पोलीस होण्यासाठी काय करावे लागते | संपूर्ण माहिती एकाच पोस्टमध्ये…! वर्दीचं स्वप्न होईल नक्की पूर्ण…!

माहिती शेअर करा.

पोलीस होण्यासाठी काय करावे लागते

Table of Contents

Table of Contents

पोलीस होण्यासाठी काय करावे लागते:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. पोलीस दलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील खूप तरुण तरुणी आहोरात्र मेहनत करत असतात त्यातील काही यशस्वी होतात तर काही अपयशी. अपयशाला कधी कधी अपुऱ्या किंवा चुकीच्या माहिती कारणीभूत असतात.म्हणूनच तुम्हाला पोलीस भरतीची अचूक माहिती देण्यासाठी सदर पोस्ट बनवत आहोत.

या पोस्टमध्ये तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण माहिती मिळणार आहे. हि पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीच्या माहितीची इतर कोणतीही पोस्ट वाचण्याची गरज भासणार नाही. हाच दृष्टिकोन समोर ठेवून ह्या पोस्टचे लिखाण करण्यात आलेले आहे.

पोलीस होण्यासाठी काय करावे लागते ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. म्हणून खालील पोस्ट काळजीपूर्वक व लक्षपूर्वक वाचून आपल्या महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलच्या तयारीचे नियोजन करून यशस्वी सुरवात करा. येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही वर्दी नक्की मिळवाल.

तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.

नवीनतम प्रकाशित भरती :-

पोलीस होण्यासाठी काय करावे लागते

पोलीस भरतीमार्फत शिपाई पदाची सामान्यतः खालील पदे भरण्यात येतात.

यापैकी आपण पोलीस शिपाई या पदाबद्दलची सखोल माहिती या पोस्टमध्ये घेणार आहोत. यानंतरच्या पोस्टमध्ये आपण उर्वरित पदांची देखील सविस्तर माहिती घेणार आहोत.

पोस्टमध्ये समाविष्ट असणारे घटक:

पोलीस शिपाई या पदासाठी आवश्यक असणारी,

त्यासोबतच पोलीस शिपाई पदासाठी देण्यात येणारा पगार हि सर्व माहिती तुम्हाला या एकाच पोस्टमध्ये मिळणार आहे.

police honyasathi kay karave lagte

पोलीस शिपाई भरती शैक्षणिक पात्रता

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठामधून किमान इयत्ता 12 उत्तीर्ण किंवा समतुल्य.
    • माजी सैनिक :- अर्जदार उमेदवार माजी सैनिक असल्यास आणि किमान 15 वर्ष इतकी सैनिकी सेवा पूर्ण केलेली असल्यास संबंधित उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण.
    • माजी सैनिक उमेदवार असल्यास परंतु 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण केलेली नसल्यास इयत्ता 12 उत्तीर्ण.

पोलीस भरतीसाठी उंची किती लागते

पोलीस शिपाई भरती शारीरिक पात्रता

शारीरिक पात्रता (पुरुष)

  • उंची – किमान 165 cm.
  • छाती –
    • न फुगवता – 79 cm
    • फुगवून – 5 cm जास्त (79cm + 5cm )

शारीरिक पात्रता (महिला)

  • उंची – किमान 155 cm.
  • छाती –
    • लागू नाही

पोलीस होण्यासाठी काय करावे लागते

शारीरिक पात्रता (तृतीय पंथी)

  • उंची
    • ओळख तृतीय पंथी महिला असल्यास – किमान 155 cm.
    • ओळख तृतीय पंथी पुरुष असल्यास – किमान 165 cm.
  • छाती –
    • स्वतःची ओळख महिला / पुरुष / तृतीय पंथी अशी केलेल्या उमेदवारांना लागू नाही.

पोलीस भरतीसाठी वजन किती लागते

  • पोलीस भरती मध्ये मुलांसाठी अंदाजे वजन ५३ किलो पेक्षा कमी नसावे.
  • पोलीस भरती मध्ये मुलींसाठी अंदाजे वजन ४५किलो पेक्षा कमी नसावे.

पोलीस भरती साठी किती वय लागते

पोलीस शिपाई भरती वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग – 18 वर्ष ते 28 वर्ष
  • मागास प्रवर्ग – 18 वर्ष ते 33 वर्ष
  • प्रकल्पग्रस्त – 18 वर्ष ते 45 वर्ष
  • भूकंपग्रस्त – 18 वर्ष ते 45 वर्ष
  • अनाथ – 18 वर्ष ते 33 वर्ष
  • माजी सैनिक –
    • माजी सैनिक उमेदवारासाठी सशस्त्र दलामध्ये झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष.

समांतर आरक्षणांतर्गत येणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा

  • महिला उमेदवार
    • खुला प्रवर्ग – 18 वर्ष – 28 वर्ष
    • मागास प्रवर्ग – 18 वर्ष – 33 वर्ष
  • खेळाडू उमेदवार
    • खुला प्रवर्ग – 18 वर्ष – (28+5) वर्ष
    • मागास प्रवर्ग – 18 वर्ष – (33+5) वर्ष
  • पोलीस पाल्य उमेदवार
    • खुला प्रवर्ग – 18 वर्ष – 28 वर्ष
    • मागास प्रवर्ग – 18 वर्ष – 33 वर्ष
  • गृहरक्षक दल उमेदवार
    • खुला प्रवर्ग – 18 वर्ष – 28 वर्ष
    • मागास प्रवर्ग – 18 वर्ष – 33 वर्ष

पोलीस होण्यासाठी काय करावे लागते

पोलीस शिपाई भरती निवड प्रक्रिया

महाराष्टामध्ये पोलीस शिपाई होण्यासाठी उमेदवाराला खालील प्रमाणे 4 प्रक्रिया पार कराव्या लागतात.

चला आता या चारही प्रक्रियांची सविस्तर माहिती घेऊ,

पोलीस होण्यासाठी काय करावे लागते
पोलीस होण्यासाठी काय करावे लागते

लेखी परीक्षा :-

पोलीस शिपाई या पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा ऑफलाईन आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. हि परीक्षा एकूण 100 गुणांची असते ज्यासाठी एकूण दीड तास म्हणजेच 90 मिनिटे इतका वेळ दिला जातो. लेखी परीक्षेची माहिती खालील तक्त्याच्या माध्यमातून समजून घेऊ,

पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम

अ.क्र.विषयएकूण गुणएकूण प्रश्नएकूण वेळ
१.मराठी२५ गुण२५ प्रश्न
२.अंकगणित२५ गुण२५ प्रश्न
३.बुद्धिमत्ता चाचणी२५ गुण२५ प्रश्न९० मिनिटे
४.सामान्यज्ञान+चालू घडामोडी२५ गुण२५ प्रश्न
एकूण१०० गुण १०० प्रश्न

महत्वाची पुस्तके

police bharti books। पोलीस भरती महत्वाची पुस्तके

police bharti ground information in marathi

पोलीस शिपाई भरती शारीरिक पात्रता चाचणी परीक्षा

शारीरिक पात्रता चाचणी (पुरुष)

अ.नं.ग्राउंड इव्हेंट पुरुष मार्क
१.१६०० मीटर धावणे२० गुण
२.१०० मीटर धावणे१५ गुण
३.गोळा फेक१५ गुण
एकूण ५० गुण

शारीरिक पात्रता चाचणी (महिला)

अ.नं.ग्राउंड इव्हेंट महिला मार्क
1.८०० मीटर धावणे२० गुण
2.१०० मीटर धावणे१५ गुण
3.गोळा फेक१५ गुण
एकूण ५० गुण

शारीरिक पात्रता चाचणी (तृतीयपंथी)

अ.नं. तृतीयपंथी पुरुष तृतीयपंथी महिला मार्क
1.१६०० मीटर धावणे८०० मीटर धावणे२० गुण
2.१०० मीटर धावणे१०० मीटर धावणे१५ गुण
3.गोळा फेकगोळा फेक१५ गुण
एकूण ५० गुण

पोलीस भरती गोळा वजन

पोलीस भरती मध्ये गोळा किती किलोचा असतो ?

पोलीस भरती मध्ये गोळा पुरुष उमेदवारांसाठी ७.२६० किलो ग्रॅम एवढ्या वजनाचा असतो.

पोलीस भरती मध्ये गोळा महिला उमेदवारांसाठी ४ किलो ग्रॅम एवढ्या वजनाचा असतो.

पोलीस भरती कागदपत्रे

पोलीस शिपाई भरती महत्वाची कागदपत्रे

  • 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
    • (लागू असल्यास )
  • अधिवास /निवास/डोमेसाइल प्रमाणपत्र (Domicile Certificate )
  • पदवी प्रमाणपत्र (असल्यास )
  • आधार कार्ड
  • MS-CIT प्रमाणपत्र
    • (नियुक्तीनंतर सादर करू शकता)
  • हलके वाहन चालक परवाना (LMV License)
    • (नियुक्तीनंतर सादर करू शकता)

police bharti sathi lagnare documents

  • खेळाडू प्रमाणपत्र (असल्यास)
  • गृहरक्षक दल प्रमाणपत्र (असल्यास)
    • अट: जाहिरात दिनांकास 1095 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक.
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्यास प्रमाणपत्र
  • प्रकल्प ग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असल्यास प्रमाणपत्र
  • भूकंप ग्रस्त /पोलीस पाल्य /होम गार्ड असल्यास प्रमाणपत्र
  • स्वतःची स्वाक्षरी/सही
  • स्वतःचा पासपोर्ट फोटो

police bharti full information in marathi

पोलीस शिपाई भरती वैद्यकीय चाचणी

लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी यामध्ये उमेदवाराने प्राप्त केलेले गुण एकत्र केल्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड केली जाते आणि कागदपत्र पडताळणी केली जाते. त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाते ज्यामध्ये खालील चाचण्या आणि तपासण्या केल्या जातात.

  • गुडघ्यास गुडघा लागणे
  • सपाट तळवे
  • छातीचे रोग
  • दृष्टिदोष
  • वर्णांधतेपणा
  • तिरळेपणा
  • रातांधळेपण इत्यादी चाचण्या केल्या जातात.

police bharti all information in marathi

पोलीस भरती बद्दल इतर महत्वपूर्ण माहिती (थोडक्यात):

महाराष्ट्र पोलिसांना पगार किती असतो?

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलला पगार ५२००रु. – २०२००रु. (भत्ते वगळता)व ग्रेड पे २००० रु. .हा पगार जिल्ह्या नुसार बदलतो.

पोलीस भरतीसाठी काय आवश्यक आहे?

  • पायरी 1 -किमान इयत्ता बारावी व्हा.
  • पायरी 2 – किमान वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण करा.
  • पायरी 3 – पोलीस भरतीचा अभ्यास चालू करा.
  • पायरी 4 – पोलीस भरतीसाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हा.
  • पायरी 5 -पोलीस भरतीसाठी योग्य जिल्हा निवड करा.

पोलीस म्हणजे काय?

पोलीस म्हणजे काय:- पोलीस हे पद राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येते. पोलीस म्हणजे नागरिकांच्या जीविताचे,मालमत्तेचे तसेच सरकारी मालमत्तेचे रक्षण करणे ,तसेच समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे.यांसारखी अनेक प्रकारचे कामे पोलीसांना करावी लागतात.

police bharti information in marathi

महाराष्ट्र पोलीस महासंचालक यादी

महाराष्ट्र पोलीस महासंचालक यादी पुढीलप्रमाणे

police bharti sampurn mahiti

महाराष्ट्र राज्याचे पोलीस प्रमुख कोण आहेत?

सध्या पोलीस प्रमुख म्हणजेच पोलीस महासंचालक ह्या श्रीमती. रश्मि शुक्‍ला ह्या आहेत.

श्रीमती. रश्मि शुक्‍ला ह्या ०९ जानेवारी २०२४ पासून पोलीस महासंचालक ह्या पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या आधी श्री. विवेक फणसळकर हे ०९ जानेवारी २०२४ पर्यंत पोलीस महासंचालक ह्या पदावर होते.त्यांच्या कडून दिनांक ०९ जानेवारी २०२४ रोजी श्रीमती. रश्मि शुक्‍ला यांना पदभार सोपवण्यात आला.

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-

पोलीस बनण्यासाठी किती शिक्षण लागते?

पोलीस भरतीसाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पोलीस भरती वय किती पाहिजे?

पोलीस भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 28 वर्ष इतके असावे, वयोमर्यादेमध्ये प्रवर्गानुसार सवलत दिली जाते.

पोलीस भरती साठी मुलीची उंची किती पाहिजे?

पोलीस भरतीसाठी मुलींची उंची किमान 155 सें.मी. असणे आवश्यक आहे.

पोलीस भरती ला किती मार्क लागतात?

पोलीस भरतीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान लेखी परीक्षेमध्ये आणि शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण असावे लागतात परंतु नियुक्ती हे पूर्णतः मेरिट वर अवलंबून असते.

पोलीस कॉन्स्टेबल ला पगार किती असतो?

महाराष्ट्रामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावरील शिपाईचा पगार ५२००रु. – २०२००रु. (भत्ते वगळता)व ग्रेड पे २००० रु. .इतका असतो .हा पगार जिल्ह्या नुसार बदलतो.

महाराष्ट्र सरकार पोलिस पाटलांना किती मानधन प्रति महिन्याला देते?

महाराष्ट्र सरकार पोलिस पाटलांना रुपये ६५०० रुपये. इतके मानधन प्रति महिन्याला देते.

पोलिसांची नोकरी महिलांसाठी चांगली आहे का?

पोलिसाची नोकरी महिलांसाठी चांगली आहे कि नाही ह्याच एकच, प्रमाणबद्ध व अचूक उत्तर नसू शकते.पण जर महिला साक्षर, शारीरिक दृष्ट्या सक्षम व समाजासाठी काहि करू इच्छित असेल तर त्या महिलेला पोलीस होण्यास हरकत नाही.

12वी पास दिल्ली पोलिसांसाठी अर्ज करू शकतात?

हो. बारावी पास उमेदवार दिल्ली पोलीस साठी अर्ज करू शकतो.

MH पोलिसांचा हेल्पलाइन नंबर काय आहे?

मुंबई ,ठाणे आणि नवी मुंबई साठी 103 । उर्वरित महाराष्ट्रासाठी 1019

महाराष्ट्र पोलिसांचा हेल्पलाइन नंबर काय आहे?

मुंबई ,ठाणे आणि नवी मुंबई साठी 103 हा टोल फ्री क्रमांक आहे. तर उर्वरित महाराष्ट्रासाठी 1019 हा टोल फ्री क्रमांक आहे.

पोलिसांमध्ये कोणते पद सर्वोच्च आहे?

पोलीस विभागामध्ये पोलीस महासंचालक (DGP) हे पद सर्वोच्चआहे.

पोलिसांनी विनाकारण मारहाण केली तर?

पोलिसांनी विनाकारण मारहाण केली तर?- जर तुम्हाला काही कारणास्तव पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण झाली असेल तर तुम्ही घटनास्थळापासून जवळील पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार देऊ शकता. तक्रार देऊन देखील जर संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही झालेली नसेल तर तुम्ही कलम १५६(३) CRPC अंतर्गत FIR नोंदवू शकता.

भारतात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्याला काय शिक्षा आहे?

पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्यास संबंधित आरोपीला न्यायालयीन कार्यवाहीला सामोरे जावे लागते.याचे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात.अशा कृतीसाठी आरोपीला IPC च्या कलम ५०६ किंवा IPC च्या कलम ३२३ किंवा IPC च्या कलम ३३२ नुसार दंड, शिक्षा किंवा दोन्ही होऊ शकते.

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

5 thoughts on “पोलीस होण्यासाठी काय करावे लागते | संपूर्ण माहिती एकाच पोस्टमध्ये…! वर्दीचं स्वप्न होईल नक्की पूर्ण…!”

Leave a Comment