यशस्वी होण्यासाठी काय करावे
Table of Contents
यशस्वी होण्यासाठी काय करावे:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
यशस्वी होण्यासाठी काय करावे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
यशस्वी होण्यासाठी काय करावे
यशस्वी होण्यासाठी काय करावे :- यशस्वी होणाऱ्या लोकांमध्ये व अपयशी होणाऱ्या लोकांच्या मानसिकतेमध्ये व विचारसरणीमध्ये काही फरक असतात, तेच फरक या दोन प्रकारच्या लोकांना यश व अपयश या दोन विभागांमध्ये विभागतात.यश तुम्हाला स्थेर्य , ताकद व स्फूर्ती देतं, तर याउलट अपयश तुम्हाला अस्थिरता व नैराश्य देतं.
“यशस्वी होण्यासाठी काय करावे” या पोस्टमधे आपण यशस्वी लोकांचा माईन्डसेट, त्यांची विचारसरणी , निर्णय क्षमता अशा अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती घेणार आहोत.हे वैशिष्ट्य जर तुम्ही अंगिकारले तर तुम्हालाही यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.तुम्हाला फक्त खाली सांगितलेल्या गोष्टी काळजीपूर्वक व जबाबदारीने वाचायच्या आहेत व त्यांची अंमलबजावणी करायची आहे.
- ध्येय निश्चिती : यशस्वी आणि अपयशी लोक यांच्यामध्ये फरक करणारी गोष्ट म्हणजे “ध्येय”. यशस्वी लोक एकच ध्येय ठेवून स्वतःची सर्व ऊर्जा त्या एका ध्येयामागे धावण्यात लावतात.तर त्याउलट अपयशी व्यक्ती स्वतःच ध्येय काहीनाकाही कारणास्थव बदलत राहतात.कधी ते जबाबदारीच कारण देतात,कधी आर्थिक परिस्थितीच कारण देतात तर कधी कोणा व्यक्तीवर आपल्या अपयशाचं खापर फोडतात.त्यांना वाटतं कि आपण कारण दिलं म्हणजे आपण सुटलो.आपल्याला लोकांची सहानुभूती भेटेल.लोक,समाज किंवा आपले कुटुंब आपल्या संघर्ष्याला दाद देतील किंवा आपल्याबद्दल चांगले मत ठेवतील.
- पण हे दुदैव आहे कि तुमचे लोक किंवा समाज कधीच तुमच्या संघर्ष्यावरून तुम्हाला सहानुभूती देत नाही. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते तुम्हाला असं भासवततील कि ते तुमच्यासोबत आहेत. पण कालांतराने जेव्हा तुमच्या वाट्याला एका-मागोमाग एक अपयश येत जात तेव्हा ते तुमची साथ सोडतात.ते फक्त तुमची साथच सोडत नाहीत तर तुम्हाला नकारात्मक दृष्टिकोनाने बघायला लागतात.तुम्हालाही ते जाणवायला लागत.असं म्हणतात कि “ध्येय नसलेला व्यक्ती मानसिकरीत्या अपंग असल्यासारखा असतो”
- एवढं सगळं सांगायचं उद्दिष्ट्य एकच कि यशस्वी होण्याची पहिली व अत्यंत मूलभूत पायरी म्हणजे ध्येय.म्हणून यशस्वी बनायचा विचार करण्याआधी स्वतःच ध्येय फिक्स करा.
- स्मार्ट नियम नियोजन (SMART) : ध्येय निश्चित करण्याचं एक प्रभावी सूत्र म्हणजे SMART. याचा अर्थ खालील प्रमाणे आहे.
- S-Specific :- म्हणजे तुमचं ध्येय तुम्हाला विशिष्ट व स्पष्ट पाहिजे.जे तुम्हाला योग्य दिशा देतं .
- M- Measurable :- तुमचं ध्येय तुम्हाला मोजता येण्याजोगं असलं पाहिजे.ज्यामुळे तुमची तुमच्या ध्येयाप्रती असणारी प्रगती तुम्ही मोजू शकाल व तुमच्या ध्येयाचा वेग तुमच्या नियंत्रणात आणू शकाल.
- A-Achievable :- तुमचं ध्येय तुम्ही साध्य करण्याजोगं असलं पाहिजे.तुमच्या मनामध्ये विचार येईल कि मी तुम्हाला तुमचं ध्येय मर्यादित करण्यासाठी सांगत आहे.पण तसं नाहीए , तुम्ही उच्च ध्येय नक्कीच ठेवलं पाहिजे. पण ते साध्य होण्याजोगं असलं पाहिजे याचा स्पष्ट अर्थ हा कि, जर कोणी व्यक्ती शारीरिकदृष्या जन्मतः कमजोर असेल व त्याला सैन्यामध्ये भरती व्हायचं असेल तर तो होऊ शकतो का ?तर नाही.मुख्यतः जर तो मेडिकल मध्ये पास होण्यासारखा नसल्यास.जर अशा व्यक्तीने असं ध्येय निश्चित केलं तर त्याच्या पदरी निराशाच पडणार आहे व त्याचे कठोर परिश्रम व्यर्थ जाणार आहेत.म्हणून साध्य होण्यासारखं ध्येय निश्चित करा व यशस्वी व्हा.
- R-Relevant :- तुमचे ध्येय नेहमी रिलीव्हंट म्हणजेच वास्तववादी असले पाहिजे.तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ व लागणारी संसाधने असली पाहिजेत.जर तुमच्याकडे निश्चित ध्येय , पुरेसा वेळ व आवश्यक संसाधने असतील तर तुम्ही लवकर तुमची ध्येयप्राप्ती व स्वप्नपूर्ती करू शकता.
- T-Time-bound :- याचा अर्थ हा कि, तुम्ही तुमच्या ध्येयाला एक ठराविक कालावधी दिला पाहिजे.त्या कालावधीनुसार नियोजन व रणनीती आखली पाहिजे.जेणेकरून तुमच्या ध्येयपूर्ती व स्वप्नपूर्तीचा पुरेपूर आनंद तुम्ही घेऊ शकाल.
- ध्येयाचा वेग व गती यांचं संतुलन –विना ध्येयाच आयुष्य हे विना चाकाची गाडी असते, जी कधीही पुढे जाऊ शकत नाही.म्हणुन सर्वप्रथम तुमचं ध्येय ठरवा व ते निश्चित करा.भले ध्येयाचा वेग कमी असला तरी चालेल,परंतु त्याची दिशा चुकु देऊ नका, कारण वेग कमी असला तरी तुम्ही कधीतरी ध्येयापर्यंत पोहचाल पण फक्त वेग असेल आणि योग्य दिशा नसेल तर तुमचं आयुष्य नेहमी धुरकट असल्याचं तुम्हला दिसेल.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावे
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावे :- यशस्वी होण्यासाठी कोणते महत्वाचे मूलमंत्र आहेत हे आपण वरील भागामध्ये पहिले आता “आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावे” याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ.
- कठोर परिश्रम :- तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत ते आधीच स्वतःला समजावून सांगा.जसं एखादा योद्धा लढाईला जातांना मनामध्ये कुठे तरी मान्य करतो कि खूप कष्ट सोसावे लागणार आहेत किंवा जीवही गमवावा लागणार आहे.पण ध्येयासाठी व विजयासाठी तो धोका पत्करतो व निधड्या छातीने रणांगणात उतरतो.तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचा माईन्डसेट ठेवून ध्येयाप्रती एकनिष्ठ राहायचं आहे व कठोर परिश्रम करायची तयारी ठेवायची आहे.
- ध्येयाप्रती समर्पण :- यश-अपयशाची चिंता न करता व भीती न बाळगता तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रती समर्पित व्हायचं आहे.जसा एकनिष्ठ व अभिमानी योद्धा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत व रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रणांगणात लढत राहतो त्याचप्रमाणे तुम्ही ठरवून दिलेल्या विशिष्ट कालावधीपर्यंत तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रती समर्पित राहायचं आहे व पूर्ण कार्यक्षमतेने ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
- योग्य दृष्टीकोन :- ध्येय निश्चिती, कठोर परिश्रम व ध्येयाप्रती समर्पण यासोबतच तुम्हाला तुमच्या मानसिकतेमध्ये योग्य व सकारात्मक दृष्टिकोन निरंतर ठेवायचा आहे. जर तुमचा आत्मविश्वास व दृष्टिकोन चुकीचा किंवा नकारात्मक असेल तर तुम्ही अपयशाला आमंत्रित करत आहात असे समजा.म्हणून कोणाची काहीही प्रतिक्रिया किंवा मत असो तुम्ही तुमच्या ध्येयाप्रति नेहमी योग्य व सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे
- स्वतःला ओळखणे :- म्हणजे ,कोणी काहीही म्हणो तुम्ही स्वतःच्या क्षमतांवरती शंका उपस्थित करू नका.स्वतःवर सेल्फ डाउट करू नका.स्वतः ला ओळखा व स्वतःवर विश्वास ठेवा कि तुम्ही नक्की यशस्वी होणार आहात.हि सकारात्मकता तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.
- हार न मानणे :- तुमच्या ध्येय प्रवासामध्ये तुम्हाला अधून मधून भरकटल्यासारखे , चुकल्यासारखे किंवा खचल्यासारखे वाटू शकते अशा वेळी थोडी विश्रांती करा पण कधीही हार मानू नका.हार न मानता तुमच्या ध्येयाच्या मार्गावर चालत राहा.हा ध्येयप्राप्तीचा एक भाग आहे असे समजा.
- जोखीम घेण्याची वृत्ती :- ध्येय साध्य करतांना खूप साऱ्या समस्या व अडचणी तुमच्या यशाच्या मार्गावर असणार आहेत.ह्यांना पार करून जाण्यासाठी तुम्ही रिस्क घेण्याची व त्यातून बाहेर पडण्याची कला शिका.यालाच जोखीम घेण्याची वृत्ती असे म्हणतात.
- नकारात्मक लोकांपासून दूर राहणे :- तुम्ही जेव्हा तुमच्या ध्येयावर काम करायला लागता तेव्हा तुमच्यामध्ये नकारात्मकता येण्याची शक्यता असते पण तुम्ही त्यावर मात करू शकता.पण जर नकारात्मक लोक तुमच्या वातावरणामध्ये व संपर्कामध्ये असतील तर वेळीच सावध होऊन त्यांच्यापासून लांब राहा.असे लोक तुमच्या आजूबाजूला असणं अपयशाला व नकारात्मकतेला आमंत्रित करू करू शकत व तुमचा ध्येय प्रवास आणखीन खडतर करू शकतं .
जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग
- आत्मविश्वास :- ध्येयप्राप्ती करण्यासाठी तुम्ही आत्मविश्वास ठेवा कि यश मिळणार आहे.आत्मविश्वास असल्यास तुम्हाला विचारांची सकारात्मकता मिळते व ध्येयप्राप्तीमध्ये मदत मिळते.
- उत्साह :- तुमच्या ध्येयाप्रती नेहमी उत्साही असा.ध्येयाचा प्रवास एन्जॉय करा.
- विचारांची लवचिकता :- ध्येयप्राप्तीसाठी खूप साऱ्या गोष्टी व सवयी तुम्हाला सोडाव्या व त्यागाव्या लागतील.तशाच खूप काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील.यासाठी तुमच्या अंगी विचारांची लवचिकता असावी लागते.
- नवीन काही शिकत राहण्याची इच्छा :- जशी ध्येयप्राप्तीसाठी व यशस्वी होण्यासाठी विचारांची लवचिकता आवश्यक आहे तशीच नवीन काही शिकत राहण्याची वृत्तीहि तुम्हाला आत्मसात करावी लागेल.याने तुमच्या ध्येयप्रवासातील समस्या कमी होत जातील व तुम्ही परिपक्व बनत जाल.
FAQ’s :-
जीवनात यश मिळवण्याची गुरुकिल्ली काय आहे?
जीवनात ध्येयनिश्चिती,कठोर परिश्रम करण्याची वृत्ती व विचारांची लवचिकता हि यश मिळवण्याची गुरुकिल्ली आहे.
जीवनात यशस्वी होणे म्हणजे काय?
जीवनात ध्येय निश्चित करणे,ते साध्य करणे व यशस्वी झाल्यानंतर समाधानी असणे म्हणजे जीवनात यशस्वी होणे.
यशस्वी जीवनाचे मोजमाप काय आहे?
तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुखी, आनंदी, समाधानी असणं हे यशस्वी जीवनाचं मोजमाप आहे असं म्हणता येईल.
तुमच्या कामात यश कसे दिसते?
जर तुमचं कामामध्ये मन असेल, आवड असेल ,तुम्ही कामामध्ये काहीतरी नवीन काही शिकत असाल व निर्धारित वेळेमध्ये पूर्ण कार्यक्षमतेने तुमचे काम पूर्ण करत असाल तर तुमच्या कामामध्ये यश दिसते.
महत्वाच्या लिंक्स:-
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"