psi information in marathi
Table of Contents
psi होण्यासाठी काय करावे लागते:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
psi होण्यासाठी काय करावे लागते ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
psi information in marathi
ह्या पोस्टमध्ये आपण psi होण्यासाठी काय करावे लागते याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.यामध्ये तुम्हाला – पी एस आय म्हणजे काय, पी एस आय होण्यासाठीची शैक्षणिक व शारीरिक पात्रता , पी एस आय अधिकाऱ्याचे वेतनमान तसेच पी एस आय होण्यासाठी काय अभ्यासक्रम असतो, पोलीस उपनिरीक्षक पदाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये अशा प्रकारच्या अनेक महत्वाच्या गोष्टींची माहिती मिळणार आहे.
पी एस आय म्हणजे काय । पोलीस उपनिरीक्षक म्हणजे काय
पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक होय याच पदाला पोलीस सब इन्स्पेक्टर असेही म्हणतात.पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी शारीरिक पात्रता व शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा याची माहिती खाली दिलेली आहे.
psi full form – Police Sub-Inspector
पी एस आय चा फुल फॉर्म पोलीस सब इन्स्पेक्टर असा आहे.
psi होण्यासाठी काय करावे लागते
पोलीस उपनिरीक्षक पात्रता:-
पोलीस उपनिरीक्षक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर असणारा विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्यास पात्र असतो.पदवीमध्ये उमेदवार किमान पास असणे आवश्यक आहे.
पोलीस उपनिरीक्षक वयोमर्यादा (Age Limit):
- किमान वय 19 असणे आवश्यक आहे, व कमाल वय 31 असणे आवश्यक आहे.(वयामध्ये राखीव प्रवर्गासाठी सवलत देण्यात आहे)
पोलीस उपनिरीक्षक शारीरिक पात्रता चाचणी (Physical Test):
शारीरिक चाचणीमध्ये उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाते.यामध्ये उमदेवराची उंची ,छाती मोजली जाते व धावणे , लांब उडी, गोळाफेक,पूल अप्स हे इव्हेंट असतात.याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
- उंची (Height):
- पुरुषांसाठी किमान उंची 165 सेमी असावी लागते.
- महिलांसाठी किमान उंची 157 सेमी असावी लागते.
- छाती (Chest) (फक्त पुरुषांसाठी):
- पुरुषांची छाती न फुगवता किमान 79 सेमी असावी लागते व फुगवल्यानंतर छाती किमान 84 सेमी एवढी भरली पाहिजे.
- महिलांना – लागू नाही
- धावणे (Running):
- पुरुषांसाठी 800 मीटर धावणे
- महिलांसाठी: 400 मीटर धावणे
- लांबी उडी (Long Jump):
- पुरुषांसाठी: 4.5 मीटर लांब किंवा त्याहून अधिक.
- महिलांसाठी: 4 मीटर लांब किंवा त्याहून अधिक.
- गोळाफेक (Shot Put):
- पुरुषांसाठी: 7.26 किलो ग्रॅम वजनाचा गोळा 7.50 मीटर लांब फेकणे.
- महिलांसाठी: 4 किलो ग्रॅम वजनाचा गोळा 6 मीटर लांब फेकणे.
- पुल अप्स (Shot Put): किमान 8 पूल अप्स, 2.5 गुण प्रत्येकी,एकूण गुण 20

पोलीस उपनिरीक्षक पगार
पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी अंदाजे 38,600 रुपये ते 1,22,800 रुपये प्रतिमहिना पगार दिला जातो.
पी एस आय अभ्यासक्रम :-
पी एस आय म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी उमेदवाराला तीन परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात.त्याखालील प्रमाणे
- पूर्व परीक्षा :- हि परीक्षा प्राथमिक स्वरूपाची परीक्षा असते या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, अंक गणित, बुद्धिमत्ता चाचणी यांसारख्या विषयांचा समावेश असतो.याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :
- सामान्य ज्ञान (General Knowledge)-सामान्य ज्ञान या विषयामध्ये खालील घटकांचा समावेश होतो.सामान्य ज्ञान ह्या विषयाचा मुद्देसूद अभ्यास करावा.सामान्य ज्ञान या विषयामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो.
- चालू घडामोडी (Current Affairs)
- इतिहास (History)
- भूगोल (Geography)
- भारतीय राज्यघटना (Indian Polity)
- अर्थशास्त्र (Economics)
- सामान्य विज्ञान (General Science)इ .
- अंक गणित | बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning and Arithmetic)
- अंकगणित (Arithmetic)
- तर्कशक्ती चाचणी (Logical Reasoning)
- बौद्धिक क्षमता चाचणी (Intellectual Ability)
- सामान्य ज्ञान (General Knowledge)-सामान्य ज्ञान या विषयामध्ये खालील घटकांचा समावेश होतो.सामान्य ज्ञान ह्या विषयाचा मुद्देसूद अभ्यास करावा.सामान्य ज्ञान या विषयामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो.
पोलीस उपनिरीक्षक माहिती
- मुख्य परीक्षा (Main Exam): हि परीक्षा देण्यासाठी खालील विषयांचे सविस्तर व सखोल माहिती व ज्ञान असणे आवश्यक आहे.ते विषय पुढीलप्रमाणे.
- मराठी (Marathi):मराठी व्याकरण या विषयामध्ये खालील घटकांचा समावेश होतो.
- व्याकरण (Grammar)
- शब्दसंग्रह (Vocabulary)
- इंग्रजी (English):
- व्याकरण (Grammar)
- शब्दसंग्रह (Vocabulary)
- भाषाशुद्धता (Language Proficiency)
- निबंध लेखन (Essay Writing)
- सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी (General Knowledge and Reasoning):सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये खालील घटकांचा समावेश होतो.
- चालू घडामोडी (Current Affairs)
- इतिहास (History)
- भूगोल (Geography)
- भारतीय राज्यघटना (Indian Polity)
- अर्थशास्त्र (Economics)
- सामान्य विज्ञान (General Science)
- पर्यावरण (Environment)
- अंकगणित (Arithmetic)
- तर्कशक्ती चाचणी (Logical Reasoning)
- बौद्धिक क्षमता (Intellectual Ability)
- मराठी (Marathi):मराठी व्याकरण या विषयामध्ये खालील घटकांचा समावेश होतो.
अधिक माहितीसाठी MPSC च्या https://mpsc.gov.in/home या संकेतस्थळाला भेट द्या.
- मुलाखत :- पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीमध्ये तुमच्या मधील विविध नेतृत्व गुणांना तपासले जाते.मुलाखत कशी द्यावी यासाठी तुम्ही यूट्यूब वर उपलब्ध असणाऱ्या व्हिडिओस चा फायदा नक्की घ्या.
psi होण्यासाठी काय करावे लागते
psi होण्यासाठी काय करावे लागते या बद्दल आपण वरील भागामध्ये माहिती घेतली आता आपण पोलीस उपनिरीक्षक पदाची भूमिका व जबाबदारी ह्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ.
पोलीस उपनिरीक्षक माहिती
पोलीस उपनिरीक्षक पद –भूमिका व जबाबदारी.
PSI चे काम काय असते?
- समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे.
- अंतर्गत असणाऱ्या पोलीस ठाण्याचे व्यवस्थापन पाहणे
- पोलीस ठाण्यामधील आलेल्या तक्रारींचे निवारण करणे
- गस्त घालणे व संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे
- गुन्ह्यांची तपासणी करणे
- गुन्ह्यासंबंधित पुरावे गोळा करणे इत्यादी.
अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या व महत्वाची कामे पोलीस उपनिरीक्षक यांना पार पाडाव्या लागतात.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
पीएसआय होण्यासाठी काय करावे लागते?
पीएसआय होण्यासाठी MPSC मार्फत घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते.
पोलीस निरीक्षक म्हणजे काय?
पोलीस निरीक्षक म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर (PSI).
psi साठी पात्रता काय आहे?
psi या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर हि आहे.तुम्ही कोणत्याही शाखेमधून पदवीधर असाल तरी तुम्ही psi ची परीक्षा देऊ शकता.
पीएसआय परीक्षेसाठी मी काय अभ्यास करावा?
पीएसआय परीक्षेसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान,चालू घडामोडी,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी अशा विषयांचा अभ्यास करावा लागतो.
मी BA नंतर psi होऊ शकतो का?
तुम्ही BA नंतर psi होऊ शकता कारण psi पदासाठी साठी किमान पात्रता पदवीधर आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे आहे.
पीएसआय परीक्षा काय आहे?
PSI म्हणजे पोलीस उप -निरीक्षक. हि परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत घेण्यात येते .
पीएसआय परीक्षेसाठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या PSI च्या परीक्षेसाठी उमेदवार किमान पदवीधर असणे आणि भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. त्यासोबतच पदासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक आणि शारीरिक पात्रतेची पूर्तता करणेही आवश्यक आहे .
पीएसआय परीक्षेची जाहिरात कधी येते?
पीएसआय परीक्षेची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते.
पीएसआय परीक्षेची शारीरिक चाचणी कशी असते?
पीएसआय परीक्षेच्या शारीरिक चाचणीमध्ये वजन, उंची, छाती मोजली जाते आणि धावणे, लांब उडी इ. सारख्या शारीरिक चाचण्या घेतल्या जातात.
पीएसआय बनण्याचे फायदे काय आहेत?
पीएसआय बनण्याचे अनेक फायदे आहेत जसे कि सामाजिक प्रतिष्ठा, नोकरीची हमी , चांगला पगार, पदोन्नती इत्यादी .
पीएसआय बनण्यासाठी कोणत्या गुणांची गरज असते?
पीएसआय ची नोकरी जबाबदारीची आणि उच्च पदाची नोकरी असल्यामुळे यामध्ये अनेक गुणांची आवश्यकता असते जसे कि, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम आणि तंदुरुस्त असणे, संयमी आणि कर्तव्यदक्ष असणे, शिस्तबद्ध असणे इत्यादी.
पीएसआय परीक्षेची तयारी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
परीक्षेची तयारी करतांना अभ्यासाचे अभ्यासक्रमानुसार योग्य नियोजन करा, शालेय पाठ्यपुस्तके वाचा, अभ्यासाचे वेळापत्रक बनवून त्याची अंमलबजावणी करा , स्वतःप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, अभ्यासासोबतच मानसिक ताणतणावांचेही व्यस्थापन करा.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"
Hi mahiti khup changli aahe
धन्यवाद…! आपल्या कमेंट्स आमच्यासाठी प्रेरणेचे स्रोत आहेत जे आम्हाला नवीन लेख लिहिण्यासाठी प्रेरणादायी ठरतात.
धन्यवाद…! खुप छान माहिती दिली तुम्ही
धन्यवाद छान आहे माहिती एक विचारायचे होते…पोलिसांमध्येही कॉम्प्यूटर टायपिंग करणारे जॉब असतात मी पाहिले आहे अंगावर वर्दी असते आणि टायपिंग करत असतात त्यासाठी एक्झॅक्टली कोणती परीक्षा आहे ? माझे ३० इंग्लिश ३० मराठी झाले आहे… एक दोघांना विचारले तर ते भरती म्हणाले पण रेग्युलर नाही फारसं कोणाला माहिती नाहीये.. प्लीज उत्तर दिल्यास बरे होईल..धन्यवाद 🙏