कृषी सेवक पात्रता
Table of Contents
कृषी सेवक पात्रता:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. या पोस्टमध्ये आपण कृषी सेवक या पदासाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये कृषी सेवक या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, प्रवर्गानुसार वयोमर्यादा आणि त्यामध्ये देण्यात येणारी सवलत / शिथिलता, परीक्षा पद्धती आणि परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादी महत्वपूर्ण घटकांची माहिती तुम्हाला या एकाच पोस्टमध्ये मिळणार आहेत. तसेच,
कृषी सेवक पात्रता या घटकासोबतच तुम्हाला, कृषी सेवक पदाच्या परीक्षेमधील अत्यंत महत्वाचा असणारा विषय म्हणजेच “कृषी“ या विषयामध्ये नेमके कोणत्या घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात याची पुरेपूर माहिती मिळणार आहे. हि पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला कृषी सेवक या पदाबद्दल आणि परीक्षेबद्दल कोणतीही शंका राहणार नाही, त्यामुळे हि पोस्ट काळजीपूर्वक वाचून अभ्यासाचे नियोजन करा.
तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
Related Posts :-
नवीनतम प्रकाशित भरती :-
- NHM Nashik Recruitment 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025
- Bank Of India Bharti 2025-खुशखबर ! बँक ऑफ इंडिया भरती 2025
- CISF Driver Recruitment 2025 । कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदाच्या 1124 जागा
- UCO Bank LBO Recruitment 2025 | युको बँक भरती 2025
- NHM beed recruitment 2025 | पगार 75000/-₹ ते 85000/-₹
कृषी सेवक पात्रता
कृषी सेवक होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे,
- कृषी सेवक या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने सांविधिक विद्यापीठामधून,
- कृषी या विषयामधील पदविका किंवा
- कृषी या विषयामधील पदवी किंवा
- कृषी विषयामधून उच्च शैक्षणिक पात्रता असलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
टीप :- “कृषी विषयामधील पदवी किंवा पदविका किंवा समतुल्य / उच्च शिक्षण पूर्ण करत असलेले आणि अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये असलेले उमेदवार कृषी सेवक या पदासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत याची नोंद घ्यावी. “
कृषी सेवक या पदासाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा खालील प्रमाणे,
- उमेदवार अराखीव / खुल्या प्रवर्गामधील असल्यास : किमान 19 वर्ष ते कमाल 38 वर्ष
- उमेदवार राखीव / मागास प्रवर्गामधील असल्यास : किमान 19 वर्ष ते कमाल 43 वर्ष
- उमेदवार दिव्यांग असल्यास : कमाल 45 वर्ष पर्यंत
- उमेदवार प्राविण्य प्राप्त खेळाडू असल्यास : कमाल 43 वर्ष पर्यंत
- उमेदवार माजी सैनिक असल्यास : सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष
- उमेदवार विकलांग माजी सैनिक असल्यास : कमाल 45 वर्ष पर्यंत
- उमेदवार अनाथ असल्यास : कमाल 43 वर्ष पर्यंत
- उमेदवार अंशकालीन प्रवर्गामधील असल्यास : कमाल 55 वर्ष पर्यंत
- उमेदवार भूकंपग्रस्त / प्रकल्पग्रस्त प्रवर्गामधील असल्यास : कमाल 45 वर्ष पर्यंत
आता पर्यंत आपण कृषी सेवक या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबद्दल माहिती घेतली आता परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेऊ,
krushi sevak syllabus
कृषी सेवक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये एकूण 5 विषयांचा समावेश होतो ते विषय खालील प्रमाणे,
- मराठी :- कृषी सेवक पदाच्या परीक्षेमध्ये मराठी या विषयावर आधारित 20 प्रश्न विचारले जातात ज्यासाठी 20 गुण दिलेले असतात.
- इंग्रजी :- इंग्रजी या विषयावर आधारित 20 प्रश्न विचारले जातात ज्यासाठी 20 गुण दिले जातात.
- सामान्य ज्ञान :- परीक्षेमधील सामान्य ज्ञान या घटकावर आधारित 20 प्रश्न विचारलेले असतात ज्यासाठी 20 गुण दिले जातात.
- बौद्धिक चाचणी :- बौद्धिक चाचणी या घटकावर आधारित 20 प्रश्न विचारले जातात ज्यासाठी 20 गुण दिलेले असतात.
- कृषी विषय :- कृषी सेवक या पदाच्या परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न म्हणजेच जवळपास 60 प्रश्न हे कृषी या विषयावर विचारले जातात ज्यासाठी अंदाजे 120 गुण दिले जातात. कृषी या विषयामधील घटकांबद्दल आपण सविस्तर माहिती खाली घेणार आहोत,
कृषी सेवक अभ्यासक्रम
- एकूण विषय : 04
- एकूण प्रश्न : 140
- एकूण गुण : 200
- परीक्षा प्रणाली : ऑनलाईन । वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. (एकूण 5 पर्याय )
- परीक्षेसाठी देण्यात येणारा वेळ : 2 तास । 120 मिनिटे.
- परीक्षेसाठी देण्यात येणारा वेळ जरी 2 तास / 120 मिनिटे असला तरी उमेदवाराने परीक्षा सुरु होण्याच्या 1 तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे कारण की, या वेळेमध्ये उमेदवाराचे संगणकावर लॉगिन केले जाते, परीक्षेच्या सूचना दिल्या जातात आणि प्रवेशपत्र गोळा केले जातात.
कृषी अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते
अ. नं. | विषयाचे नाव | काठिण्य पातळी | प्रश्न | गुण |
---|---|---|---|---|
1. | मराठी | इयत्ता 10 वी | 20 प्रश्न | 20 गुण |
2. | इंग्रजी | इयत्ता 10 वी | 20 प्रश्न | 20 गुण |
3. | सामान्य ज्ञान | – | 20 प्रश्न | 20 गुण |
4. | बौद्धिक चाचणी | – | 20 प्रश्न | 20 गुण |
5. | कृषी विषय | कृषी स्तर पदविका | 60 प्रश्न | 120 गुण |
एकूण | 140 प्रश्न | 200 गुण |

कृषी विषय स्पेशल टीप :- परीक्षेमधील सर्वात महत्वाचा असणारा विषय म्हणजे कृषी. या विषयावर आधारित असणारे 120 प्रश्न विचारले जातात.
कृषी सेवक पदाच्या परीक्षेमध्ये कृषी या विषयासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता आणि कृषी सहाय्यक या पदाच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यावर आधारित कृषी सेवक या पदाची परीक्षा घेतली जाते. या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये सामान्यतः खालील घटकांचा समावेश होतो,
- मृद शास्त्र व्यवस्थापन
- जमीन व्यवस्थापन
- पीक संवर्धन आणि शेतीपूरक उद्योग
- उद्यान विद्या – रोपवाटिका आणि फळ बागा व्यवस्थापन
- उद्यान विद्या – भाजीपाला व फूलांचे व्यवस्थापन
- कृषी विस्तार
- कृषी विपणन
- कृषी व्यवसाय आणि वित्त व्यवस्थापन
उमेदवाराने वरील घटकांचा आणि त्यामधील उप घटकांचा अभ्यास करावा.
कृषी सेवक पगार
कृषी सेवक पगार :- रुपये 16000/- (प्रतिमहिना)
कृषी सेवक म्हणजे काय
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी तसेच पिकांसंबंधित , खतांसंबंधित, कीटक नाशकांसंबंधित , नवीन शेती उपकरणांसंबंधित इ. माहिती देण्यासाठी कृषी सेवक यांची नियुक्ती केली जाते.
krushi sevak information in marathi
कृषी सेवक पदाच्या परीक्षेसाठी आवश्यक सूचना :-
- कृषी सेवक पदाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.
- परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. एका प्रश्नासाठी पाच पर्याय दिलेले असतात त्यापैकी एक बरोबर पर्याय उत्तर म्हणून निवडणे अपेक्षित असते.
- प्रश्नाच्या उत्तरामधील अंतिम पर्याय निवडल्यानंतर उमेदवाराने Save and Next / Mark For Review and Next या ऑप्शन वर आठवणीने क्लिक करावे अन्यथा ते निवडलेले उत्तर मूल्यांकनासाठी विचारात घेतले जाणार नाही त्यामुळे गुणांचे नुकसान होऊ शकते.
- कृषी सेवक पदाच्या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसते परंतु तरीही उमेदवाराने अंदाजे उत्तर देऊ नये.
- परीक्षेला उपलब्ध करून दिलेल्या संगणकाच्या स्क्रीनवरील उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये टायमर / घड्याळ दिलेले असते ज्यावर शिल्लक वेळ दर्शविलेली असते त्यानुसार उमेदवाराने वेळेचे नियोजन करावे आणि जास्तीत-जास्त प्रश्न योग्य पर्याय निवडून सोडवण्याचा प्रयत्न करावा.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
FAQ’s :-
कृषी सेवक परीक्षा कोणत्या भाषेत घेण्यात आली?
कृषी सेवक पदाची परीक्षा इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये घेण्यात येते परंतु भाषा विषय म्हणजेच मराठी आणि इंग्रजी हे विषय यासाठी उपवाद आहेत कारण, मराठी ची परीक्षा मराठी मध्ये आणि इंग्रजीची परीक्षा इंग्रजीमध्ये घेतली जाते.
महाराष्ट्रातील कृषी सेवकांचा पगार किती आहे?
महाराष्ट्रामधील कृषी सेवकांना रुपये 16000/- प्रतिमाह पगार दिला जातो.
कृषी सेवक पदाच्या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असते का ?
नाही, कृषी सेवक पदाच्या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसते.
कृषी सेवक पदाची परीक्षा किती गुणांची असते
कृषी सेवक पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा एकूण 200 गुणांची असते ज्यामध्ये 140 प्रश्न विचारले जातात. हि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"