्रनिंग/प्रशिक्षण:- नियुक्ती झाल्यानंतर शक्यतो कार्यालयीन प्रशिक्षण दिले जाते किंवा पुणे येथील यशदा या शासकीय इन्स्टिटयूट मध्ये पाठवून अल्प कालावधीचे ट्रेनिंग दिले जाते.

कामाचे स्वरूप:-

  • शासकीय प्रकरणांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची तपासणी करणे.
  • व्यापारी लोकांशी किंवा संस्थांशी कर विषयक पत्रव्यवहार करणे.
  • कर चुकवणाऱ्या किंवा कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीसा पाठवणे.
  • नोटिसा पाठवूनही संबंधित व्यापाऱ्यांनी कर भरला नसेल तर वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णयानुसार कार्यवाही करणे आणि मालमत्ता जप्त करणे.
  • नोटीस पाठवून आणि मालमत्तेची जप्ती करून देखील जर कर भरणा झालेला नसेल तर अशा वेळी संबंधित मालमत्ता किंवा संपत्तीचा लिलाव करणे. इत्यादी.

विक्रीकर निरीक्षक होण्यासाठी काय करावे

प्रमोशन/पदोन्नतीच्या संधी:- जेव्हा तुम्ही विक्री कर निरीक्षक म्हणून नियुक्त होता त्यानंतर राज्य कर अधिकारी गट-ब या राजपत्रित पदावर तुमचे प्रमोशन होते त्यानंतर सहायक राज्य कर आयुक्त या पदावर पदोन्नत्तीची संधी उपलब्ध असते.

विक्रीकर निरीक्षक पगार

विक्रीकर अधिकारी यांना ७ व्या वेतन आयोगानुसार अंदाजे 38,600 ते 1,22,800 प्रतिमहिना वेतन दिले जाते याव्यतिरिक्त शासनाकडून इतर भत्ते देखील दिले जातात.

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-

महाराष्ट्रात STI कसे व्हावे?

महाराष्ट्रात STI म्हणजेच विक्रीकर निरीक्षक होण्यासाठी तुम्हाला MPSC Combine Group B and Group C ची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा द्यावी लागते.

मी 12वी नंतर MPSC परीक्षा देऊ शकतो का?

MPSC परीक्षा देण्यासाठी किमान पात्रता पदवीधर आहे.

STI साठी कोणती परीक्षा आवश्यक आहे?

STI साठी MPSC Combine Group B and Group C हि परीक्षा आवश्यक आहे.

STI परीक्षेसाठी मुलाखत आहे का?

नाही, STI परीक्षेसाठी मुलाखत नाही.

MPSC मुलाखत कोण घेते?

MPSC ची मुलाखत शासकीय सेवा निवृत्त वरिष्ठ अधिकारी घेतात.

STI हे राजपत्रित पद आहे का?

नाही,STI हे राजपत्रित पद नाही.

विक्रीकर अधिकारी किती कमावतो?

विक्रीकर अधिकारी ७ व्या वेतन आयोगानुसार 38,600 ते 1,22,800 प्रतिमहिना वेतन कमावतो याव्यतिरिक्त शासनाकडून इतर भत्ते देखील दिले जातात.

विक्रीकर निरीक्षक म्हणजे काय?

विक्रीकर निरीक्षक हा राज्य सरकारचा अधिकारी असतो जो कर विषयक विविध कामे करतो ज्यामध्ये उद्योगांची कराबाबतची तपासणी करणे, सरकारला कर वसुली करण्यामध्ये मदत करणे , कर चोरी रोखण्यामध्ये सरकारची मदत करणे अशी विविध कामे विक्रीकर निरीक्षक या पदावरील अधिकारी यांना करावी लागतात.

विक्रीकर निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत?

विक्रीकर निरीक्षक यांना करविषयक अनेक जबाबदाऱ्या असतात ज्यामध्ये शासकीय प्रकरणांच्या नोंदी ठेवणे आणि त्यांची तपासणी करणे, कर चोरी रोखणे , कर चोरी करणाऱ्या लोकांना आणि संस्थांना नोटीस पाठवणे आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणे इत्यादी जबाबदाऱ्या विक्रीकर निरीक्षक यांना पार पाडाव्या लागतात.

विक्रीकर निरीक्षकाच्या नोकरीची आव्हाने काय आहेत?

विक्रीकर निरीक्षकाची नोकरी हि जबाबदारीची नोकरी असल्यामुळे इतर नोकऱ्यांप्रमाणे याही नोकरीमध्ये कमी-अधिक प्रमाणामध्ये आव्हाने आहेत. ज्यामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कायदेशीर कठोर निर्णय घेऊन कार्यवाही करावी लागते ज्यामुळे अनेकदा वादविवादांनाही सामोरे जाण्याची परिस्थिती उदभवू शकते.त्यामुळे अश्या परिस्थितींना सामोरे जाऊन आपले काम करण्याची मानसिकता विक्रीकर निरीक्षक या पदावरील अधिकारी यांना ठेवावी लागते.

विक्रीकर निरीक्षकाची नोकरीचे फायदे काय आहेत?

विक्रीकर निरीक्षकाची नोकरी सरकारी नोकरी असल्यामुळे या नोकरीमध्ये तुम्हाला नोकरीची सुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठा, चांगले वेतन आणि त्या बरोबरच चांगल्या पदोन्नतीच्या संधी देखील मिळतात.

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment