जास्त विचार करणे कसे थांबवायचे | हे आहेत काही वास्तविक उपाय, जे केल्याने तुम्ही विचार करू शकता तुमच्या इच्छेनुसार….!

माहिती शेअर करा.

जास्त विचार करणे कसे थांबवायचे

जास्त विचार करणे कसे थांबवायचे:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

जास्त विचार करणे कसे थांबवायचे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

जास्त विचार करणे कसे थांबवायचे:- जर तुम्हाला जास्त विचार करण्याची सवय असेल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला जास्त विचार करणे कसे थांबवायचे याबद्दल मुद्देसूद माहिती मिळणार आहे.

  • विचारांना ओळखणे व समजून घेणे :- तुमच्या मनामध्ये जे-जे विचार येत असतात ते विचार कुठून येतात ते बघा.ते विचार कोणत्या वस्तू,परिस्थिती वा व्यक्ती मुळे येतात याचा अभ्यास करा.ते येणारे विचार व त्यांचा उगम नेमका कुठून आहे हे लक्षात घ्या.अभ्यासलेल्या सर्व गोष्टी एका कागदावर लिहून काढा.या लिहिलेल्या मुद्द्यांचा उपयोग आपल्याला पुढे करायचा आहे.
  • जर ओव्हर थिंकिंग ची समस्या जाणवत असेल तर ती मान्य करा:- बहुतेक लोक हे जास्त विचार करणे या समस्येपासून ग्रासलेले असतात.पण त्यांना हे मान्य करायचं नसत कि त्यांना हि समस्या आहे.तस पाहिलं तर हा एक सामान्य प्रॉब्लेम आहे.जर याला व्यवस्थित व नियोजनबद्धरित्या हाताळलं गेलं तर यातून सहजरित्या सुटका मिळू शकते.
  • ट्रिगर करणाऱ्या गोष्टी ओळखणे :-आता तुमच्याजवळ त्या सर्व गोष्टी असतील ज्या तुम्हाला अति विचार करायला भाग पाडतात.काही गोष्टी अश्या असतात ज्या समोर आल्याने किंवा त्यांची आठवण आल्यामुळे आपण विचारांच्या खोल दरीमध्ये जातो.एका विषयातून दुसरा विषय दुसऱ्या मधून तिसरा विषय हे चालूच राहत.पण विचार चक्र काय थांबायचं नाव घेत नाही.असं ज्या गोष्टीमुळे होतात त्याला आपण ट्रिगर करणाऱ्या गोष्टी असं म्हणू.तुम्हाला ह्या ट्रिगर करणाऱ्या गोष्टी व ट्रिगर करणारे लोक यांपासून लांब राहायचं आहे.जेणेकरून तुम्ही ओव्हरथिंकींग पासून वाचू शकता.
  • विचारांचा प्रकार ओळखणे :- आपल्या मनामध्ये व डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार चालू असतात.त्यातील काही गोष्टींबद्दल चिंता देखील वाटत असते.पण तस पाहता त्या खरंच तुमच्या वाट्याला येणार आहेत का? तर सांगू शकत नाही असं याच उत्तर असेल.यावरून त्या विचारांचे २ प्रकार आपण पाडू शकतो ते खालील प्रमाणे,
    • काल्पनिक विचार :– जे विचार फक्त जर – तर याच नियमावर चालत असतील तर ते तुमचे काल्पनिक विचार असू शकतात.जे विचार भविष्यात सत्यात उतरतीलच असे नाही.पण तरीही तुम्ही त्याबद्दल तुमचे विचार करणे थांबवत नाहीत.म्हणून अशा काल्पनिक विचारांना वेळीच थांबवा.
    • वास्तविक विचार :– जे विचार तुमच्या वर्तमानाबद्दल येतात व ते पुढे जाऊन सत्यात उतरतीलच असे तुम्हाला प्रकर्षाने जाणवत असेल तर ते तुमचे वास्तविक व खरे विचार असतात.
    • उदाहरणार्थ, जर तुम्ही शालेय शिक्षण घेत असाल व अभ्यास करत नसाल तर तुम्ही नक्की अनुत्तीर्ण होणार आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा वास्तविक विचार आहे.जर तुम्ही अभ्यास नाही केला तर तुमचे अनुत्तीर्ण होणे खरे आहे.
  • स्वतःला विचलित करणे :- कधी कधी असे होते कि विचार एका-मागोमाग एक येतच राहतात व त्यांना थांबवणे अशक्य होते.अशा वेळेस तुम्ही स्वतःला विचलित करून ती वेळ कशी बशी ढकलणे हा उत्तम पर्याय आहे.स्वतःला विचलित करण्यासाठी तुम्ही विनोदी चित्रपट पाहू शकता,बाहेर फिरायला जाऊ शकता किंवा आपल्या प्रियजनांसोबत गप्पा मारू शकता.असे केल्याने थोड्या काळासाठी तुम्ही स्वतःला विचलित करू शकता.
  • विश्रांती घेणे :- जर तुम्हाला असे वाटत असेल कि विचारांची येण्याची तीव्रता अधिक आहे.अशा वेळेस तुम्ही विश्रांती घेणे एक उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे.जर तुम्हाला विश्रांती करण्यामध्ये अडचण येत असेल तर,अशा वेळी तुम्ही सायलेंट गाणी किंवा जुनी गाणी ऐकत विश्रांती करू शकता.
  • गरज वाटल्यास तज्ज्ञाची मदत घेणे :- जर एवढं सगळं करून देखील तुम्हाला अस्वथ व बेचेन वाटत असेल व विचार थांबत नसतील.तर अशा वेळी तुम्ही तज्ञ् डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.याने तुम्हाला लवकर फरक जाणवेल.
जास्त विचार करणे कसे थांबवायचे
जास्त विचार करणे कसे थांबवायचे

जास्त विचार केल्याने काय होते :- जास्त विचार केल्याने तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही,फक्त जास्त विचार करताय म्हणून तुमचे भविष्य उज्वल होणार नाही पण तुमचा आताचा उत्तम काळ म्हणजेच वर्तमानकाळ तुमच्यासाठी त्रासदायक नक्की ठरू शकतो.म्हणून विचारांच्या जाळ्यात जास्त न अडकता वर्तमानामध्ये जास्तीत जास्त जगून घ्या.कारण कि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आत्ताचा काळ मिस करणार आहात.म्हणून ज्या गोष्टी तुमच्या आवाक्याबाहेर असतील ज्या बदलणे तुम्हाला शक्य नसतील त्या गोष्टींचा विचार करणं आत्ताच थांबवा.कारण जास्त विचार केल्याने तुम्हाला शारीरिक तसेच मानसिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

जास्त विचार केल्याने काय होते

  • शारीरिक परिणाम :- जास्त विचार केल्याने तुमचे शारीरिक आरोग्य धोक्यात येऊ शकते ते कसे हे खाली समजावून सांगत आहोत.
    • थकवा जाणवणे :- जास्त विचार केल्याने तुमची ऊर्जा वाया जात असते यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो.व महत्वाचे काम करण्यास ऊर्जा मिळत नाही.
    • कार्यक्षमतेवर परिणाम :- थकवा आल्यामुळे व तुमची अमूल्य ऊर्जा फक्त विचार करण्यामध्ये नष्ट झाल्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर याचा खूप विपरीत परिणाम होतो.
    • आरोग्य समस्या:- जास्त विचार केल्या तुम्हाला शारीरिक परिणामांसोबतच, आरोग्याच्या समस्याही येऊ शकतात.त्या खालील प्रमाणे
      • हृदयाचे ठोके वाढणे- जास्त वाईट तीव्रता असणारा विचार जास्त काळापर्यंत केल्याने तुमच्या हृदयावर दाब येऊ शकतो व तुमच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात.त्यामुळे कृपया जास्त विचार करू नका.
      • रक्तदाब समस्या– जास्त विचार करण्याच्या सवयीमुळे तुम्हाला रक्तदाबाच्या समस्या येऊ शकतात.
      • पोटाच्या समस्या– जास्त विचार केल्याने तुम्हाला पोटाच्या समस्यादेखील होतात.
  • मानसिक परिणाम :-जसे जास्त विचार केल्याचे काही शारीरिक परिणाम आहेत तसेच मानसिक परिणाम देखील आहेत ते परिणाम खालीलप्रमाणे.
    • चिंता व ताण-तणावामध्ये वाढ :- जास्त विचार करण्याच्या सवयीमुळे तुमच्या व्यावसायिक तसेच कौटुंबिक जीवनामध्ये ताण – तणाव वाढू शकतो.यामुळे तुमच्यामध्ये मतभेद होऊ शकतात.
    • नैराश्य येते:- जेव्हा तुमचे जास्त विचार करण्याच्या सवयीमुळे ताण-तणाव वाढतात तेव्हा त्यासोबतच आपोआप तुमच्या आयुष्यामध्ये नैराश्य येते.ज्याचा दुष्परिणाम तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये होतो.
    • झोप न येणे :- जास्त विचार करण्याची सवय ,नैराश्य , ताण तणाव असल्यामुळे तुम्हाला झोपण्यामध्ये अडचणी निर्माण होतात.पूर्ण झोप होत नाही.
    • एकाग्रतेची कमतरता :- जेव्हा एवढे सगळे वाईट परिणाम तुम्ही अनुभवायला लागता तेव्हा तुमची एकाग्रता भंग होते.तुमची निर्णय क्षमता डिस्टर्ब् होते.हे सर्व एकाग्रतेच्या असणाऱ्या कमतरतेमुळे होते.
  • इतर परिणाम :- वरील भागामध्ये आपण जास्त विचार करण्याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम पाहिले.या व्यतिरिक्त काही इतर परिणाम सुद्धा आहेत ते खालील प्रमाणे.
    • सामाजिक व कौटुंबिक संबंधांमध्ये अडचणी- जेव्हा तुमचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य अस्थिर होते तेव्हा तुमची चिडचिड वाढते.त्यामुळे मतभेद वाढतात व सामाजिक तसेच कौटुंबिक संबंधांमध्ये अडचणी निर्माण होतात.जे अधिक जास्त प्रमाणात विचार करायला प्रभावित करतात.
    • नकारात्मकते मध्ये वाढ-एवढ्या साऱ्या समस्या एकामागोमाग एक आल्यामुळे तुमच्या नकारात्मकतेमध्ये वाढ होते ज्याचे पडसाद तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर पडतात.
    • सेल्फ डाउट वाढणे- नकारात्मकतेमध्ये वाढ झाल्यामुळे तुम्हीच तुमच्यावर अविश्वास दाखवायला लागता.अनेकदा नकारात्मक दृष्टिकोनामुळे तुमचा दाखवलेला अविश्वास खरा ठरतो व तुमचे तुमच्या बद्दलचे मत बदलायला लागते.तुम्ही स्वतःला कमी लेखायला सुरवात करता.यालाच आपण स्व संशय किंवा सेल्फ डाऊट असे म्हणू शकतो.यामुळे पुढे जाउन तुम्ही असफल होऊ शकता.म्हणून सेल्फ डाउट मध्ये जगू नका.

विचार बदला आयुष्य बदलेल:- तुमच्यासाठी हे खूपदा ऐकण्यात आलेलं वाक्य असेल.म्हणून या वाक्याची तीव्रता तुम्हाला कमी जाणवेल किंवा जाणवणारही नाही.पण हा तुमचं आयुष्य बदलण्याचा मूलमंत्र ठरू शकतो.जो तुमच्या आयुष्याच्या चालू असलेल्या वर्तुळाला ३६० डिग्री मध्ये कलाटणी देऊ शकतो. “विचार बदला आयुष्य बदलेल” या वाक्याची तीव्रता तुम्हला खाली जाणवून देण्याचा प्रयत्न करेल.

विचार बदला आयुष्य बदलेल म्हणजेच विचारांची रिप्लेसमेंट असा याचा अर्थ.ज्यामध्ये तुम्ही तुमच्या नकारात्मक मानसिकतेला सकारात्मकतेमध्ये बदलता.तुमच्या अपयशाला यशामध्ये ,नैराश्य व दुःखाला समाधान व आनंदामध्ये बदलता म्हणजेच रिप्लेस करता.

  • सकारात्मक विचार:- सकारात्मक विचार म्हणजे तो विचार जो विचार तुम्हाला यश मिळ्वण्यामध्ये ,आनंद अनुभवण्यामध्ये , समाधानी राहण्यामध्ये , प्रगती करण्यामध्ये ताकद देतो.म्हणून होईल तेवढं नकारात्मकतेला बाजूला सारून त्याची जागा सकारात्मकतेला द्या म्हणजेच रिप्लेस करा.
  • नकारात्मक विचार:- नकारात्मक विचार म्हणजे असे विचार जे केल्याने तुम्हाला अपयश मिळतं ,तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं , नैराश्य येतं व प्रगतीकडे जाण्याउलट तुमचं आयुष्य अधोगतीकडे जात.हे सर्व तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही वर सांगिल्याप्रमाणे नकारात्मक विचारांच्या ऐवजी सकारात्मक विचार करा.
  • सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करणे (आयडेंटिफाय अँड टार्गेट) :- नकारात्मक व सकारात्मक विचारांमधील फरक तुम्हाला वरील दोन मुद्द्यांमुळे लक्षात आला असेल. आता आयडेंटिफाय अँड टार्गेट म्हणजेच आयडेंटिफाय केलेल्या सकारात्मक विचारसरणीवर तुम्हाला टार्गेट करायचं आहे. म्हणजेच नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करायचं आहे.
  • सकारात्मक वातावरणामध्ये राहाणे:- नुसते सकारात्मक विचार करणे यामुळे तुमचं लक्ष केंद्रित राहणार नाही त्यासाठी तुम्ही सकारात्मक मानसिकता असणाऱ्या लोकांमध्ये,यशस्वी लोकांमध्ये ,ध्येय असणाऱ्या लोकांमध्ये व सकारात्मक वातावरणामध्येही राहायला हवं.
  • चुकांमधून शिकत राहणे :- जीवन हा एक प्रवास आहे. ज्याचं पहिलं स्थानक तुमचा जन्म व शेवटचं स्थानक तुमचा मृत्यू आहे.ह्या प्रवासादरम्यान सर्वांकडून कमी – अधिक प्रमाणामध्ये चुका होत असतात.तुम्हीही चुकू शकता, मी सुद्धा चुकतो.पण चुकण्यापेक्षा महत्वाचं असतं ते म्हणजे त्या चुकीतून शिकणं आणि त्या चुकीतून योग्य धडा घेऊन पुढे वाटचाल करणं.तुम्हीही चुकांमधून शिकत राहा , त्यातून घडून पुढे जात राहा.हेच जीवन आहे.उगाच जास्त विचार करत बसण्यामध्ये तुमचं अमूल्य आयुष्य वाया घालवू नका.
  • समस्येला समस्या न समजत आव्हान व संधी समजणे :- वरील प्रमाणेच जीवनाच्या ह्या प्रवासामध्ये खूप अडथळे व समस्या येत असतात. ह्याच समस्या आपल्याला आपण जिवंत असल्याची अनुभूती सुद्धा देत असतात.म्हणूनच समस्यांकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन सोडून आपण त्याच समस्यांचा संधी म्हणून उपयोग करून घ्यायला शिकलं पाहिजे.हा गुण तुमच्या अंगी असल्यास तुम्ही वेगाने प्रगती करू शकता.

विचार कमी करण्यासाठी उपाय :- वरील भागामध्ये आपण नकारात्मक व सकारात्मक विचार यांचे विस्तृत विश्लेषण पहिले.आता विचार कमी करण्यासाठी आपण कोणते गुण अंगिकारले पाहिजे ते बघू.

  • विचारांना कागदावर लिहून काढणे :- तुमच्या मनामध्ये येणारे विचार जर तुम्ही कागदावर लिहून काढले तर त्यापैकी खुप सारे विचार हे काल्पनिक असल्याचे तुम्हाला जाणवेल.यामुळे तुम्ही नियोजनबद्धरित्या जास्त विचार करण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.तुम्हाला वाटेल कि विचार कागदावर लिहिणे का गरजेचे आहे? त्याचे उत्तर तुम्हाला एका उदाहरणाने व्यवस्थित कळू शकेल.
    • उदाहरणार्थ,जर तुम्हाला एखाद्या मोठ्या किचकट यादीचा हिशोब करायचा असेल आणि जर तुम्ही तो हिशोब तोंडी केला तर तुमचा हिशोब चुकण्याची दाट शक्यता असते.पण जर तो हिशोब तुम्ही लिहून केला तर तुम्ही अचूक हिशोब करू शकता.ह्या उदाहरणामधील यादी हे तुमचे विचार आहेत व लिहून केलेला हिशोब म्हणजे तुमचे लिहिलेले विचार आहे.म्हणून विचार कागदावर लिहिणे गरजेचे आहे.
  • पुरेशी झोप व विश्रांती :- पुरेशी झोप घेतल्याने तुम्ही अधिक ताजेतवाने असल्याचे अनुभवता.म्हणून पुरेशी झोप व विश्रांती विचार कमी करण्यामध्ये फायदेशीर ठरते.
  • नियमित व्यायाम :- नियमित व्यायाम केल्याने तुमचा थकवा कमी होतो.तुम्ही अधिक उर्जावान असल्याचे अनुभवता.म्हणून नियमित व्यायाम करणे फार गरजेचे आहे.
  • कॅफेन व अल्कोहोल टाळणे :- हाय कॅफेन असलेले ड्रिंक्स किंवा अल्कोहोल घेतल्यास तुम्हाला कदाचित तात्पुरते बरे वाटू शकते.पण हा आभास फार काळ टिकत नाही.म्हणून हाय कॅफेनयुक्त कोल्ड्रिंक्स व अल्कोहोल यांपासून लांब राहा.
  • मनोरंजन :- मनामध्ये विचारांचा खूप गोंधळ झालेला आहे असे जर तुम्हाला भासत असेल तर तुम्ही खालील गोष्टी ट्राय करू शकता.याने तुम्हाला मदत मिळू शकते.
    • विनोदी चित्रपट- विनोदी चित्रपट पाहिल्याने तुम्ही हसता ज्यामुळे तुम्हाला हलकं वाटतं.म्हणून तुम्ही विनोदी चित्रपट पहिले पाहिजेत प्रामुख्याने तेव्हा, जेव्हा तुम्ही फार विचार करायला लागता.
    • पुस्तक वाचणे- आजकाल च्या व्यस्त जीवनामध्ये लोक पुस्तक वाचत नाहीत आणि जे लोक काही प्रमाणात वाचतात ते पुस्तक पी.डी.एफ. फॉरमॅट मध्ये वाचतात.यामुळे फोनची नोटिफिकेशन आल्यास एकाग्रता भंग होते व मन विचलित होते.म्हणून तुम्ही पुस्तकाची प्रत वाचली पाहिजे ज्यामुळे तुमची एकाग्रता वाढून. जास्त विचार करण्याची सवय कमी होईल.
  • छंद जोपासणे :- तुम्हाला ज्या छंदाची रुची/आवड आहे तो छंद तुम्ही जोपासायला हवा. जेणेकरून मोकळ्या वेळेमध्ये विनाकारण जास्त विचार न करता तुम्ही तुमच्या छंदांमध्ये व्यस्त राहू शकता.ह्या एका मोकळ्या वेळेने तुमचे सरळ दोन फायदे होतात, ते म्हणजे तुमचा छंद जोपासला जातो व दुसरे म्हणजे जास्त विचार करण्याची सवय टाळली जाते.

“आशा करतो कि, तुम्हाला तुमच्या “जास्त विचार करणे” या समस्येबद्दल मी जी माहिती दिली आहे, त्याचा तुम्हाला फायदा झाला असेल.हि सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी व लिहिण्यासाठी मी व माझ्या टीमने फार वेळ दिला आहे.

याच एकच उद्दिष्ट्य आहे, ते म्हणजे जी व्यक्ती ह्या समस्येमधून जात असेल त्या व्यक्तीपर्यंत हि माहिती पोहचावी.व कदाचित काही चुकीचा विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये येत असेल तर त्याला ह्या लेखाने मदत व्हावी.

जर तुमच्या संपर्कात कोणी अशी व्यक्ती असेल ज्याला या लेखाची गरज आहे कृपया त्यांच्यापर्यंत हि माहिती पोहचवा.”

तुम्ही तुमचा अमूल्य वेळ ह्या लेखासाठी दिला त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद ……!

FAQ’s :-

विचार कसे थांबवावे?

भूतकाळ व भविष्यकाळ यावर विचार न करता वर्तमानामध्ये राहिल्यास विचार थांबण्यास मदत होते.

जास्त विचार करणे आणि काळजी करणे कसे थांबवायचे?

वर्तमानावर लक्ष केंद्रित करून ध्येयावर काम करत राहिल्यास तुम्ही व्यस्त राहता.ज्यामुळे जास्त विचार करणे व काळजी करणे थांबू शकते.

विचार कमी आणि जास्त कसे करायचे?

तुम्ही स्वतःला विचार करण्यासाठी एक वेळ ठरवून दिली पाहिजे. ज्या वेळेमध्ये तुम्ही जास्त विचार करू शकता व इतर वेळी कमी विचार करू शकता.

महत्वाच्या लिंक्स:-

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment