उप मुख्य कार्यकारी अधिकारी माहिती | नाही राहणार पदाबद्दल कोणतीही शंका !

माहिती शेअर करा.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी माहिती

Table of Contents

उप मुख्य कार्यकारी अधिकारी माहिती:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

उप मुख्य कार्यकारी अधिकारी माहिती

जिल्हा परिषदेमध्ये अनेक विभाग असतात जसे कि ,

  • शिक्षण विभाग
  • आरोग्य विभाग
  • कृषी विभाग
  • पाणी पुरवठा विभाग
  • समाज कल्याण विभाग
  • सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी.

असे अनेक विभाग जिल्हा परिषदेमध्ये असतात.त्या प्रत्येक विभागावर मुख्य कार्यकारीअधिकारी यांनी एकट्याने नियंत्रण ठेवणे अवघड असते म्हणून राज्य शासनामार्फत उप मुख्य अधिकारी यांची निवड केली जाते.उपमुख्य अधिकारी हे मुख्य अधिकारी यांचे सहाय्यक म्हणून काम करत असतात.

पार्श्वभूमी : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ९४ नुसार राज्य शासन प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक मुख्य अधिकारी व एक किंवा त्याहुन अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करत असते.

मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत पंचायत व पंचायत समिती तसेच इतर विभागांशी समन्वय साधत असतात.पंचायत आणि पंचायत यांच्याशी समन्वय साधून जिल्हा परिषदेमार्फत विविध विभागांचा विकास केला जातो.यामधील विकास कामांचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत केले जाते.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी कामे

उप मुख्य कार्यकारी अधिकारी हे जबाबदारीचे पद आहे म्हणून या पदामध्ये अनेक कामे ,जबाबदाऱ्या व कर्तव्ये असतात त्यातील काही कामे खालीलप्रमाणे,

  • जिल्हा परिषदेमधील विविध विभागांचे व्यवस्थापन करणे:- उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिक्षण,आरोग्य,कृषी,पाणीपुरवठा,सार्वजनिक बांधकाम यांसारख्या विविध शासकीय प्रकल्पांचे व्यवथापन करावे लागते. त्यामुळे या विविध प्रकल्प आणि योजनांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी उप- मुख्य कार्यकारी यांच्यावर असते.
  • जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना आणि प्रकल्प राबवणे:- शासन व जिल्हा परिषद मार्फत विविध विभागांच्या विकासासाठी ज्या योजना/प्रकल्प जाहीर केलेले असतात त्या योजना आणि प्रकल्प उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे संयुक्तपणे राबवत असतात आणि त्यांचे व्यवस्थपन करत असत. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी समनव्य साधून आणि चर्चा करून जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची आणि प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचे काम उप मुख्य कार्यकारी हे करतात.
  • जिल्हा परिषदेमधील अर्थसंकलपाची माहिती ठेवणे:- जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना,अर्थसंकल्प व त्यांचे नियोजन यांची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना ठेवावी लागते.
  • विविध अहवालांचे सादरीकरण करणे:- जिल्हा परिषदेमधील होणाऱ्या कामकाजाची तपासणी करणे व त्यांच्या अहवालांचे वेळोवेळो वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करणे हि जबाबदारी उप मुख्य कार्यकारी हे पार पाडत असतात.
  • जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवणे:- जिल्हा परिषदेमधील कर्मचारी यांना कामकाजासंबंधी आलेल्या अडचणींचे व समस्यांचे निवारण करणे आणि त्यांना कामकाजासंबंधी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी यांच्यावर असते.
  • जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे : जिल्हा परिषदेमधील विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामकाजाचे प्रशिक्षण देणे व त्यांना शासनाच्या योजना समजावून सांगून त्यांच्याकडून कामकाज करवून घेणे हे महत्वाचे काम उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे करतात.
  • जिल्हा परिषदेमधील कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे:- उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हापरिषदेमधील विविध विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवावे लागते त्या सोबतच त्यांच्या कामकाजाची तपासणी करावी लागते.

up mukhya karyakari adhikari

उप मुख्य कार्यकारी अधिकारी माहिती
उप मुख्य कार्यकारी अधिकारी माहिती

उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची आव्हाने

  • समन्वय साधणे :- जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना विविध विभागांशी समन्वय साधून योजनांची,प्रकल्पांची,निर्णयांची अंमलबजावणी करायची असते. अशा वेळी जिल्ह्यामधील सर्व विभागांशी,पंचायत-पंचायत समित्यांशी समन्वय साधण्याचे आव्हान उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर असते.
  • योजनांची अंमलबजावणी करणे:-जिल्हा परिषदेमार्फत जाहीर केलेल्या विविध विकासकामांची ग्राउंड लेव्हल वरती अंमलबजावणी करण्याचे आव्हान.
  • जिल्हा परिषदेमधील विविध विभागांचे व्यवस्थापन करणे:- एकाच वेळी विविध विभागांच्या विविध योजना व प्रकल्पांवर काम करण्याचे व त्या कामाचे व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे आव्हान.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचे फायदे

  • प्रशासनामधील सर्व विभागांचा अनुभव आणि माहिती:-उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासकीय कामकाजादरम्यान प्रशासनामधील विविध लोकांसोबत काम करावे लागते यामुळे विविध विभागांची माहिती मिळते.हे अनुभव अचूक निर्णय घेण्यामध्ये मदत करतात तसेच प्रकल्प किंवा योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
  • सामाजिक योगदान देण्याची संधी:- जर तुम्हाला समाजातील,जिल्हातील किंवा ग्रामीण भागातील सामान्य जनतेसाठी विकासकामे करण्याची इच्छा असेल तर तुम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर अधिकारी बनू शकता.या माध्यमातून तुम्ही जनतेच्या विकासाच्या दृष्टीने काम करून समाजासाठी आणि देशासाठी तुमचे महत्वाचे योगदान देऊ शकता.
  • भविष्यामध्ये पदोन्नतीच्या संधी:- उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्त झाल्यानंतर भविष्यामध्ये तुम्हाला पदोन्नती म्हणजेच प्रमोशनच्या विविध संधी उपलब्ध होतात.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी पगार

उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अंदाजे मासिक पगार रुपये 70,000 ते 1,60,000 या दरम्यान असतो.जिल्ह्यानुसार आणि शासन निर्णयानुसार यामध्ये बदल आढळू शकतो.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी आवश्यक कौशल्य

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-

उप मुख्य कार्यकारी अधिकारी पगार

उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अंदाजे मासिक पगार 70,000 ते 1,60,000 रुपये या दरम्यान असतो. या पगारामध्ये जिल्ह्यानुसार आणि शासन निर्णयानुसार बदल होऊ शकतो .

जिल्हा परिषद सचिव कोण असतो

जिल्हा परिषदेमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात.

उप मुख्य कार्यकारी अधिकारीवर कोणाचे नियंत्रण आहे?

उप मुख्य कार्यकारी अधिकारीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रण असते.

जिल्हा परिषदेस अनुदान कोण देते?

जिल्हा परिषदेस राज्य शासन अनुदान कोण देते.

जिल्हा परिषद स्थायी समिती सचिव कोण असतो

जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध सचिव असतात.

स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात?

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे संबंधित स्थायी समितीचे अध्यक्ष असतात.

जिल्हा परिषदेची ग्रामीण विकासात काय भूमिका असते?

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये विविध विकास योजना राबवल्या जात असतात ज्यामध्ये मुख्यतः पाणी पुरवठा, आरोग्य केंद्रे, शाळा , रस्ते इत्यादी विकास योजनांचा समावेश होतो.

जिल्हा परिषद आणि पंचायतींचे संबंध कसे असतात?

शासनाने ग्रामीण विभागांसाठी आणि शहरी विभागांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांबाबत जिल्हा परिषद पंचायतींना मार्गदर्शन करते आणि त्यामुळे विकासकामांना अधिक गती प्राप्त होते.

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment