नायब तहसीलदार महाराष्ट्र |नायब तहसीलदार पदाची संपूर्ण व परिपूर्ण माहिती सर्व प्रश्नांच्या उत्तरासह!

माहिती शेअर करा.

नायब तहसीलदार महाराष्ट्र

Table of Contents

नायब तहसीलदार महाराष्ट्र:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

तहसीलदार होण्यासाठी काय करावे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

नायब तहसीलदार महाराष्ट्र

महाराष्ट्रामध्ये नायब तहसीलदार होण्यासाठी खूप उमेदवार इच्छुक असतात.कारण कि नायब तहसीलदार हे एक उच्च दर्जाचे, जबाबदारीचे व प्रतिष्ठेचे पद आहे.नायब तहसीलदार हे पद जेवढे जास्त लोकप्रिय आहे तेवढीच यामध्ये स्पर्धा देखील आहे.

या स्पर्ध्येमध्ये टिकण्यासाठी तुम्हाला तुमचे नायब तहसीलदार होण्याचं स्वप्न व त्या स्वप्नाबद्दलची संपूर्ण माहिती माहित असणं अत्यंत आवश्यक आहे.

या पोस्टमध्ये आपण नायब तहसीलदार होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत व तुमच्या मनामध्ये असणाऱ्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रामध्ये नायब तहसीलदार होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन ,कामे, कर्तव्ये ,जबाबदाऱ्या,पदोन्नती अशा अनेक घटकांची माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये मिळणार आहे.

महाराष्ट्रामध्ये नायब तहसीलदार कसे होता येईल याची संपूर्ण व परिपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत.या माहितीमुळे तुम्हाला तुमच्या स्वप्नपूर्तीमध्ये मदत मिळणार आहे त्यामुळे खालील माहिती लक्षपूर्वक वाचा व त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करून तुमच्या नायब तहसीलदार पदाच्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती करा.

नायब तहसीलदार माहिती

राज्यातील महसूल विभागाचा मुख्य कणा म्हणून नायब तहसीलदार या पदाकडे बघितले जाते.नायब तहसीलदार हे MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत भरले जाणारे पद आहे.MPSC अंतर्गत राज्य सेवा परीक्षा घेतली जाते.या परीक्षेमधून नायब तहसीलदार हे पद भरले जाते.दरवर्षी MPSC अंतर्गत राज्य सेवा परीक्षा घेतली जाते.

नायब तहसीलदार त्यांच्या 15 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्यांची तहसीलदार या पदावर पदोन्नती केली जाऊ शकते.नायब तहसीलदार हे तहसीलदार यांचे सहाय्य्क म्हणून काम करत असतात.

निवड प्रक्रिया : नायब तहसीलदार हे पद मिळवण्यासाठी उमेदवाराला खालील तीन परीक्षा पास व्हाव्या लागतात.

  • पूर्व परीक्षा :- पूर्व परीक्षेमध्ये खालील २ पेपरचा समावेश होतो.
    • पेपर क्रमांक १:- सामान्य अध्ययन
    • पेपर क्रमांक २:- C-SAT (Civil Services Aptitude Test)
  • मुख्य परीक्षा :- मुख्य परीक्षेमध्ये खालील ६ पेपरचा समावेश होतो.
    • मराठी भाषा
    • इंग्रजी भाषा
    • सामान्य अध्ययन- १
    • सामान्य अध्ययन-२
    • सामान्य अध्ययन -३
    • सामान्य अध्ययन-४
  • मुलाखत :- नायब तहसीलदार या पदाच्या वरील परीक्षा आणि पेपर उत्तीर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र उमेदवारांना १०० गुणांची मुलाखत द्यावी लागते.

वरील परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मुलाखत या प्रक्रियांबाबत खाली सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी केली जाते.

नायब तहसीलदार पगार

महाराष्ट्रामध्ये नायब तहसीलदार या पदावरील अधिकारी यांना 38,600 ते 1,22,800 एवढे वेतन प्रतिमहिना दिले जाते.या व्यतिरिक्त महागाई भत्ता व इतर भत्ते देखील शासनाकडून दिले जातात.या वेतनामध्ये जिल्हा व तालुक्यानुसार थोडासा बदल होऊ शकतो.पण अंदाजे सांगायचे झाल्यास 75,000 ते 80,000 रुपये प्रतिमाह एवढे वेतन शासनाकडून दिले जाते.

नायब तहसीलदार महाराष्ट्र
नायब तहसीलदार महाराष्ट्र

नायब तहसीलदार syllabusनायब तहसीलदार अभ्यासक्रम

पूर्व परीक्षा (Preliminary Exam ):-

  1. पेपर क्रमांक १:- सामान्य अध्ययन
  2. पेपर क्रमांक २:- C-SAT (Civil Services Aptitude Test)
अ.नं.विषय प्रश्न गुण वेळ
1सामान्य अध्ययन 100 प्रश्न 200 गुण 2 तास
2C-SAT (Civil Services Aptitude Test)80 प्रश्न 200 गुण 2 तास
एकूण 180 प्रश्न 400 गुण 2 तास

मुख्य परीक्षा (Mains Exam ):-

अ.नं.विषयगुणवेळ
1मराठी भाषा100 गुण 3 तास
2इंग्रजी भाषा100 गुण 3 तास
3सामान्य अध्ययन- १
(इतिहास,भूगोल,कृषी)
150 गुण 2 तास
4सामान्य अध्ययन-२
(भारतीय संविधान,भारतीय राजकारण आणि कायदे)
150 गुण 2 तास
5सामान्य अध्ययन -३
(मानवी संसाधन,मानवी हक्क)
150 गुण 2 तास
6सामान्य अध्ययन-४
(विज्ञान आणि तंत्रज्ञान,अर्थव्यवस्था)
150 गुण 2 तास
एकूण 800 गुण

मुलाखत (Interview) :-

नायब तहसीलदार या पदासाठी एकूण १०० गुणांची मुलाखत नोकरी विभागाकडून घेण्यात येते.यानंतर मुख्य परीक्षा व मुलाखत यांच्याआधारे फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाते.

यानंतर सर्व पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया पार पाडली जाते.यानंतर ट्रेनिंग व नियुक्ती अशी प्रक्रिया असते..

नायब तहसीलदार म्हणजे काय

नायब तहसीलदार म्हणजेच तहसीलदार सहाय्य्क किंवा डेप्युटी तहसीलदार.नायब तहसीलदार हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा या परीक्षेमार्फत भरले जाते.नायब तहसीलदार हे तहसीलदार याचे सहाय्य्क असतात.

नायब तहसीलदार कामे । कर्तव्ये ।जबाबदाऱ्या

  • तालुका स्तरावरील प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळणे.
  • महसूल व जमीन संदर्भातील कामे.
  • जमीन महसूल गोळा करणे व शासनाला पाठवणे.
  • तालुक्यातील जमिनीच्या व्यवहारासंदर्भातील नोंदी ठेवणे.
  • जमिनींचे नकाशे तसेच इतर महत्वाच्या माहितीच्या नोंदी ठवणे.
  • प्रशासकीय कागदपत्रे जसे कि दाखले,कागदपत्रे इत्यादी संदर्भातील कामे पाहणे. इत्यादी.

नायब तहसीलदार या पदासाठी कोणती कौशल्ये आवश्यक असतात?

नायब तहसीलदार हे जबाबदारीचे पद आहे आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तहसीलदार यांच्या अंगी काही आवश्यक कौशल्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून कामकाज वेळेमध्ये आणि अचूकपणे करणे सोपे होते.

  • अचूक निर्णय क्षमता
  • कामकाजाचे कायदेशीर ज्ञान
  • समस्या ओळखण्याची व त्या समस्या सोडवण्याची कला
  • कनिष्ठ कर्मचारी वर्गाशी संवाद साधण्याची प्रभावी कला
  • वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची कला
  • कागदपत्र व्यवस्थापन कौशल्य
  • समन्वय साधण्याची कला
  • दबावाच्या परिस्थितीमध्ये संयम ठेवून कर्तव्य पूर्ण करण्याची कला
  • बदल स्वीकारण्यासाठी अंगी लवचिकता
  • मराठी, इंग्रजी तसेच स्थानिक भाषेवर प्रभुत्व
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक
  • कायद्याचे ज्ञान आवश्यक

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-

नायब तहसीलदार आणि तहसीलदार एकच आहेत का?

नायब तहसीलदार आणि तहसीलदार हे एकाच नसून हि दोन्ही वेगवेगळी पदे आहेत.परंतु यांचे कामकाज थोड्या अधिक प्रमाणात सारखेच आहे.नायब तहसीलदार हे तहसीलदार यांचे सहाय्य्क म्हणून काम करत असतात.

नायब तहसीलदार म्हणजे काय?

नायब तहसीलदार म्हणजे तहसीलदार सहाय्य्क/ डेप्युटी तहसीलदार.

नायब तहसीलदार तहसीलदार होऊ शकतो का?

नायब तहसीलदार 15 वर्षांच्या कारकिर्दीनंतर तहसीलदार होऊ शकतात.

नायब तहसीलदार हे चांगले काम आहे का?

हो,नायब तहसीलदार हे चांगले आणि प्रतिष्ठेचे पद आहे.

नायब तहसीलदार किती कमावतो?

नायब तहसीलदार भत्ते वगळता अंदाजे 38,600 ते 1,22,800 एवढे वेतन प्रतिमहिना कमावतो.

नायब तहसीलदार यांना इंग्रजीत काय म्हणतात?

नायब तहसीलदार यांना इंग्रजीत Deputy Tehsildar असे म्हणतात.

MPSC नायब तहसीलदार परीक्षा कशी असते?

महाराष्ट्रामध्ये नायब तहसीलदार होण्यासाठी MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोक सेवा आयोग मार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा हि परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. हि परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते त्यापैकी पूर्व परीक्षा हा पहिला टप्पा, मुख्य परीक्षा हा दुसरा टप्पा तर मुलाखत हा तिसरा टप्पा असतो या नंतर कागदपत्रे पडताळणी केली जाते.

नायब तहसीलदार होण्यासाठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे?

महाराष्ट्रामध्ये नायब तहसीलदार या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून किमान पदवीधर असावा अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे.

नायब तहसीलदार या पदावर काम करताना कोणत्या कौशल्यांची गरज असते?

नायब तहसीलदार या पदावर काम करत असतांना संभाषण कौशल्य, कामकाजाचे ज्ञान, समन्वय साधण्याची कला, समस्या समजण्याची आणि त्या सोडवण्याची कला इ. कौशल्यांची गरज असते.

नायब तहसीलदाराची मुख्य जबाबदारी काय असते?

जमिनींच्या नोंदी ठेवणे, महसूल जमा करणे आणि तो शासनाला पाठवणे, तहसीलदार यांना कामकाजामध्ये मदत करणे, कार्यालयीन कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे अश्या विविध जबाबदाऱ्या नायब तहसीलदार यांना पार पाडाव्या लागतात.

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment