कलेक्टर होण्यासाठी काय करावे याबद्दल सखोल व सविस्तर माहिती.

माहिती शेअर करा.

कलेक्टर होण्यासाठी काय करावे

कलेक्टर होण्यासाठी काय करावे:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

कलेक्टर होण्यासाठी काय करावे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

कलेक्टर होण्यासाठी काय करावे

collector honyasathi kay karave

कलेक्टर होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला या पोस्ट मध्ये माहिती मिळणार आहेत.या पोस्टमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

कलेक्टर होण्यासाठी काय करावे लागते

collector honyasathi kay karave lagte

कलेक्टर होण्यासाठी काय करावे लागते या पोस्टमध्ये आपण सर्वप्रथम कलेक्टर होण्यासाठीची शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा याबद्दल माहिती घेऊ.

कलेक्टर होण्यासाठी शैक्षणिक पात्रता:-

कलेक्टर पदाच्या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • किमान पदवीधर :- कलेक्टर होण्यासाठी तुम्हाला किमान पदवीधर असावे लागते.तुम्ही कोणत्याही शाखेमधून पदवीधर असाल तरीही तुम्ही कलेक्टर होण्याची परीक्षा देऊ शकता.
  • पदवीच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी:- तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षांमध्ये किंवा सेमिस्टर मध्ये असणारे विद्यार्थी कलेक्टर होण्याची परीक्षा देऊ शकतात.
  • किमान आवश्यक गुण :- कलेक्टर होण्यासाठी तुम्ही किमान कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे किंवा त्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला किंवा सेमिस्टरला असणे आवश्यक आहे.तुम्हाला कितीही गुण असले तरी तुम्ही कलेक्टर होण्याची परीक्षा देऊ शकता यासाठी फक्त तुम्ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

कलेक्टर होण्यासाठी वयोमर्यादा :-

कलेक्टर पदाच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने वरील शैक्षणिक पात्रतेसह खालील प्रमाणे वयोमर्यादेचीही पूर्तता करणे अनिवार्य आहे.

  • कलेक्टर होण्याची परीक्षा देण्यासाठी तुमचे वय किमान 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे तसेच कमाल वयोमर्यादा हि 32 वर्ष एवढी आहे.
    • टीप :- वरील वयोमर्यादा हि खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच जनरल प्रवर्गासाठी आहे जर तुम्ही राखीव प्रवर्गामधून असाल तर तुमच्यासाठी सवलत असते.
कलेक्टर होण्यासाठी काय करावे
कलेक्टर होण्यासाठी काय करावे

कलेक्टर म्हणजे काय

कलेक्टर याच पदाला जिल्हाधिकारी (डी.सी.) म्हणूनही ओळखले जाते.या पदावरील अधिकारी UPSC द्वारे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा म्हणजेच UPSC -CSE हि परीक्षा उत्तीर्ण झालेले असतात.

कलेक्टर/जिल्हाधिकारी हे एखाद्या विशिष्ट जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असतात.कलेक्टर/जिल्हाधिकारी एखाद्या विशिष्ट जिल्ह्याची किंवा प्रदेशाची कायदा व सुव्यवस्था पाहतात ,तसेच संबंधित प्रदेशाच्या किंवा जिल्ह्याच्या विकासाची व कल्याणाची जबाबदारी पार पाडतात. त्या कामांची व जबाबदाऱ्यांची माहिती ह्या पोस्टमध्ये देण्यात आलेली आहे.

कलेक्टर होण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते

कलेक्टर होण्यासाठी तुम्ही किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.जरी तुम्ही किमान गुणांनी तुमची पदवी परीक्षा पास झालेले असाल तरी तुम्ही कलेक्टर होण्यासाठीची परीक्षा देऊ शकता.तसेच तुम्ही कोणत्याही शाखेमधून पदवी पूर्ण केलेली असेल तरी तुम्ही कलेक्टर होण्यासाठी ची नागरी सेवा परीक्षा म्हणजेच UPSC -CSE हि परीक्षा देऊ शकता.

कलेक्टर होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते

कलेक्टर होण्यासाठी तुम्हाला UPSC मार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा म्हणजेच UPSC -CSE हि परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.ह्या परीक्षेसाठी तुमची शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती असावी याबद्दल आपण मागील मुद्द्यांमध्ये माहिती घेतलेली आहे.

कलेक्टर होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते, ह्या विषयांमधील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या परीक्षेमध्ये कोणकोणते पेपर असतात.तर त्याची माहिती पुढीलप्रमाणे,

  1. Preliminary Exam म्हणजेच पूर्व परीक्षा :- हि कलेक्टर होण्यासाठीची पहिली व प्रारंभिक परीक्षा असते.हि परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असते.या परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, राजकारण ,अर्थशास्त्र यांसारख्या विषयांचा समावेश असतो.
  2. Mains Exam म्हणजेच मुख्य परीक्षा :- हि दुसऱ्या टप्प्याची परीक्षा असते यामध्ये उमेदवाराला परीक्षेमध्ये MCQ type प्रश्न विचारले जात नाही.यामध्ये उमेदवाराला सविस्तर लेखन करायचे असते.या परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन व वैकल्पिक विषय यांचा समावेश असतो. सामान्य अध्ययन मध्ये पुढील 9 विषयांचा समावेश असतो.
  3. Interview म्हणजेच मुलाखत :- मुलाखत हि शेवटची परीक्षा प्रक्रिया असते.हि परीक्षा उमेदवाराचे नेतृत्व गुण, कौशल्य गुण, तार्किक बुद्धी तसेच उमेदवाराचे व्यक्तिमत्व तपासण्यासाठी हि मुलाखत घेण्यात येते.शक्यतो हि मुलाखत UPSC द्वारे दिल्ली येथे आयोजित केली जाते.

कलेक्टर ची कामे

कलेक्टर/जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असतात.पदभार स्वीकारल्यानंतर कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी यांना समाजाप्रती काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.त्यातील काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे,

यांसारख्या अनेक प्रकारच्या कामांची जबाबदारी कलेक्टर या पदावरील अधिकाऱ्यांना पार पाडावी लागतात.

कलेक्टर या पदासाठी अत्यंत आवश्यक असणारी मूल कर्तव्ये

तुम्ही जेव्हा मुलाखतीसाठी जाता तेव्हा तुमच्यामध्ये असणाऱ्या मूल्यांची तपासणी मुलाखतीमध्ये केली जाते.यासाठी तुमच्या अंगी काही महत्वाची मूल्ये असणे आवश्यक आहेत, जेणेकरून तुमच्यामार्फत समाजसेवा व देशसेवा केली जाईल. त्यापैकी काही मूल्ये व गुण खालीलप्रमाणे ,

कलेक्टर चा पगार किती असतो

कलेक्टर या पदाचा पगार सर्वाना सारखा नसतो, यामध्ये सामान्यतः बदल आढळतो.तुम्हालाही हे वेतन विविध संकेतस्थळावर वेगवेगळे असल्याचे पाहायला मिळेल पण शक्यतो हे वेतन (मूळ वेतन) अंदाजे 57,700 ते 2,40,000 प्रति महिना या दरम्यान असते.(मूळ वेतनामध्ये भत्ते समाविष्ट नाहीत,भत्यांमध्ये राज्यानुसार व जिल्ह्यावर बदल होऊ शकतो..)

कलेक्टर हे पद अभिमानाचे,सन्मानाचे व उच्च प्रतिष्ठेचे पद आहे , त्यासोबतच हे पद अत्यंत जबाबदारीचे सुद्धा आहे.जर तुम्हाला समाजामध्ये काही सकारात्मक बदल करायचा असेल तर हे पद तुमच्यासाठी उत्तम आहे.

FAQ’s :-

कलेक्टरची नोकरी किती वर्ष असते?

कलेक्टर पदावरील अधिकारी वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरी करू शकतात त्या नंतर त्यांना निवृत्ती भेटते. तसेच काही विशिष्ट परिस्थितीमध्ये निवृत्ती 5 वर्षांसाठी पुढे करावी यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्या स्थितीमध्ये निवृत्तीचे वय 65 वर्ष केले जाऊ शकते.

जिल्हाधिकारी चा पगार किती असतो?

जिल्हाधिकारी चा पगार (मूळ वेतन) अंदाजे 57,700 ते 2,40,000 प्रति महिना या दरम्यान असते.(नमूद वेतन हे मूळ वेतन आहे यामध्ये भत्ते ग्राह्य नाहीत तसेच राज्यानुसार व जिल्ह्यानुसार वेतनामध्ये बदल होऊ शकतो.)

IAS साठी कोणती परीक्षा द्यावी?

IAS होण्यासाठी UPSC द्वारे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा म्हणजेच UPSC -CSE हि परीक्षा द्यावी लागते.ज्या मधून उमेदवारांना IAS, IPS, IRS ,IFS इत्यादी पदांसाठी परीक्षा देता येते.

12वी नंतर कलेक्टर कसे व्हायचे?

12वी नंतर कलेक्टर होण्यासाठी पदवी पूर्ण करून UPSC -CSE परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल.

जिल्हाधिकारी म्हणजे काय?

जिल्हाधिकारी म्हणजे असा प्रशासकीय अधिकारी ज्यांच्यावर जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असते.

जिल्हाधिकारी होण्यासाठी कोणत्या पात्रता असणे आवश्यक आहे?

जिल्हाधिकारी या पदाची परीक्षा देण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे यासाठी गुणांची कोणतीही अट नाही.

2. जिल्हाधिकारी कोणत्या प्रकारचे काम करतात?

जिल्हाधिकारी जिल्हापातळीवरील आपत्ती व्यवस्थापन, कायदा आणि सुव्यवस्था, निवडणूक कामकाज, विकास कामे इत्यादी प्रकारची अनेक जबाबदारीची कामे करतात.

महत्वाच्या लिंक्स:-

UPSC Official Website: https://upsc.gov.in/

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment