तलाठी अभ्यासक्रम
Table of Contents
तलाठी अभ्यासक्रम :- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
तलाठी अभ्यासक्रम | तलाठी होण्यासाठी काय करावे लागते । ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
-:नवीनतम प्रकाशित भरती :-
- Talathi Bharti 2025 – Update | महाराष्ट्रामध्ये तलाठी पदाच्या तब्बल 2477 जागा रिक्त
- central bank of india apprentice bharti 2025 | अप्रेंटिस पदाच्या 4500 रिक्त जागांसाठी भरती
- SSC Stenographer Bharti 2025 – स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर पदाच्या 261 जागांसाठी भरती.
- SSC CHT BHARTI 2025 – हिंदी ट्रान्सलेटर पदाच्या 437 जागांसाठी भरती 2025। पगार ₹35400 ते ₹142400
- NHM Nashik Recruitment 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025
तलाठी अभ्यासक्रम
Talathi Bharti 2025 – Update | महाराष्ट्रामध्ये तलाठी पदाच्या तब्बल 2477 जागा रिक्त
तलाठी अभ्यासक्रम :- तलाठी होण्यासाठी काय करावे लागते ह्या पोस्ट मध्ये आपण तलाठी भरती होण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती पाहणार आहोत.या माहितीमध्ये तुम्हाला तलाठी भरतीच्या अभ्यासक्रमासोबतच, तलाठी होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , वयामध्ये मिळणारी सूट,परीक्षेचे स्वरूप, तलाठी कोणती कामे करतात त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात अश्या सर्व मुद्दयांची माहिती आपण समजून घेणार आहोत.
म्हणून शेवट पर्यंत हि पोस्ट वाचा व तुमच्या तलाठी होण्याच्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती करा.
talathi bharti abhyaskram
आता आपण तलाठी भरती होण्यासाठी अभ्यासक्रम काय आहे याची सविस्तर माहिती बघू. ती माहिती खालीलप्रमाणे,
तलाठी भरती महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभागामार्फत घेतली जाते.या भरतीच्या लेखी परीक्षेसाठी खालील विषय असतात.
विषय | प्रश्न संख्या | गुण |
मराठी | 25 | 50 |
इंग्रजी | 25 | 50 |
सामान्य ज्ञान | 25 | 50 |
अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 प्रश्न (2गुण प्रत्येकी) | 200 गुण |
वरील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे तलाठी भरतीच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी,इंग्रजी,सामान्य ज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश असतो.
लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असते.या परीक्षेमध्ये मराठी विषयासाठी २५ प्रश्न,इंग्रजी विषयासाठी २५ प्रश्न,सामान्यज्ञान या विषयासाठी २५ प्रश्न आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी २५ प्रश्न असे एकूण १०० प्रश्न असतात.
प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण या नुसार एकूण २०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते.परंतु उमेदवाराला गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी किमान ४५% गुण आवश्यक असतात.त्यानंतर मेरिट नुसार यादी जाहीर केली जाते.

- मराठी – मराठी विषयामध्ये सामान्यतः खालील घटकांचा समावेश असतो.
- मराठी व्याकरण
- मराठी व्याकरण
- वाक्य आणि वाक्यरचना
- शब्दांचे अर्थ
- प्रयोग व प्रयोगांचे प्रकार
- समास
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- म्हणी व म्हणींचे अर्थ
- वाक्य प्रचार
- शब्दसंग्रह
- प्रसिद्ध पुस्तके आणि पुस्तकांचे लेखक
- संत व संतांची नावे व माहिती इत्यादी.
- परीक्षेमध्ये मराठी या विषयावर आधारित असणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी दर्जा हा 12 वी पास असतो.
- मराठी व्याकरण
- इंग्रजी – इंग्रजी विषयामध्ये सामान्यतः खालील घटकांचा समावेश असतो.
- Grammer
- Parts of speech
- Synonyms (Simmilar wards)
- Antonyms (Opposite words)
- Tense and its types
- Change the voice
- Clauses
- Questions tag
- Punctuation mark
- Vocabulary
- Fill in the Blanks. etc.
- Grammer
- सामान्य ज्ञान – सामान्य ज्ञान या विषयामध्ये सामान्यतः खालील घटकांचा समावेश असतो.
- भूगोल
- महाराष्ट्र
- भारत
- जग
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
- आधुनिक भारताचा इतिहास
- नागरिकशास्त्र
- अर्थव्यवस्था
- पंचायत राज
- भारताची राज्यघटना
- सामान्य विज्ञान
- संगणक शास्त्र (माहिती आणि तंत्रज्ञान)
- समाजसुधारक
- भूगोल
- चालू घडामोडी
- अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी –
- अंकगणित-
- बेरीज -वजाबाकी
- गुणाकार – भागाकार
- सरळव्याज – चक्रवाढ व्याज
- काळ-काम-वेग
- नफा – तोटा
- शेकडेवारी
- समचलन – व्यस्तचलन
- मापे व परिमाणे इत्यादी.
- बुद्धिमत्ता चाचणी-
- अंकमालिका
- अक्षरमालिका
- व्हेन आकृत्या
- विसंगत संख्या ओळखणे
- संख्या सहसंबंध
- आकृत्यांवर आधारित प्रश्न
- आकृत्यांची संख्या मोजणे
- कूट प्रश्न
- नातेसंबंधावर आधारित प्रश्न इत्यादी.
- अंकगणित-
तलाठी भरती पात्रता वयोमर्यादा
तलाठी भरती पात्रता आणि वयोमर्यादा यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा यासोबतच प्रवर्गानुसार मिळणारी सूट याबद्दल माहिती घेणार आहोत.
शैक्षणिक पात्रता :-
- तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक असते.
- कोणत्याही शाखेमधील पदवीधर तलाठी पदासाठी अर्ज करू शकतो.
- नागरिकत्व भारतीय असणे आवश्यक.
- MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक.
- जर तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पद नियुक्तीनंतर 2 वर्ष कालावधीच्या आत तुमचे MSCIT कोर्स पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा :- तलाठी भरती साठी आवश्यक वयोमर्यादा खालीलप्रमाणे
- खुला प्रवर्ग : किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष
- राखीव प्रवर्ग : किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष
- दिव्यांग : किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्ष
- खेळाडू : किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष
- प्रकल्पग्रस्त : किमान वर्ष 18 ते कमाल 45 वर्ष
- भूकंपग्रस्त : किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्ष
- माजी सैनिक : किमान 18 वर्ष ते 46 कमाल वर्ष
तलाठी होण्यासाठी काय करावे लागते
जर तुमचे स्वप्न हे तलाठी होणे असेल ,आणि तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधर असाल तर तुम्ही तलाठी भरती परीक्षा देण्यासाठी पात्र असता.तलाठी भरती परीक्षा महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभागामार्फत घेतली जाते.ह्या परीक्षेचे स्वरूप कसे असते,शैक्षणिक पात्रता काय असते,वयोमर्यादा किती असते , अभ्यासक्रम काय असतो अशा सर्व महत्वाच्या घटकांची माहिती आपण वरील भागामध्ये घेतली.
अभ्यासक्रमानुसार जर तुम्ही योग्य नियोजन केले व त्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवले तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता.जर तुम्ही अजून पदवीधर झालेले नसाल पण तुम्हाला भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असेल तर तुम्ही पदवी पूर्ण होण्याची वाट न बघता आत्ता पासूनच अभ्यास चालू करायला हवा. जर तुम्ही सातत्याने १-२ वर्ष नियोजनबद्धरित्या अभ्यासक्रमाला अनुसरून मेहनत केली तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता.
talathi information in marathi
तलाठी भरती किती वर्षांनी होते
तलाठी भरती किती वर्षांनी होते याचे अचूक उत्तर देणे शक्य नाही.पण नियमित अंतरामध्ये हि भरती होत असते.तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्धी हि पूर्णतः राज्य सरकारच्या नियंत्रणामध्ये असते.
तलाठी काय काम करतो
तलाठी जनता व सरकार यामधील दुवा म्हणून काम करत असतो.
- शेती संदर्भातील अभिलेखांच्या नोंदी व रेकॉर्ड ठेवणे.
- शासनाला शेतसारा गोळा करून देणे.
- जमिनीच्या व्यवहारांसंबंधी नोंदी ठेवणे.
- पिकांची पाहणी व नोंदणी करणे. अशी अनेक प्रकारची कामे तलाठ्याला करावी लागतात.
सज्जा म्हणजे काय :-तलाठी ज्या ठिकाणी काम करतो त्या कार्यालयास सज्जा असे म्हणतात.हे तलाठ्याचे कार्यक्षेत्र असते.
सज्जा हा शब्द मुख्यतः ग्रामीण भागामध्ये वापरण्यात येणारा आणि महसूल व्यवस्थेशी संबंधित असणारा शब्द आहे. सामान्यतः एका तलाठीकडे एक ते तीन गावांचा कार्यभार सोपवलेला असतो आणि त्या तलाठी अधिकाऱ्याचे हे कार्यक्षेत्र असते याच गावांच्या समूहाला एकत्रितपणे सज्जा असे म्हणतात.
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
तलाठीची पात्रता काय?
तलाठीची परीक्षा देण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
तलाठीसाठी किती लोक अर्ज करतात?
दरवर्षी तलाठी पदाची पदसंख्या व अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या हि बदलत असते.पण मागील तलाठी भरतीच्या अनुसार 4644 जागांसाठी 11 लाखांहून अधिक अर्ज आले होते.
तलाठी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का?
नाही ,तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते.
मी डिप्लोमा नंतर तलाठी परीक्षा देऊ शकतो का?
नाही, तुम्ही डिप्लोमा नंतर तलाठी परीक्षा देऊ शकत नाही कारण तलाठी भरतीसाठी कमीतकमी पात्रता हि पदवीधर अशी आहे.
तलाठी अर्ज कसा करावा?
तलाठी पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
तलाठी पदाचा पगार किती?
तलाठी पदाचा पगार 25,500 ते 81,100 या दरम्यान असतो.पण याव्यतिरिक्त महागाई भत्ता व इतर भत्ते मिळतात.
तलाठीची मुख्य जबाबदारी काय असते?
जमिनी संदर्भातील नोंदी ठेवणे, महसूल जमा करणे, कार्यालयीन कागदपत्रे सांभाळणे आणि त्यांची तपासणी करणे, सरकारी योजनांची माहिती देणे इ. जबाबदाऱ्या आणि कामे तलाठी या पदावरील व्यक्तीला करावी लागतात.
तलाठीची परीक्षा कोणामार्फत घेण्यात येते?
तलाठी भरतीची परीक्षा हि महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येते. या भरती परीक्षेसाठी उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
सज्जा म्हणजे काय ?
तलाठीच्या कार्यक्षेत्रास / कार्यालयास सज्जा असे म्हणतात.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"