Architecture information in marathi | आर्किटेक्ट होण्यासाठी ह्या आहेत आवश्यक पात्रता. जाणून घ्या आर्किटेक्चर क्षेत्राबद्दल संपूर्ण माहिती.

माहिती शेअर करा.

architecture information in marathi

Table of Contents

Architecture information in marathi:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

आर्किटेक्चर होण्यासाठी काय करावे लागते ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

architecture information in marathi

या पोस्टमध्ये आपण आर्किटेक्चर क्षेत्राविषयीची सखोल माहिती घेणार आहोत.पोस्टमध्ये आपण-

  • आर्किटेक्ट होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते ?
  • परीक्षा कोणामार्फत घेतली जाते ?
  • परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त माहिती काय ?
  • परीक्षा प्रक्रिया कशी आहे ?
  • आर्किटेक्चर मध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत आणि त्या कोर्सेसचा कालावधी किती आहे ?
  • परीक्षेविषयी काही शंका किंवा अडचण असल्यास परीक्षाविभागाशी संपर्क कसा साधावा ?
  • आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी कोणती पुस्तके उपयुक्त आहेत ?

अशा अनेक महत्वाच्या बाबींबद्दल तुम्हाला या पोस्टमध्ये माहिती मिळणार आहे.म्हणून खालील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करा.

आर्किटेक्चर म्हणजे काय

आर्किटेक्चर म्हणजे अशी शाखा ज्यामधील प्रशिक्षित व्यक्तीला वास्तुकला आणि स्थापत्य यासंबंधीचे कौशल्य आणि ज्ञान आहे.

आर्किटेक्चर हे असे क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये इमारत,पूल,घरे,कार्यालये,उद्याने, रुग्णालये,पार्क यांसारख्या वास्तूंचे डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन केले जाते.

थोडक्यात आर्किटेक्चर या शाखेमध्ये तुम्हाला वरील गोष्टींच्या बांधकाम ,रचना आणि डिझाईन संबंधित कामे करावी लागतात. त्यासोबतच ज्या वास्तू/प्रोजेक्टवर आर्किटेक्चर काम असतो, त्या वास्तू/प्रोजेक्ट्मधील सर्व संसाधने आणि सामग्री यांचा पुरेपूर वापर करून प्रोजेक्ट्ची कार्यक्षमता वाढवणे हे काम देखील आर्किटेक्चर करत असतो.

architecture in marathi

हाती घेतलेल्या प्रोजेक्ट्च्या डिझाईन आणि रचनेला अधिकाधिक आकर्षक बनवून त्या प्रोजेक्ट्ची कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढवणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रोजेक्ट पूर्ण करणे हि एका आर्किटेक्ट्ची जबाबदारी असते.त्यासोबतच खालील काही जबाबदाऱ्या आणि कामे देखील आर्किटेक्टला करावी लागतात.

  • प्रोजेक्ट संबंधी चर्चा करणे.
  • प्रकल्पाचे डिझाईन आणि ड्रॉईंग बनवणे.
  • प्रोजेक्टसाठी येणाऱ्या संभाव्य खर्चाचा अंदाज घेणे आणि त्यानुसार प्रोजेक्टमध्ये नियोजन आणि बदल करणे.
  • प्रोजेक्टसंबंधित कायदेशीर करावी लागणारी कामे पाहणे आणि ती कामे करून घेणे.
  • प्रोजेक्ट्शी निगडित कॉन्ट्रॅक्टर वर्गाशी आणि सिव्हिल इंजिनियर टीमशी चर्चा करणे आणि त्यांच्याकडून कामे करवून घेणे.
  • पदवी अभ्यासक्रमामध्ये अभ्यासलेल्या स्थापत्य ज्ञानाच्या आधारे आणि आपल्या तर्क आणि कल्पनाशक्तीच्या आधारे तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान यांचा वापर करून अधिक कार्यक्षम आणि आकर्षक प्रोजेट्स व प्रकल्प बनवणे.

nata information in marathi

NATA :- National Aptitude Test In Architecture

NATA म्हणजे काय :-

NATA म्हणजे National Aptitude Test In Architecture.हि एक राष्ट्रीय स्तरीय प्रवेश परीक्षा आहे.हि परीक्षा ज्या 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्किटेक्चरमधील B.Arch. हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे त्यांच्यासाठी घेतली जाते. B.Arch. हा पदवी अभ्यासक्रम 5 वर्ष कालावधीचा असतो.

NATA म्हणजे National Aptitude Test In Architecture हि परीक्षा CoA म्हणजेच काउंसिल ऑफ आर्किटेक्चर (Council of Architecture) मार्फत घेतली जाते.

nata exam information in marathi

NATA ची परीक्षा देण्यासाठी पात्रता :-

  • कोणत्याही शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयामधून इयत्ता 12 वी उत्तीर्ण आवश्यक.
  • इयत्ता 12 वी अभ्यासक्रमामध्ये मध्ये Physics (भौतिकशास्त्र) आणि Mathematics (गणित) हे विषय असावे त्यासोबतच Chemistry/Biology/Computer Science/Information & Technology/Business Studies /Engineering Graphics पैकी विषय असणे आवश्यक.
  • इयत्ता 12 वी किमान 50% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक.

डिप्लोमा केलेला असल्यास :-

जर इयत्ता 10 वी नंतर विद्यार्थ्याने 3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा (10+3) केलेला असेल तरी देखील संबंधित विद्यार्थी NATA ची प्रवेश परीक्षा देऊ शकतो. परंतु डिप्लोमा अभ्यासक्रमामध्ये Mathematics (गणित) हा विषय असणे आवश्यक आहे.त्यासोबतच डिप्लोमा कोर्स (Aggregate) किमान 50% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Architecture course information in marathi

NATA ची परीक्षा CoA म्हणजेच काउंसिल ऑफ आर्किटेक्चर (Council of Architecture) मार्फत घेतली जाते.ह्या परीक्षेची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत ती खालीलप्रमाणे ,

NATA :- National Aptitude Test In Architecture

architecture information in marathi
Architecture information in marathi

वरील तक्त्यामधील माहितीनुसार NATA म्हणजेच National Aptitude Test In Architecture ची परीक्षा Council Of Architecture मार्फत घेण्यात येते.जर तुम्ही हि परीक्षा उत्तीर्ण झालात तर तुम्हाला B.Arch म्हणजे Bachelor of Architecture ह्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो.या परीक्षेमध्ये एकूण 48 प्रश्न विचारले जातात ज्यासाठी 3 तास एवढा वेळ दिला जातो.

सदर प्रवेश परीक्षेचे अधिकृत संकेतस्तळ https://www.nata.in/ हे आहे NATA परीक्षेसंबंधित सर्व महत्वाचे अपडेट्स तुम्हाला ह्या संकेतस्थळावर दिले जातात.जर तुम्हाला NATA च्या परीक्षेसंबंधित काही प्रश्न असतील किंवा काही अडचण असेल तर nata.helpdesk.2024@gmail.com या अधिकृत ई-मेल वर मेल करून मदत घेऊ शकता तसेच वरील पत्त्यावर कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधू शकता किंवा 95607 07764 / 93192 75557 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

architecture course information

जर तुम्हाला आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये कोर्सेस करायचे असतील तर खालील पैकी कोर्सेस करू शकता.

कोर्सकोर्सचे नाव कोर्सचा कालावधी
B.Arch.Bachelor of Architecture5 वर्ष
B.Plan.Bachelor of Planning3 वर्ष
DAADiploma In Architectural Assistantship3 वर्ष
DIDDiploma In Interior Design1 वर्ष
CIDCertificate In Interior Design6 महिने

जर तुम्हाला आर्किटेक्चर या क्षेत्रामध्ये कोर्सेस करून करिअर करायचे असेल तर तुम्ही वरील प्रमाणे,

  • Bachelor of Architecture (B.Arch.)
  • Bachelor of Planning (B.Plan.)
  • Diploma In Architectural Assistantship (DAA)
  • Diploma In Interior Design (DID)
  • Certificate In Interior Design (CID)

यापैकी जो तुमची आवड,तुम्ही करिअर साठी देऊ शकणारा वेळ आणि तुमची आर्थिक परिस्थिती यामध्ये समन्वय आणि समतोल राखत असेल तो कोर्स निवडू शकता.

NATA परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

“I wish you all the best for your exam!”

FAQ’s :-

मी बारावी सायन्स नंतर आर्किटेक्चर करू शकतो का?

होय,तुम्ही बारावी सायन्स नंतर NATA ची म्हणजेच National Aptitude Test In Architecture हि परीक्षा देऊन आर्किटेक्चरसाठी प्रवेश घेऊ शकता.

बी आर्क चांगला कोर्स आहे का?

जर तुम्हाला इमारती,पूल,पार्क,उद्याने इत्यादींच्या कन्स्ट्रक्शन आणि डिझाईन मध्ये आवड असेल तर तुम्ही बी आर्क करू शकता.

आर्किटेक्चरसाठी कोणती परीक्षा आहे?

आर्किटेक्चरसाठी Council Of Architecture मार्फत घेण्यात येणारी National Aptitude Test In Architecture (NATA) हि परीक्षा आहे.

मी डिप्लोमा नंतर आर्किटेक्चर करू शकतो का?

होय,तुम्ही डिप्लोमा नंतर आर्किटेक्चर करू शकता परंतु त्यासाठी डिप्लोमामधील अभ्यासक्रमामध्ये Mathematics (गणित) हा विषय घेतलेला असणे आवश्यक आहे आणि Aggregate किमान 50% असणे आवश्यक आहे.

आर्किटेक्चर मध्ये कोणते कोर्सेस असतात.

आर्किटेक्चर मध्ये B.Arch,B.Plan हे कोर्सेस असतात.

आर्किटेक्चरचे काम काय आहे?

घराचे, इमारतीचे किंवा प्रकल्पाचे डिझाईन आणि ड्रॉईंग बनवणे हे मुख्य काम आर्किटेक्चरला करावे लागते याव्यतिरिक्तहि अनेक कामे करावी लागतात.

कोणता देश आर्किटेक्टला जास्त पगार देतो?

स्वित्झर्लंड, कॅनडा , सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स हे देश आर्किटेक्टला इतर देशांपेक्षा जास्त पगार देतात कारण या देशामधील नागरिकांचा जीवनस्तर उच्च आहे आणि यांची अर्थव्यवस्थाही मजबूत आहे यामुळे येथे आर्किटेक्टला मागणी जास्त आहे.

आर्किटेक्चरसाठी कोणता कोर्स सर्वोत्तम आहे?

आर्किटेक्चरसाठी बी.आर्क / B.Arch हा अभ्यासक्रम सर्वोत्तम आहे. हा कोर्स तुम्ही इयत्ता बारावी सायन्स/विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण झाल्यानंतर करू शकता.

आर्किटेक्ट होण्यासाठी काय करावे?

आर्किटेक्ट होण्यासाठी १२ वी सायन्सनंतर बी.आर्क / B.Arch हा कोर्स करावा लागतो हा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर आर्किटेक्ट होता येते.

आर्किटेक्चरसाठी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते?

आर्किटेक्चरसाठी NATA, JEE यांसारख्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.

बारावीनंतर आर्किटेक्चरला प्रवेश कसा मिळेल?

बारावीनंतर NATA, JEE Mains यांसारख्या परीक्षा देऊन आर्किटेक्चरला प्रवेश घेता येतो.

महत्वाच्या लिंक्स:-

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment