Air Force Information in marathi
Table of Contents
air force information in marathi:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
air force information in marathi या पोस्टमध्ये आपण भारतीय वायुदलाबद्दल माहिती घेणारा आहोत. या पोस्टमध्ये आपण भारतीय वायुदलाच्या माहितीसोबतच या दलामध्ये कसे भरती होता येते याचीही माहिती घेणारा आहोत.त्यामुळे हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
air force information in marathi
आपली भारतीय वायुसेना जगातील 4 थ्या क्रमांकाची सर्वात शक्तिशाली असणारी वायुसेना म्हणून ओळखली जाते. भारतीय वायूसेना ज्याला Indian Air Force म्हणून ओळखले जाते या दलाची स्थापना सन 8 ऑक्टोबर 1932 रोजी करण्यात आली पण तेव्हा या दलाचे नाव भारतीय वायूसेना असे नव्हते.त्या काळी या दलाला आर.आय.ए.एफ म्हणजेच रॉयल इंडियन एअर फोर्स असे नाव देण्यात आले होते.
परंतु सन 1950 मध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या आर.आय.ए.एफ म्हणजेच रॉयल इंडियन एअर फोर्सचे नाव बदलून भारतीय वायूसेना म्हणजेच Indian Air Force असे ठेवण्यात आले.भारतीय वायुसेनेचे ब्रीदवाक्य “नभ:स्पृशं दीप्तम्” ज्याचा मराठीमध्ये अर्थ “आकाशाला स्पर्श करणारे तेजस्वी” असा होतो.
भारतीय वायुसेना लढाई किंवा आपात्कालीन परिस्थितीमध्ये हवाई मदत पुरवण्याची आणि संरक्षण देण्याची अत्यंत महत्वाची आणि जोखमीची जबाबदारी पार पडत असते.त्याचबरोबर हवाई मार्गाने होऊ शकणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार आणि प्रतिबंध करणे, तसे त्यापासून देशाचे आणि नागरिकांचे संरक्षण करणे हि भारतीय वायू सेनेची महत्वाची जबाबदारी असते.
भारतीय वायुसेना माहिती मराठी
भारतीय वायुसेनेचे पश्चिम विभाग, दक्षिण विभाग , दक्षिण-पश्चिम विभाग , पूर्व विभाग आणि मध्य विभाग हे महत्वाचे विभाग आहेत. वायुसेनेच्या या विभागांना कमांड असे म्हणतात. भारतीय वायुसेनेच्या प्रत्येक विभाग/कमांडमध्ये अनेक एअर स्टेशन्स असतात ज्यांना एअर बसेस असे म्हणतात. या सर्व विभागांमध्ये मिळून एकत्रितपणे सुमारे 1,70,000 वायुसेना जवान भारतीय वायुसेनेमध्ये कार्यरत आहेत.
आपण पाहिले कि, आपली भारतीय वायुसेना जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायुसेना आहे त्याची अनेक कारणे आहेत. आपल्या भारतीय वायुसेनेमध्ये अनेक प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, बॉम्बर्स, विमानाची वाहतूक / ने-आण करण्यासाठी सक्षम असणारी विमाने यांचा समावेश आहे. युद्धाच्या, अडचणीच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीच्या समयी या सर्वांचा वापर भारतीय वायुसेनेमार्फत कार्यक्षमतेने केला जातो.

भारतीय वायुसेना दिवस
08 ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुसेना दिवस / Indian Air Force Day म्हणून साजरा केला जातो.
जर तुम्हाला भारतीय वायुसेनेमध्ये करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी पुढील माहिती महत्वाची आहे.
भारतीय वायुसेनेमार्फत विविध प्रकारे वायुसेना अधिकारी आणि वायुसेना सैनिक पदांची भरती केली जाते. भरतीसंबंधीच्या जाहिरातींची प्रसिद्धी विविध वर्तमानपत्रे आणि भारतीय वायुसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येत असते.भारतीय वायुसेनेमध्ये वयानुसार आणि शिक्षणानुसार विविध क्षेत्रांमध्ये करीअरच्या उत्तम संधी उपलब्ध असतात. ज्यामध्ये पायलट, इंजिनियरिंग, टेक्नॉलॉजी अशा प्रकारच्या अनेक क्षेत्रांचा समावेश होतो.
भारतीय वायुसेना माहिती मराठी
आता आपण भारतीय वायुदलामध्ये करिअर करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या विविध क्षेत्रांची थोडक्यात माहिती घेऊ, –
तुम्ही विविध परीक्षा देऊन भारतीय वायुसेनेमधील विविध क्षेत्रांमध्ये करिअर करू शकता. तुम्ही तुमच्या आवड, ज्ञान आणि शिक्षण तसेच पात्रतेनुसार AFCAT, CDS, NCC किंवा NDA यांसारख्या परीक्षा देऊ शकता ज्यामाध्यमातून उमेदवाराला Ground Duty (Technical), Ground Duty (Non-Technical), Flying Branch यांसारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची संधी मिळते.
आता आपण NDA, AFCAT , CDSE आणि NCC या परीक्षेच्या पात्रतेविषयी माहिती घेऊ,
NDA:- NDA चे पूर्ण रूप National Defence Academy असे आहे.NDA ची परीक्षा नॅशनल लेव्हलची परीक्षा असते.हि परीक्षा UPSC मार्फत घेण्यात येते. या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने खालील किमान पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.या परीक्षेची आवश्यक माहिती खालीलप्रमाणे.
- उमेदवार अविवाहित असणे आवश्यक.
- उमेदवाराचे वय 16.5 ते 19.5 वर्ष दरम्यान असावे.
- उमेदवार 12 वी मध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.
- या परीक्षेसाठी अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 100 रुपये एवढे आकारण्यात येते तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि महिलांसाठी फी नाही.
AFCAT:- AFCAT या परीक्षेचा फुल फॉर्म Air Force Common Admission Test असा आहे.हि राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी परीक्षा आहे जी IAF म्हणजेच भारतीय वायुदलामार्फत घेण्यात येते.या परीक्षेची पात्रता खालीलप्रमाणे,
- उमेदवार अविवाहित असणे आवश्यक.
- उमेदवाराचे वय 20 ते 24 वर्ष दरम्यान असावे.
- या परीक्षेसाठी 250/- रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात यते.
CDSE :- CDSE या परीक्षेचे पूर्ण रुप Combined Service Examination असे आहे.हि परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते.CDSE ची परीक्षा UPSC मार्फत घेण्यात येते.या परीक्षेची माहिती खालीलप्रमाणे,
- उमेदवार अविवाहित असणे आवश्यक.
- उमेदवाराचे वय 19 ते 24 वर्ष दरम्यान असावे.
- अभियांत्रिकी पदवी । गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह पदवी आवश्यक.
NCC :- NCC म्हणजेच National Cadets Corps. या परीक्षेची किमान आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे,
- उमेदवार अविवाहित असणे आवश्यक.
- उमेदवाराचे वय 20 ते 24 वर्ष दरम्यान असावे.
- 12 वी मध्ये गणित आणि भौतिकशास्त्र या विषयासह किमान 50% गुण आवश्यक आणि 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
भारतीय वायुदल माहिती मराठी
भारतीय हवाईदलामध्ये अनेक विभाग असतात , प्रत्येक विभागाचे कामकाज वेगवेगळे असते. तुमच्या शारीरिक आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे मिळालेल्या पद नियुक्तीनुसार तुम्हाला काम करावे लागते. तुम्हाला यातील महत्वाच्या विभागांची थोडक्यात माहिती असावी यासाठी खालील माहिती देत आहोत.
- फायटिंग ब्रांच – या ब्रांचचे मुख्य कार्य हे देशाच्या सीमांचे हवाई रक्षण करणे हे असते. त्यासोबचत शत्रूंच्या लढाऊ विमानांना परास्त करून शत्रूंच्या हल्यांपासून देशाला वाचवणे हे देखील मुख्य कार्य फायटिंग ब्रांचचे असते. या ब्रान्चमधील अधिकारी आणि सैनिक लढाऊ विमान उडवण्यामध्ये प्रशिक्षित असतात.
- टेक्निकल ब्रांच – इंडियन एअर फोर्स मधील सर्व लढाऊ विमानांची , इतर विमानांची, शस्त्रांची आणि उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल संदर्भातील सर्व कामे टेक्निकल ब्रँचच्या अधीन येत असतात. या शाखेतील अधिकारी आणि जवान यांना विमान, शस्त्र इत्यादींचे ज्ञान आणि प्रशिक्षण दिलेले असते.
- ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रांच – इंडियन एअर फोर्स मधील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह या ब्रांचला अनेक कामकाज पाहावी लागतात ज्यातील बहुतेक कामे कार्यालयीन कामे असतात ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स, हवाई दलातील इतर प्रशासकीय कामे यांचा समावेश होतो.
- एज्युकेशन ब्रांच – इंडियन एअर फोर्स मधील एज्युकेशन हि ब्रांच हवाई दलामध्ये नियुक्त झालेल्या सर्व अधिकारी, जवान आणि सैनिकांना प्रशिक्षण देण्याचे महत्वाचे काम करते. तसेच नव-नवीन तंत्रज्ञानाबद्दलची माहिती देऊन अधिकारी, जवान, आणि सैनीकांना देखील अपडेट करते. या शाखेमधील अधिकारी इंडियन एअर फोर्स मध्ये शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून काम करत असतात.
- वेपन सिस्टीम ब्रांच – इंडियन एअर फोर्स मधील विविध शस्त्रांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण वेपन सिस्टीम ब्रांच मार्फत केले जाते. वेपन सिस्टीम ब्रांच हि मिसाईल, रडार, तोफ सह इतर शस्त्रास्त्रांची देखभाल करत असते. या ब्रान्चमध्ये काम करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांची सखोल माहिती असणे आवश्यक आहे.
bhartiya vayusena information in marathi
- एअर ट्राफिक कंट्रोल ब्रांच – इंडियन एअर फोर्सच्या या ब्रान्च मार्फत हवाई वाहतुकीचे नियंत्रण केले जाते. हवाई वाहतूकीचे अनेक निर्णय या विभागावर अवलंबून असतात जसे कि विमानांची उड्डाणे आणि हवाईमार्ग नियंत्रित करणे,त्यामध्ये सुरक्षित अंतर राखणे इत्यादी. या विभागामध्ये काम करण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य आणि उच्च गणितीय क्षमता यांची अत्यंत आवश्यकता असते.
- सर्च अँड रेस्क्यू ब्रांच – इंडियन एअर फोर्सच्या सर्च अँड रेस्क्यू या ब्रान्चमार्फत शोध आणि बचाव कार्याची कार्यवाही केली जाते. विमान अपघात परिस्थितीमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये इंडियन एअर फोर्सची सर्च अँड रेस्क्यू हि ब्रांच यामध्ये अडकलेल्या लोकांना आणि नागरिकांना शोधण्यामध्ये आणि त्यांना वाचवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
हवाई दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
Touch The Sky With Glory हे हवाई दलाचे ब्रीदवाक्य आहे ज्याचा मराठीमध्ये अर्थ “गौरवाने आकाशाला स्पर्श करा ” असा होतो.
भारतीय हवाई दलाचे मुख्यालय कोठे आहे?
भारतीय हवाई दलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
भारतीय वायुसेना म्हणजे काय?
भारतीय वायुसेना हे भारताचे असे दल आहे जे हवाई हल्ला करण्यास सज्ज असते.
हवाई दलाचे मुख्य कार्य काय आहे?
हवाई दलाचे मुख्य कार्य हे देशाचे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करणे हे आहे.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"