बारावी सायन्स नंतर काय करावे
Table of Contents
बारावी सायन्स नंतर काय करावे:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
जर तुम्ही बारावी पास झाले असाल व भविष्यातील करिअर ऑप्शन्स च्या शोधात असाल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे.सदर लेखामध्ये तुम्हाला “बारावी सायन्स नंतर काय करावे” ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळणार आहे.जे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या भविष्यातील करिअरचे निर्णय घेण्यास अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला करिअरच्या अशा लोकप्रिय पर्यायांबद्दल माहिती मिळणार आहे जे तुम्ही बारावी सायन्स शाखेमधून मधून पास झाल्यानंतर करू शकता.त्या सर्व पर्यायांची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.तरीही ती माहिती वाचून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या शिक्षक,पालक किंवा त्या निवडलेल्या फिल्ड मधील तज्ञ व्यक्ती यांचा सल्ला अवश्य घ्यावा.
बारावी सायन्स नंतर काय करावे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
बारावी सायन्स नंतर काय करावे :-
बारावी सायन्स शाखेमधून उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही विविध क्षेत्रांमध्ये तुमचे करिअर यशस्वीपणे करू शकता.पण करिअरचा पर्याय निवडतांना तुमचे व्यक्तिगत गुण , तुमचं ध्येय , तुमची आर्थिक परिस्थिती व तुम्ही करिअर साठी देऊ शकणारा वेळ यांची योग्य सांगड घालणं खूप महत्वाचं आहे.मला आशा आहे कि याची योग्य सांगड घालून तुम्ही तुमच्यासाठी योग्य असणारा पर्याय निवडाल व निवडलेल्या करिअर मध्ये यशस्वी व्हाल.
तर आता माहिती घेऊयात त्या महत्वाच्या मुद्द्याची ज्याच्या शोधात तुम्ही ह्या पोस्ट पर्यंत पोहोचलात.आणि तो मुद्दा म्हणजे “बारावी सायन्स नंतर काय करावे“.ज्या क्षेत्रांमध्ये तुम्ही 12 वी सायन्स नंतर करिअर करू शकता त्या क्षेत्रांची माहिती खालील प्रमाणे.

- बी.एस.सी.- बी.एस.सी. म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स हि तीन वर्षांची पदवी आहे.यामध्ये खालील विषयांमधील पदव्या तुम्ही घेऊ शकता ,त्या पुढीलप्रमाणे –
- भौतिकशास्त्र
- रसायनशास्त्र
- जीवशास्त्र
- गणित
- संगणक विज्ञान इत्यादी.
- बी.ई. / बी.टेक.- हि पदवी तुम्ही विविध क्षेत्रांमध्ये घेऊ शकता जसे कि
- बी.ई. / बी.टेक इन ऑटोमोबाइल
- बी.ई. / बी.टेक इन मॅकेनिकल
- बी.ई. / बी.टेक इन सिव्हिल
- बी.ई. / बी.टेक इन इलेक्ट्रिकल
- बी.ई. / बी.टेक इन इलेक्ट्रॉनिक्स
- बी.टेक इन एरोस्पेस
- बी.ई. / बी.टेक इन सॉफ्टवेअर
- एन.डी.ए.- एन.डी.ए म्हणजेच ज्याला मराठीमध्ये आपण राष्ट्रीय संरक्षण अकादमी असे संबोधतो.जर तुम्ही भारतीय लष्कर जसे कि भारतीय नौदल, भारतीय वायूदल यामध्ये जाऊ इच्छित असाल तर तुम्हाला एन.डी.ए ची प्रवेश परीक्षा द्यावी लागते.हि परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते.
- लेखी – हि परीक्षा तुम्ही लेखी स्वरूपाची असते.यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात.हि परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी भाषांमध्ये देता येते.
- एसएसबी परीक्षा- उमेदवाराचे व्यक्तिनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी हि परीक्षा घेतली जाते.यामध्ये उमेदवाराचे व्यक्तिमत्व,बौद्धिक क्षमता , शारीरिक क्षमता , नेतृत्व गुण याचे मूल्यांकन केले जाते. यानंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील प्रशिक्षणासाठी संबंधित अकादमी मध्ये पाठवले जाते.व हे प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार पुढे जाऊन भारतीय लष्कराचे अधिकारी बनतात.
12 वी सायन्स नंतर काय करावे
- बी. फार्मसी – म्हणजेच बॅचलर ऑफ फार्मसी. जर तुम्ही औषधनिर्माण, औषधवितरण ,औषध विकास यासारख्या क्षेत्रामध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही बी. फार्मसी करू शकता.यानंतर तुम्ही औषध कंपन्या,मेडिकल, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था , औषध प्रयोग शाळा अशा क्षेत्रांमध्ये काम करू शकता.तसेच जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर मेडिकल किंवा फार्मसी चा व्यवसाय करू शकता.
- नर्सिंग – जर तुम्हाला नर्सिंग मध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग म्हणजेच B.Sc. Nursing हि पदवी पूर्ण करावी लागते.नर्सिंग केल्यानंतर तुम्ही हॉस्पिटल किंवा वैद्यकीय क्लीनिक मध्ये नोकरी करू शकता.
- एम.बी.बी.एस.- म्हणजे बॅचलर ऑफ मेडिसिन- बॅचलर ऑफ सर्जरी होय.हा ४ वर्ष कालावधीचा कोर्स आहे.या नंतर तुम्हाला १ वर्षाचा अनुभव घ्यावा लागतो. यामाध्यमातून तुम्ही शल्यचिकित्सक, डॉक्टर , वैद्यकीय शिक्षक होऊ शकता.
- बी.डी .एस.- म्हणजे बॅचलर ऑफ डेन्टल सर्जरी होय.हा ४.५ वर्ष कालावधीचा कोर्स आहे.या नंतर तुम्हाला १ वर्षाचा अनुभव घ्यावा लागतो. यामाध्यमातून तुम्ही दातांचे डॉक्टर , वैद्यकीय दंत शिक्षक होऊ शकता.
- बी.यू .एम.एस. – म्हणजे बॅचलर ऑफ यूनिव्हर्सिटी -मेडिसिन अँड सर्जरी होय.हा ४ वर्ष कालावधीचा कोर्स आहे. यामाध्यमातून तुम्ही डॉक्टर , वैद्यकीय शिक्षक , वैद्यकीय अधिकारी होऊ शकता.
- बी.ए.एम.एस.- म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसीन आणि सर्जरी होय.हा ५.५ वर्ष कालावधीचा कोर्स आहे. यामाध्यमातून तुम्ही डॉक्टर , वैद्यकीय शिक्षक , वैद्यकीय अधिकारी होऊ शकता.
- बी.एच.एम.एस.- म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन आणि सर्जरी होय.हा देखील ५.५ वर्ष कालावधीचा कोर्स आहे. यामाध्यमातून तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टर , होमिओपॅथिक शिक्षक होऊ शकता.
12 वी सायन्स नंतर काय करावे
- डेटा सायन्स – यामध्ये तुम्हाला विविध तंत्र वापरून व डेटा संचयन करून व त्याचे विश्लेषण करून त्या डेटा चा वापर व्यवसायाच्या वृद्धीसाठी व व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी करायचा असतो. डेटा सायन्स च्या माध्यमातून तुम्ही डेटा सायंटिस्ट , डेटा विश्लेषक होऊ शकता .
- मशीन लर्निंग – मशीन लर्निंग हे एक आधुनिक AI टूल आहे. ज्या माध्यमातून तुम्ही मशीन लर्निंग इंजिनिअर , सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊ शकता.ह्या आधुनिक क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर केल्यास भविष्यामध्ये तुम्हाला नोकरीच्या विशिष्ट संधी प्राप्त होऊ शकतात.
- एरोनॉटीकल इंजिनिअरिंग – जर तुम्हाला विमान क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही एरोनॉटीकल इंजिनिअरिंग हा पर्याय करिअर म्हणून निवडू शकता.या कोर्सच्या माध्यमातुन तुम्ही विमान उत्पादन,विमान दुरुस्ती व देखभाल यांसारख्या डिपार्टमेंट मध्ये काम करू शकता.
12 vi science nantar kay karayche
- एरोस्पेस इंजिनिअरिंग- जर तुम्हाला अंतराळयान,विमान त्यांचा विकास व डिझाईन ,आणि देखभाल यामध्ये करिअर करायचे असेल तर तुम्ही एरोस्पेस इंजिनिअरिंग करू शकता.या कोर्स च्या माध्यमातून तुम्ही एरोस्पेस इंजिनिअर ,सिस्टीम इंजिनिअर, रिसर्च इंजिनिअर यांसारख्या पदांवर काम करण्याची संधी मिळते.
- पेट्रोलियम इंजिनिअरिंग – जर तुम्हाला तेल आणि वायू यांच्या संबंधित वितरण प्रणाली , साठवणूक प्रणाली व उत्पादन प्रणाली याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही पेट्रोलियम इंजिनिअरिंग करू शकता.यानंतर तुम्ही पेट्रोलियम क्षेत्रामध्ये इंजिनिअर म्हणून काम करू शकता.
- केमिकल इंजिनिअरिंग- रसायन , औषधें , प्लास्टिक च्या उत्पादन क्षेत्रामध्ये तुम्हाला रसायन अभियंता किंवा केमिकल इंजिनिअर व्हायचं असेल तर तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग करू शकता.
- मरीन इंजिनियरिंग – जहाजांच्या डिझाईन, देखभाल यामध्ये जर तुमची रुची असेल तर तुम्ही मरीन इंजिनियरिंग करू शकता. मरीन इंजिनियरिंग करून तुम्ही ऑफशोर इंजिनिअर, मरीन इंजिनिअर, शिपयार्ड इंजिनिअर यांसारख्या पदावर काम करू शकता.तसेच नौसेना इंजिनिअर म्हणून देखील काम करू शकता.
- पायलट – जर तुम्हाला विमान चालवण्याची कला शिकायची असेल तर तुम्ही विमान चालक प्रशिक्षण घेऊन पायलट होऊ शकता.या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला सुरक्षिणपणे विमान चालवण्याची कला,नियंत्रण करण्याची कला,व कार्यक्षमतेने विमान चालवणे यांसारख्या गोष्टी शिकवल्या जातात.ह्या प्रशिक्षण झाल्यानंतर व विमान वाहन चालक परवाना मिळवल्यानंतर तुम्ही एअर लाईन्स मध्ये पायलट म्हणून नोकरी करू शकता.
- मर्चंट नेव्ही- वस्तू व मालाची समुद्री वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या चालक व कर्मचारी यांचा समावेश मर्चंट नेव्ही मध्ये होतो.मर्चंट नेव्ही मध्ये तुम्ही इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट,इंजिन रूम ऑफिसर अशा विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये काम करू शकता.
- आर्किटेक्चर – बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (B.Arch) जर तुम्हाला इमारतींची रचना तसेच यांची ड्रॉईंग , इंटेरिअर ,बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, स्ट्रक्चर्स इत्यादी मध्ये आवड असेल तर तुम्ही बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (B.Arch) करू शकता.यासाठी तुम्ही १२ वी किमान ५०% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही “NATA” ची म्हणजेच “नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर” हि परीक्षा देऊन प्रवेश घेऊ शकता . हा एकूण ५ वर्ष कालावधीचा कोर्स असून तुम्हाला प्रत्येक वर्षी २ सेमिस्टर असे एकूण १० सेमिस्टर असतात.
12 vi science nantar kay karave
FAQ’s :-
मी बारावी सायन्स नंतर बीकॉम करू शकतो का?
हो,तुम्ही बारावी सायन्स नंतर बी कॉम करू शकता.
कोणत्या कोर्समध्ये नोकरीच्या अधिक संधी आहेत?
डेटा सायन्स व मशीन लर्निंग मध्ये नोकरीच्या अधिक संधी उपलध आहेत.
भविष्यात कोणत्या कोर्सची जास्त मागणी आहे?
भविष्यामध्ये रोबोटिक्स , मशीन लर्निंग व AI क्षेत्रामधील कोर्सेस ची अधिक मागणी असू शकते.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"