इंजिनीयर होण्यासाठी काय करावे लागते ।आवश्यक गुण।इंजिनिअरिंग चे प्रकार।घ्यावयाची काळजी ।कॉलेज निवड यांसारख्या महत्वाच्या मुद्यांची माहिती देणारा लेख!

माहिती शेअर करा.

इंजिनीयर होण्यासाठी काय करावे लागते

इंजिनीयर होण्यासाठी काय करावे लागते:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

इंजिनीयर होण्यासाठी काय करावे लागते ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

इंजिनीयर होण्यासाठी काय करावे लागते भाग १

इंजिनीयरींग करणे हे जर तुमचे स्वप्न असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.इंजिनियरिंग हे क्षेत्र तुम्ही का निवडताय याचं आधी आत्म विश्लेषण करून घ्या.जर तुम्हाला खरंच इंजिनियरिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही बिनधास्त हे करिअर निवडू शकता पण जर घरच्यांच्या प्रेशर मुळे किंवा मित्र मैत्रिणी इंजिनीयरींग करणार आहेत म्हणून जर तुम्ही प्रवेश घेणार असाल,तर तुम्ही हा निर्णय घेणे तुमच्यासाठी कितपत योग्य आहे याचा विचार करा.कारण जर तुमची एखाद्या क्षेत्रामध्ये आवड नसेल तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी होणे फार अवघड असते.इंजिनियरिंग हि खूप मनोरंजक व आव्हानात्मक करिअर संधी आहे.यामध्ये शिकण्यासारखं व करिअर करण्यासारखं खूप काही आहे.तुम्ही यामधून विविध ठिकाणी आणि विविध पदांवर काम करू शकता.

जर तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्ही दहावी नंतर देखील डिप्लोमा करून इंजिनियर होऊ शकता.डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही ज्युनिअर इंजिनियर या पदावर काम करू शकता किंवा पुढील उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊ शकता जसे कि बी.ई. किंवा बी.टेक. देखील करू शकता.

डिप्लोमा हा तीन वर्षांचा कोर्स असतो व या तीन वर्षांमध्ये सहा सेमिस्टर असतात.हे सहा सेमिस्टर उत्तीर्ण झाल्यानंतर तम्ही ज्युनिअर इंजिनियर म्हणून काम करू शकता.

तसेच जर तुम्हाला 12 वी नंतर इंजिनियरिंग करायचे असेल तर तुम्ही बी.ई. किंवा बी.टेक. करू शकता.यासाठी तुम्ही बारावीला PSM म्हणजेच फिजिक्स-केमिस्ट्री-मॅथ हे विषय घेतलेले असावे. जर तुम्हाला बी.ई. किंवा बी.टेक. करायचे असेल तर यासाठी तुम्हाला 4 वर्ष कालावधी लागतो व या 4 वर्षांमध्ये तुम्हाला 8 सेमिस्टर असतात.

इंजिनियरिंग करण्यासाठी आवश्यक मार्क्स: जर तुम्हाला इंजिनियरिंग सरकारी इंजिनियरिंग कॉलेज मधून करायची असेल तर तुम्हाला अंदाजे 75% पेक्षा जास्त गुण असावे.जरी तुम्हाला 75% पेक्षा कमी गुण असतील तरी तुम्ही खाजगी इंजिनियरिंग कॉलेज मधून तुमचे इंजिनियरिंग पूर्ण करू शकता.दरवर्षी ह्या गुणांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते.

इंजिनिअर बनण्यासाठी काय करावे लागते भाग २

  • गणित व विज्ञानाची आवड :- इंजिनियरिंग करण्यासाठी तुमचा गणित व विज्ञानाचा पाया पक्का असावा.
  • समस्या सोडवण्याचा गुण :- इंजिनियरिंग या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुमच्या अंगी समस्या सोडवण्याचा गुण असायला हवा.
  • तर्क वापरण्याची कला :- तुमच्या इंजिनियरिंग अभ्यासक्रमामध्ये व फिल्ड वर काम करतेवेळी तुम्हाला बहुतेक निर्णय हे लॉजिकली व तर्क वापरून घ्यायचे असतात म्हणून तर्क वापरण्याची कला तुमच्यामध्ये असावी.
  • तंत्रज्ञान शिक्षणाची आवड :-अभ्यासक्रम पूर्ण करतांना व नोकरी करतांना तुम्हाला तुमच्या शाखेशी निगडित असणारे नवनवीन तंत्रज्ञान शिकावे लागतात.असे केल्याने तुमचे काम जलद गतीने व कार्यक्षम पद्धतीने पूर्ण होण्यास मदत मिळते.म्हणून तुमच्यामध्ये तंत्रज्ञान शिकण्याची आवड असायला हवी.

इंजिनीयर चे प्रकार

  • मॅकेनिकल इंजिनीयर
  • सिव्हिल इंजिनीयर
  • इलेक्ट्रिकल इंजिनीयर
  • इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीयर
  • कॉम्प्युटर इंजिनीयर
  • केमिकल इंजिनीयर
  • ऑटोमोबाईल इंजिनीयरइत्यादी
इंजिनीयर होण्यासाठी काय करावे लागते
इंजिनीयर होण्यासाठी काय करावे लागते

इंजिनिअरिंग चे प्रकार

तुम्ही विविध क्षेत्रांमध्ये इंजिनियरिंग करू शकता.त्यातील काही महत्वाची क्षेत्रे खालील प्रमाणे.

  • मॅकेनिकल इंजिनियरिंग – या प्रकारामध्ये तुम्हाला इंजीनियरिंगचं बेसिक ज्ञान , मशिन्स व यंत्र तसेच वाहने यांचे ज्ञान दिले जाते.
  • सिव्हिल इंजिनियरिंग- यामध्ये तुम्हाला बांधकाम, रोड , रस्ते, ब्रिज इत्यादींचे ज्ञान दिले जाते.
  • इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग- यामध्ये तुम्हाला विद्युत ऊर्जा व इलेक्ट्रिकल याबद्दल ज्ञान दिले जाते.
  • इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग – या प्रकारामध्ये तुम्हाला विद्युत सर्किट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व संवाद साधने इत्यादी संबंधी ज्ञान दिले जाते.
  • कॉम्प्युटर इंजीनियरिंग- या मध्ये तुम्हाला संगणकाच्या हार्डवेअर व सॉफ्टवेअर बद्दल सखोल माहिती दिली जाते.
  • केमिकल इंजीनियरिंग – या अभियांत्रिकी शाखेमध्ये तुम्हाला रसायन व रसायन प्रक्रिया यांबद्दल ज्ञान दिले जाते.
  • ऑटोमोबाईल इंजीनियरिंग- या अभियांत्रिकी शाखेमध्ये तुम्हाला वाहने, वाहनांची रचना तसेच वाहनांचा विकास याबद्दल माहिती दिली जाते.

वरील माहिती थोडक्यात दिलेली आहे, जर वरील शाखांबद्दल अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर आमचा 12 वी नंतर काय करावे। करिअर मार्गदर्शन ।12 वी नंतर करता येण्यासारखे व डिमांड मध्ये असणारे कोर्सेस व पदवी तसेच ट्रेण्डिंग करिअर ऑप्शन्स यांची मुद्देसूद माहिती.” हा लेख अवश्य वाचा.

इंजिनीअरिंग चे प्रकार निवडतांना घ्यावयाची काळजी

इंजीनियरिंग या क्षेत्राला करिअर म्हणून निवडतांना तुम्ही खालील गोष्टींची खबरदारी व काळजी अवश्य घेतली पाहिजे.

  • तुमच्या आवड व क्षमतेनुसार विषय निवडणे :- वर सांगितल्याप्रमाणे तुमची जर गणित व विज्ञान यांसारख्या विषयांमध्ये आवड असेल तरच तुम्ही इंजिनियरिंग करणे योग्य राहील.तसेच तुमच्यामध्ये तार्किक बुद्धी वापरण्याची कला देखील आवश्यक आहे.म्हणून तुमच्या आवड व क्षमतेनुसार तुम्ही क्षेत्र निवडले पाहिजे.
  • योग्य कॉलेज निवडणे :- आज काल खूप कॉलेज उपलब्ध आहेत जे तुम्हाला इंजिनियरिंग साठी प्रवेश देऊ इच्छितात.परंतु तुम्ही असेच कॉलेज निवडा जे लोकप्रिय व विश्वसनीय असेल.जर तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर शक्य असल्यास सरकारी कॉलेज मधून इंजिनीअरिंग करण्याचा प्रयत्न करा.
  • इंजिनियरिंगला येणाऱ्या खर्चाचा विचार करणे :- इंजिनियरिंग हि चार वर्षांची पदवी आहे व डिप्लोमा हा तीन वर्षांचा इंजिनियरिंग कोर्स आहे यामध्ये खूप सारे खर्च तुम्हाला करावे लागणार आहेत याचा विचार करूनच तुम्ही इंजिनियरिंगला प्रवेश घेतला पाहिजे.खर्चाचा विचार करतांना कॉलेजची फी, पुस्तकांचा खर्च , बस खर्च , अन्य अभ्यासक्रम सामग्री इत्यादी गोष्टींसाठी येणार खर्च यांचा आढावा घ्या.
  • निवडलेल्या क्षेत्राला भविष्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी :- ज्या शाखेमध्ये तुम्ही इंजिनियरिंग करणार आहात त्या शाखेला पुढील चार वर्षानंतर अंदाजे किती व्याप म्हणजेच स्कोप असेल याचा विचार करून इंजिनियरिंगसाठी शाखा निवडा.सध्या असणाऱ्या स्कोपला भुलून कोणताही निर्णय घेऊ नका.
  • कॉलेजची पडताळणी :- ज्या कॉलेज मध्ये तुम्ही प्रवेश घेऊ इच्छित असाल त्या कॉलेजला प्रवेश घेण्याआधी अवश्य भेट द्या.तसेच तेथील विद्यार्थी व प्राध्यापक यांच्याशी संवाद साधून कॉलेजची व्यवस्थित माहिती घ्या व नंतरच आपला प्रवेश निश्चित करा.यासोबतच कॉलेजच्या पायाभूत सुविधा यांना अवश्य पडताळून बघा.
  • तज्ञ् व्यक्ती व संबंधित व्यावसायिक यांच्याशी चर्चा करा :- बहुधा आपण कोणाचं तरी ऐकून एखादी शाखा निवडलेली असते.परंतु सद्य स्थितीमध्ये त्या क्षेत्रामध्ये काय स्कोप आहे आणि भविष्यामध्ये काय स्कोप असणार आहे यांसारख्या गोष्टींची आपल्याला माहिती नसते.म्हणून तुम्ही जी शाखा निवडली आहे त्यामध्ये तज्ञ् असणाऱ्या व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या.तसेच ज्या शाखेमधून तुम्ही इंजिनियरिंग करणार आहात त्या शाखेच्या निगडित व्यवसाय करणारे व्यायसायिक जर तुमच्या संपर्कामध्ये असतील तर त्यांचाही सल्ला तुम्ही अवश्य घेतला पाहिजे.

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-

इंजीनियरिंग चे किती प्रकार आहेत?

अभियांत्रिकी म्हणजेच इंजीनियरिंग क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजीनियरिंग,मेकॅनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, कॉम्पुटर इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग इत्यादी प्रकार आहेत.

सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे किती प्रकार आहेत?

सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये दोन प्रमुख व प्राथमिक प्रकार आहेत ते म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर डेव्हलपर.

बी टेक म्हणजे काय?

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी या पदवीलाच B.Tech असे म्हणतात.

इंजिनीअरिंगसाठी किती वर्षे?

इंजिनीअरिंग चा कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 8 सेमिस्टर पूर्ण करावे लागतात.हे आठ सेमिस्टर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 4 वर्षांचा कालावधी लागतो.

बी ई म्हणजे काय?

बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग या पदवीलाच BE असे म्हणतात.

इंजिनियरिंग म्हणजे काय?

इंजिनियरिंग म्हणजे असे क्षेत्र ज्यामध्ये विज्ञान, गणित, रसायन, भौतिक नियम इ. चा अभ्यास केला जातो तसेच त्यांना वैज्ञानिक सिद्धांतांची जोड देऊन, मानवी समस्या सोडवण्यासाठी आणि मानवी जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उत्पादने आणि प्रक्रिया तयार करण्यामध्ये त्यांचा वापर केला जातो.

इंजिनियरिंगचे वेगवेगळे प्रकार कोणते?

इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये अनेक शाखा आहेत ज्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मॅकेनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, कॉम्पुटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इत्यादी. शाखांचा समावेश होतो.

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

1 thought on “इंजिनीयर होण्यासाठी काय करावे लागते ।आवश्यक गुण।इंजिनिअरिंग चे प्रकार।घ्यावयाची काळजी ।कॉलेज निवड यांसारख्या महत्वाच्या मुद्यांची माहिती देणारा लेख!”

Leave a Comment