mht cet information in marathi
Table of Contents
MHT CET information in marathi:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे.”MHT CET परीक्षा पास होण्यासाठी काय करावे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल.
तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
mht cet information in marathi
या पोस्ट मध्ये आपण MHT CET या परीक्षेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.या पोस्टमध्ये तुम्हाला MHT CET या परीक्षेबद्दल खालील माहिती मिळणार आहे ज्यामुळे तुम्हाला MHT CET या परीक्षेची तयारी करणे आणि त्यामध्ये उत्तीर्ण होणे सोपे होणार आहे.
- MHT CET म्हणजे काय ?
- MHT CET ची तयारी केव्हापासून करावी ?
- MHT CET परीक्षेमार्फत कोणत्या क्षेत्रांमध्ये करिअर करता येते ?
- MHT CET च्या परीक्षेचे संपूर्ण स्वरूप कसे असते ?
- परीक्षेमध्ये गुण विभाजन कसे केले जाते ?
तसेच MHT CET परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम स्पष्टीकरणासह तुम्हाला समजून घेता येणार आहे.
mht cet full form
MHT CET full form :- MHT CET चे पूर्ण रूप Maharashtra Health and Technical Common Entrance Test असे आहे.महाराष्ट्रातील फार्मसी महाविद्यालय,इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी MHT CET हि परीक्षा घेण्यात येते .जर तुम्ही या क्षेत्रांमध्ये करिअर करू इच्छित असाल तर तुम्हाला हि परीक्षा द्यावी लागते.हि परीक्षा देण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे हे आपण पाहणार आहोत.
cet exam information in marathi
MHT CET परीक्षा पात्रता: MHT CET परीक्षा देण्यासाठी उमेदवार किमान 12 वी सायन्स शाखेमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच 12 वी अभ्यासक्रमामध्ये भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि गणित/बायोलॉजी हे विषय असणे आवश्यक आहे कारण MHT CET च्या परीक्षेसाठी याच अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात.
MHT CET ची तयारी कधी सुरू करावी?
MHT CET च्या परीक्षेमध्ये इयत्ता 11 वी च्या अभ्यासक्रमावर आधारित 20% प्रश्न विचारले जातात आणि इयत्ता 12 वी च्या अभ्यासक्रमावर आधारित 80% विचारले जातात.म्हणून MHT CET च्या परीक्षेच्या दृष्टीने इयत्ता 11 वी पासूनच तयारी केल्यास परीक्षेचा अभ्यासक्रम लवकर पूर्ण करता येतो.
information about cet exam in marathi
MHT CET परीक्षेसाठी आवश्यक गुण: जर तुम्ही इयत्ता बारावी विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण असाल आणि MHT CET च्या परीक्षेसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला खालील प्रमाणे (प्रवर्गानुसार) गुण आवश्यक असतात.
- अराखीव प्रवर्ग :- इयत्ता बारावी किमान 50% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- राखीव प्रवर्ग :- इयत्ता बारावी किमान 45% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक.
जर तुम्ही वरीलप्रमाणे MHT CET परीक्षेची पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करू शकता.
सीईटी परीक्षा अभ्यासक्रम
पेपर | विषय | 11 वी | 12वी | वेळ |
पेपर 1. | गणित | 10 प्रश्न | 40 प्रश्न | 90 मिनिटे |
पेपर 2. | भौतिकशास्त्र | 10 प्रश्न | 40 प्रश्न | 90 मिनिटे |
रसायनशास्त्र | 10 प्रश्न | 40 प्रश्न | 90 मिनिटे | |
पेपर 3. | वनस्पतीशास्त्र | 10 प्रश्न | 40 प्रश्न | 90 मिनिटे |
प्राणीशास्त्र | 10 प्रश्न | 40 प्रश्न | 90 मिनिटे |
cet exam information marathi
वरीलप्रमाणे, ज्या उमेदवारांना अभियांत्रिकी (Engineering ) अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवायचा त्यांना गणित,भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे पेपर द्यावे लागतात.
आणि ज्यांना फार्मसी (Pharmacy) अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवायचा आहे त्यांना भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र) म्हणजेच Biology मधील Botany आणि Zoology हे पेपर द्यावे लागतात.
सीईटी परीक्षा पेपर
MHT CET ची परीक्षा तीन विभागांमध्ये विभाजित केलेली आहे ज्याला Sections असे म्हणतात.MHT CET च्या परीक्षेमध्ये खालील तीन विभाग/Sections असतात.
- Section 1 :- गणित (Mathematics )
- Section 2:-
- भौतिकशास्त्र (Physics)
- रसायनशास्त्र (Chemistry)
- Section 3 :- जीवशास्त्र (Biology)
- प्राणीशास्त्र (Zoology)
- वनस्पतीशास्त्र (Botany)
cet exam full information in marathi
Sections | विषय | वेळ |
Section 1 | गणित (Mathematics ) | 90 मिनिटे |
Section 2 | भौतिकशास्त्र (Physics) रसायनशास्त्र (Chemistry) | 90 मिनिटे |
Section 3 | जीवशास्त्र (Biology) प्राणिशास्त्र (Zoology) वनस्पतीशास्त्र (Botany) | 90 मिनिटे |

cet exam details in marathi
जर तुम्हाला अभियांत्रिकी (Engineering ) अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला Section 1 आणि Section 2 चा पेपर द्यावा लागतो.प्रत्येक Section साठी दीड तास म्हणजेच 90 मिनिटे एवढा वेळ दिला जातो.याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-
MHT CET परीक्षा पद्धती आणि परीक्षेचे स्वरूप :-
MHT CET या परीक्षेमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी परीक्षार्थीला खालील विषयांचे पेपर द्यावे लागतात.
- भौतिकशास्त्र (Physics)
- रसायनशास्त्र (Chemistry)
- गणित (Mathematics )
आता आपण परीक्षेचे स्वरूप आणि पॅटर्न यांची थोडक्यात माहिती घेऊ.
सीईटी परीक्षा म्हणजे काय
PCM परीक्षा पद्धती आणि स्वरूप :-
प्रश्न संख्या | गुण प्रति प्रश्न | |
भौतिकशास्त्र (Physics) | 50 प्रश्न | 1 गुण |
रसायनशास्त्र (Chemistry) | 50 प्रश्न | 1 गुण |
गणित (Mathematics ) | 50 प्रश्न | 2 गुण |
एकूण | 150 प्रश्न |
MHT CET या परीक्षेमध्ये फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवाराला खालील विषयांचा पेपर द्यावा लागतो.
- भौतिकशास्त्र (Physics)
- रसायनशास्त्र (Chemistry)
- जीवशास्त्र (Biology )
- वनस्पतीशास्त्र (Botany)
- प्राणीशास्त्र (Zoology )
mht cet exam information in marathi
PCB परीक्षा पद्धती आणि स्वरूप :-
प्रश्न संख्या | गुण प्रतिप्रश्न | |
भौतिकशास्त्र (Physics) | 50 प्रश्न | 2 गुण |
रसायनशास्त्र (Chemistry) | 50 प्रश्न | 2 गुण |
जीवशास्त्र (Biology) (Zoology+Botany) | 50 प्रश्न | 1 गुण |
एकूण | 150 प्रश्न |
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
MHT-CET चा अभ्यास कधीपासून सुरु करावा.
MHT-CET चा अभ्यास इयत्ता 11 वी पासून सुरु केल्यास फायदेशीर ठरू शकते.कारण MHT-CET च्या अभ्यासक्रमामध्ये 11 वी मधील 20% अभ्यासक्रम असतो आणि 12 वी मधील 80% अभ्यासक्रम असतो.
MHT CET परीक्षा कठीण आहे का?
MHT-CET ची परीक्षा कठीण नसून या परीक्षेला मध्यम किंवा निम्न काठिण्य पातळीची परीक्षा म्हणणे योग्य राहील.
MHT CET ची तयारी कशी सुरू करावी?
MHT CET चा अभ्यासक्रम इयत्ता 11 वी पासून सुरु करावा तसेच MHT CET चा अभ्यासक्रम पूर्णतः समजून घेऊन त्या अनुषंगाने परीक्षेची तयारी करावी.
MHT CET मध्ये कोणते अभ्यासक्रम आहेत?
MHT CET मध्ये अभियांत्रिकी,फार्मसी यांसारखे अभ्यासक्रम आहेत.
MHT CET साठी 1 महिना पुरेसा आहे का?
MHT CET च्या अभ्यासक्रमासाठी 4-6 महिने आवश्यक असतात. पण जर तुमची अभ्यासामध्ये मेहनत करण्याची मानसिक तयारी असेल आणि आकलन क्षमता चांगली असेल तर तुम्ही एका महिन्यामध्ये तयारी करू शकता.
MHT CET कोणत्या विषयांची असते?
जर तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छित असाल तर तुम्हाला गणित, भौतिकशास्त्र आणि रसायन शास्त्र हे विषय असतात आणि जर तुम्ही फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छित असाल तर तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय असतात.
MHT CET च्या आधारे कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो?
MHT CET हि प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या परीक्षेतील उत्तीर्ण गुणांच्या आधारे उमेदवारांना महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी आणि फार्मसी कॉलेजेस मध्ये प्रवेश मिळतो.
MHT CET मध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी काय करावे?
नियमित अभ्यास करून, झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवून आणि त्यांचे बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण करून तुम्ही MHT CET च्या प्रवेशपरीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता आणि गरज वाटल्यास कोचिंग क्लास देखील लावू शकता याने तुमच्या अभ्यासाची पातळी आणखीन सुधारू शकते.
MHT CET च्या परीक्षेचा कठीणता स्तर काय असतो?
MHT CET च्या परीक्षेचा कठीणता स्तर किंवा काठिण्य पातळी प्रत्येक अभ्यासू उमेदवाराला वेगवेगळी वाटू शकते याचे नक्की काटेकोर मोजमाप नाही परंतु MHT CET च्या परीक्षेची काठिण्य पातळी / कठीणता स्तर मध्यम असतो.
MHT CET परीक्षा म्हणजे काय?
MHT CET परीक्षा म्हणजे Maharashtra Health and Technical Common Entrance Test. हि परीक्षा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा आहे जी परीक्षा अभियांत्रिकी/इंजिनियरिंग आणि फार्मसी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी घेतली जाते.
MHT CET परीक्षेसाठी पात्रता काय आहे?
MHT CET ची प्रवेश परीक्षा देण्यासाठी उमेदवार किमान इयत्ता 12 वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि जीवशास्त्र/गणित या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानुसार पात्र उमेदवार MHT CET ची प्रवेश परीक्षा देऊ शकतात आणि अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग आणि फार्मसी या शाखांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.
महत्वाच्या लिंक्स:-
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"