मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे
Table of Contents
Table of Contents
मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
भीती वाटणे हि खूप सामान्य समस्या आहे पण जर हि साधी व सामान्य समस्या खूप काळापर्यंत तुमच्यामध्ये राहिली तर याचे वाईट परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळू शकतात.भीती वाटण्याबाद्दल तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतील.
मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
भीती वाटणे हा एक सामान्य विषय असला तरी हा विषय समजावून सांगण्यासाठी थोडा किचकट आहे. म्हणून मी तुम्हाला हा विषय काही मुद्द्यांमध्ये व भागांमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काळजी करू नका हे सर्व मुद्दे व भाग तुम्हाला ह्या एकाच लेखामध्ये मिळून जातील. तर ज्या मुद्द्यांबद्दल व भागांबद्दल मी बोलत आहे ते खालील प्रमाणे.
मनातील भीती बद्दल थोडं बेसिक – भीती वाटणे हि एक सामान्य , स्वाभाविक व मानवी भावना आहे.भीती प्रत्येक व्यक्तीला वाटते.कोणाला करिअरची भीती वाटते,कोणाला जास्त लोकांसमोर बोलायची भीती वाटते, कोणाला वक्तृत्वाची भीती वाटते,कोणाला जबाबदारीची भीती वाटते, कोणाला एकटेपणाची भीती वाटते अश्या अनेक प्रकारच्या भीती लोकांना वाटत असतात.कोणी या बद्दल उघडपणे बोलत तर कोणी मनातल्या मनामध्ये विचार करत राहतं.
लोकांना कोणत्या कोणत्या गोष्टींची भीती वाटते ह्याची जर यादी केली तर ती यादी कदाचित संपणारही नाही.आता आपण थोडं पुढे जाऊन विचार कि मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे.
- आपल्या मनातील भीतीला ओळखणे :- तुमच्या मनातील भीती घालवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला भीती नेमकी कोणत्या गोष्टींची वाटते हे ओळखावे लागेल.ज्या ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते त्या सर्व गोष्टी लिहून घ्या.तुमची भीती घालवण्याचा हाच पाया असेल.ह्याच फाउंडेशन वर तुम्हाला पुढे काम करायचं आहे.म्हणून तुम्ही त्या सर्व लहान-सहान गोष्टी लिहून काढा ज्यांची तुम्हाला भीती वाटते.व त्या गोष्टींची एक यादी बनवा.(ह्या यादीला सुरक्षित ठेवा जेणेकरून त्या यादी बद्दल कोणालाही समजणार नाही.जर तुमच्या यादी बद्दल कोणाला समजलं तर तुमचे हेच मुद्दे तुमच्या विरुद्ध कोणीतरी वापरू शकत.)
- आपल्या मनातील भीतीला समजून घेणे :- आता त्या सर्व गोष्टी लिहून काढल्यानंतर दुसरी पायरी म्हणजे तुमच्या मनातील भीतीला व्यवस्थित समजून घ्या.भीती वाटताना तुम्हाला नेमकं कसं वाटतं ,त्यावेळी तुमच्या मनामध्ये कोण-कोणते विचार चालू होतात,तुमचे हाव भाव कसे बदलतात, मनामध्ये भीती वाटत असतांना तुम्हाला काय जाणवत असत, कोणत्या भावना मनामध्ये येत असतात अशा सर्व गोष्टींचा आढावा घ्या.
- ओळखलेल्या व समजून घेतलेल्या भीतीला सामोरे जाणे :-वरील गोष्टी समजून घेतल्यानंतर तिसरी पायरी म्हणजे त्या समजून घेतलेल्या प्रत्येक गोष्टीला व भावनेला सामोरे जाणे.वरील गोष्टी तुमच्यासोबत होतात हे तुमच्या मनामध्ये मान्य करा व स्वतःला सांगा कि हे सर्व बदलण्याची व भीतीमुक्त जीवन जगण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. ज्या गोष्टींची मला भीती वाटते त्या सर्व गोष्टी माझ्या आवाक्यामध्येच म्हणजे माझ्या कंट्रोल मध्येच आहेत.आणि मी त्या सर्व गोष्टीना बदलणार आहे व सामोरे जाणार आहे.

मनातील भीती कशी घालवावी
- वाटत असलेल्या भीतीला आव्हान देणे :- आता तुमची मानसिक तयारी झालेली असेल आता या पुढचं पाऊल म्हणजे पायरी क्रमांक चार,त्या भीती दाखवणाऱ्या व घाबरावणाऱ्या गोष्टींना आव्हान देणे.आव्हान देणे म्हणजे तुम्हाला स्वतःला हे सांगावं लागेल कि जेव्हा कोणत्या गोष्टीची भीती वाटेल तेव्हा त्या गोष्टीला न घाबरता स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य निर्णय घ्यायचा आहे.असा निर्णय घेणे ज्या बद्दल तुम्हाला कितीही भीती वाटत असली तरी तो निर्णय तुम्ही घेणे.पण त्या निर्णयाने तुमची उन्नती व प्रगती होणे अपेक्षित आहे.
- भीती वाटणाऱ्या गोष्टी करून दाखवणे :- आता जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे त्याला प्रत्यक्षात करून दाखवण्याची तयारी तुम्हाला ह्या पायरी क्रमांक पाच मध्ये करायची आहे.यामध्ये तुम्हाला घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची योजना व नियोजन बनवायचे आहे.आता त्या नियोजनावर चालणे,त्यामध्ये सातत्य ठेवणे व स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे हीच तुमची तुमच्याप्रती प्राथमिक जबाबदारी असणार आहे.
- स्वतःला प्रोत्साहित करणे :- वरील गोष्टी करत असतांना तुम्ही अधून-मधून निराश होऊ शकता जे स्वाभाविक आहे.सर्व यशस्वी लोकांना देखील असून मधून निराश वाटत असते त्यामुळे ह्या निराशेच्या भावनेकडे जास्त लक्ष केंद्रित न करता स्वतःला प्रोत्साहित करत राहा.निराशेच्या भावनेची चाहूल लागताच त्याकडे दुर्लक्ष करा.दुर्लक्ष करणे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्या गोष्टी करा ज्याने तुम्हाला आनंद मिळतो. उदाहरणार्थ , तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारू शकता, बाहेर फेर-फटका मारू शकता, आवडीचा पदार्थ खाऊ शकता जसे कि आईस्क्रीम किंवा चॉकलेट. हि गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि निराशेची भावना व त्याची भीती हि तात्पुरती आलेली असते , तुम्ही दुर्लक्ष केल्यास ती नाहीशी देखील होते.
- एकटेपणाला न घाबरणे :- आता पायरी क्रमांक सात मध्ये आपण तुम्ही एकटेपणाशी कसे डील कराल याबद्दल समजून घेऊ.खूप वेळेस असं देखील होत कि काही समस्या नसून देखील भीती वाटत असते.बहुदा त्यावेळेला आपल्या सोबत कोणी नसत आपण एकटे असतो.ती जी भीती असते ती एकटेपणामुळॆ वाटणारी भीती असते.त्यामुळे स्वतःवर प्रेम करा व स्वतः सोबत तुम्ही आनंदी आहेत ह्या गोष्टीला मान्य करा.कारण जीवनामध्ये एकटेपणा असणं देखील खूप फायद्याचं ठरू शकत.हा एकटेपणा तुम्हाला तुमच्याशी परिचय करून देतो.म्हणून एकटेपणाला घाबरू नका व याच्या भीतीमध्ये जगू नका.
- नकारात्मक लोकांपासून लांब राहणे :- आता पायरी क्रमांक आठ मध्ये आपण त्या माणसांबद्दल बघू जे असल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनातील त्या जुन्या व वाईट गोष्टींची आठवण होते ज्या जुन्या घटनांचा व प्रसंगांचा तुम्हाला त्रास होतो व मनामध्ये एक भीती निर्माण होते.त्या नकारात्मक लोकांपासून लांब राहणे हे देखील त्या भीती पासून स्वतःला वाचवण्यासारखे आहे.ह्या लोकांना वेळीच तुमच्या आयुष्यामधून काढणं फार गरजेचं आहे.म्हणून नकारात्मक लोकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा.
- जीवनामध्ये ध्येय निश्चित करणे:- वरील सर्व गोष्टी सुरळीत चालू झाल्यानंतर तुम्ही आता तुमच्या ध्येयावर काम करायला चालू केलं पाहिजे.कारण बहुदा ज्या समस्यांची भीती वाटते त्या समस्या करिअर व पैसे या दोन गोष्टींशी निगडित असतात.जर तुम्ही तुमचं ध्येय निश्चत केलं व त्यावर काम करून यश मिळवलं.तर तुम्ही करिअर व पैसे यामुळे उत्पन्न होणाऱ्या भीती पासून अलिप्त राहू शकता.
मनातील भीती कशी घालवावी
- ध्येयावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे :- ध्येयहीन असणे म्हणजेच जीवनात कोणतेच ध्येय नसणे हे सुद्धा एक निराशेचे व भीतीचे कारण असू शकते.त्यामुळे तुमचे ध्येय निश्चित करा व ध्येय निश्चिती साठी ध्येयाशी समर्पित असणे फार गरजेचे असते.त्यामुळे त्या ध्येयाशी समर्पित असा.
- वरील गोष्टींमध्ये सातत्य ठेवणे व विचलित न होणे :- तुम्हाला भीतीशी संलग्न असणाऱ्या गोष्टींचा थोडक्यात आढावा मिळालेला आहे.आता तुम्हाला वरील सर्व गोष्टींवर अंमलबजावणी करायची आहे व विचलित न होता त्या मध्ये सातत्य ठेवायचे आहे.हळू-हळू तुमच्या मनातील भीतीची तीव्रता कमी कमी होत असलेली तुम्हाला जाणवेल.व तुम्हाला अधिक प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल.
- मिळालेल्या आयुष्याबद्दल देवाची कृतज्ञता व्यक्त करणे :- जर तुम्हाला मंदिरात गेल्याने प्रसन्न वाटत असेल तर तुम्ही मंदिरात जाऊ शकता.जर तुम्ही मंदिरात जात नसाल तर ज्या गोष्टी देवाने तुम्हाला दिलेल्या आहेत त्याबद्दल देवाचे आभार माना व त्याबद्दल नेहमी कृतज्ञ असा.याने एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होत असते.
भीती वाटणे यावर उपाय
- सकस आहार घेणे :- तुमच्या मानसिक आरोग्याचा खुप महत्वाचा भाग या तुमच्या आहारावर अवलंबून असतो.त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही सकस आहार घेणे फार गरजेचे आहे.सकस आहारामध्ये तुम्ही घरगुती अन्नाला पसंती दिली पाहिजे, ऋतू नुसार येणाऱ्या फळांना खाल्ले पाहिजे,पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे जेणेकरून तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील.
- पुरेपूर व आवश्यक झोप घेणे :- सकस आहार या सोबतच पुरेपूर झोप व विश्रांती घेणेही फार गरजेचे आहे.तुम्ही वेळेवर झोपत असाल व वेळेवर उठत असाल तर तुम्हाला दिवसभर उर्जावान असल्याचे जाणवेल.त्यामुळे झोपेकडे प्रामुख्याने लक्ष द्या व आवश्यक झोप घ्या.हे केल्याने देखील तुमच्यातील भीती कमी होऊ शकते.
- योग व ध्यान करणे :– तुम्ही जर आवश्यक विश्रांती व सकस आहार या सोबतच योग व ध्यान केले तर तुमच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढून तुमची विचार करण्याची क्षमता व निर्णय क्षमता यामध्ये आमूलाग्र बदल होतो.त्यामुळे योग व ध्यान याला तुमच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवा.
मनातील भीती दूर करण्याचे उपाय
- नियमित व्यायाम करणे🏋️♀️ :- नियमित व्यायाम केल्याने तुमचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यास खूप मदत होते.व्यस्त जीवनशैलीमुळे आजकाल बहुतेक लोक व्यायाम करणे टाळतात.तसे पाहता तुम्ही तुमच्या वेळेतील ३० मिनिटे काढून देखील व्यायाम करू शकता.व्यायाम केल्याने देखील तुम्हाला वाटणारी भीती कमी होण्यास मदत होईल.
- कुटुंब – प्रियजनांसोबत वेळ घालवणे 👨👩👦:- तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत गप्पा मारल्याने देखील तुमची भीती कमी होण्यास मदत होते.कारण विचारांचा जो गोंधळ तुमच्या मनामध्ये चालू असतो, तो गोंधळ यामुळे कमी होऊ शकतो.आपल्या मित्र-मैत्रिणी,नातेवाईक , प्रियजन यांच्यासोबत जेव्हा तुम्ही वेळ घालवता तेव्हा गप्पा मारतांना तुम्ही स्वतः व्यक्त होत असता.ज्यामुळे तुम्हाला हलकं वाटतं व विचारांमध्ये स्पष्टता येते. ज्यामुळं विनाकारण वाटणारी भीती नाहीशी होते.म्हणून तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत व कुटुंबासोबत वेळ घालवणं खूप महत्वाचं आहे.
💫स्पेशल टीप :
स्पेशल टीप :- स्पेशल टीप मध्ये मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्या एका गोष्टीमुळे तुम्ही स्वतःमध्ये खूप परिवर्तन पाहू शकता.यामुळे तुमचं भीती वाटण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल आणि ती महत्वाची व स्पेशल गोष्ट आहे “व्यस्त (बिझी) राहणे “
- व्यस्त राहणे :- व्यस्त राहणे म्हणजे कोणतेही व्यर्थ काम करणे असे नाही.जसे कि रिल्स बघणे, सोशल मीडिया वर विनाकारण वेळ वाया घालवणे. जर तुम्ही या माध्यमांमधून इनकम किंवा नॉलेज मिळवत नसाल या सर्व गोष्टी तुमच्यासाठी व्यर्थ गोष्टी आहेत. जर हाच वेळ तुम्ही स्वतःला दिला व व्यस्त राहिले तर विनाकारण येणारे विचार येणार नाहीत व त्यामुळे विनाकारण वाटणारी भीतीही येणार नाही.व्यस्त राहिल्याने तुमच्या मध्ये आत्मविश्वास वाढतो व जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येते. तुम्ही व्यस्त राहायला लागतात तेव्हा विनाकारण वाटणारी भीती कमी होण्यास मदत होते.जेव्हा तुम्ही व्यस्त राहायला सुरुवात करताल तेव्हा तुम्हाला अजून नवीन अनुभव पाहायला मिळतील जे माझ्याकडून तुम्हाला सांगायचे चुकून राहून गेले असेल.
FAQ’s :-
भीती वाटत असेल तर काय करावे?
भीती वाटत असल्यास तुम्ही सर्वात आधी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा.विश्रांती घ्या व एकटेपणामध्ये न राहता तुमच्या जिवलग व विश्वासू प्रियजनांसोबत भेटून त्यांच्याशी गप्पा मारा.असे केल्याने तुमच्यातील भीती कमी होण्यास मदत मिळेल.
मनातील भीती कशी दूर करावी?
मनातील भीती दूर करण्यासाठी सर्वप्रथम वाटणाऱ्या भीतीच मूळ शोधा,त्याला सामोरे जा. ज्या गोष्टीबद्दल मनामध्ये भीती आहे त्या भीतीला कारण आहे कि ती भीती विनाकारण आहे ते तपासा.
माझ्या मनात भीतीदायक विचार का येतात?
कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त विचार करण्याची तुमची सवय असेल तर तुमच्यामध्ये भीतीदायक विचार येऊ शकतात.म्हणून विनाकारण जास्त विचार करणे टाळा जेणेकरून भीतीदायक विचार येणे देखील कमी होतील.
जीवनाला घाबरणे सामान्य आहे का?
हो ,जीवनाला घाबरणे हे सामान्य आहे. भविष्याबद्दल किंवा भूतकाळाबद्दल जास्त विचार केल्याने हे होऊ शकते.पण जर जीवनाला घाबरण्याचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही तज्ञ् डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
महत्वाच्या लिंक्स:-
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"