पोलीस भरती फॉर्म | महाराष्ट्र पोलीस अंतर्गत 17000+ पदांची मेगा भरती 2024 |

माहिती शेअर करा.

पोलीस भरती फॉर्म 2024

Table of Contents

पोलीस भरती फॉर्म 2024:- महाराष्ट्र राज्य गृह विभाग व महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार पोलीस शिपाई, पोलीस बॅन्ड्समन , पोलीस कॉन्स्टेबल ड्राइवर, कारागृह पोलीस शिपाई व SRPF पोलीस पदाच्या एकूण पदाच्या एकुण 17471 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे.

महाराष्ट पोलीस विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्ध्तीने अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 मार्च 2024 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा. ऑनलाईन अर्ज, अ‍धिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपुर्वक वाचावी.


❇️  I २०२४ च्या पोलीस भरतीमध्ये निश्चत यश मिळवण्यासाठी व वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही मार्गदर्शन केलेले आहे  ▶️ इथे क्लीक करून वाचू शकता धन्यवाद....!

पोलीस भरती फॉर्म

पोलीस भरती फॉर्म 2024

maharashtra police bharti 2024 online form date। maharashtra police bharti 2024 date

एकुण रिक्त पदे : 17471 पदे.

पदाचे नाव : पोलीस शिपाई । पोलीस बॅन्ड्समन । पोलीस कॉन्स्टेबल ड्राइवर । कारागृह पोलीस शिपाई । SRPF पोलीस.

शैक्षणिक पात्रता :

  • पोलीस शिपाई – किमान १२ वी उत्तीर्ण
  • पोलीस बॅन्ड्समन – किमान १० वी उत्तीर्ण
  • पोलीस कॉन्स्टेबल ड्राइवर – किमान १२ वी उत्तीर्ण
  • कारागृह पोलीस शिपाई – किमान १२ वी उत्तीर्ण
  • SRPF पोलीस – किमान १२ वी उत्तीर्ण

maharashtra police bharti 2024 online form date। maharashtra police bharti 2024 date

वयोमर्यादा : उमेदवाराचे ३१ मार्च २०२४ रोजी किमान वय व कमाल वय खालील प्रमाणे

  • पोलीस शिपाई – किमान १८ ते कमाल २८ वर्ष (मागास प्रवर्ग ५ वर्ष सूट )
  • पोलीस बॅन्ड्समन – किमान १८ ते कमाल २८ वर्ष (मागास प्रवर्ग ५ वर्ष सूट )
  • पोलीस कॉन्स्टेबल ड्राइवर – किमान १९ ते कमाल २८ वर्ष (मागास प्रवर्ग ५ वर्ष सूट )
  • कारागृह पोलीस शिपाई – किमान १८ ते कमाल २८ वर्ष (मागास प्रवर्ग ५ वर्ष सूट )
  • SRPF पोलीस – किमान १८ ते कमाल २५ वर्ष (मागास प्रवर्ग ५ वर्ष सूट )

शारीरिक पात्रता :-

शारीरिक पात्रता पुरुष:-

  • उंची – 165cm. पेक्षा कमी नसावी.
  • छाती -79cm (न फुगवता) पेक्षा कमी नसावी व फुगवलेला छाती व न फुगवलेला छाती यातील फरक 5 से.मी. पेक्षा कमी नसावा.

शारीरिक पात्रता महिला:-

  • उंची – 155cm. पेक्षा कमी नसावी
  • छाती – लागू नाही

शारीरिक पात्रता तृतीय पंथी:-

  • उंची
    • स्वतः ची लिंग ओळख महिला किंवा तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी 155cm. पेक्षा कमी नसावी.
    • स्वतः ची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तीसाठी 165 cm. पेक्षा कमी नसावी .
  • छाती – स्वतः ची लिंग ओळख महिला / तृतीय पंथी / पुरुष अशी केलेल्या व्यक्तीसाठी आवश्यक नाही.

शारीरिक पात्रता चाचणी :-

शारीरिक पात्रता चाचणी पुरुष

इव्हेंट गुण
१६०० मीटर धावणे२० गुण
१०० मीटर धावणे१५ गुण
गोळाफेक१५ गुण
एकूण गुण ५० गुण

शारीरिक पात्रता चाचणी महिला

इव्हेंट गुण
८०० मीटर धावणे२० गुण
१०० मीटर धावणे१५ गुण
गोळाफेक१५ गुण
एकूण गुण ५० गुण

शारीरिक पात्रता चाचणी तृतीय पंथी पुरुष

इव्हेंटगुण
१६०० मीटर धावणे२० गुण
१०० मीटर धावणे१५ गुण
गोळाफेक१५ गुण
एकूण गुण ५० गुण

शारीरिक पात्रता चाचणी तृतीय पंथी महिला

इव्हेंटगुण
८०० मीटर धावणे२० गुण
१०० मीटर धावणे१५ गुण
गोळाफेक१५ गुण
एकूण गुण ५० गुण

अभ्यासक्रम:

महत्वाची सूचना :- संपूर्ण राज्यभर एका पदासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहे.कृपया सर्व उमेदवारांनी ह्या सूचनेचा व्यवस्थित विचार करून पदासाठी अर्ज करावा.

अ .नं.विषय गुण
१.मराठी व्याकरण२५ गुण
२.अंकगणित२५ गुण
३.बुद्धिमत्ता२५ गुण
४.सामान्य ज्ञान व चालू घडामोडी२५ गुण
एकूण गुण १०० गुण

भरती प्रक्रिया: खालीलप्रमाणे

  1. लेखी परीक्षा – १०० गुण
  2. मैदानी चाचणी परीक्षा – ५० गुण
  3. कागदपत्र पडताळणी
  4. वैद्यकीय तपासणी

महत्वाची कागदपत्रे : महत्वाच्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे

  1. १० वी व १२ वी प्रमाणपत्र
  2. जन्मदाखला
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. रहिवाशी दाखला
  5. जात प्रमाणपत्र
  6. जात वैधता प्रमाणपत्र
  7. MSCIT प्रमाणपत्र*
  8. हलके वाहन चालक परवाना*
  9. खेळाडू असल्यास खेळाडू प्रमाणपत्र
  10. नॉन क्रिमीलेयर
  11. माजी सैनिक असल्यास डिस्चार्ग प्रमाणपत्र
  12. गृहरक्षक दल उमेदवार असल्यास गृहरक्षक दल प्रमाणपत्र
  13. भूकंप ग्रस्त असल्यास भूकंप ग्रस्त प्रमाणपत्र
  14. पोलीस पाल्य असल्यास पोलीस पाल्य प्रमाणपत्र
  15. अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र
  16. अंशकालीन असल्यास अंशकालीन प्रमाणपत्र
  17. EWS प्रमाणपत्र
  18. NCC प्रमाणपत्र
  19. पासपोर्ट फोटो
  20. सहीचा नमुना इ .

करिअर मार्गदशन टिप्स स्पेशल :-

“जर आपल्याला पोलीस भरती बद्दल मार्गदर्शन, सामान्य प्रश्नांची उत्तरे व अन्य माहिती हवी असेल तर इथे क्लीक करून वाचू शकता व आपला वर्दीचा प्रवास सोयीस्कर बनवू शकता .धन्यवाद ….!”

अर्ज करण्याची पध्दत :

  • ऑनलाइन
  • अर्ज शुल्क (Fee) :-
    • खुला प्रवर्ग :- ₹450/- (Per Application)
    • मागास प्रवर्ग :- ₹350/- (Per Application)

नोकरीचे ठिकाण :

  • संपुर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा:-

maharashtra police bharti 2024 online form date।police bharti update 2024

  • ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 मार्च 2024
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024  15 एप्रिल 2024


महाराष्ट्र पोलीस मध्ये पोलीस शिपाई, पोलीस बॅन्ड्समन , पोलीस कॉन्स्टेबल ड्राइवर, कारागृह पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस व SRPF पोलीस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही सूचना आणि माहिती

  1. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज दिनांक  05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत करावा.
  3. सदर भरती प्रक्रियेसाठी उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  4. आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  5. उमेदवाराने वर दिलेल्या अधिकृत वेबसाइटवरूनच आपला आवेदन अर्ज पाठवावा.
  6. उमेदवाराने आवेदन अर्ज करतांना अर्जामध्ये अपुरी किंवा चुकीची माहिती नये,असे केल्यास संबंधित नोकरी विभागाकडून उमेदवाराचा आवेदन अर्ज रद्द केला जाईल व भरती प्रक्रियेमधून बाद केले जाईल.
  7. अर्ज करत असतांना उमेदवाराने शक्यतो खूप पूर्वीचा फोटो वापरू नये.
  8. उमेदवाराने स्वतःची सही आवेदन अर्जामध्ये अपलोड करतांना व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावी व ती सही लक्षात राहील याची काळजी घ्यावी.
  9. आपला फोटो व्यवस्थित स्कॅन करून अर्जामध्ये दिलेल्या फॉरमॅटनुसार अपलोड करावा.
  10. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  11. नोकरी भरतीच्या कुठलाही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  12. तसेच परीक्षेला जातांना सोबत ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्स सोबत असू द्यावे.
  13. आवेदन अर्ज सादर करतांना उमेदवाराने जो इ-मेल आयडी , लॉगिन पासवर्ड व मोबाईल नंबर ई. जी माहिती अर्जामध्ये नमूद केलेली असेल ती माहिती उमेदवाराने लक्षात ठेवावी. सदर माहिती उमेदवाराला भरतीच्या पुढील कोणत्याही टप्प्यामध्ये लागू शकते.
  14. आवेदन अर्ज सादर करतांना अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवार डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / नेट बँकिंग चा वापर करून ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज शुल्क भरू शकतो.
  1. उमेदवाराने भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जात नाही म्हणून अर्ज करण्याआधी योग्य ती खबरदारी घ्यावी.
  2. संबंधित नोकरी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा सर्वस्वी अधिकार हा संबंधित नोकरी विभागाकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
  3. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. सदर भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराकडून होणारा प्रवास खर्च किंवा इतर कुठलाही खर्च उमेदवाराला स्वतः करावा लागेल, सदर कुठल्याही प्रकारचा खर्च परत करण्याची जबाबदारी नोकरी विभाग घेत नाही

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 
maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment