मुख्य कार्यकारी अधिकारी माहिती
Table of Contents
मुख्य कार्यकारी अधिकारी माहिती:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी माहिती ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
मुख्य कार्यकारी अधिकारी माहिती
जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 94 नुसार प्रत्येक जिल्हापरिषदेसाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एक किंवा त्यापेक्षा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी शासनाला नियुक्त करावे लागतात.
प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्रपणे एक मुख्य प्रशासकीय अधिकारी शासनाकडून नेमला जातो.त्या प्रशासकीय अधिकाऱ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सी.इ.ओ (CEO) असे म्हणतात.मुख्य कार्यकारी अधिकारी हे IAS दर्जाचे अधिकारी असतात व त्यांची निवड UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून केली जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड जरी UPSC मार्फत केली जाते असली तरी त्यांची नियुक्ती किंवा बदली करण्याचे अधिकार मात्र राज्य शासनाकडे असतात.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सहाय्यक म्हणून शासनाकडून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती केली जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेसंदर्भातील सर्व मुख्य व महत्वपूर्ण निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असते.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामकाजावर नजीकचे नियंत्रण विभागीय आयुक्त यांचे असते.
जिल्हा परिषदेमध्ये शासन निर्णय व आदेशानुसार निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असते.तसेच संबंधित जिल्हा हद्दीमध्ये येणाऱ्या सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रण असते.
मुख्य कार्यकारी अधिकारी हे राज्य शासन आणि जिल्हापरिषद यांच्यामधील दुवा म्हणून काम करत असतात.
महाराष्ट्रामधील सर्व जिल्हापरिषदांमध्ये वर्षातून दोनदा आमसभा घेतली जाते.ह्या सभेचे नियोजन व आयोजन करण्याची जबाबदारी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असते.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्य
- जिल्हा परिषदेच्या सभांना उपस्थित राहणे.
- जिल्हा परिषदच्या सभेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे.
- जिल्हा परिषदेमधील कर्मचारी व अधिकारी यांना त्यांच्या जबाबदाऱ्या व कामे समजावून सांगणे व कामांचे योग्य वितरण करणे.
- जिल्हा परिषदेच्या कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवणे व तपासणे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्य कोणते
- जिल्हा परिषदेमधील वर्ग-३ व वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतात.
- जिल्हा परिषदेच्या वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांच्या २ महिना कालावधी दरम्यानच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतो .
- जिल्हा परिषदेच्या वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल शासनाला पाठवणे.
- जर अधिकारी किंवा कर्मचारी रजेवर असतील तर त्याजागी हंगामी अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचा अधिकार देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतो.
- शासनाकडून जिल्हा परिषदेसाठी आलेल्या निधीतुन रकमा काढणे आणि त्यांचे योग्य वाटप करणे हि जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असते.
- स्थायी समितीसमोर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक सादर करण्याची जबाबदारी.
- जर जिल्हा परिषदेमधून एक किंवा त्याहून अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील तर त्यापैकी एका अधिकाऱ्याची जिल्हा परिषद सचिव म्हणून नेमणूक करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासनाने दिलेला असतो.
- जिल्हा परिषदेमधील सर्व महत्वाचे कागदपत्रे आणि इतिवृत्त ताब्यात ठेवणे .
- जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकल्पांचे निर्देशन आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असते.
FAQ’s :-
मुख्य कार्यकारी अधिकारी निवड कोण करते?
मुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड UPSC मार्फत केली जाते आणि नियुक्ती व बदली राज्य शासनाकडून केली जाते.
जिल्हा परिषदेची कामे कोणती?
जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पंचायत आणि पंचायत समिती यांच्यामध्ये समन्वय साधून जिल्ह्याचा विकास करणे हे जिल्हा परिषदेचे महत्वाचे काम आहे.
जिल्हा परिषदेची प्रमुख व्यक्ती कोण?
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रमुख व्यक्ती असतात.
जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतो?
जिल्हा परिषदेमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात.
जिल्हा परिषदेवर कोणाचे नियंत्रण आहे?
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेही जिल्हा परिषदेवर नियंत्रण असते.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"