ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम
Table of Contents
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. या पोस्टमध्ये आपण ग्रामसेवक या पदाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील बहुतांश स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवा परीक्षेची तयारी करणारा तरुण वर्ग ग्रामसेवक या पदाची देखील परीक्षा देत असतो. हि पोस्ट बनवण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्हाला ग्रामसेवक या पदाविषयी प्रश्न असणारे काही मेसेज आले होते ज्यामध्ये ग्रामसेवक या पदाविषयी माहिती विचारण्यात आली होती.
तर काही १२ उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुद्धा हा प्रश्न नेहमी विचारतात कि, “मी फक्त इयत्ता १२ वी उत्तीर्ण आहे तर मी कोणत्या पदाच्या परीक्षेची तयारी करू ?” तेव्हा आम्ही २ मार्ग नक्की सुचवतो त्यापैकी “एक पोलीस भरती आणि दुसरा ग्रामसेवक भरती.”
होय, ग्रामसेवक होण्यासाठी तुम्ही किमान १२ वी देखील उत्तीर्ण असाल तरीही या पदासाठी अर्ज करू शकता आणि ग्राम सेवक हि पोस्ट मिळवू शकता. जर तुम्हाला या पदाची तयारी करायची असेल तर तुमचे कोणते-कोणते प्रश्न असू शकतील हा दृष्टीकोन समोर ठेवून आम्ही हि पोस्ट बनवत आहोत. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला खालील माहिती देणार आहोत जी माहिती ग्रामसेवक या पदाची तयारी करण्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आवश्यक आहे.
- ग्रामसेवक म्हणजे काय ?
- ग्रामसेवक या पदाची पार्श्वभूमी काय आहे ?
- ग्रामसेवक या पदाचा अभ्यासक्रम काय आहे आणि परीक्षेचे स्वरूप कसे आहे ?
- ग्रामसेवक या पदासाठी शैक्षणिक पात्रता किती लागते ?
- ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे ?
- ग्रामसेवक या पदाच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, आणि कामे काय आहेत ?
- ग्रामसेवक होण्यासाठी काय करावे लागते ?
या आणि अशा अनेक गोष्टींबाबत आपण या पोस्टमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे हि पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि ग्रामसेवक भरतीची वाट न बघता लगेच अभ्यासाचे नियोजन करून तयारीला लागा.
तुमच्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती “ कडून खूप खूप शुभेच्छा…!
-:नवीनतम प्रकाशित भरती :-
- Talathi Bharti 2025 – Update | महाराष्ट्रामध्ये तलाठी पदाच्या तब्बल 2477 जागा रिक्त
- central bank of india apprentice bharti 2025 | अप्रेंटिस पदाच्या 4500 रिक्त जागांसाठी भरती
- SSC Stenographer Bharti 2025 – स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर पदाच्या 261 जागांसाठी भरती.
- SSC CHT BHARTI 2025 – हिंदी ट्रान्सलेटर पदाच्या 437 जागांसाठी भरती 2025। पगार ₹35400 ते ₹142400
- NHM Nashik Recruitment 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025
gram sevak mhanje kay
ग्राम सेवक म्हणजे काय ? :- महाराष्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार तसेच ग्राम पंचायत अधिनियम 1958 नुसार, शासनाद्वारे ग्राम सेवकाची नियुक्ती करण्यात येते. ग्रामसेवक हा ग्राम पंचायतीचा विकास करण्यासाठी आवश्यक असणारा महत्वपूर्ण घटक आहे. ग्रामसेवक हे शासकीय योजनांची आणि विकास कामांची गाव पातळीवर अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा विकास करण्याचे महत्वाचे काम करतात. थोडक्यात,
“ग्राम सेवक म्हणजे शासनाद्वारे नियुक्त केला जाणारा असा सरकारी कर्मचारी, जो शासकीय योजनांची आणि विकास कामांची गाव पातळीवर अंमलबजावणी करतो आणि ग्राम पंचायतीचा सचिव म्हणून ग्राम पंचायतीची जबाबदारी स्वीकारतो .”
“ग्राम सेवक हे ग्राम पंचायतीचे सचिव असतात आणि सचिव म्हणून ग्राम पंचायतीची सर्व जबाबदारी ते घेतात. “
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम
ग्रामसेवक भरतीमध्ये मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बुद्धिमत्ता आणि गणित , कृषी / तांत्रिक असे एकूण 5 विषय असतात
- मराठी :- परीक्षेमध्ये मराठी या विषयाचे एकूण 15 प्रश्न विचारले जातात ज्यांना 30 गुण दिले जातात.
- इंग्रजी :- परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाचे एकूण 15 प्रश्न असतात ज्यांना 30 गुण दिले जातात.
- सामान्य ज्ञान :- परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान या विषयाचे 15 प्रश्न असतात ज्यांना 30 गुण दिले जातात.
- बुद्धिमत्ता आणि गणित :- परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे 15 प्रश्न असतात ज्यांना 30 गुण दिले जातात.
- कृषी / तांत्रिक :- परीक्षेमध्ये कृषी / तांत्रिक या विषयावर आधारित सर्वाधिक म्हणजेच एकूण 40 प्रश्न विचारले जातात ज्यांना एकूण 80 गुण दिले जातात.
वरील 5 विषयांपैकी कृषी / तांत्रिक या विषयावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात त्यामुळे ग्रामसेवक पदाच्या परीक्षेची तयारी करत असताना कृषी/तांत्रिक या विषयाची जास्त तयारी करा. जर तुम्ही आधीपासून सरळ सेवा / स्पर्धा परीक्षा तयारी करत असाल तर तुमच्यासाठी फक्त कृषी / तांत्रिक हा घटक वेगळा असेल बाकी विषय सारखे आहेत.
gramsevak syllabus in marathi
अशा प्रकारे ग्रामसेवक पद भरतीमध्ये 5 विषयांवर आधारित असणारी एकूण 200 गुणांची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येकी 2 गुण दिले जातात आणि परीक्षेसाठी दीड तास म्हणजेच 90 मिनिटे वेळ दिला जातो. थोडक्यात,
- एकूण विषय : 05
- एकूण प्रश्न संख्या : 100
- एकूण गुण : 200
- गुण प्रति प्रश्न : 02
- परीक्षेसाठी देण्यात येणारा वेळ : 1 तास 30 मिनिटे
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम
अ.नं. | विषयाचे नाव | प्रश्नसंख्या | गुण |
---|---|---|---|
1. | मराठी | 15 प्रश्न | 30 गुण |
2. | इंग्रजी | 15 प्रश्न | 30 गुण |
3. | सामान्य ज्ञान | 15 प्रश्न | 30 गुण |
4. | बुद्धिमत्ता आणि गणित | 15 प्रश्न | 30 गुण |
5. | कृषी / तांत्रिक | 40 प्रश्न | 80 गुण |
एकूण | 100 प्रश्न | 200 गुण |
ग्रामसेवक भरती परीक्षा
वरील भागामध्ये आपण ग्राम सेवक या पदाची पार्श्वभूमी , ग्राम सेवक पदाची माहिती , ग्राम सेवक पदाचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप व पॅटर्न समजून घेतला आता आपण या पदाची उर्वरित माहिती घेऊ ,
ग्रामसेवक भरती पात्रता
ग्राम सेवक पदाच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे पात्रता निकष खालील प्रमाणे,
ग्रामसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता
- उमेदवार कोणत्याही शाखेमधून किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 12 वी ला किमान 60% गुण असणे आवश्यक.
- जर तुमची 12 वी झालेली नसेल आणि खालील पैकी कोणतेही एक शिक्षण झालेले असेल तरीही तुम्ही ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेसाठी पात्र असता,
- MCVC शाखेमधून पदवी
- D.Ed.
- B.Ed
- Agri.
- Diploma
- Engineering
- B.tech.
- जर तुमचे वरील पैकी कोणत्याही एका शाखेमधून शिक्षण झालेले असेल तरी तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करू शकता.
- जर तुमची 12 वी झालेली नसेल आणि खालील पैकी कोणतेही एक शिक्षण झालेले असेल तरीही तुम्ही ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेसाठी पात्र असता,
- संगणकाचे ज्ञान / MS – CIT आवश्यक.
- ग्रामसेवक या पदासाठी अर्ज सादर करत असतांना जरी तुमचे MS – CIT झालेले नसेल तरीही तुम्ही अर्ज करू शकता आणि सिलेक्शन / नियुक्तीनंतर 6 महिन्यांच्या आत MS – CIT प्रमाणपत्र सादर करू शकता.
- ग्राम सेवक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

ग्रामसेवक होण्यासाठी काय करावे लागते
ग्रामसेवक पदासाठी वयोमर्यादा
ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने वरील शैक्षणिक पात्रतेसह वयोमर्यादेचीही पुर्तता करणे बंधनकारक आहे. याआधीच्या जुन्या शासन निर्णयानुसार अराखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष इतकी होती तर, राखीव प्रवर्गासाठी हि वयोमर्यादा किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष इतकी होती परंतु सध्या या वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात आलेली आहे आणि नवीन निर्णयानुसार वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे ,
- ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार जर अराखीव प्रवर्गामधून असेल तर,
- किमान 18 वर्ष ते कमाल 40 वर्ष
- ग्रामसेवक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार जर राखीव प्रवर्गामधून असेल तर,
- किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्ष
“ग्रामसेवक या पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध करतेवेळी, सदर पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये, वयोमर्यादेमध्ये तसेच ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम यामध्ये शासन निर्णयानुसार बदल केला जाऊ शकतो , त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबद्दलची खात्री करून घ्यावी व मगच अर्ज करावा.“
ग्रामसेवक पदासाठी पात्रता
जर तुम्ही इयत्ता बारावी उत्तीर्ण असाल किंवा वरील प्रमाणे किमान शैक्षणिक पात्रतेची आणि वयोमर्यादेची पूर्तता करत असाल तर, तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करू शकता.जर तुम्हाला ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल आणि त्याच्याशी निगडित असणाऱ्या सरकारी नोकरीमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर ग्रामसेवक होणे तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. ग्रामसेवक या पदावर नियुक्त झाल्यानंतर तुम्हाला ग्रामीण भागातील जनतेसाठी विविध विकासकामे करण्याची संधी मिळते ज्यातून तुम्ही ग्रामीण भागाचा विकास करण्यामध्ये तुमचे योगदान देऊ शकता.
ग्रामसेवक माहिती
ग्रामसेवक हा सरकारी कर्मचारी असून त्यासोबतच ग्रामपंचायतीचा सचिव देखील असतो त्यामुळे ग्रामपंचायतीची अनेक जबाबदारीची कामे आणि कर्तव्ये ग्रामपंचायत सचिव या जबाबदारीने ग्रामसेवक यांना पार पाडावी लागतात. त्यातील काही महत्वाची कामे / कर्तव्ये / जबाबदाऱ्या खालील प्रमाणे,
- ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या बैठकांना आणि सभांना उपस्थित राहणे , ठराव तयार करणे तसेच ग्राम पंचायतीचे कार्यालयीन पत्रव्यवहार पाहण्याची जबाबदारी देखील ग्रामसेवक यांची असते.
- गाव पातळीवर सरकारच्या योजनांचे आणि विकासकामांचे नियोजन करणे , व्यवस्थापन करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यांसारख्या अनेक जबाबदाऱ्या ग्रामसेवक यांच्यावर असतात.
- ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीच्या विकासासाठी ज्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करायची आहे त्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये समन्वय साधने अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये समन्वय साधून गावाचा विकास करून घेण्याचे मुख्य काम ग्रामसेवक यांना करावे लागते.
gramsevak work in marathi | gramsevak information in marathi
- ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजाची आणि पत्रव्यवहाराची नोंद ग्राम पंचायतीच्या नोंदवही मध्ये नोंदवण्याचे काम ग्रामसेवक यांना करावे लागते.
- ग्रामस्थांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय योजना करण्यासाठी तसेच ग्रामस्थांना सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभा आयोजित केली जाते या ग्रामसभेचे आयोजन करण्याची जबाबदारी आणि अधिकार ग्रामसेवक यांना असतो.
- ग्रामसेवक यांना विविध सरकारी योजना गाव पातळीवर राबवाव्या लागतात. त्या योजना आणि विकासकामांची तपासणी करणे आणि पारदर्शकपणे त्या कामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामसेवक यांच्यावर असते.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
ग्राम पंचायत सचिव कोण असतो
ग्रामसेवक हे ग्राम पंचायतीचे सचिव असतात.
ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?
ग्रामपंचायतीचे सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्ष असतात.
ग्रामसेवक म्हणजे काय?
ग्रामसेवक म्हणजे असा सरकारी कर्मचारी ज्याच्या मार्फत शासकीय योजनांची आणि विकास कामांची गाव पातळीवर अंमलबजावणी केली जाते.
ग्रामसेवकासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार इयत्ता 12 वी किमान 60% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जर तुमची बारावी झालेली नसेल आणि त्या समकक्ष शिक्षण झालेले असेल तरी तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करू शकता.
ग्रामसेवकाची पात्रता काय आहे?
ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शासनमान्य विद्यापीठामधून इयत्ता 12 वी किमान 60% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, किंवा त्या समकक्ष शिक्षण घेतलेले असेल तरी अर्ज करता येऊ शकतो.
ग्रामसेवकाचे काम काय असते?
सरकारी योजनांची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव पातळीवर अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा विकास करण्याचे काम ग्रामसेवक यांचे असते. त्यासोबतच गाव पातळीवरील सरकारी योजनांची पाहणी आणि तपासणी करणे, यांचे व्यवस्थापन करणे आणि त्यामध्ये पारदर्शकता ठेवणे इत्यादी जबाबदाऱ्या देखील ग्रामसेवक यांच्या असतात.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"