interior design information in marathi
Table of Contents
interior design information in marathi:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
इंटिरियर डिझायनर होण्यासाठी काय करावे लागते ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
interior design information in marathi
इंटीरियर डिझाईनिंग हे क्षेत्र एक चॅलेंजिंग क्षेत्र आहे. इंटीरियर डिझाईनिंग हि डिझाईनिंगचीच उपशाखा आहे.ज्यामध्ये एखाद्या इमारतीचे किंवा मोकळ्या जागेचे सौंदर्य आणि आकर्षण वाढवण्यासाठीचे कौशल्य शिकवले जाते.
वर सांगितल्याप्रमाणे इंटीरियर डिझाईनिंग हे क्षेत्र चॅलेंजिंग तर आहेच त्यासोबतच विस्तृत क्षेत्र सुद्धा आहे.या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इंटीरियर डिझाईनर व्यक्तीकडे कल्पनाशक्ती , क्रिएटिव्हिटी आणि विचारामध्ये लवचिकता असणे देखील महत्वाचे आहे कारण काम करत असतांना सर्व ठिकाणी एकच काल्पनिकता/कल्पना वापरणे हे इंटीरियर डिझाईनरसाठी नुकसानीचे असू असते.म्हणून या क्षेत्रामध्ये काम करतांना तुम्हाला नवनवीन कल्पना सुचायला हव्या आणि त्यानुसार विचारांमध्ये लवचिकता आणून त्या कल्पना सत्यात उतरवता यायला हव्या.
आता आपण त्या विषयाबद्दल माहिती घेऊ ज्यासाठी तुम्ही हि पोस्ट वाचत आहात आणि तो विषय म्हणजे, इंटीरियर डिझाईनर कसे होता येते? काय पात्रता आवश्यक असते ? कोणते कोर्सेस करता येऊ शकतात ? काही फ्री कोर्सेस आहेत का बरेच काही…
interior design in marathi
इंटीरियर डिझाईनिंग या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक असणारा उमेदवार किमान 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.काही कोर्सस अंडरग्रॅज्युएट स्तरावर देखील करता येतात जसे कि इंटीरियर डिझाईनिंग मध्ये B.Sc. ,B.A. तसेच इंटीरियर डिझाईनिंगचे कोर्सेस पोस्टग्रॅजुएट स्तरावर देखील करता येतात जसे कि, M.Sc in इंटीरियर डिझाईनिंग,M.A.in इंटीरियर डिझाईनिंग.काही कोर्सेस डिप्लोमा स्तरावर देखील करता येतात उदा. Certification/Diploma Courses in Interior Design.
इंटीरियर डिझाईनिंगचे कोर्सेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतात.काही नामांकित इंटीरियर डिझाईनिंगची महाविद्यालये इंटीरियर डिझाईनिंग करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने कोर्सेस पूर्ण करण्याची संधी देतात.
जर तुम्हाला फ्री मध्ये इंटीरियर डिझाईनिंगचे काही कोर्सेस ऑनलाईन पद्दतीने करायचे असतील तर हि पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा कारण, या पोस्टच्या शेवटी तुम्हाला त्या फ्री ऑनलाईन कोर्सेस ची माहिती देण्यात आलेली आहे.
interior designer information in marathi
इंटीरियर डिझाईनिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही इंटीरियर डिझाईनिंगच्या विविध विभागांमध्ये काम करू शकता जसे कि इंटीरियर डिझाईनिंग महाविद्यालये किंवा इन्स्टिटयूट मध्ये शिक्षकाची नोकरी करू शकता, इंटीरियर डिझाईनिंग कन्सल्टन्ट किंवा सल्लागार म्हणून काम करू शकता तसेच स्वतःचा व्यवसाय देखील चालू करू शकता.इंटीरियर डिझाईनिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्यास प्लॅनिंग तसेच कन्स्ट्रक्शन सारख्या क्षेत्रामध्ये काम करण्याची सुद्धा संधी मिळू शकते.त्यासोबतच इंटिरियर डेकोरेटर ,स्पेस प्लॅनर आणि स्टुडिओ डिझायनर म्हणून देखील काम करता येते.
interior design courses information in marathi
आता आपण इंटीरियर डिझाइनमध्ये कोणकोणते कोर्सेस असतात याची माहिती घेऊ,

Bachelor Of Design in Interior Design | B.Des in Interior Design | 4 वर्ष | |
Bachelor Of Science in Interior Design | B.Sc in Interior Design | 3 वर्ष | |
Master Of Design in Interior Design | M.Des in Interior Design | 2 वर्ष | |
Master Of Science in Interior Design | M.Sc in Interior Design | 2 वर्ष | |
Diploma in Interior Design | DID | 1 वर्ष | |
Certificate in Interior Design | CID | 6 महिने -1 वर्ष | |
- Bachelor Of Design in Interior Design:- म्हणजे B.Des in Interior Design.जर तुम्ही 12 वी उत्तीर्ण असाल आणि तुमच्या 12 वी अभ्यासक्रमामध्ये Physics,Chemistry,Mathematics & Biology हे विषय समाविष्ट असतील तर तुम्ही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता.Bachelor Of Design in Interior Design चा अभ्यासक्रम 4 वर्ष कालावधीचा असतो.
- Bachelor Of Science in Interior Design:- म्हणजे B.Sc in Interior Design. जर तुम्ही 12 वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला घरे,कार्यालये,इमारती इत्यादी च्या इंटिरियर डिझाईन बद्दल आवड असेल तर तुम्ही ह्या 3 वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता.पण यासाठी तुम्ही 12 वी उत्तीर्ण असणे आणि अभ्यासक्रमामध्ये Physics,Chemistry,Mathematics & Biology हे विषय समाविष्ट असणे आवश्यक आहे.
- Master Of Design in Interior Design:- म्हणजे M.Des in Interior Design. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.या कोर्सचा कालावधी 2 वर्ष एवढा असतो.
- Master Of Science in Interior Design:- म्हणजे M.Sc in Interior Design.या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.या कोर्सचा कालावधी 2 वर्ष एवढा असतो.
- Diploma in Interior Design:- जर तुम्ही इयत्ता 10 वी नंतर थेट अभियांत्रिकी डिप्लोमा केलेला असेल तर तुम्ही Diploma in Interior Design या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता.
- Certificate in Interior Design:- जर तुम्ही इयत्ता 10 वी/12 वी/डिप्लोमा उत्तीर्ण असाल तर तुम्ही Certificate in Interior Design मधील कोर्सेस करू शकता
महत्वाचे:-जर तुम्हाला यशस्वी इंटिरियर डिझाईनर बनायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला इंटीरियर डिझाईनिंग या क्षेत्राचे सखोल ज्ञान आवश्यक असते.परंतु ६ महिने किंवा १ वर्षांमध्ये संपूर्ण इंटीरियर डिझाईनिंग शिकणे अवघड असते.म्हणून इंटीरियर डिझाईनिंग मधील डिप्लोमा कोर्सेस आणि सर्टिफिकेशन कोर्सेस करण्याचा सल्ला अनुभवी डिझाईनर देत नाहीत.म्हणून शक्य असल्यास हे कोर्सेस करण्याऐवजी दीर्घ कालावधी असणारे कोर्सेस करण्याचा प्रयत्न करा.
परंतु जर इंटीरियर डिझाईनिंग हा तुमचा छंद आणि आवड असेल तर तुम्ही इंटीरियर डिझाईनिंग मधील डिप्लोमा कोर्सेस आणि सर्टिफिकेशन कोर्सेस करू शकता.
Interior designer in marathi salary
इंटिरियर डिझाईनरची सॅलरी/पगार हा पूर्णतः त्याच्या डिझायनिंग कौशल्य आणि संवाद कौशल्य यावर अवलंबून असतो.तसेच इंटिरियर डिझाईनर कोणत्याठिकाणी काम करत आहे त्यानुसार देखील वेतनामध्ये बदल होऊ शकतो.सर्व इंटिरियर डिझाईनरची सॅलरी/पगार सारखा नसतो.पण काही विश्वसनीय स्रोतांनुसार एका इंटिरियर डिझाईनरला अंदाजे 25,000 रुपये ते 30,000 रुपये प्रतिमहिना एवढे वेतन मिळते.
इंटिरियर डिझाईन फ्री कोर्स
कोर्सचे नाव | माध्यम | पद्दती | कालावधी | शुल्क |
Interior Design Masterclass | Skillshare | ऑनलाईन | 1 तास | Free |
Interior Design Masterclass : Ultimate essentials and insider techniques | Skillshare | ऑनलाईन | 1 तास | Free |
How to work with interior design styles like a pro | Udemy | ऑनलाईन | 5 तास | Free |
Role Of Craft & Technology in Interior Design | NPTEL | ऑनलाईन | 1 तास | Free |
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
How to write interior design in Marathi?
घराच्या किंवा वास्तूच्या अंतर्भागाचे आकर्षण आणि सौंदर्य वाढवणे आणि त्यासोबतच त्या वास्तू किंवा घराची रचना सुविधापूर्ण बनवणे याला इंटीरियर डिझाईन असे म्हणतात. इंटीरियर डिझाईन यालाच आपण मराठीमध्ये सोप्या शब्दात अंतर्भागीय रचना असे म्हणू शकतो.
इंटीरियर डिझाइन मराठीत कसे लिहावे?
इंटीरियर डिझाइनला मराठीमध्ये अंतर्भागीय रचना असे लिहिता येईल.
इंटिरियर डिझायनरचा पूर्ण अर्थ काय आहे?
ज्या डिझायनिंग च्या क्षेत्रामधील प्रशिक्षित व्यक्ती इमारती/ मोकळ्या जागेचे अंतर्भागीय सौंदर्य आणि आकर्षण वाढवू शकतो त्या प्रशिक्षित व्यक्तीला इंटिरियर डिझायनर असे म्हंटले जाते .
मी 12वी नंतर इंटिरियर डिझायनिंग करू शकतो का?
होय तुम्ही इयत्ता 12 वी नंतर इंटिरियर डिझायनिंग करू शकता पण त्यासाठी 12 वी मध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.
इंटीरियर डिझायनिंगमध्ये BDES म्हणजे काय?
इंटीरियर डिझायनिंगमध्ये BDES म्हणजे Bachelor Of Design in Interior Design.
मी 12वी नंतर BDES करू शकतो का?
होय तुम्ही 12 वी नंतर BDES करू शकता पण त्यासाठी तुम्ही इयत्ता 12 वी मध्ये किमान 50% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इंटीरियर डिझाइनमध्ये बीएससी म्हणजे काय?
इंटीरियर डिझाइनमध्ये बीएससी म्हणजे Bachelor Of Science in Interior Design.
इंटीरियर डिझाइनर कोणते काम करतात?
इंटीरियर डिझाइनर घर, हॉटेल, रेस्टोरंट, कार्यालय-आफिस इत्यादींचे डिझाईन करतो हे डिझाईन ग्राहकांच्या गरजेनुसार, आवडीनुसार आणि बजेटनुसार केले जाते.
इंटीरियर डिझाइनर बनण्यासाठी कोणते शिक्षण आवश्यक आहे?
इंटीरियर डिझाइनर बनण्यासाठी डिप्लोमा कोर्सेस आणि पदवी अभ्यासक्रम करता येतात तसेच या क्षेत्रामधील अल्प किंवा दीर्घ कालावधीचे सर्टिफिकेशन कोर्सेस देखील करता येऊ शकतात.
इंटीरियर डिझाइनमध्ये कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते?
इंटीरियर डिझाइनमध्ये AutoCad, Revit, SketchUp, 3ds Max यांसारखे सॉफ्टवेअर्स वापरले जातात.
इंटीरियर डिझाइनमध्ये कोणते स्टाइल आहेत?
इंटीरियर डिझाइनमध्ये विविध स्टाईल्स आहेत ज्यामध्ये मॉडर्न, इंडस्ट्रियल, रस्टिक, बोव्हो यांसारख्या स्टाईल्सचा समावेश होतो.
कमी बजेटमध्ये घर कसे सजवावे?
कमी बजेटमध्ये घराला सजवण्यासाठी कमी वापरलेले जुने/ सेकेंड हॅन्ड फर्निचर, सेकेंड हॅन्ड पेंटिंग्स आणि इतर अक्सेसरीज यांचा वापर केल्यास कमी खर्चामध्ये घराची सजावट करता येते.
लहान खोली मोठी दिसावी यासाठी काय करावे?
तसे पाहता हे प्रत्यक्षात हे शक्य नाही परंतु चांगल्या इंटेरिअरचा वापर करून असे भासवणे शक्य आहे यासाठी खोलीमध्ये हलके रंग, मोठे पडदे वापरावेत आणि अशा फर्निचरचा वापर करावा ज्यामध्ये तुमच्या जास्तीत जास्त वस्तू मावू शकतील.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"