नकारात्मक विचार मराठी
Table of Contents
नकारात्मक विचार मराठी:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
नकारात्मक विचार कसे थांबवायचे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
नकारात्मक विचार मराठी
नकारात्मक विचार मराठी :- या लेखामध्ये आपण नकारात्मक विचार केल्याने काय होते,हे विचार कशामुळे येतात याबद्दल मराठीमधे सखोल माहिती घेणार आहोत.
नकारात्मक विचार म्हणजे काय ? :- नकारात्मक विचार म्हणजे असे विचार जे विचार केल्यामुळे तुमच्या मानसिक स्थितीवर दुष्परिणाम होतात असे विचार केल्यामुळे तुम्ही निराशेच्या छायेमध्ये ढकलले जाता ,तुम्ही हताश होता, दुःखी होता.असे विचार तुम्हाला स्वतःबद्दलच अविश्वास दाखवायला भाग पडतात.
नकारात्मक विचार येणे याची काही कारणे असतात.या कारणांना काही पार्श्वभूमी असते.तसेच काही भूतकाळामध्ये घडून गेलेल्या वाईट घटना सुद्धा यामध्ये असतात.नकारात्मक विचार येण्याची काही कारणे आपण बघू, ती कारणे खालीलप्रमाणे,
- नकारात्मक विचारांची काही कारणे:
- स्वतःला तुच्छ समजणे /कमी लेखणे :- नकारात्मक विचार तुम्हाला सेल्फ डाउट म्हणजेच स्व संशय करण्यास प्रभावित करतात.ज्यामुळे तुम्ही तुमची दुसर्यांसोबत तुलना करायला लागता. दुसर्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजून स्वतःला तुच्छ व कमी समजायला लागता.हा तयार झालेला न्यूनगंड तुम्हाला भविष्यामधे चुकीच्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करू शकतो.म्हणून तुम्ही जसे आहेत तसेच स्वतःला स्वीकारा व स्वतःवर विश्वास ठेवा.तुम्ही युनिक व स्पेशल आहात कोणाची कॉपी बनायचा प्रयत्न करू नका.जर समोरची व्यक्ती श्रेष्ठ व यशस्वी असेल तर त्यांच्यापासून प्रेरणा घ्या, पण तुमची तुलना त्यांच्याशी करू नका.अशा काही गोष्टी असू शकतात ज्या तुमच्याकडे आहेत पण त्यांच्याकडे नाहीत.
- भविष्याबद्दल निराशा :- जेव्हा तुम्हाला ध्येय माहिती असतं ,ते ध्येय साध्य कसं करायचं ते माहित असत, त्याचं नियोजन कसं करू शकतो हेही माहित असतं पण तुम्ही ते करत नाहीत.फक्त विचार करता आणि गेलेला दिवस तुम्ही कसा वाया घालवला ह्याबद्दल विचार करत बसता.यामुळे भविष्याबद्दलची निराशा वाढते व तुमची प्रगती खुंटते.यामुळे तुमचे नकारात्मक विचार वाढण्यास मदत होते.म्हणून वेळ वाया घालवून भविष्याबद्दल निराश होऊ नका.
- समस्या न सुटण्याची नकारात्मक भावना :- जेव्हा एखादी समस्या तुमच्या समोर येणार आहे याची फक्त चाहूल तुम्हाला लागते.तेव्हा तुम्ही त्या समस्येसमोर आधीच हार मानता व ती येणारी समस्या तुमच्या आवाक्याबाहेरची आहे हे तुम्ही मनामध्ये मान्य करता.याच नकारात्मक भावनेला समस्या न सुटण्याची नकारात्मक भावना असे म्हणता येईल.
- भूतकाळातील चुका व आठवणी :- भूतकाळामध्ये सर्वांसोबत होतं तसंच तुमच्यासोबतही काही चुकीचं व वाईट झालेलं असतं.पण जिथे काही लोक त्या चुकीच्या गोष्टींना विसरतात.तुम्ही त्याच गोष्टींना कवटाळून बसता.भूतकाळातील तुमच्या कडून झालेल्या चुका व घडून गेलेल्या वाईट घटना यांना विसरण्याची सवय लावा. जर “तुम्ही एकाच विनोदावर रोज रोज हसू शकत नाही तर एकाच वाईट गोष्टीबद्दल निराश कसे होऊ शकता.”
- समाज / कुटुंबाकडून येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रिया:- बहुधा तुमच्यामधील नकारात्मकतेला समाज व कुटुंबाकडून चुकीच्या दृष्टिकोनातून पहिलं जातं.तुमची समस्या समजून घेऊन तुम्हाला त्यामधून बाहेर काढण्यापेक्षा तुमच्या बद्दल नकारात्मक प्रतिक्रिया केल्या जातात.हे चुकीचं असलं तरी ते थांबवणं तुमच्या हातात नाही.तुम्हालाच अशा लोकांपासून थोडं लांब राहायला आणि अशा प्रकारच्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करायला शिकायचं आहे.
नकारात्मक विचारांची काही उदाहरणे : नकारात्मक मानसिकता असलेले लोकं काही विचार हे हुबेहूब करत असतात.ते खालीलप्रमाणे :
- “मी कधीच यशस्वी होऊ शकत नाही कारण……”
- “माझी कोणीही काळजी करत नाही.”
- “माझ्यासोबतच असं का होत ,मीच का ?” इत्यादी.
असे विचार करणे हे चुकीचं आहे पण जी व्यक्ती असा विचार करते ती चुकीची नसते. हे आपण समजून घेतलं पाहिजे.असे विचार येणं तुम्ही थांबवू शकता.त्याच्याबद्दल आपण खाली माहिती घेणार आहोत.

वाईट विचार का येतात
वाईट विचार का येतात:- वाईट विचार येणं हि एक सवय असते.जी आपल्यासोबत भूतकाळामध्ये घडून गेलेल्या काही गोष्टींमुळे आपल्याला लागू शकते.वेळीच भूतकाळातून बाहेर पडल्यास असे विचार येणं थांबवता येते. पण सारखे सारखे त्याबद्दल विचार करत राहिल्याने तुम्हाला वाईट विचार करण्याची सवय होऊन जाते.
- अपयश :- अपयशामुळे तुम्हाला नकारात्मक व वाईट विचार करण्याची सवय लागू शकते.अपयश तुम्हाला वाईट विचार करायला प्रभावित करू शकते.जे आणखीन अपयशाला खेचून आणण्यास कारणीभूत ठरते.
- दुसऱ्यांकडून आशा /अपेक्षा ठेवणे:- जर तुमचे सुख, आनंद , समाधान हे दुसऱ्यांवर अवलंबून असेल.तसेच तुमचं नैराश्य दुःख हेही समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये असेल.थोडक्यात, तुमच्या भावनांचं रिमोट कंट्रोल तुम्ही समोरच्याच्या हातामध्ये दिलेलं असेल व तुम्ही त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवत असाल तर तुमच्या पदरी निराशा पडून तुम्ही नकारात्मक विचारांमध्ये पडू शकता.
वाईट विचार का येतात
- अपेक्षा भंग :- वरच्या मुद्द्यामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे जर तुमच्या जीवनाचं नियंत्रण व भावनांचं रिमोट कंट्रोल तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये दिलेलं असेल तर हे तुमच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं जे तुम्हाला भविष्यामध्ये अपेक्षाभंग व निराशा देतं.
- एकटेपणा :- एकटेपणादेखील नकारात्मक विचारांना आकर्षित करत असतो.जर तुम्ही खूप एकटेपणामध्ये राहत असाल किंवा तुम्हाला एकटं राहावं लागत असेल तर यामुळे तुम्ही नकारात्मक/वाईट विचार करण्यास प्रभावित होऊ शकता.
- ताण-तणावयुक्त जीवन:- जर तुमच्या दैनंदिन कामामध्ये / व्यवसायामध्ये / वैयक्तिक आयुष्यामध्ये समस्या किंवा ताण-तणाव असतील तर वाईट विचार व नकारात्मक भावना तुमच्यामध्ये येऊ शकते.म्हणून ताण तणाव असल्यास त्यातून मार्ग काढून तणावमुक्त जगण्याचा प्रयत्न करावा.
निगेटिव्ह विचार का येतात
निगेटिव्ह विचार येणं हि एक सामान्य समस्या आहे.पण फक्त निगेटिव्ह विचारच वारंवार येत असतील तर हि सामान्य वाटणारी समस्या हानीकारण समस्येमध्ये बदलू शकते. निगेटिव्ह विचारांना येण्यास प्रभावित करणाऱ्या काही गोष्टी असतात, त्या प्रभावित करणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती असल्यास निगेटिव्ह विचारांना थांबवता येऊ शकते.त्या गोष्टी खालीलप्रमाणे.
- मानसिक अस्थिरता:- मानसिक अस्थिरता असल्यास निगेटिव्ह विचार तुम्हाला प्रभावित करू शकतात.मानसिक अस्थिरतेमुळे तुमची निर्णय क्षमता व कार्यक्षमता यामध्ये घट होते.यामुळे निगेटिव्हिटी चे प्रमाण वाढते.
- नकारात्मक अनुभव :- भूतकाळातील चुकलेले निर्णय व त्यामुळे आलेले नैराश्य, भूतकाळातील झालेला अपेक्षा भंग , भूतकाळातील वाईट अनुभव व अपमान यासर्वांचे एकत्रीकरण होऊन तुमचे नकारात्मक अनुभव बनतात.यामळे सेल्फ डाउट व निगेटिव्हिटी वाढते, असे तुमच्यासोबत पण होत असेल तर भूतकाळाचा आढावा घेणे वेळीच थांबवा व वर्तमानाध्ये चांगले कार्य करत राहा.येणार काळ नक्की सकारात्मक असेल हा दृढ विश्वास मनामध्ये ठेवा.
- आर्थिक समस्या :- आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या पैश्यांच्या अभावामुळे येत असतात.आपण त्या सर्व समस्यांचे मूळ हे पैसा आहे हे समजूनच घेत नाही.अशा आर्थिक समस्याचे निरसन करण्यासाठी वेळीच योग्य उपाययोजना व रणनीती आखून काम करत राहिल्यास आपण आर्थिक समस्यांपासून दूर राहू शकतो व निगेटिव्हिटी ला आपल्या आयुष्यापासून दूर ठेवू शकतो.
- ध्येयहीन जीवन:- ध्येय नसल्यामुळे तुमच्या विचारांमध्ये निगेटिव्हिटी येते.ध्येयहीन असल्यामुळे तुमच्याकडे फार मोकळा वेळ असतो.आपोआपच तुमचा हा मोकळा वेळ, तुम्ही फक्त विचार करण्यामध्ये घालवायला लागता.यामुळे निगेटिव्ह विचारांमध्ये वाढ होते.म्हणून जीवनामध्ये ध्येय ठेवा जेणेकरून तुम्ही त्या ध्येयाचा पाठलाग करण्यामध्ये व्यस्त राहाल व निगेटिव्हिटी पासून लांब रहाल.
नकारात्मक विचार कसे दूर करावे
जेव्हा तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलता तेव्हा तुमचं आयुष्य देखील हळू हळू बदलत असतं.आयष्य जगणं एक कला आहे.ज्याचं प्रशिक्षण कोणत्या शाळेमध्ये मिळत नाही ते तुम्हाला तुमच्या अनुभवातूनच शिकावं लागत.आयुष्य जगण्याची एक कला म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार एखादी सवय लावणं किंवा सोडणं, हे जर तुम्ही शिकले तर नकारात्मक विचार कमी होऊ शकतात.नकारात्मक विचार दूर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नकारात्मक विचारांची जागा स्वेच्छेने सकारात्मक विचारांना देणं.हे जमण्यासाठी तुम्हाला खालील काही गोष्टी उपयुक्त ठरतील.
- माफ करा व सोडून द्या :- तुमच्यासोबत जे चुकीचं झालं , ज्या व्यक्तीमुळे झालं त्या व्यक्तीकडून सूड किंवा बदला घेण्याची मानसिकता तुम्ही सोडली पाहिजे.सूड किंवा बदल्याची मानसिकता तुम्हाला नकारात्मक विचार करायला लावते,म्हणून ज्यांच्यामुळं तुम्हाला त्रास झाला असेल त्यांना माफ करून टाका व सकारात्मक दृष्टिकोनाने आयुष्य जगायला शिका.
- सोशल मीडियाचा वापर कमी करणे :- तुम्ही सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात करत असल्यास तुमचा अटेन्शन स्पॅन कमी होतो.तुम्ही नाटकी दुनियेमध्ये जगायला लागता.लोकांचा दिखावा तुम्हाला खरा वाटायला लागतो ज्याने तुमच्यामनामध्ये न्यूनगंड तयार होतो.जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे करत असाल तरी याचा वापर मर्यादित करायला हवा.
- नकारात्मकतेकडे दुर्लक्ष -सकारात्मकतेकडे केंद्रित :- जेव्हा तुम्ही तुमचा फोकस नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे शिफ्ट करता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागतात.
- योग,ध्यान व व्यायाम करणे :- योग, ध्यान व व्यायाम केल्याने तुमची एकाग्रता वाढण्यास मदत होते.म्हणून योग ,ध्यान व व्यायाम केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर राहण्यास मदत मिळेल.
- छंद जोपासणे :- छंद जोपासणे हि सवय तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर राहण्यास फार उपयुक्त ठरते.छंद जोपासल्यामुळे तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये,निगेटिव्ह विचार करण्यात वेळ वाया न घालवता छंदांमध्ये व्यस्त राहता.ज्यामुळे तुम्हाला वाईट विचार व निगेटिव्हिटी पासून दूर राहण्यास मदत मिळते.जर तुम्हाला छंद नसेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही खालील छंद जोपासू शकता.छंद जोपासल्यामुळे तुमची एकाग्रता वाढते व कल्पनाशक्तीला वाव मिळतो.
- चित्रकला
- वाचन
- संगीत
- नृत्य
” जर तुमच्या संपर्कात कोणी अशी व्यक्ती असेल ज्या व्यक्तीला नकारात्मक विचारांच्या समस्या आहेत.अशा व्यक्तींना हि माहिती अवश्य पाठवा व त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी त्यांची मदत करा. “
अशाच मानसिक व शारीरिक विकास करणाऱ्या लेखांसाठी आमचे संकेतस्थळ अवश्य चेक करा.काही लेखांची यादी तुम्हाला खाली मिळून जाईल.
FAQ’s :-
मनातील नकारात्मक विचार कायमचे कसे काढायचे?
तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार यायला लागल्यास ,तुम्ही स्वतःला विचलित करण्याचा व व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा.असे केल्याने तुम्ही नकारात्मक विचार काढू शकता.
सकारात्मक विचार करणे म्हणजे काय?
सकारात्मक विचार म्हणजे असे विचार जे केल्याने तुम्ही आनंद,समाधान,शांतता व एकाग्रता अनुभवता, जे विचार केल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते अश्या विचारांना आपण सकारात्मक विचार असे म्हणतो.
निरुपयोगी विचार कसे थांबवायचे?
निरुपयोगी विचार हे शक्यतो काल्पनिक विचार असतात.निरुपयोगी विचार थांबवायचे असल्यास तुम्ही उपयोगी व वास्तविक पाया असणाऱ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.
सकारात्मक विचाराने तणाव कसा कमी होतो?
सकारात्मक विचार तुम्हाला समस्यांचे निवारण करण्यास मदत करतात.समस्यांचे निवारण झाल्यामुळे तुमचा तणावही कमी होतो.
महत्वाच्या लिंक्स:-
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"