cet neet jee information in marathi
Table of Contents
cet neet jee information in marathi:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
CET NEET JEE information in marathi ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
cet neet jee information in marathi
जेव्हा विद्यार्थी इयत्ता १२ वी उत्तीर्ण होतात तेव्हा त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनामध्ये करिअर बाबतीत अनेक शंका कुशंका निर्माण होत असतात.नेमका कोणत्या क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यावा हा सर्वांत मोठा पेच विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये पाहायला मिळतो.प्रवेश इंजिनियरिंगला घ्यावा कि मेडिकलला घ्यावा कि अजून काही वेगळं करावं अशी दुविधा मनःस्थिती निर्माण होते.अशावेळी काही विद्यार्थी आणि पालक CET, NEET, JEE यांसारख्या प्रवेश परीक्षा देण्याचा निर्णय घेतात.
CET NEET JEE यांसारख्या परीक्षा द्यायचा निर्णय घेतल्यानंतर बहुतेक विद्यार्थी आणि पालकांना या परीक्षांमधील फरक समजण्यास अडचण निर्माण होते आणि त्यामुळे योग्य निर्णय घेण्यामध्ये विलंब होऊ शकतो, आपल्याला याच समस्येमध्ये थोडीशी मदत म्हणून हि पोस्ट बनवत आहोत.हि पोस्ट काळजीपूर्वक वाचून आणि तुमच्या आवडी निवडीचा विचार करून तसेच पालक आणि शिक्षक यांचे मार्गदर्शन घेऊन संपूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेची तयारी करा आणि तुमचे ध्येय साध्य करा.
jee neet exam information in marathi
तसे पाहता CET NEET JEE या सर्व परीक्षा स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा आहेत त्यामुळे यांचा अभ्यासक्रम कठीण असतो.पण या प्रवेशपरीक्षेमध्ये तुम्ही केलेल्या अभ्यासावरच प्रश्न विचारले जात असतात म्हणून अभ्यासक्रमाला अनुसरून व नियोजनबद्धरित्या परीक्षेची तयारी केल्यास यश हमखास मिळते.
तरीही आपण CET NEET JEE या तीनही परीक्षांना थोडं बारकाईने समजून घेऊ.या पोस्टमध्ये आपण CET NEET JEE या परीक्षांची थोडक्यात तुलना करणार आहोत.जर तुम्हाला या तीनही परीक्षांची सखोल आणि संपूर्ण माहिती हवी असेल तर पोस्टमध्ये देण्यात आलेल्या लिंक वर क्लीक करून माहिती वाचू शकता.
difference between jee and mht cet
jee म्हणजे काय
JEE म्हणजे Joint Entrance Examination.ज्या विद्यार्थ्यांना देशातील अभियांत्रिकी म्हणजेच Engineering/Architecture महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांना JEE Mains आणि JEE Advanced या परीक्षा द्याव्या लागतात.परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना देशाच्या टॉप Engineering/Architecture महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो.
उदा. IIT,NIT इत्यादी.
JEE ची परीक्षा NTA म्हणजेच National Testing Agency मार्फत घेतली जाते.
जर तुम्हाला JEE या प्रवेश परीक्षेची संपूर्ण माहिती वाचायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करून वाचू शकता.
- आय आय टी विषयी माहिती / IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काय करावे लागते याची संपूर्ण माहिती.
- jee exam information in marathi : नाही राहणार JEE Advanced परीक्षेबद्दल कोणतीही शंका !
NEET म्हणजे काय
NEET म्हणजे National Entrance cum Eligibility Test.ज्या विद्यार्थ्यंना देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना NEET ची परीक्षा द्यावी लागते.या माध्यमातून संबंधित विद्यार्थी भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS,BDS,BHMS सारख्या कोर्सेसमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो.
जर तुम्हाला NEET या परीक्षेची संपूर्ण माहिती वाचायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करून ती पोस्ट वाचू शकता.
mht cet म्हणजे काय
MHT-CET म्हणजे Maharashtra Health and Technical Common Entrance Test .ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि फार्मसी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना MHT-CET ची प्रवेश परीक्षा द्यावी लागते.हि परीक्षा पास झाल्यांनतर विद्यार्थ्याला महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग/ फार्मसी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येतो आणि B.E./B.Tech/B.Pharm/D.Pharm यांसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.
जर तुम्हाला MHT-CET या परीक्षेची संपूर्ण माहिती वाचायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करून वाचू शकता.
आपण वरील तीनही परीक्षांची थोडक्यात माहिती घेतली. आता आपण या तीनही परीक्षांचा तुलनात्मक अभ्यास करू.
difference between mht cet and neet
JEE आणि NEET परीक्षा फरक
JEE Mains Exam | NEET Exam | |
---|---|---|
पूर्ण रूप | Joint Entrance Examination | National Entrance cum Eligibility Test |
परीक्षा पद्धती | Online | Offline |
परीक्षेचे माध्यम | Computer Based | Paper-Pen |
विषय | पेपर 1-Physics,Chemistry and Mathematics | Physics,Chemistry,Biology |
पेपर 2- Mathematics, Aptitude, Drawing,Planning | -//- | |
कोर्सेस /अभ्यासक्रम | B.E./B.Tech & B.Arch/B.Plan. | MBBS,BDS Etc. |
एकूण प्रश्नसंख्य | 90 प्रश्न | 180 प्रश्न |
परीक्षा वेळ | 3 तास | 3 तास |
सत्र | 2 सत्र प्रतिवर्ष जानेवारी आणि एप्रिल | 1 सत्र प्रतिवर्ष |
परीक्षा शुल्क | अराखीव प्रवर्ग (पुरुष) :- 650/- राखीव प्रवर्ग (पुरुष) :- 325/- महिला :- 325/- परीक्षाशुल्कामध्ये बदल होऊ शकतो. | अराखीव प्रवर्ग:- 1500/- Ews/OBC:- 1400/- SC/ST/Pwd:- 800/- परीक्षाशुल्कामध्ये बदल होऊ शकतो. |
अधिकृत संकेतस्थळ | https://jeemain.nta.ac.in/ | https://exams.nta.ac.in/NEET/ |

difference between jee and mht cet syllabus
MHT-CET आणि JEE परीक्षा फरक
MHT-CET Exam | JEE Mains Exam | |
---|---|---|
पूर्ण रूप | Maharashtra Health and Technical Common Entrance Test | Joint Entrance Examination. |
परीक्षा पद्धती | Online | Online |
परीक्षा स्तर | राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा | राष्ट्रीय स्तर परीक्षा |
स्पर्धा स्तर | राज्यस्तरीय परीक्षा असल्यामुळे तुलनात्मकरित्या कमी स्पर्धा | राष्ट्रस्तरीय परीक्षा असल्यामुळे जास्त स्पर्धा |
परीक्षेचे माध्यम | Computer Based | Computer Based |
विषय | Physics,Chemistry and Mathematics । Biology | पेपर 1-Physics,Chemistry and Mathematics |
पेपर 2- Mathematics, Aptitude, Drawing,Planning | ||
कोर्सेस /अभ्यासक्रम | B.E./B.Tech &B.Pharm/D.Pharm | B.E./B.Tech & B.Arch/B.Plan. |
एकूण प्रश्नसंख्य | 150 प्रश्न | 90 प्रश्न |
परीक्षा वेळ | 3 तास | 3 तास |
मार्किंग | निगेटिव्ह मार्किंग पद्धती नाही | निगेटिव्ह मार्किंग पद्धती आहे. |
अधिकृत संकेतस्थळ | https://cetcell.mahacet.org/ | https://jeemain.nta.ac.in/ |
पालकांचे काही प्रश्न:-
वरील प्रवेश परीक्षेसंदर्भात पालकांचे अनेक प्रश्न असतात त्यापैकी काही सामान्य प्रश्नांची उत्तरे या लेखामार्फत देण्याचा आपण प्रयत्न करू. ते काही सामान्य प्रश्न खालील प्रमाणे,
माझ्या मुलाने कोणती परीक्षा द्यावी?
यासाठी तुमच्या पाल्याशी सविस्तर चर्चा करा. त्यांच्या आवडीनुसार,कुवतीनुसार, त्यांना असलेल्या ज्ञानानुसार आणि त्यांच्या ध्येयानुसार करिअर निवडण्यामध्ये त्यांची मदत करा.
कोचिंग क्लास घेणे आवश्यक आहे का?
कोचिंग क्लास लावावा किंवा कोचिंग क्लास लावू नये याचे अचूक उत्तर नाही. जर तुमचे पाल्य सेल्फ स्टडीने अभ्यास करू इच्छित असेल आणि अपेक्षेनुसार चांगले गुण मिळवत असेल तर सामान्यतः कोचिंगची आवश्यकता नसते अन्यथा कोचिंग लावणे फायदेशीर ठरते.
परीक्षेच्या तयारीसाठी किती खर्च येतो?
परीक्षेच्या तयारीचा खर्च हा तुमच्यावर अवलंबून असतो. उमेदवारांच्या आर्थिक परिस्थितीनुसार हा खर्च बदलत असतो. पण सामान्यतः कोचिंग क्लास खर्च, पुस्तकांचा आणि शालेय साहित्याचा खर्च, मॉक टेस्ट इत्यादी खर्च तुम्हाला करावा लागतो त्यामुळे प्रवेश घेण्याआधी या खर्चाचा विचार अवश्य करा.
CET, NEET आणि JEE या परीक्षांमध्ये कोणते विषय येतात?
CET, NEET आणि JEE या परीक्षांमध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र, गणित यांसारखे विषय असतात.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
“I wish you all the best for your exam!“
FAQ’s :-
JEE आणि NEET परीक्षेत काय फरक आहे?
JEE हि परीक्षा अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर म्हणजेच B.E.,B.Tech , B.Arch,B.Plan. या अभ्यासक्रमांसाठी घेतली जाते तर NEET ची परीक्षा वैद्यकीय अभ्यासक्रम जसे कि MBBS,BDS साठी घेतली जाते.
कठीण परीक्षा कोणती, NEET किंवा JEE?
NEET आणि JEE यामध्ये तुलनात्मकरित्या पाहिल्यास JEE ची परीक्षा जास्त कठीण आहे.
JEE विद्यार्थी NEET देऊ शकतात का?
होय,JEE च्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी NEET ची परीक्षा देऊ शकतात.
NEET परीक्षा सोपी आहे का?
NEET च्या परीक्षेला मध्यम किंवा निम्न काठिण्य पातळी असलेली परीक्षा म्हणता येईल.
कोणते चांगले आहे, आयआयटी की एमबीबीएस?
या प्रश्नाचे उत्तर सर्वांचे सारखे नसू शकते यामध्ये मत-मतांतर आहेत.जर तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर आय आय टी चांगली आहे आणि जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर एमबीबीएस चे क्षेत्र तुमच्यासाठी चांगले आहे.
CET आणि NEET मध्ये काय फरक आहे?
CET हि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे तर NEET हि राष्ट्रस्तरीय प्रवेश परीक्षा आहे.
CET NEET JEE या परीक्षा देण्यासाठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे?
CET NEET JEE या परीक्षा देण्यासाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या लिंक्स:-
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"