12 वी कॉमर्स नंतर काय करावे | हे करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्या करिअरचे टर्निंग पॉईंट्स.

माहिती शेअर करा.

12 वी कॉमर्स नंतर काय करावे

12 वी कॉमर्स नंतर काय करावे:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.तुम्ही जर बारावी कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेमधून केली असेल तर खालील माहिती तुमच्या करिअरला कलाटणी देऊ शकते.

दहावी झालेल्या विद्यार्थ्यांपुढे प्रश्न असतो कि पुढे कॉमर्स करू ,सायन्स करू कि आर्टस् करू.काहीतरी एक निर्णय घेऊन शेवटी ऍडमिशन घेतलं जात.आणि लगेच करिअरचा दुसरा टप्पा पडतो आणि परत तसाच प्रश्न पडतो तो म्हणजे “12 वी कॉमर्स नंतर काय करावे

तुम्हाला जरी हा प्रश्न पडत असेल तर हि पोस्ट तुमच्यासाठीच आहे.”12 वी कॉमर्स नंतर काय करावे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.

12 वी commerce नंतर काय करावे:-

12 वी commerce नंतर तुमच्या करिअरच्या महत्वाचा भाग सुरु होत असतो. जर इथे तुमची काही चूक झाली तर भविष्यात तुम्हाला आर्थिक व वैयक्तिक नुकसान होऊ शकते.आणि जर तुम्ही इथे नियोजितपणे योग्य निर्णय घेतला व करिअर निवडले तर तुमची प्रगती निश्चितपणे तुम्ही करू शकता.

तुम्हाला तुमच्या ह्याच निर्णयामध्ये मदत करण्यासाठी खाली काही महत्वाचे करिअर पर्याय देत आहोत.त्यापैकी तुम्हाला आवडणारा व तुमची रुची असणारा करिअर पर्याय निवडून व त्याबद्दल तुमच्या संपर्कातील व्यक्तींशी ,तज्ज्ञांशी ,पालक व शिक्षकांशी चर्चा करून तुम्ही निर्णय घेवू शकता.

पदवी :- 12 वी commerce नंतर काय करावे यांचे तुमचे उत्तर जर पदवी असेल असेल तर खालील क्षेत्रामध्ये पदवी करून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता.परंतु डिग्री म्हणजेच पदवी मिळवण्यासाठी लागणार वेळ व तुमचे ध्येय यामध्ये समतोल साधला जातोय का याचा विचार करून निर्णय घ्या.

  • बॅचलर ऑफ कॉमर्स (B.com): सर्व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांचा रस हा बी.कॉम करण्याकडे असतो.जर तुमचीही इच्छा बी कॉम करण्याची असेल तर तुम्ही अकाउंटिंग,फायनान्स,बिझनेस मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये तुम्ही करिअर करू शकता.
  • बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (B.B.A.): जर तुमची रुची व्यवसाय कौशल्य शिकण्यामध्ये असेल तर तुम्ही “बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बी.बी.ए.)” करून तुमचे बिझनेस कौशल्य व लिडरशिप चे गुण विकसित करू शकता व चांगल्या पगाराची नोकरी किंवा बिझनेस करू शकता.
  • बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स (B.A.F.): जर तुमची आवड अकौंटिंग व फायनान्स या क्षेत्रांमध्ये असेल तर तुम्ही बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स (बी.ए.एफ.) मध्ये पदवी करून नोकरी करू शकता.

12 वी commerce नंतर काय करावे

  • चार्टर्ड अकाउंटंट (C.A. ) :- जर तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट होण्याची इच्छा असेल तर तुम्ही CA करू शकता.यासाठी तुम्हाला भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्था म्हणजेच ICAI द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल.यासाठी तुम्ही बारावी किमान ५०% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • सी एस फाउंडेशन (C.S. Foundation) :- सी एस म्हणजेच कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठी तुम्हाला बारावीला किमान ५० % गुण आवश्यक असतात त्यानंतर तुम्ही जर पात्र असाल तर ICSI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया मार्फत घेण्यात येणारी परीक्षा तुम्हाला ऊत्तीर्ण व्हावी लागेल.हि परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते.
  • बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स (BCA):- जर तुम्हाला प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर व नेटवर्किंग यांसारख्या तांत्रिक विषयांमध्ये रुची असेल तर तुम्ही बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स म्हणजेच (BCA) करू शकता.BCA केल्यानंतर तुम्ही आय टी कंपन्यांमध्ये विविध पदांवर नोकरी करू शकता ज्यामध्ये मुख्यतः सॉफ्टवेअर डेव्हलपर वेब डेव्हलपर ,नेटवर्किंग इंजिनिअर यांसारख्या पदांचा समावेश होतो. जर तुमची गणित व विज्ञान तसेच संगणक ज्ञान व तार्किक विचार यामध्ये आवड असेल तर तुम्ही BCA करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

12 वी commerce नंतर काय करावे

  • स्पर्धा परीक्षा :- बारावी पस झाल्यानंतर तुम्ही जर सरकारी नौकरीच स्वप्न बघत असाल तर स्पर्धा परीक्षा हा एक उत्तम पर्याय तुम्ही निवडू शकता. स्पर्धा परीक्षा जसे कि , एम पी एस सी , यू पी एस सी , स्टाफ सिलेक्शन कमिशन , रेल्वे भरती, बँकिंग, पोस्ट ऑफिस, एस आर पी एफ, सी आर पी एफ, दिल्ली पोलीस अशा प्रकारच्या विविध सरकारी विभागांमध्ये तुम्ही सरकारी नौकरी मिळवू शकता व तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता.
  • पोलीस भरती :- जर तुम्हाला वर्दीचा सरकारी जॉब हवा असेल तर तुमच्यासाठी पोलीस भरती एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही बारावी कोणत्याही शाखेमधून उत्तीर्ण असाल तर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करून तुमचं वर्दीच स्वप्न पूर्ण करू शकता व खाकी वर्दी मिळवू शकता.यासाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण असणे यासोबतच तुमची उंची,वजन,मेडिकल फिटनेस,१०० मीटर धावणे,१६०० मीटर धावणे,गोळा फेक इत्यादी गोष्टींचीही पूर्तता तुम्हाला करावी लागते. पोलीस भरतीमध्ये तुमची लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी परीक्षा,मेडिकल टेस्ट कागदपत्र पडताळणी अशा प्रक्रियांचा समावेश आहे.या प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ट्रेनींग पूर्ण करावी लागते.
  • जर तुम्हाला पोलीस भरती बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर खालील लिंक वर क्लीक करून वाचु शकता.

पोलीस होण्यासाठी काय करावे लागते |ह्या गोष्टी करा आणि 2024 मध्ये महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल चे आपले लक्ष्य साकार करा!

12 वी कॉमर्स नंतर काय करावे
12 वी कॉमर्स नंतर काय करावे
  • डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअरिंग (DCE) :- जर तुम्हाला रस्ते,पूल,बिल्डींग्स ,इमारती,बांधकाम प्रकल्प व त्याचे डिझाईन या सारख्या गोष्टींमध्ये आवड असेल तर तुम्ही डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअरिंग (DCE) करून सिव्हिल इंजिनिअर,साईट इंजिनिअर , कन्स्ट्रक्शन इंजिनिअर यांसारख्या पदांवर काम करू शकता.तसेच पुढे उच्च शिक्षण घेऊ इच्छित असाल तर बी.ई. किंवा बी.टेक. करू शकता.
  • डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनीअरिंग (DME):- तुम्हाला जर ऑटोमोबाईल,मशीन्स,यंत्रे व उपकरणे यांची देखभाल यांसारख्या विषयांमध्ये रुची असेल तर तुम्ही डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनीअरिंग करू शकता .तसेच पुढे उच्च शिक्षण घेऊ इच्छित असाल तर बी.ई. किंवा बी.टेक. करू शकता.

बारावी कॉमर्स नंतर काय करावे

  • डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (DEE) :- तुम्हाला जर इलेक्ट्रिकल फिल्ड मध्ये आवड असेल तर तुम्ही डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग हा तीन वर्षांचा कोर्स करू शकता.या कोर्स मधून तुम्हाला विद्युत उपकरणांची माहिती मिळते. तसेच जर तुम्ही पुढे उच्च शिक्षण घेऊ इच्छित असाल तर बी.ई. किंवा बी.टेक. करू शकता.
  • डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग(DCE) :- तुम्हाला जर कॉम्पुटर ची आवड असेल तर तुम्ही डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिं हा तीन वर्षांचा कोर्स करू शकता.या कोर्स मध्ये तुम्हाला कॉम्पुटर हार्डवेअर व सॉफ्टवेअर तसेच इंटरनेट व नेटवर्किंग तंत्रज्ञान याची माहिती दिली जाते.जर यानंतर तुम्ही तसेच पुढे उच्च शिक्षण घेऊ इच्छित असाल तर बी.ई. किंवा बी.टेक. करू शकता.व आय टी फिल्ड मध्ये जाऊ इच्छित असाल तरी जाऊ शकता.
  • डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग(DETE):- जर तुम्ही designing, fabricating, testing या सारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करू इच्छित असाल तर डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक उपकरणे, यंत्रणा, आणि दूरसंचार प्रणालींच्या डिझाइन यांबद्दल माहिती दिली जाते.

बारावी नंतर कोणता कोर्स करावा ?

जर तुम्ही बारावी पास असाल तर डिप्लोमा कोर्सेस ,फार्मसी कोर्सेस, डेंटल , आर्किटेक्चर इत्यादी प्रकारचे कोर्सेस तुम्ही करू शकता.

12 vi commerce nantar kay karave

महत्वाच्या लिंक्स व पोस्ट :-

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment