GATE exam information in marathi । परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आणि परीक्षेसंदर्भात असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

माहिती शेअर करा.

GATE exam information in marathi

Table of Contents

GATE exam information in marathi:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

GATE ची परीक्षा पास होण्यासाठी काय करावे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

GATE exam information in marathi

या पोस्टमध्ये आपण GATE च्या प्रवेश परीक्षेबद्दल माहिती घेणार आहोत.या पोस्टमध्ये GATE ची परीक्षा कोणामार्फत घेतली जाते,परीक्षेसाठी शैक्षिणक पात्रता किती असते,कोण अर्ज करण्यास पात्र असतात,परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे,परीक्षा पद्धती कशी असते अशा अनेक गोष्टींबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

GATE full form in marathi

GATE – Graduate Aptitude Test In Engineering

GATE या परीक्षेचे पूर्ण रूप Graduate Aptitude Test In Engineering असे आहे.हि नॅशनल लेव्हल म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे .जर तुम्हाला M.Tech /P.dh इ. सारख्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला GATE ची परीक्षा द्यावी लागते.

GATE च्या प्रवेश परीक्षेसाठी दरवर्षी अंदाजे 8 लाखांहून अधिक अर्ज येत असतात. इतके सारे अर्ज येत असल्यामुळे GATE ची परीक्षा 210 हुन अधिक सेंटर्स मध्ये घेण्यात येते.

GATE exam meaning in marathi

GATE ची प्रवेश परीक्षा हि नॅशनल लेव्हलची म्हणजेच राष्ट्रीयस्तरीय प्रवेश परीक्षा आहे.हि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.GATE ची परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते.या परीक्षेसाठी परीक्षार्थी उमेदवाराला 3 तास एवढा वेळ देण्यात येतो.या 3 तासांच्या कालावधीमध्ये परीक्षार्थी उमेदवाराला एकूण 65 प्रश्न सोडवावे लागतात.हे 65 प्रश्न MCQ (Multiple Choice Questins),NAT (Numerical Answer Type) & MSQ (Multiple Select Questions) या तीन प्रकारांमध्ये विचारले जातात.

जर तुम्ही जनरल किंवा अराखीव प्रवर्गामधून GATE च्या परीक्षेसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला 1800/- रुपये प्रति अर्ज एवढे शुल्क आकारण्यात येते आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गामधून किंवा इतर प्रवर्गामधून या परीक्षेसाठी अर्ज भरणार असाल तर तुम्हाला 900/- रुपये प्रति अर्ज एवढे शुल्क भरावे लागते.या शुल्कासंबंधित अधिक माहिती खालील प्रमाणे,

जर तुम्ही SC/ST/PwD/महिला प्रवर्गामधून साधारण/मूळ कालावधी दरम्यान अर्ज करत असाल तर तुम्हाला वरीलप्रमाणे 900/- रुपये प्रति अर्ज एवढे शुल्क आकारण्यात येते परंतु जर तुम्ही वाढवून मिळालेल्या म्हणजेच Extended Period दरम्यान परीक्षेसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला 1800/- रुपये प्रति अर्ज एवढे शुल्क आकारण्यात येते.

जर तुम्ही वरील प्रवर्गाव्यतिरिक्त इतर प्रवर्गांमधून परीक्षेसाठी अर्ज करणार असाल तर, साधारण किंवा मूळ कालावधीमध्ये परीक्षेसाठी अर्ज केल्यास तुम्हाला 1800/- रुपये प्रति अर्ज एवढे शुल्क आकारले जाते परंतु जर तुम्ही वाढीव मुदतीमध्ये म्हणजेच Extended Period मध्ये परीक्षेसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला 2300/- रुपये प्रति अर्ज एवढे शुल्क भरावे लागते.

gate exam meaning in marathi

पात्रता:

शैक्षणिक पात्रता:- जर तुम्हाला GATE च्या परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालीलप्रमाणे पदवीधर असणे आवश्यक आहे

  • B.E./B.Tech
  • B.Pharm
  • B.Arch
  • M.Sc.
  • MCA
  • ME/M.Tech इ.

GATE च्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही वरील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.परंतु उत्तीर्ण गुणांची अट अद्याप GATE च्या परीक्षा विभागाकडून करण्यात आलेली नाही म्हणून जरी तुम्ही किमान गुणांनी पदवीधर असाल तरीही तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करू शकता.

GATE exam information in marathi

वयोमर्यादा :-

GATE च्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज करण्यासाठी वयाची अट नाही.

gate exam information in marathi
GATE exam information in marathi

परीक्षा पद्धती/परीक्षेचे स्वरूप :-

GATE च्या परीक्षेमध्ये पुढील कोडच्या पेपरमध्ये AR, CY, EY, GG, MA, PH, XH आणि XL मध्ये 100 गुणांपैकी 15 गुण General Aptitude या विषयासाठी असतात तर उर्वरित 85 गुण हे निवडलेल्या विशिष्ट विषयासाठी दिलेले असतात.


त्याचप्रमाणे AR, CY, EY, GG, MA, PH, XH, and XL या कोडचे पेपर वगळता उर्वरित सर्व कोडच्या पेपरमध्ये 15 गुण General Aptitude या विषयासाठी दिलेले असतात,13 गुण अभियांत्रिकी गणित या विषयासाठी दिलेले असतात तर उरलेले 72 गुण हे निवडलेल्या विशिष्ट विषयासाठी दिलेले असतात.

GATE परीक्षेसंबंदर्भात इतर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून अधिकृत माहिती मिळवू शकता.

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-

गेट परीक्षेसाठी पात्र कसे व्हावे?

गेट परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने B.E./B.Tech, B.Pharm, B.Arch, M.Sc., MCA, ME/M.Tech इ. शाखेमधून पदवीधर असणे आवश्यक आहे.

गेट परीक्षेत किती विषय असतात?

GATE च्या परीक्षेमध्ये एकूण 30 विषय असतात.

गेट परीक्षेची वयोमर्यादा किती आहे?

GATE च्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.

गेट परीक्षा एका वर्षात किती वेळा घेतली जाते?

GATE ची परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते.

मी दुसऱ्या वर्षी GATE देऊ शकतो का?

GATE ची परीक्षा उमेदवार पदवीधर असल्यास किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असल्यास देता येते.

GATE साठी एकूण मार्क किती आहे?

GATE ची परीक्षा एकूण 100 गुणांची असते ज्यामध्ये 65 प्रश्न असतात.

गेट परीक्षेत किती फील्ड आहेत?

गेट परीक्षेत जवळपास 30 फील्ड आहेत.

गेट परीक्षेत किती शाखा आहेत?

गेट परीक्षेत 30 विविध शाखा आहेत.

मी दोन शाखांमध्ये गेट परीक्षा देऊ शकतो का?

होय.आपण दोन विविध शाखांमध्ये GATE ची परीक्षा देऊ शकता.

गेट वर्षातून दोनदा आयोजित केले जाते?

नाही,GATE ची परीक्षा वर्षातून एकदा आयोजित केली जाते.

मी 1 वर्षात गेट क्रॅक करू शकतो का?

होय,तुम्ही एका वर्षात गेटची परीक्षा क्रॅक करू शकता परंतु त्यासाठी GATE च्या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार अभ्यासाचे योग्य नियोजन आणि सराव करणे गरजेचे आहे.

कोण GATE परीक्षा देऊ शकतो?

कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयामधून कोणत्याही शाखेमधून पदवीधर असणारा किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असणारा उमेदवार GATE ची परीक्षा देऊ शकतो.

GATE परीक्षेसाठी वय मर्यादा आहे का?

GATE ची परीक्षा देण्यासाठी वयाची कुठलीही अट अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही वयाची परंतु शैक्षणिकदृष्टया पात्र व्यक्ती या परीक्षेसाठी अर्ज करू शकते.

GATE परीक्षेचा अवधी किती असतो ?

GATE च्या परीक्षेसाठी 3 तास म्हणजेच 180 मिनिटे एवढा वेळ/अवधी देण्यात येतो.

GATE परीक्षेचा कसे अर्ज करायचा?

GATE परीक्षा विभागाच्या अधिकृत वेबसाईट/संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

मी कॉम्प्युटर सायन्स मध्ये बी टेक केलेलं आहे आणि आता एम टेक करत आहे मी GATE परीक्षेसाठी अर्ज करू शकतो का?

हो, तुम्ही बी टेक उत्तीर्ण असाल तर तुम्ही GATE च्या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. GATE च्या परीक्षेचा अर्ज भरतेवेळी तुमचे बी टेक चे प्रमाणपत्र अवश्य अपलोड करा.

बॅकलॉग असणारे विद्यार्थी GATE ची परीक्षा देऊ शकतात का?

होय, पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवार बॅकलॉग असूनही GATE च्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात परंतु कोणत्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याआधी बॅकलॉग क्लीअर करणे गरजेचे आहे.

अर्ज फी किती असते?

GATE च्या परीक्षेचे अर्जशुल्क प्रवर्गानुसार बदलते. साधारणतः हे शुल्क (Extended Period वगळता) 900/- रुपये ते 1800 रुपये या दरम्यान असते.

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment