भाषण कसे करावे मराठी |भाषण कौशल्य शिका मराठीमध्ये आणि व्हा एक यशस्वी वक्ता .

माहिती शेअर करा.

भाषण कसे करावे मराठी

भाषण कसे करावे मराठी:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

भाषण कसे करावे मराठी ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

भाषण कसे करावे मराठी :-

भाषण कसे करावे या लेखामध्ये आपण भाषण करण्यासाठी कोणत्या मुद्द्यांचा अवलंब करावा, भाषणाचा विषय कसा निवडावा, भाषणामध्ये होणाऱ्या चुका कशा टाळाव्या, भाषण अधिक प्रभावीपणे कसे करावे अशा सर्व मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत.ह्या मुद्द्यांचा अभ्यास केल्याने तुम्ही प्रभावी वक्ते बनू शकता.

ज्या मुद्द्यांची आपण माहिती घेणार आहोत ते खालीलप्रमाणे.

  • भाषण विषय निश्चिती :- भाषणामध्ये सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे भाषणाचा विषय निवडणे.जर तुम्ही भाषणाचा विषय निवडण्यामध्ये चुकलात तर तुमचं भाषण प्रभावी बनू शकत नाही.भाषणाचा विषय चुकीने निवडलेला असल्यास तुमच्या श्रोत्यांना तुम्ही प्रभावीपणे आकर्षित करू शकणार नाही.म्हणून भाषणाचा विषय निवडतांना कधीही फार घाई करून विषय निवडू नका.भाषणाचा विषय अचूक निवडा, ज्याबद्दल तुम्ही व्यवस्थित बोलू शकाल.
  • विषयाचे संशोधन :- जेव्हा तुम्ही भाषणाचा अचूक विषय निवडाल त्याच्या पुढची पायरी म्हणजे निवडलेल्या विषयाचे योग्य व अचूक संशोधन करणे.विषयाचे संशोधन करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमधून माहिती गोळा करू शकता.विषयाचे संशोधन करण्यासाठी तुम्ही गुगल वर माहिती वाचू शकता, निवडलेल्या विषयाशी संलग्न पुस्तके वाचू शकता, विषयाशी संलग्न असणारे युट्युब व्हिडिओ पाहू शकता किंवा संबंधित विषयामध्ये तज्ञ् असणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेऊ शकता.
  • मुख्य मुद्दे निश्चत करणे :- विषयाची योग्य निवड व संशोधन केल्यानंतर तुम्ही तुमच्या भाषणाचे मुख्य मुद्दे निश्चित करू शकता.यामध्ये मिळालेला माहितीच्या आधारे तुम्ही मुख्य मुद्दे निश्चित करू शकता व गरज भासल्यास निश्चित केलेल्या मुद्यांचे परत संशोधन करून तुमचे भाषण आणखीन प्रभावी व परिपक्व बनवू शकता.
  • भाषण लिहिणे :- मुख्य मुद्दे निश्चित झाल्यानंतर तुम्ही भाषण लिहिण्यास सुरुवात करू शकता.भाषण लिहितांना भाषणाची सुरुवात, भाषणाचा मध्य व भाषणाचा शेवट तुम्ही कसा करणार आहात हे स्पष्ट करा.तुमच्या भाषणाला सांगितल्याप्रमाणे तीन भागांमध्ये विभाजित केल्यानंतर तुम्ही त्यातील प्रत्येक भाग वेगळा लिहा व त्याचे मुद्दे स्पष्ट करा. असे केल्याने तुम्हाला भाषणाचा सराव करणे सोपे जाईल.
  • भाषणाचा सराव करणे :- तुम्ही लिहिलेले भाषण पूर्णतः तयार झाल्यानंतर तुम्हाला भाषणाचा सराव करावा लागेल.जेवढा जास्त तुम्ही भाषणाचा सराव कराल, तेवढ्या प्रभावीपणे तुम्ही भाषण देऊ शकाल.भाषणाचा परिपूर्ण सराव केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल व भाषण देतेवेळी तुम्हाला सारखे मुद्दे पाहण्याची गरज भासणार नाही.हे तुमच्या वक्तृत्व गुणांमध्ये तुम्हाला मदत करेल.

bhashan kase karave marathi

  • आत्मविश्वास बाळगणे :- भाषणाची पडद्यामागची तयारी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला भाषण करतेवेळी आत्मविश्वास बाळगणे फार गरजेचे आहे.भाषण करतांना तुम्हाला भीती वाटू शकते याला आपण परफॉर्मन्स प्रेशर असं म्हणतो.परफॉर्मन्स प्रेशर हे बहुतांशी लोकांना येते.जसे कि भारत-पाकिस्तान मॅच खेळतांना खेळाडूंना अधिक प्रेशर असल्याचे जाणवते हे परफॉर्मन्स प्रेशरचे एक अत्यंत चांगले उदाहरण आहे.म्हणून भीती वाटणे हे सामान्य समजून तुम्ही भाषणादरम्यान आत्मविश्वास बाळगणे फार गरजेचे आहे.
  • स्पष्ट व मोठ्याने बोलणे :- भाषण नेहमी मोठ्या आवाजात व स्पष्ट्पणे केले पाहिजे, असे केल्याने प्रेक्षक तुमच्या भाषणाशी संलग्न राहतात व तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. म्हणून भाषण नेहमी स्पष्ट व मोठ्या आवाजात करण्याचा प्रयत्न करा.भाषण मोठ्याने करणे याचा अर्थ असा नाही कि तुम्ही भाषण फार ओरडत केले पाहिजे.तुमच्या आवाजानुसार तुमच्या भाषणाची तीव्रता तुम्ही निवडली पाहिजे.
  • हाव-भाव वापरणे :- भाषण करतांना स्तब्ध राहून भाषण करू नका.भाषणामध्ये अधून मधून हाव-भाव वापरण्याचा प्रयत्न करा.हाव-भाव वापरतांना भाषणाला अनुसरून हाव-भाव वापरण्याचा प्रयत्न करा.
  • हाव-भावांवर नियंत्रण ठेवणे :- हाव-भाव वापरणे हि एक कला आहे हे समजून, भाषणादरम्यान हाव-भाव वापरतांना त्यांवर नियंत्रण ठेवा.नको असेल तिथे हावभाव वापरण्याचा प्रयत्न करू नका.
भाषण कसे करावे मराठी
भाषण कसे करावे मराठी

भाषण कौशल्य मराठी

  • भाषणामध्ये कथा सांगणे :- भाषण करत असतांना प्रेक्षकांना फक्त मुद्दे वाचून दाखवणे यास भाषण म्हणत नाहीत.त्यामुळे भाषणामध्ये कथांचा समावेश करा असे केल्याने तुमचे भाषण प्रभावी बनते.
  • प्रेक्षकांचा उत्साह वाढवणे :- भाषण करतांना प्रेक्षकांचं लक्ष जास्तीत जास्त तुमच्या भाषणाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करा.असे केल्याने प्रेक्षकांचा तुमच्या भाषणामध्ये उत्साह कायम राहतो व तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
  • भाषणाचा सारांश देणे :- भाषण करत असतांना तुम्ही भाषणाचा सारांश दिला पाहिजे.यामुळे तुमचे भाषण प्रभावी बनण्यास मदत होते व तुमचे भाषण दीर्घकाळापर्यंत प्रेक्षकांच्या स्मरणात राहते.
  • प्रेक्षकांचे आभार मानणे :- भाषण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही प्रेक्षकांचे आभार मानले पाहिजेत.प्रेक्षकांनी तुमच्या भाषणासाठी जो वेळ दिला व जे व्यासपीठ तुम्हाला भाषणासाठी मिळालं याबद्दल तुम्ही आभार मानले पाहिजे.असे केल्याने तुम्ही विनम्र आहात हे प्रेक्षकांना समजते व प्रेक्षकांकडून तुम्हाला आदर मिळतो.

भाषण कौशल्य म्हणजे काय

भाषण कौशल्य म्हणजे प्रभावी भाषण करण्यासाठी लागणारे नेतृत्व गुण. तुम्हाला भाषण प्रभावी बनवण्यासाठी व तुमचे भाषण श्रोत्यांना आवडण्यासाठी तुम्हाला जी कौशल्ये आत्मसात करावी लागतात त्यांना एकत्रितरित्या भाषण कौशल्य असे म्हणतात.

भाषण प्रभावीपणे करण्यासाठी तुम्हाला पुरेशी माहिती माहित असणे आवश्यक आहे.तुम्हाला आवश्यक माहिती मिळवण्यासाठी काही स्त्रोतांची आवश्यकता असते ज्यामुळे तुमचे ज्ञान वाढण्यास मदत होते व तुमचे भाषण प्रभावी व परिपूर्ण बनते.त्यातील काही स्त्रोतांची माहिती आपण घेऊ.

  • पुस्तके वाचणे :- पुस्तक वाचल्याने तुमच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होते.पुस्तके वाचल्यामुळे तुम्हाला नवनवीन शब्दांची माहिती होते, तुमचा शब्दसाठा वाढण्यास मदत मिळते व तुमचे विचार प्रभावीपणे मांडण्यास तुम्हाला अडचण येत नाही.म्हणून तुम्ही भरपूर वाचन करणे गरजेचे आहे.
  • कथा वाचणे :- कथा वाचल्याने तुम्हाला तुमचे भाषण अधिक मनोरंजक पद्धतीने बनवता येते.कथा वाचल्याने तुम्हाला विविध कथांची माहिती मिळते व तुम्हाला तुमच्या भाषणामध्ये त्या कथा मांडण्यास अडचण येत नाही.भाषणामध्ये कथांचा थोडा समावेश असल्यास तुमचे भाषण आणखीन मनोरंजक व आकर्षक बनते.
  • विनोद वाचणे :- तुमच्या भाषणामध्ये विनोदांचा समावेश असल्यास तुम्ही तुमचे भाषण आणखीन आकर्षक पद्दतीने करू शकता.तुमच्या भाषनामध्ये विनोदांचा समावेश असल्यास श्रोते तुमच्या भाषणाचा भरपूर आनंद घेतात.जेव्हा तुम्ही श्रोत्यांना हसवता तेव्हा भाषणाच्या वातावरणामध्ये असलेला तणाव कमी होण्यास मदत मिळते.वातावरणातील तणाव कमी झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.
  • चित्रपट पाहणे :- चित्रपट पाहिल्याने देखील तुमच्या वक्तृत्वामध्ये विकास होतो.चित्रपटामुळे तुम्हाला शब्दानुरूप स्वतःचे हाव-भाव कसे बदलावे हे समजते.तसेच चेहऱ्यावरील हाव भाव देखील शिकण्यास मदत मिळते.त्यामुळे तुम्ही चित्रपट पाहणे फायदेशीर ठरते.
भाषण कसे करायचे
  • व्यक्तिमत्व विकास करणे :- भाषणाच्या वरील कौशल्यासोबतच तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्व विकासावर देखील भर दिला पाहिजे.व्यक्तिमत्व विकास तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामध्येही फायदेशीर ठरतो.
  • संवेदनशील विषय टाळणे :- व्यासपीठावर भाषण करत असतांना विविध प्रकारच्या लोकांसमोर तुम्हाला भाषण द्यावे लागते.वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते असू शकतात.म्हणून भाषणामध्ये शक्यतो संवेदनशील विषय टाळणे गरजेचे आहे.भाषणामध्ये काय बोलावं व काय टाळावं हे देखील वेळेवर समजणं खूप महत्वाचं आहे.
  • चालू घडामोडींवर लक्ष ठेवणे :- तुम्ही ज्या विषयावर व मुद्य्यावर भाषण देणार आहात त्या विषयाबद्दलचे वर्तमानकालीन ज्ञान तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.जर तुमच्या भाषणातील माहिती वेळेनुसार नसेल तर तुमचे भाषण कंटाळवाणे वाटू शकते.भाषणामध्ये अशा गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करा ज्या नवीन असतील.
  • द्विअर्थी शब्द टाळणे :- आजकाल लोक एखाद्या शब्दाच्या अर्थाऐवजी त्याचा बेअर्थ काढण्यात उत्सुक असतात.म्हणून द्विअर्थी शब्दांचा वापर भाषणामध्ये अजिबात वापरू नका.असे केल्याने नकळत तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो.

FAQ’s :-

भाषणाची सुरुवात कशी करावी?

तुम्ही तुमचा परिचय देऊन भाषणाची सुरुवात करावी.

भाषण भावनिक कसे करावे?

भाषणामध्ये विषयानुरूप कथा किंवा विनोद सांगितल्याने तुम्ही तुमचे भाषण भावनिक करू शकता.

भाषण कसे लिहिले जाते?

भाषण लिहितांना सर्वप्रथम तुम्ही भाषणासाठी विषय निवडला पाहिजे ,त्यांनतर महत्वाचे मुद्दे लिहून त्यानुसार भाषणाची सुरुवात,भाषणाचा मध्य व भाषणाची समाप्ती अशी रचना केली पाहिजे.

शाळेसाठी भाषण कसे संपवायचे?

शाळेसाठी जर तुम्ही भाषण करत असाल तर भाषणाच्या शेवटी प्रेक्षकांचे व पाहुण्यांचे आभार मानून तुम्ही भाषण संपवले पाहिजे.

भाषण लांब कसे करावे?

भाषणामध्ये विनोद किंवा कथा वापरल्याने भाषण लांबवता येते.

महत्वाच्या लिंक्स:-

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment