गट विकास अधिकारी माहिती
Table of Contents
गट विकास अधिकारी माहिती:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
गट विकास अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
गट विकास अधिकारी माहिती
पंचायतराज मधील महत्वाचा घटक म्हणून गट विकास अधिकारी या पदाकडे पहिले जाते. हा पंचायत समितीचा प्रमुख अधिकारी असतो.पंचायत समितीमार्फत जी शासकीय विकास कामे केली जातात ती कामे करवून घेण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची असते.
गट विकास अधिकारी याच पदाला इंग्रजीमध्ये BDO म्हणजेच Block Development Officer असेही म्हणतात.गट विकास अधिकारी होण्यासाठी MPSC मार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.पंचायत समितीची सर्व कामे गट विकास अधिकारी यांच्यामार्फत केली जातात.
सन १९५२ मध्ये समुदाय विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी गट विकास अधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आली.राज्य शासनाकडून प्रत्येक पंचायत समितीसाठी एक गट विकास अधिकारी (बी.डी.ओ) याप्रमाणे नियुक्ती करण्यात येते.
गट विकास अधिकारी हे राजपत्रित पद आहे.या पदाची निवड MPSC मार्फत करण्यात येते तर नेमणूक राज्य शासनाकडून करण्यात येते.गट विकास अधिकारी (BDO) हे पंचायत समिती आणि राज्यशासन यांच्यामधील दुवा असतात.
गट विकास अधिकारी यांच्यावर जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रण असते.जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच CEO असेही म्हणतात.जिल्हापरिषदेचे CEO हे IAS किंवा IAS दर्जाचे अधिकारी असतात.
एकंदरीत गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे कार्यकारी अधिकारी असतात.तसेच गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव (Secretary) म्हणून देखील कार्यरत असतात.पंचायत समितीचे सर्व महत्वाचे निर्णय गट विकास अधिकारी हेच घेत असतात.
bdo full form in marathi
BDO म्हणजे Block Development Officer या पदाला मराठीमध्ये गट विकास अधिकारी असे म्हणतात.हे पद MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा या परीक्षेमार्फत निवडले जाते आणि नेमणूक राज्य शासनामार्फत केली जाते.
गट विकास अधिकारी कामे
गट विकास अधिकारी या पदावरील अधिकाऱ्यांना अनेक महत्वाची कामे असतात ज्यामध्ये सामान्यतः खालील कामांचा आणि जबाबदाऱ्यांचा समावेश होतो.
गट विकास अधिकारी यांची कामे / कार्ये / जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे,
- पंचायत समितीमधील सर्व महत्वाच्या कागदपत्रांचे रेकॉर्ड्स व नोंदी ठेवणे व त्यांचे जतन करणे.
- पंचायत समितीसाठी शासनाकडून आलेल्या विकासकामांची अंमलबजावणी करणे.
- पंचायत समितीच्या सभांना उपस्थित राहणे व सभेबद्दलचे इतिवृत्त लिहिणे.
- राज्य शासनाकडून आलेल्या अनुदानाचे पंचायत समितीसाठी योग्य वाटप करणे.
- राज्य शासनाच्या आदेशानुसार पंचायत समितीसाठी मालमत्ता ताब्यात घेणे किंवा मालमत्ता विकणे हे महत्वाचे काम व जबाबदारी गट विकास अधिकारी यांची असते.
- पंचायत समितीमधील कामकाजाचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी पाठवणे.
- पंचायत समितीमधील वर्ग क आणि वर्ग ड कर्मचारांवर नियंत्रण ठेवणे.
गट विकास अधिकारी अभ्यासक्रम
गट विकास अधिकारी या पदाची परीक्षा खालील तीन प्रक्रियांमध्ये घेतली जाते.
- पूर्व परीक्षा :- गट विकास अधिकारी पदाची पूर्व परीक्षेमध्ये खालील २ पेपर असतात.
- सामान्य अध्ययन
- C-SAT (Civil Services Aptitude Test)
- मुख्य परीक्षा :- गट विकास अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षेमध्ये खालील ६ पेपर असतात.
- मराठी
- इंग्रजी
- सामान्य ज्ञान पेपर -१
- सामान्य ज्ञान पेपर -२
- सामान्य ज्ञान पेपर -३
- सामान्य ज्ञान पेपर -४
- मुलाखत :- पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन परीक्षांमधील पेपर मध्ये उत्तीर्ण झालेले आणि पात्र ठरलेले उमेदवार यांची मुलाखत घेतली जाते हि मुलाखत १०० गुणांची असते.
आता आपण गट विकास अधिकारी पदाच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, आणि मुलाखत याची सविस्तर माहिती घेऊ आणि त्या सोबतच गट विकास अधिकारी माहिती आणि अभ्यासक्रम समजून घेऊ,
पूर्व परीक्षा (Preliminary Exam ):- गट विकास अधिकारी या पदाच्या पूर्व परीक्षेमध्ये २ पेपर असतात. त्यापैकी पेपर क्रमांक १ सामान्य अध्ययन या विषयावर आधारित असतो तर पेपर क्रमांक २ हा C-SAT म्हणजेच Civil Services Aptitude Test या विषयावर आधारित असतो.
- पेपर क्रमांक १:- सामान्य अध्ययन :-
- या पेपरमध्ये एकूण १०० प्रश्न विचारले जातात जे सोडवण्यासाठी २ तास एवढा वेळ दिला जातो. हा पेपर एकूण २०० गुणांचा असतो.
- पेपर क्रमांक २:- C-SAT (Civil Services Aptitude Test):-
- या पेपरमध्ये एकूण ८० प्रश्न विचारले जातात जे सोडवण्यासाठी २ तास एवढा वेळ देण्यात यतो. हा पेपर एकूण २०० गुणांचा असतो .
पूर्व परीक्षेमधील पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक २ या दोन्ही पेपरची माहिती खालील तक्त्याप्रमाणे ,
अ.नं. | विषय | प्रश्न | गुण | वेळ |
1 | सामान्य अध्ययन | 100 प्रश्न | 200 गुण | 2 तास |
2 | C-SAT (Civil Services Aptitude Test) | 80 प्रश्न | 200 गुण | 2 तास |
एकूण | 180 प्रश्न | 400 गुण | 2 तास |

मुख्य परीक्षा (Mains Exam ):-
अ.नं. | विषय | गुण | वेळ |
---|---|---|---|
1 | मराठी भाषा | 100 गुण | 3 तास |
2 | इंग्रजी भाषा | 100 गुण | 3 तास |
3 | सामान्य अध्ययन- १ (इतिहास,भूगोल,कृषी) | 150 गुण | 2 तास |
4 | सामान्य अध्ययन-२ (भारतीय संविधान,भारतीय राजकारण आणि कायदे) | 150 गुण | 2 तास |
5 | सामान्य अध्ययन -३ (मानवी संसाधन,मानवी हक्क) | 150 गुण | 2 तास |
6 | सामान्य अध्ययन-४ (विज्ञान आणि तंत्रज्ञान,अर्थव्यवस्था) | 150 गुण | 2 तास |
एकूण | 800 गुण |
मुलाखत (Interview) :-
गट विकास अधिकारी या पदासाठी एकूण 100 गुणांची मुलाखत MPSC मार्फत घेण्यात येते.
मुख्य परीक्षा व मुलाखत असे एकूण 900 गुण यांच्याआधारे फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाते.
गट विकास अधिकारी पगार । गट विकास अधिकारी वेतन
महाराष्ट्रामध्ये गट विकास अधिकारी यांना अंदाजे 41,800 ते 1,32,300 एवढे वेतन प्रतिमहिना दिले जाते.या व्यतिरिक्त महागाई भत्ता व इतर भत्ते देखील राज्य शासनाकडून दिले जातात.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
BDO ची निवड कोण करते?
BDO म्हणजेच गट विकास अधिकारी, यांची निवड MPSC मधील राज्यसेवा परीक्षेमार्फत केली जाते व नियुक्ती राज्य शासनामार्फत केली जाते.
गटविकास अधिकाऱ्याचे काम काय?
गटविकास अधीकारी पंचायत समितीमधील कागदपत्रे,अहवाल,नोंदी,हिशोब,अनुदान यासंबंधित कामे करतात.तसेच कामाचे अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवतात आणि पंचायत समितीमधील इतर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवतात.
मी बीडीओ अधिकारी कसा होऊ शकतो?
बीडीओ / गटविकास अधीकारी होण्यासाठी MPSC मार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा हि परीक्षा द्यावी लागते.यासाठी उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही शाखेमधून पदवी केलेली असेल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.
गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कोण असतो?
गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी आणि पदसिद्ध सचिव असतो.तसेच गट अ मधील राजपत्रित अधिकारी असतो.
गट विकास अधिकारी हे राजपत्रित पद आहे का?
हो,गट विकास अधिकारी हे राजपत्रित अधिकारी गट अ मधील पद आहे.
गट विकास अधिकारी पगार?
गट विकास अधिकारी यांना अंदाजे 41,800 ते 1,32,300 एवढे वेतन प्रति महिना दिले जाते.या व्यतिरिक्त महागाई भत्ता व इतर भत्ते देखील मिळतात.
गट विकास अधिकाऱ्याची जबाबदारी काय आहे?
शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणे, ग्राम पंचायतींना मार्गदर्शन करणे, ग्राम पंचायतींच्या समस्या समजून घेणे आणि त्या समस्या सोडवणे अश्या प्रकारची अनेक कामे आणि जबाबदाऱ्या गट विकास अधिकारी या पदावरील अधिकारी यांना पार पाडाव्या लागतात.
गट विकास अधिकारी या पदावर काम करताना कोणत्या कौशल्यांची गरज असते?
गट विकास अधिकारी या पदावर काम करत असतांना संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण, समस्या सोडवण्याची कला इत्यादी कौशल्यांची गरज असते.
गट विकास अधिकारी म्हणून काम करताना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते?
गट विकास अधिकारी हे उच्च आणि जबाबदारीचे पद आहे त्यामुळे या पदामध्ये प्रतिष्टेसह आव्हानेही आहेत. या पदामध्ये राजकीय दबाव, कर्मचाऱ्यांची असणारी कमतरता, ग्रामीण भागामध्ये असणारी संपर्क साधनांची अडचण इत्यादी आव्हानांना सामोरे जाऊन गट विकास अधिकारी यांना काम करावे लागते.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"