अंगणवाडी मदतनीस पात्रता, कामे, महत्वाची कागदपत्रे,वेतन इ. बद्दल संपूर्ण माहिती.

माहिती शेअर करा.

अंगणवाडी मदतनीस पात्रता

अंगणवाडी मदतनीस पात्रता:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. या पोस्टमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस या पदाबद्दल माहिती घेणार आहोत त्यासोबतच अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदार महिलेला सामान्यतः कोणते प्रश्न आणि शंका असतात याचीही माहिती घेणार आहोत.या पोस्टमध्ये तुम्हाला खालील काही सामान्य प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत,

  • अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
  • अंगणवाडी मदतनीस या पदाची पदभरती कोणामार्फत घेण्यात येते?
  • अंगणवाडी मदतनीस म्हणजे काय?
  • अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता कोणत्या आहेत?
  • अंगणवाडी मदतनीस या पदावरील महिलेची कामे आणि कर्तव्ये काय असतात?
  • अंगणवाडी मदतनीस या पदावरील महिलेला दरमहा किती पगार/मानधन दिले जाते?
  • अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करणाऱ्या महिलेसाठी शासनाच्या कोणत्या अटी आणि नियम आहेत?
  • अंगणवाडी मदतनीस या पदावर नियुक्ती मिळाल्यांनतर अश्या कोणत्या परिस्थिती आहेत ज्यामध्ये नियुक्ती रद्द होऊ शकते?

महत्वाची भरती :-

नवीनतम प्रकाशित भरती :-

अंगणवाडी मदतनीस पात्रता

अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक महिला उत्सुक असतात परंतु या पदाबद्दल सविस्तर आणि अधिकृत माहिती या बहुसंख्य महिला वर्गापर्यंत पोहचत नाही.त्यासाठी आपण हा लेख बनवत आहोत जेणेकरून महाराष्ट्रातील अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिला वर्गापर्यंत हि माहिती पोहचेल आणि त्यांना अंगणवाडी मदतनीस या पदाची तयारी करण्यासाठी आवश्यक असणारी प्राथमिक माहिती मिळेल.

अंगणवाडी मदतनीस या पदाची तयारी करण्यासाठी सर्वात महत्वाचा आणि प्रमुख प्रश्न म्हणजे “अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे?” तर पाहूया या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर,-

  • कोण करू शकत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज :-
    • अंगणवाडी मदतनीस या पदासाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकतात या पदासाठी पुरुष अर्ज करू शकत नाही.
  • शैक्षणिक पात्रता :-
    • अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • रहिवासी :-
    • अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवार त्याच नगरपरिषद/नगरपंचायत/महानगरपालिका मधील स्थानिक रहिवासी पाहिजे ज्या क्षेत्रामध्ये संबंधित महिला उमेदवार अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करत आहे.जर तुम्ही अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ज्या क्षेत्रामध्ये अर्ज करत आहात त्या क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी (नगरपरिषद/नगरपंचायत/महानगरपालिका ) नसाल तर तुम्हाला अपात्र केले जाते किंवा तुमची नियुक्ती रद्द होऊ शकते.
  • वयोमर्यादा :-
    • सर्वसाधारण महिला – वय किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्ष दरम्यान असावे.
    • विधवा महिला :- किमान 18 वर्ष ते कमाल 40 वर्ष दरम्यान असावे.
      • अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करणारी महिला उमेदवार जर विधवा असेल तर संबंधित महिलेसाठी कमाल वयोमर्यादा हि 40 वर्ष आहे. यासाठी संबंधित महिलेला पतीच्या मृत्यूच्या दाखल्याची साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडावी लागते आणि पडताळणीवेळी पतीच्या मृत्यूच्या दाखल्याची सत्यप्रत सादर करावी लागते.
  • भाषा ज्ञान :-
    • अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारास स्थानिक भाषेचे म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
      • अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ज्या संबंधित क्षेत्रामधील अंगणवाडीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत त्या अंगणवाडीमधील 50% पेक्षा जास्त मुले जर मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा बोलणारी असतील तर अशा परिस्थितीमध्ये सदर भाषेचे ज्ञान असणाऱ्या महिला उमेदवाराला त्या संबंधित अंगणवाडीमध्ये नियुक्ती दिली जाते.
  • लहान कुटुंब :-
    • सदर पदासाठी अर्ज करणारी महिला उमेदवार लहान कुटुंब अटीची पूर्तता करणारी असावी.
      • अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करणारी महिला उमेवार लहान कुटुंब अटीची पूर्तता करणारी असावी याचा अर्थ, संबंधित महिलेला दोन पेक्षा जास्त जीवंत अपत्य नसावे जर असतील तर संबंधित उमेदवार अपात्र करण्यात येतात.
      • जर अपत्य मूल दत्तक दिलेले असेल तरी त्या अपत्याचा लहान कुटुंबामधील अपत्यामध्ये समावेश करण्यात येतो.
      • जर संबंधीत अर्जदार अर्ज करतेवेळी लहान कुटुंब प्रमाणपत्र देऊन पात्र झालेली असेल आणि नियुक्ती मिळाल्यांनतर / सेवाकालावधीमध्ये तीसरे मूल झालेले असेल तरीही संबंधित अंगणवाडी मदतनीस या पदावरील महिलेची नियुक्ती रद्द करण्यात येते आणि सेवा समाप्त केली जाते.

अंगणवाडी मदतनीस म्हणजे काय

सरकारच्या महिला व बालविकास विभागाद्वारे महाराष्ट्रामध्ये एकात्मिक बाल विकास हि सेवा राबवण्यात येते. बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि बालकांना पोषक आणि पौष्टिक आहार देण्यासाठी अंगणवाडीमार्फत या सेवा बालकांपर्यंत पोहचवल्या जातात.

विविध अंगणवाड्यांमार्फत या योजनांचा आणि उपक्रमांचा लाभ लहान बालकांना दिला जातो. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेला मदत करण्यासाठी अंगणवाडी मदतनीस या पदावर एका महिलेची नियुक्ती केली जाते त्या महिलेस अंगणवाडी मदतनीस असे म्हणतात. थोडक्यात अंगणवाडी मदतनीस या पदावरील महिला अंगणवाडी सेविका या पदावरील व्यक्तीची सहाय्य्क असते ज्यांना अंगणवाडी हेल्पर असेही म्हणतात.

आता आपण अंगणवाडी मदतनीस या पदावरील महिलेला कोण-कोणती महत्वाची कामे करावी लागतात याची सविस्तर माहिती पाहू,

अंगणवाडी मदतनीस ची कामे

अंगणवाडी मदतनीस या पदावरील महिलेला शासनामार्फत आणि एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि प्रकल्पाशी निगडित असणारी अनेक कामे करावी लागतात त्यातील काही महत्वाची कामे खालीलप्रमाणे,

  • लसीकरण करणे- शासनामार्फत नवजात बालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत नवजात बालकांना लस देणे आणि दिलेल्या लसीची नोंद करणे हे काम अंगणवाडी मदतनीस यांना करावे लागते.
  • आरोग्य तपासण्या करणे- नियुक्ती मिळालेल्या क्षेत्रामधील आरोग्य तपासणी संदर्भातील कामे अंगणवाडी मदतनीस यांना करावे लागते.
  • अंगणवाडी सेविकेला मदत करणे- अंगणवाडीमधील सर्व कामे अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडी मदतनीस यांची मदत घेऊन करावे लागतात. त्यामुळे अंगणवाडी सेविकेला कामकाजामध्ये मदत अंगणवाडी मदतनीस यांना करावी लागते.
  • बालकांना प्राथमिक आणि पूर्व शालेय शिक्षण देणे- लहान बालकांना अंगणवाडीमध्ये आवश्यक पूर्व शालेय शिक्षण अंगणवाडी मदतनीस यांनी द्यावे लागते.
  • अंगणवाडीमधील बालकांची आणि त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे.
  • शासनामार्फत देण्यात येणाऱ्या धान्याचे योग्य वितरण करणे.
  • आहार वितरित करणे- शासनामार्फत देण्यात येणारा आहार अंगणवाडीमधील बालकांमध्ये वितरित करण्याचे काम अंगणवाडी मदतनीस यांना करावे लागते.
  • पालकांशी संवाद साधने- अंगणवाडीमधील बालकांच्या पालकांशी त्यांच्या पाल्याबद्दल आणि त्याच्या आरोग्य संदर्भात संवाद साधने आणि त्यांना माहिती देणे.
  • अंगणवाडीची देखभाल करणे- यामध्ये अनेक कामांचा समावेश होतो जसे कि,
    • अंगणवाडी वेळेवर उघडणे आणि बंद करणे.
    • अंगणवाडीमध्ये स्वच्छता ठेवणे.
    • अंगणवाडी परिसरामध्ये स्वच्छता ठेवणे.इत्यादी.

अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे

अंगणवाडी मदतनीस पात्रता
अंगणवाडी मदतनीस पात्रता

अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता काय काय आहेत याची आणि अंगणवाडी मदतनीस यांना कोणती कामे करावी लागतात याची माहिती आपण वरील भागामध्ये घेतली. आता आपण अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात याची माहिती घेऊ,

तसेच शासन आणि संबंधित नोकरी विभागामार्फत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या इतर कागदपत्रांची यादी जाहिरातीमध्ये दिलेली असते त्यानुसार सर्व आवश्यक कागदपत्रे उमेदवाराने अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.

वरील सर्व कागदपत्रांच्या स्व साक्षांकित प्रति अर्जासोबत पाठवाव्या लागतात आणि जर तुम्ही नियुक्तीसाठी पात्र असाल तर तुम्हाला कागदपत्र पडताळणीवेळी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते त्यामुळे अर्जासोबत मूळ कागदपत्रे जोडू नये .

अंगणवाडी मदतनीस पगार

अंगणवाडी मदतनीस या पदावरील महिलेला अंदाजे 4,500 ते 5,500 रुपये प्रतिमहिना एवढा पगार दिला जातो.

अंगणवाडी मदतनीस या पदाबद्दल आवश्यक असणारी इतर महत्वपूर्ण माहिती :-

अंगणवाडी मदतनीस पेमेंट

  • उमेदवाराने अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या स्व साक्षांकित प्रति सादर करणे आवश्यक आहे त्यामुळे अर्जासोबत मूळ कागदपत्रे जोडू नये.
  • अंगणवाडी सेविका / मिनी अंगणवाडी / अंगणवाडी मदतनीस म्हणून कमीत कमी दोन वर्ष अनुभव असणाऱ्या उमेदवाराला 5 अतिरिक्त गुण देण्यात येतात.
  • गुणांसंबंधित जर परीक्षार्थी उमेदवाराला काही शंका किंवा तक्रार असेल तर गुणवत्ता यादी/नियुक्ती यादी प्रसिद्ध केलेल्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत संबंधित बालविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी अन्यथा या कालावधींनंतर करण्यात आलेल्या तक्रारींची नोंद घेतली जाणार नाही.
  • जर समजा, संबंधित अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज मागवण्यात आलेल्या पदासाठी एकही अर्ज आला नाही किंवा एकच अर्ज आला तर सदर भरतीची फेर जाहिरात दिली जाते आणि फेर जाहिरात दिल्यानंतरही जर एकच पात्र अर्ज आला तर त्या उमेदवाराची छाननीच्या आधीन राहून निवड करण्यात येते.
  • जर पात्र उमेदवार नियुक्ती मिळाल्यानंतर १० दिवसांच्या आत पदावर रुजू झाली नाही तर संबंधित पात्र उमेदवाराची नियुक्ती रद्द केली जाते आणि प्रतीक्षायादीमधील पुढील पात्र उमेदवाराला संधी दिली जाते.
  • उमेदवाराने जातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच नियुक्ती मिळालेल्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत जातवैधता / जात पडताळणी प्रमाणपत्र व त्याची सत्यप्रत नोकरी विभागाच्या कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-

अंगणवाडी मदतनीस पगार किती आहे?

अंगणवाडी मदतनीस या पदावरील महिलेला अंदाजे 4,500 ते 5,500 रुपये प्रतिमहिना एवढा पगार दिला जातो.

अंगणवाडी मदतनीस चे काम काय असते?

लसीकरण करणे ,आरोग्य तपासणी करणे,अंगणवाडीची देखभाल करणे, आहार वितरित करणे, अंगणवाडी सेविकेला मदत करणे अशी अनेक कामे अंगणवाडी मदतनीस यांना करावी लागतात.

अंगणवाडी तक्रार कुठे करावी?

जर अंगणवाडी संबंधित काही तक्रार असेल तर त्या संबंधित क्षेत्रामधील महिला व बालविकास विभागांमध्ये लेखी तक्रार देऊ शकता.

अंगणवाडी पर्यवेक्षकाचे काम काय?

नेमून दिलेल्या क्षेत्रामधील अंगणवाड्यांची आणि संबंधित अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या कामकाजाची तपासणी करण्याचे काम अंगणवाडी पर्यवेक्षक यांचे असते.

महाराष्ट्रात किती अंगणवाडी कर्मचारी आहेत?

महाराष्ट्रामध्ये सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका आहेत.

अंगणवाडीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

बालमृत्यूचे आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करणे आणि बालकांना पोषक आणि पौष्टिक आहार देणे हे अंगणवाडीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 
maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment