कृषी अधिकारी माहिती
Table of Contents
कृषी अधिकारी माहिती:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे. या पोस्टमध्ये आपण कृषी अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणारी MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणारी कृषी सेवा परीक्षा या परीक्षेची सविस्तर माहिती घेणार आहोत.
या पोस्टमध्ये आपण कृषी सेवा या परीक्षेसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, प्रवर्गानुसार असणारी वयोमर्यादा, परीक्षेचा अभ्यासक्रम (संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत), परीक्षा पद्धती, व इतर माहिती तसेच परीक्षेसंदर्भातील आणि पदासंदर्भातील असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे इत्यादी माहिती घेणार आहोत.
जर तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणारी कृषी सेवा हि परीक्षा उत्तीर्ण होऊन कृषी अधिकारी बनायचे असेल तर तुमच्यासाठी हि पोस्ट अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे हि पोस्ट काळजीपूर्वक वाचून अभ्यासाचे नियोजन करा आणि तुमचे कृषी अधिकारी पदाचे स्वप्न साकार करा.
तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
कृषी अधिकारी माहिती
MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग, या आयोगामार्फत महाराष्ट्र राज्यामधील अनेक विभागातील पदे भरण्यात येतात. त्या विभागांमध्ये कृषी विभागाचा देखील समावेश होतो. कृषी विभागामधील कृषी अधिकारी हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून भरण्यात येत असते.
कृषी अधिकारी या पदाला Agriculture Officer असेही म्हणतात. महाराष्टामध्ये कृषी अधिकारी होण्यासाठी तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, आणि मुलाखत या निवड प्रक्रियांमधून जावे लागते. यानंतर तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये आलात तर तुमची कागदपत्र पडताळणी केली जाते.
कृषी अधिकारी पात्रता
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या कृषी सेवा परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार खालील निकषांमध्ये पात्र असणे आवश्यक आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा यांसह इतर बाबींचा देखील समावेश आहे त्याबद्दल खाली माहिती देण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता:- महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कृषी सेवा या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालील शाखांमधून पदवीधर असणे आवश्यक आहे.
- मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कृषी पदवी / कृषी अभियांत्रिकी पदवी / उद्यानविद्या पदवी / समतुल्य.
- शासन निर्णय क्रमांक : आकृवी – १२११ /प्रक्र २०८ /१५ ए नुसार खालील पदव्या बी. एस. सी. (कृषी) / बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी) यांच्या समतुल्य म्हणून मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्या पदव्या खालील प्रमाणे,
- बी. एस. सी. (कृषी जैव तंत्रज्ञान )
- बी. एस. सी. (गृह विज्ञान)
- बी. एफ. एस. सी.
- बी. एस. सी. (कृषी व्यवसाय व्यवस्थापन)
- बी. टेक. (अन्न तंत्र)
- बी. एस. सी. (उद्यानविद्या)
या पदव्या समतुल्य म्हणून मान्य करण्यात आलेल्या आहेत.
krushi adhikari syllabus in marathi
कृषी सेवा परीक्षेच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशानुसार आणि शासन निर्णयानुसार बदल करण्यात येऊ शकतो त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शैक्षणिक पात्रतेची अट काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर पदासाठी अर्ज करावा.
वयोमर्यादा :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार खालील प्रमाणे प्रवर्गानुसार वयोमर्यादेमध्ये पात्र असणे आवश्यक आहे.
mpsc agriculture eligibility
- अमागास प्रवर्ग :- अमागास प्रवर्गामधील उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक.
- मागास प्रवर्ग :- मागास प्रवर्गामधील उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक.
- अनाथ :- अनाथ प्रवर्गामधील उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक.
- आ.दु.घ. :- आ.दु.घ या प्रवर्गामधील उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक.
- दिव्यांग :- दिव्यांग प्रवर्गामधील उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक.
how to become agriculture officer in maharashtra
कृषी सेवा परीक्षेच्या वयोमर्यादेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग बदल करू शकते त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर वयोमर्यादेची अट काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर पदासाठी अर्ज करावा.
नागरिकत्व :- कृषी सेवा परीक्षेसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय असणे आवश्यक आहे.
krushi adhikari information in marathi
महाराष्ट्रामध्ये कृषी अधिकारी पदासाठी घेण्यात येणाऱ्या कृषी सेवा परीक्षाचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे,
कृषी अधिकारी पदाची परीक्षा खालील प्रमाणे ३ टप्यांमध्ये घेण्यात येते.
mpsc agriculture officer syllabus
- संयुक्त पूर्व परीक्षा :-
- एकूण विषय – 4
- एकूण प्रश्न – 200
- एकूण गुण – 200
- वेळ – 2 तास | 120 मिनिटे
- मुख्य परीक्षा :-
- एकूण भाग – 2
- एकूण प्रश्न –
- भाग 1 – 100 प्रश्न
- भाग 2 – 200 प्रश्न
- एकूण गुण –
- भाग 1 – 200 गुण
- भाग 2 – 400 गुण
- वेळ –
- भाग 1 – 1 तास | 60 मिनिटे
- भाग 2 – 2 तास | 120 मिनिटे
- मुलाखत :- 50 गुण
कृषी अधिकारी अभ्यासक्रम

संयुक्त पूर्व परीक्षा :- कृषी अधिकारी पदाच्या पूर्व परीक्षेमध्ये एकूण ४ विषय असतात इंग्रजी, मराठी , सामान्य अध्ययन , आणि कृषी. पेपरमध्ये इंगजी या विषयाचे ३५ प्रश्न विचारले जातात ज्यासाठी ३५ गुण दिले जातात, मराठी या विषयाचे ३५ प्रश्न विचारले जातात ज्यासाठी ३५ गुण दिले जातात, सामान्य अध्ययन या विषयाचे ८० प्रश्न विचारले जातात ज्यांना ८० गुण दिले जातात, आणि कृषी या विषयावर आधारित ५० प्रश्न विचारले जातात ज्यांना ५० गुण दिले जातात. अशा प्रकारे एकूण २०० गुणांची आणि २०० प्रश्नांची पूर्व परीक्षा घेतली जाते ज्यासाठी एकूण २ तास म्हणजेच १२० मिनिटे इतका वेळ दिला जातो.
agriculture officer exam in maharashtra
अ.नं. | विषय | प्रश्न संख्या | गुण |
---|---|---|---|
१ . | इंग्रजी | ३५ | ३५ |
२ . | मराठी | ३५ | ३५ |
३ . | सामान्य अध्ययन | ८० | ८० |
४ . | कृषी | ५० | ५० |
एकूण | २०० | २०० |
मुख्य परीक्षा :- कृषी अधिकारी या पदाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यांनतर संबंधित पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागते. या मुख्य परीक्षेमध्ये एकूण २ भाग असतात.
- भाग १ – कृषी विज्ञान
- भाग २ – कृषी/शेती
भाग.नं. | विषय | प्रश्न संख्या | गुण |
---|---|---|---|
१ . | कृषी विज्ञान | १०० | २०० |
२ . | कृषी/शेती | २०० | ४०० |
भाग १ मधील कृषी विज्ञान या पेपरमध्ये एकूण १०० प्रश्न विचारले जातात ज्यासाठी २०० गुण दिले जातात. या भागासाठी १ तास म्हणजेच ६० मिनिटे एवढा वेळ देण्यात येतो.
Agriculture Officer in Maharashtra
भाग २ मधील कृषी / शेती या विषयावर आधारित एकूण २०० प्रश्न विचारले जातात ज्यासाठी ४०० गुण दिले जातात. या भागासाठी २ तास म्हणजेच १२० मिनिटे वेळ दिला जातो.
मुलाखत :- कृषी अधिकारी पदाच्या सयुंक्त पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण/पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यानंतर संबंधित उमेदवारांची ५० गुणांची मुलाखत चाचणी घेतली जाते आणि त्यांनतर अंतिम निवड यादीमध्ये जागा मिळवलेल्या सदस्यांची कागदपत्र पडताळणी केली जाते.
कृषी अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते
जर तुम्हाला शेती , कृषी , जमीन ,मृदा यांसारख्या घटक आणि विषयांमध्ये रुची असेल, आणि त्याच्याशी संलग्न असणारी नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर कृषी अधिकारी होणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कृषी अधिकारी बनल्यानंतर तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये जिल्हा / तालुका स्तरावर चांगले काम करू शकता आणि शेती / कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करून कृषी क्षेत्रासाठी तुमचे मोलाचे योगदान देऊ शकता.
कृषी अधिकारी कसे बनायचे
कृषी अधिकारी होण्यासाठी तुम्ही MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी कृषी सेवा हि परीक्षा देऊन तुमचे कृषी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.
तालुका कृषी अधिकारी पगार
तालुका कृषी अधिकारी यांना 44900 ते 1,42,400 रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाते याव्यतिरिक्त महागाई भत्ता आणि इतर देय भत्ते देखील शासनामार्फत देण्यात येतात.
krushi adhikari salary in maharashtra
कृषी अधिकारी या पदावरील अधिकारी यांना मिळणारे वेतन खालील तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहे.
कृषी अधिकारी पगार
पदनाम | वेतनमान |
कृषी अधिकारी गट – अ | 56100 ते 177500 |
कृषी अधिकारी गट – ब | 44900 ते 142400 |
कृषी अधिकारी गट – ब , कनिष्ठ | 41800 ते 132300 |
तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
कृषी अधिकारी माहिती आणि संबंधित प्रश्नोत्तरे
FAQ’s :-
कृषी अधिकारी काय करतात?
महाराष्ट्रामधील कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, त्यांना शासकीय योजनांची माहिती देतात, कृषी क्षेत्रामधील नवीन संशोधनाबद्दल शेतकऱ्यांना माहिती देतात, कृषी क्षेत्रातील विविध योजनांची अंमलबजावणी करतात थोडक्यात, कृषी अधिकारी हे शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि त्यांना शेतीच्या विकासामध्ये आणि उत्पादनामध्ये वाढ करण्यास मदत करतात.
महाराष्ट्रात कृषी अधिकारी कसे व्हावे?
महाराष्ट्रामध्ये कृषी अधिकारी होण्यासाठी MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणारी कृषी अधिकारी पदाची कृषी सेवा हि परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.
कृषी अधिकाऱ्यासाठी कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल?
महाराष्ट्रामध्ये कृषी अधिकारी होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणारी कृषी सेवा हि परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
MPSC Agri साठी कोण पात्र आहे?
MPSC Agri या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून कृषी पदवी / कृषी अभियांत्रिकी पदवी / उद्यानविद्या पदवी किंवा या पदवीच्या समतुल्य असणाऱ्या शाखेमधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
कृषी अधिकाऱ्यासाठी कोणती पदवी सर्वोत्तम आहे?
महाराष्ट्रामध्ये कृषी अधिकारी होण्यासाठी कृषी पदवी / कृषी अभियांत्रिकी पदवी / बी. एस. सी. (कृषी) इ. पदवी सर्वोत्तम आहेत.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"