indian army information in marathi
Table of Contents
Indian Army Information in Marathi:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.या पोस्ट मध्ये आपण भारतीय लष्कराची सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर लष्कर भरतीबद्दलही माहिती घेणार आहोत. ह्या पोस्टच्या इतिश्रीला तुम्हाला भारतीय लष्कराबद्दल आवश्यक असणारी सर्व माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
Indian army information in marathi
बदलत्या वेळेनुसार आणि काळानुसार करिअरच्या अनेक नवनवीन संधी तरुण – तरुणींसाठी उपलब्ध होत आहेत. त्यानुसार नवीन पिढी उपलब्ध असलेल्या करिअर संधींचा उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करत आहेत. परंतु तरीही सैन्य भरतीबद्दल आकर्षण असणाऱ्या वर्गामध्ये या नवीन करिअर संधींमुळे फरक पडलेला दिसत नाही. भारतीय सैन्यामध्ये भरती होण्याचे एकमेव स्वप्न पाहणारा फार मोठा वर्ग आजही आहे जो देशसेवा करण्यासाठी आणि देशाप्रती असणाऱ्या प्रेमाप्रती आजही प्रामाणिक आहे. अशी खूप सारी कुटुंबे आहेत जे पिढ्यानपिढ्या देशसेवा करत आहेत ज्यांच्या घरामध्ये भारतीय सैन्यामध्ये भरती होण्याचा वारसा आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ह्या कुटुंबांसाठी भारतीय सैन्यामध्ये भरती होणे हे फक्त एक उदरनिर्वाहाचे साधन किंवा करिअर ऑप्शन नसून देशाप्रती असणारे त्यांचे प्रामाणिक प्रेम आहे.
आर्मी भरती माहिती मराठी
सन 1 एप्रिल 1895 रोजी भारतीय लष्कराची म्हणजेच Indian Army ची स्थापना करण्यात आली.राष्ट्राच्या सीमेची सुरक्षा करणे तसेच परकीय आक्रमणांपासून आणि शेजारील देशांपासून देशाचे संरक्षण करणे हे भारतीय लष्कराचे प्राथमिक कार्य असते.त्याचबरोबर शेजारील देशांपासून होऊ शकणाऱ्या आक्रमणांना सामोरे जाण्यासाठी तयार राहणे आणि त्यानुसार रणनीती आखणे हीदेखील भारतीय लष्कराची जबाबदारी आणि कर्तव्य असते.
देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतीय सैन्यदल मुख्य तीन दलांमध्ये विभाजित करण्यात आलेले आहे.यामध्ये भारतीय वायुसेना म्हणजे Indian Air Force, भारतीय नौदल म्हणजेच Indian Navy आणि भारतीय लष्कर म्हणजेच Indian Army यादलांचा समावेश होतो.
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये भारतीय लष्करावर ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व होते.त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये भारतीय लष्कराला ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर म्हणून ओळखले जायचे ज्याला Armies Of the East India Company म्हणून संबोधले जात असे.त्यानंतर कालांतराने जेव्हा ब्रिटिशांचे वर्चस्व वाढले आणि ते राज्य करू लागले तेव्हाच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्कराला ब्रिटिश भारतीय लष्कर म्हणून ओळखले जाऊ लागले ज्याला British Indian Army असे संबोधले जाऊ लागले.त्यानंतर जेव्हा भारत पारतंत्र्यामधून मुक्त झाला आणि स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिश भारतीय लष्कराला म्हणजेच British Indian Army ला भारतीय लष्कर म्हणजेच Indian Army म्हणून ओळखले जाऊ लागले आणि हेच लष्कर पुढे जाऊन जगातील शक्तिशाली लष्कर म्हणून ओळखले जाऊ लागले.
आर्मी विषयी माहिती
भारतीय लष्कराला अनेक वेळा परकीय आक्रमण आणि शेजारील देशांकडून म्हणजेच पाकिस्तान आणि चीन या देशांकडून झालेल्या आक्रमणांना सामोरे जावे लागलेले आहे. त्यावेळी भारतीय लष्कराने या देशांसोबत झालेल्या विविध आक्रमणांमध्ये आणि हल्ल्यांमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे.
अशा हल्ल्याना अधिक कार्यक्षम पद्धतीने हाताळण्यासाठी आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी रणनीती आखणे आवश्यक असते आणि याच रणनीतीचा महत्वाचा भाग असतो सिक्रेट ऑपरेशन्स. भारतीय लष्कराने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशी अनेक सिक्रेट ऑपरेशन्स यशस्वीपणे राबवलेली आहेत.ज्यामध्ये ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन मेघदूत यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
भारतीय भूदल माहिती मराठी
भारतीय लष्कराने देशाची सुरक्षा अधिक प्रभावीपणे आणि अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी विविध रेजिमेंट्स बनवलेल्या आहेत.भारतीय लष्कारामध्ये त्यानुसार सुमारे 13,25,000 साधारण सैनिक तर 11,55,000 राखीव सैनिक यांचा समावेश करण्यात आलेला आहे.यामध्ये सैनिकांना जवान, हवालदार, सब-इन्स्पेक्टर , लेफ्टनंट अशा प्रकारच्या पदांमध्ये विभाजित केलेले आहे.
आता पर्यंत आपण भारतीय लष्कराबद्दल माहिती पहिली आता आपण भारतीय सैन्यामध्ये भरती कसे होता येईल याची थोडक्यात माहिती घेऊ,
ज्या भारतीय तरुण-तरुणींना भारतीय लष्करामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी भारतीय लष्करामध्ये भरती होण्यासाठी काही मार्ग आहेत ज्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.यासाठी उमेदवार शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. आता आपण माहिती घेऊ त्या पर्यायांबद्दल ज्याद्वारे तुम्ही भारतीय लष्करामध्ये भरती होऊ शकता.

आर्मी भरती होण्यासाठी काय करावे लागते
- NDA :- भारतीय लष्करामध्ये भरती होण्याचा अत्यंत लोकप्रिय असणारा पर्याय म्हणजे NDA ची परीक्षा देणे. परंतु या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने काही अटी आणि पात्रता यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये उमेदवाराचे वय किमान 16.5 वर्ष ते कमाल 19.5 वर्ष यादरम्यान असणे गरजेचे आहे. जर तुम्ही इयत्ता 12 वी उत्तीर्ण असाल तर या परीक्षेसाठी अर्ज करू शकता.हि परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत घेण्यात येते.या परीक्षेमध्ये लेखी परीक्षा, शारीरिक पात्रता चाचणी आणि मुलाखत/ग्रुप डिस्कशन यांचा समावेश असतो.
- भारतीय सेना भरती मेळावा :- भारतीय सेना भरती मेळावा म्हणजे Indian Army Recruitment Rally. या रॅलीमार्फत भारतीय सैन्यामध्ये भरती होण्याची एक उत्तम संधी उमेदवारांना दिली जाते.भारतीय लष्कर या रॅलीचे झोन नुसार आयोजन करते. ज्यामध्ये विशिष्ट झोनमधील उमेदवारांना भारतीय सैन्यामध्ये भरती होण्याची संधी दिली जाते. या मेळाव्यामधील भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि शारीरिक पात्रता चाचणी यांचा समावेश असतो. या मेळाव्याबाबतची माहिती भारतीय लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जात असते. अधिक माहितीसाठी भारतीय लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळाची लिंक खाली देण्यात आलेली आहे.
- टेक्निकल एंट्री स्कीम :- भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी टेक्निकल एंट्री स्कीम देखील एक उत्तम पर्याय मानला जातो. हि परीक्षा देण्यासाठी उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबतच 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा समावेश असणे देखील आवश्यक आहे. हि परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 16.5 वर्ष ते कमाल 19.5 वर्ष यादरम्यान असावे लागते त्यासोबतच इयत्ता 12 वीमध्ये किमान 70% गुण असणे आवश्यक आहे.
आर्मी भरतीची तयारी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स :- आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न अनेक उमेदवार पाहतात पण या स्वप्नाला सत्यात उतरवण्याची धमक फक्त त्याच उमेदवारांमध्ये असते जे आर्मी भरती होण्याच्या प्रवासाचे योग्य नियोजन करतात आणि त्या नियोजनाची अंमलबजावणी करतात.
आर्मी भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शारीरिक पात्रता आणि बौद्धिक ज्ञान यासोबतच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचे असते. त्यासाठी खाली काही महत्वाच्या टिप्स देत आहोत ज्यामुळे तुमच्या आर्मी भरतीच्या प्रवासामध्ये थोडीशी मदत होईल.
Indian army information in marathi
शारीरिक स्वाथ्य टिप्स:-
- रोज नियमित आणि नियोजितपणे व्यायाम करा – व्यायामामध्ये रनिंग, पुश-अप्स, पुल-अप्स यांचा समावेश अवश्य करा.
- योग आणि ध्यान करा – ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वास वाढून अभ्यासामध्ये तुमचे मन लागेल.
- सकस आणि संतुलित आहार घ्या. – शारीरिक तंदुरुस्तीसाठी तर हे आवश्यक आहेच त्यासोबचत मानसिक स्वाथ्यामध्येही फायदेशीर आहे.
- पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या- आर्मी भरतीची तयारी करण्यामध्ये तुमची ऊर्जा खर्च होत असते आणि तुमच्या शरीराचीही झीज होत असते. याची भरपाई किंवा रिकव्हरी झोपेमध्ये होत असते म्हणून झोप अत्यंत महत्वाची आहे.
- सातत्य ठेवा – वरील सर्व गोष्टींमध्ये सातत्य ठेवा. तात्पुरती तयारी करणे निरर्थक ठरते त्यामुळे भरती जाहीर होण्या आधीपासूनच तयारीला लागा आणि त्यामध्ये सातत्य ठेवा.
बौद्धिक ज्ञान आणि परीक्षेची तयारी करण्यासंदर्भात टिप्स :-
- ज्या पदासाठी अर्ज करत आहेत त्या पदाचा अभ्यासक्रम समजून घ्या आणि त्या अनुषंगाने परीक्षेची तयारी करा.
- नियमित अभ्यास करा आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवा.
- सामान्य ज्ञान या विषयासोबतच चालू घडामोडींचाही अभ्यास करा.
- गणित या विषयाची तयारी बेसिक ज्ञानापासून करा जेणेकरून हा विषय संपूर्ण समजून घेण्यास मदत मिळेल.
- तुमची तार्किक क्षमता विकसित करा ज्यामुळे तुमची बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत मिळेल.
- इंग्रजी भाषा शिका त्यावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करा.
- ज्या पदासाठी अर्ज करत आहेत त्या पदाच्या झालेल्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा आणि त्यांचा पॅटर्न समजून घ्या.
- जुन्या प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करा आणि प्रश्नपत्रिकांचे बारकाईने विश्लेषण करा.
मानसिक स्वाथ्य टिप्स :-
- जरी तुमच्यावर आणि तुमच्या स्वप्नावर कोणाचा विश्वास नसेल तरी त्यांची पर्वा न करता स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा. तुमचा आत्मविश्वास हाच तुमच्या यशाचा मूलभूत पाया आहे हे लक्षात ठेवा.
- कोणत्याही विपरीत किंवा कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवण्याची कला शिकून घ्या. हि कला तुम्हाला तुमच्या ट्रेनिंगमध्ये दबाव आणि प्रेशर सहन करण्याची क्षमता देईल.
- एकजुटीने आणि समूहपुर्वक काम करणे शिका.
- स्वतःला शिस्त लावा आणि ध्येयाप्रती समर्पित व्हा.
- स्वतःच्या कर्तव्याला नेहमी भावनांच्या वरचा दर्जा द्या. जीवनातील कठोर निर्णय घेणे यामुळे सहज शक्य होते.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
भारतात किती सैन्य दल आहेत?
भारतात मुख्य तीन सेन्यदल आहेत ते म्हणजे Indian Air Force, Indian Navy आणि Indian Army.
भूदल म्हणजे काय?
भूदल म्हणजे असे सैन्य किंवा दल जे जमिनीवर लढते.
भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य काय आहे?
भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य “Service is our prime duty” हे आहे ज्याचा संस्कृत मध्ये अर्थ “सेवा परमो धर्म: “ असा होतो आणि मराठी मध्ये याचा अर्थ “सेवा हेच आमचे आद्य कर्तव्य” असा होतो.
लष्कर म्हणजे काय?
लष्कर म्हणजे असा समूह जो राष्ट्राची एकता, बंधुता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी आणि परकीय आक्रमण किंवा हल्ल्यांपासून देशाला वाचवण्यासाठी नेहमी तत्पर असतो तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये देशाचे आणि नागरिकांचे रक्षण करतो.
लष्कराचे काम काय?
लष्करामध्ये प्रामुख्याने तीन दलांचा समावेश होतो.हे तीनही दल देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या दलांचे मुख्य काम आणि जबाबदारी हि देशाचे हवाई मार्गाने, पाणी / समुद्रमार्गाने आणि जमीन मार्गाने होणाऱ्या आक्रमणांपासून संरक्षण करणे हि आहे.
सर्वात मोठे सैन्य कोणाकडे आहे?
जगातील सर्वांत मोठे सैन्य चीन या देशाकडे आहे.
भारतात किती प्रकारचे सैन्य आहे?
भारतामध्ये भूदल,वायुदल आणि नौदल हे तीन प्रकारचे मुख्य सैन्य आहे.
दरवर्षी किती लोक भारतीय सैन्यात भरती होतात?
दरवर्षी अंदाजे 50,000 ते 60,000 नवीन सैनिक भारतीय सैन्यामध्ये भरती होतात.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"