सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय
Table of Contents
सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
सिव्हिल इंजिनिअर होण्यासाठी काय करावे लागते ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय
इंजिनीयरिंगचे क्षेत्र फार विस्तृत क्षेत्र आहे आणि सिव्हिल इंजिनियरिंग हि त्या क्षेत्रामधील एक शाखा आहे.उदाहरणार्थ जसे एक झाड असते आणि त्याची अनेक मुळे असतात अगदी त्याचप्रमाणे इंजिनियरिंग हे क्षेत्र एक झाड आहे आणि सिव्हिल इंजिनियरिंग हे असणाऱ्या अनेक मुळांपैकी एक मूळ आहे.
सिव्हिल इंजिनियरिंग हे असे क्षेत्र आहे ज्या क्षेत्राचा आपण दररोज कळत नकळत उपयोग करत असतो.आपण ज्या रस्त्यावरून चालतो किंवा गाडी चालवतो तो रस्ता,पूल,ज्या रुग्णालयामध्ये उपचार घेतो ते रुग्णालय ,ज्या घरामध्ये पाहतो ते घर,ज्या कंपनी किंवा कार्यालयामध्ये काम करतो ती इमारत,पाण्याची धरणे ,डॅम्स,विमानतळे,रेल्वे स्थानके,सांडपाणी व्यवस्थापनाच्या सोयी, आणि अशा प्रकारच्या अनेक पायाभूत सुविधा ज्यांचा आपण दैंनदिन जीवनामध्ये उपयोग करून घेत असतो त्यातील बहुतेक सेवा आपण सिव्हिल इंजिनियरिंग या क्षेत्रामुळे घेत असतो.यावरून सिव्हिल इंजिनियर या क्षेत्राची व्याप्ती आणि त्याचे महत्व समजून येते.
सिव्हिल इंजिनिअर म्हणजे काय
एखाद्या विशिष्ट संस्थेच्या,व्यक्तीच्या किंवा सरकारच्या आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार पर्यावरण पूरक वास्तू बांधून देणारा प्रशिक्षित व्यक्ती म्हणजे सिव्हिल इंजिनियर.इथे वास्तू या शब्दाचा अर्थ एकत्रितपणे वापरलेला आहे.या लेखामधील वास्तू या संकल्पनेमध्ये अनेक पायाभूत सोयी सुविधांचा समावेश होतो यामध्ये सरकारकडून सामान्य नागरिक आणि जनतेसाठी देण्यात येणाऱ्या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत जसे कि रस्ते,पूल,विमानतळ,इमारती,निवासस्थाने इत्यादी त्या सोबतच लहान घरापासून ते मोठ्या प्रकल्पांपर्यत बांधणीची सर्व कामे जो प्रशिक्षित व्यक्ती करतो त्यास सिव्हिल इंजिनियर असे म्हणतात.
सिव्हिल इंजिनियर कोणताही प्रकल्प किंवा वास्तू उभारताना त्या प्रकल्पाची/वास्तूची पर्यावरणपूरक आणि मजबूत बांधणी कशी करता येईल याची जबाबदारी घेतो.या बांधणीच्या कामामध्ये अनेक तांत्रिक बाबींचा,जमिनीच्या आणि मृदेच्या प्रकारचा विचार सिव्हिल इंजिनियरला करावा लागतो.तसेच हवामान,तापनाम ,निसर्ग,सांडपाणी,व्हेंटिलेशन,प्रदूषण यांचा देखील विचार करावा लागतो.
civil engineering information in marathi
वरील माहितीवरून तुम्हाला सिव्हिल इंजिनियरिंग म्हणजे काय आणि सिव्हिल इंजिनियर म्हणजे काय याची थोडक्यात माहिती मिळाली असेल.आता जर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्यासाठी काय पात्रता आवश्यक असते आणि सिव्हिल इंजिनियरिंग कसे करावे याबद्दल आपण माहिती पाहू.
सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये करिअर करण्यासाठी तुम्ही खालील तीन अभ्यासक्रम घेऊ शकता
- डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग
- बी.इ. किंवा बी.टेक. इन सिव्हिल इंजिनियरिंग
- एम.इ. किंवा एम.टेक इन सिव्हिल इंजिनियरिंग
कोर्सचे नाव | कोर्ससाठी आवश्यक पात्रता |
---|---|
डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग | कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यालयामधून इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
बी.इ. किंवा बी.टेक. इन सिव्हिल इंजिनियरिंग | कोणत्याही शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयामधून इयत्ता 12 वी विज्ञान (Science) शाखेमधून उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा सिव्हिल इंजिनियरिंगचा 3 वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक. |
एम.इ. किंवा एम.टेक इन सिव्हिल इंजिनियरिंग | कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठामधून बी.इ. किंवा बी.टेक. इन सिव्हिल इंजिनियरिंग उत्तीर्ण असणे आवश्यक |
आता आपण वरील तीनही कोर्सची एकेक करून सविस्तर माहिती घेऊ.

civil diploma information in marathi
डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग:- या कोर्ससाठी प्रवेश मिळवण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
- Diploma In Civil Engineering मध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यालयामधून इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इयत्ता 10 वी मध्ये किमान 40% गुण असणे आवश्यक.
- इयत्ता 10 वी मध्ये गणित विषय असणे आवश्यक.
डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग या कोर्सचा कालावधी 3 वर्ष एवढा आहे या तीन वर्षांमध्ये एकूण 6 सेमिस्टर असतात.
civil engineering course information in marathi
बी.इ. किंवा बी.टेक. इन सिव्हिल इंजिनियरिंग:- सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये बी.इ. किंवा बी.टेक साठी प्रवेश घेण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
- Civil Engineering मध्ये Bachelor of Engineering किंवा Bachelor of Technology करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयामधून इयत्ता 12 वी विज्ञान (Science) शाखेमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच इयत्ता 12 वी विज्ञान (Science) शाखेमध्ये किमान 60% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.
- 12 वी विज्ञान (Science) शाखेमधील अभ्यासक्रमामध्ये भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि गणित हे विषय असणे देखील आवश्यक आहे.
जर बी.इ. किंवा बी.टेक. इन सिव्हिल इंजिनियरिंग साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये डिप्लोमा केलेला असेल तरीही संबंधित विद्यार्थी वरील कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो.
बी.इ. किंवा बी.टेक. इन सिव्हिल इंजिनियरिंग हा अभ्यासक्रम एकूण 8 सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो.
एम.इ. किंवा एम.टेक इन सिव्हिल इंजिनियरिंग :- Civil Engineering मध्ये Master of Engineering किंवा Master of Technology करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शासनमान्य विद्यापीठामधून बी.इ. किंवा बी.टेक. इन सिव्हिल इंजिनियरिंग हा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच उमेदवार GATE ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असावा.
एम.इ. किंवा एम.टेक इन सिव्हिल इंजिनियरिंग या कोर्सचा अभ्यासक्रम एकूण 2 वर्ष कालावधीचा असतो.
करिअरच्या संधी:-
सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्स अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही विविध पदांवर काम करू शकता जसे कि,
- Structural Engineer :- स्ट्रक्चरल इंजिनिअर हे बांधकाम क्षेत्रामधील अनेक कामे पाहतात जसे कि पूल, धरण, इमारती, कार्यालय किंवा इतर प्रकल्पांचे डिझाईन करणे , रचना करणे आणि त्यांची तपासणी करणे. प्रकल्प डिझाईन करतांना स्ट्रक्चरल इंजिनिअर यांना खालील गोष्टींची काळजी घेऊन प्रकल्पाचे डिझाईन करावे लागते.
- सुरक्षित आणि टिकावू बांधकामाच्या दृष्टीने डिझाईन बनवणे.
- भूकंपाचे धोक्याच्या दृष्टीने योग्य डिझाईन बनवणे.
- व्हेंटिलेशन – वारा येण्या जाण्याच्या दृष्टीने प्रकल्प डिझाईन करणे.
- नैसर्गिक आपत्तींच्या दृष्टीने सक्षम असणारे डिझाईन बनवणे. इत्यादी.
- Site Engineer :- साईट इंजिनिअर बांधकामाच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून विविध कामे करत असतात. यामध्ये अनेक दैनंदिन कामांचा समावेश होतो ज्यामध्ये बांधकाम सामग्रीचे व्यवस्थापन करणे, मजुरांचे आणि मनुष्य बळाचे व्यवस्थापन करणे, डिझाईन नुसार बांधकाम चालू आहे कि नाही याची वेळोवेळी तपासणी करणे अशा अनेक महत्वपूर्ण कामाचा समावेश होतो.
- Geo Technical Engineer :- जिओ टेक्निकल इंजिनिअर ज्या ठिकाणी प्रकल्पाची उभारणी करायची आहे त्या ठिकाणच्या जमिनीची आणि तेथील मातीची तपासणी करतात. या तपासणीमध्ये जमिनीच्या आणि मातीच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार ती जागा बांधकामासाठी किंवा प्रकल्पासाठी योग्य आहे कि नाही याची खात्री करून पुढील पाऊले उचलली जातात.
- Construction Engineer :- कन्स्ट्रक्शन इंजिनिअर बांधकामाशी सलंग्न अनेक कामे पाहतात. ज्यामध्ये प्रकल्पाच्या योजना, प्रकल्पाचे असणारे बजेट , बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता इत्यादींची जबाबदारी कन्स्ट्रक्शन इंजिनिअर घेतात.
- Teacher In Engineering Colleges :- जर तुम्हाला कोणत्याही इंजिनिअरिंग शाखेचे पुरेसे आणि संपूर्ण ज्ञान असेल तर तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षक होऊ शकता. यामध्ये तुम्हाला उत्कृष्ट संवाद कौशल्य, शिकवणार असलेल्या विषयाचे ज्ञान आणि त्यासंबंधित असणारे इतर ज्ञान (जसे कि प्रयोगशाळेतील प्रयोग) यांची आवश्यकता असते.
सिव्हिल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअर करू शकता.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये किती सेमिस्टर असतात?
सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बी.इ. किंवा बी.टेक. मध्ये एकूण 8 सेमिस्टर असतात.
सिव्हिल इंजिनिअर बिल्डर होऊ शकतो का?
होय,सिव्हिल इंजिनिअर बिल्डर होऊ शकतो परंतु बिल्डर होण्यासाठी तुमच्याकडे कन्स्ट्रक्शन क्षेत्रामधील पुरेसा अनुभव असणे गरजेचे आहे.
सिव्हिल इंजिनियरची 5 महत्वाची कार्ये कोणती आहेत?
सिव्हिल इंजिनियरची 5 महत्वाची कार्ये- प्रकल्पाचे डिझाईन बनवणे,त्याचे नियोजन करणे,भूमी प्रकारानुसार रचना करणे,संसाधनांचा पुरेपूर वापर करणे,मजबुतीकडे लक्ष देणे.
भारतात सिव्हिल इंजिनीअरिंगला वाव आहे का?
भारतात सिव्हिल इंजिनीअरिंगला वाव आणि मागणी आहे परंतु त्यानुरूप कौशल्य तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
भारतात सिव्हिल इंजिनीअरिंगची वाढ किती आहे?
भारतात सिव्हिल इंजिनिअर्सची वाढ वर्ष 2028 पर्यंत अंदाजे 9-10 % ने वाढणे अपेक्षित आहे.
सिव्हिल इंजिनिअर कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतात?
सिव्हिल इंजिनिअर AutoCad, Revit, HEC-RAS , Plaxis यांसारखे सॉफ्टवेअर्स वापरतात.
सिव्हिल इंजिनिअरिंग अभ्यासक्रम कठीण आहे का?
हे पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला गणित, विज्ञान , भौतिकशास्त्र यांसारखे विषय आवडत असतील आणि या विषयांसह तुम्हाला डिझाईन, कन्स्ट्रक्शन यांशी संलग्न असणारे क्षेत्र आवडत असेल तर तुमच्यासाठी हा अभ्यासक्रम इतरांपेक्षा कमी कठीण किंवा सोपा असू शकतो.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"