jee exam information in marathi : नाही राहणार JEE Advanced परीक्षेबद्दल कोणतीही शंका !

माहिती शेअर करा.

jee exam information in marathi

Table of Contents

jee exam information in marathi:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. या पोस्टमध्ये आपण JEE च्या प्रवेश परीक्षेच्या तयारीबद्दल आणि अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत. तसेच या पोस्टच्या शेवटी तुम्हाला JEE च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सामान्यतः पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात आलेली आहे ती नक्की वाचा.

तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

jee exam information in marathi

सदर पोस्टमध्ये आपण JEE Advanced या IIT च्या प्रवेश परीक्षेबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. IIT च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या दोन परीक्षांचा समावेश होतो , त्यामध्ये JEE Mains आणि JEE Advanced या दोन परीक्षा असतात.त्यापैकी JEE Mains या प्रवेश परीक्षेबद्दल आपण मागील पोस्टमध्ये जाणून घेतलं.जर तुम्ही तो लेख वाचला नसेल तर, खालील लिंक वर क्लीक करून वाचू शकता.

आता आपण JEE Advanced या परीक्षेबद्दल माहिती घेऊ.

JEE Advanced म्हणजे Joint Entrance Examination Advanced ज्याला आपण JEE Advanced असे म्हणतो.हि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.ज्यामध्ये एकूण दोन पेपर असतात.पेपर-१ आणि पेपर-२, हे पेपर कोणत्या स्वरूपाचे असतात याची माहिती आपण घेणार तर आहोतच पण त्याआधी या पेपरबद्दल थोडं जाणून घेऊ.

jee information in marathi

महत्वाचे : JEE Advanced या परीक्षेच्या गुणपद्धतीमध्ये दरवर्षी बदल होत असतो.गुणपद्धती नेमकी कशी आहे हे तुम्हाला पेपरमधील “Instructions to candidate” या कॉलममध्ये दिलेले असते.

JEE Advanced हि परीक्षा दोन पेपरमध्ये विभागलेली असते.प्रत्येक पेपरमध्ये तीन विषय असतात.

प्रत्येक पेपरमध्ये वरील प्रमाणे ३ विभाग असतात आणि त्या ३ विभागांमध्ये प्रत्येकी ४ उपविभाग असतात.

आता आपण पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक २ बद्दलची सविस्तर माहिती समजून घेऊ.

jee advanced information in marathi

पेपर – १

  • एकूण गुण : १८०
  • वेळ : ३ तास । १८० मिनिटे.
  • एकूण विषय : ०३
    • भौतिकशास्त्र
    • रसायनशास्त्र
    • गणित
  • एकूण प्रश्न : ५१
    • भौतिकशास्त्र – १७
    • रसायनशास्त्र – १७
    • गणित -१७
  • प्रत्येक विषयासाठी कमाल गुण
    • भौतिकशास्त्र – ६० गुण
    • रसायनशास्त्र – ६० गुण
    • गणित – ६० गुण

jee परीक्षा माहिती

पेपर – २

  • एकूण गुण : १८०
  • वेळ : ३ तास । १८० मिनिटे.
  • एकूण विषय : ०३
    • भौतिकशास्त्र
    • रसायनशास्त्र
    • गणित
  • एकूण प्रश्न : ५१
    • भौतिकशास्त्र – १७
    • रसायनशास्त्र – १७
    • गणित -१७
  • प्रत्येक विषयासाठी कमाल गुण
    • भौतिकशास्त्र – ६० गुण
    • रसायनशास्त्र – ६० गुण
    • गणित – ६० गुण

आता आपण Section नुसार पेपर क्रमांक-१ आणि पेपर क्रमांक-२ यांची सविस्तर माहिती तक्त्याच्या माध्यमातून समजून घेऊ.

information about jee exam in marathi

jee exam information in marathi
jee exam information in marathi

पेपर क्रमांक-1

विषय Sectionsपेपर क्रमांक-1
भौतिकशास्त्रSection – 112 गुण
Section – 212 गुण
Section – 324 गुण
Section – 412 गुण
रसायनशास्त्रSection – 112 गुण
Section – 212 गुण
Section – 324 गुण
Section – 412 गुण
गणितSection – 112 गुण
Section – 212 गुण
Section – 324 गुण
Section – 412 गुण
एकूण गुण 180

पेपर क्रमांक-2

विषय Sections पेपर क्रमांक-2
भौतिकशास्त्रSection – 112 गुण
Section – 212 गुण
Section – 324 गुण
Section – 412 गुण
रसायनशास्त्रSection – 112 गुण
Section – 212 गुण
Section – 324 गुण
Section – 412 गुण
गणितSection – 112 गुण
Section – 212 गुण
Section – 324 गुण
Section – 412 गुण
एकूण गुण180

JEE Advanced Syllabus Pdf

JEE Advanced परीक्षेचा अभ्यासक्रम खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता.

I wish you all the best for your exam!

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-

विद्यार्थी JEE Mains किती वेळा देऊ शकतो?

JEE Mains हि परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाते.यामधील पहिले सत्र जानेवारीमध्ये असते आणि दुसरे सत्र एप्रिलमध्ये असते.एक उमेदवार JEE Mains या परीक्षेसाठी 3 वर्षांमध्ये एकूण 6 वेळा बसू शकतो.

JEE परीक्षेत किती पेपर असतात?

JEE परीक्षेत एकूण 2 दोन पेपर असतात. पेपर क्रमांक 1- JEE Mains आणि पेपर क्रमांक 2- JEE Advanced.

जेईई परीक्षा कधी द्यावी?

जेईई परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते म्हणजेच दोन सत्रांमध्ये घेतली जाते.त्यापैकी पहिले सत्र जानेवारीमध्ये असते आणि दुसरे सत्र एप्रिलमध्ये असते.त्यानुसार तुम्ही जेईई परीक्षा वर्षातून 2 वेळा देऊ शकता.

JEE मध्ये किती विषय आहेत?

JEE मध्ये एकूण 3 विषय असतात.१.भौतिकशास्त्र,२.रसायनशास्त्र,आणि ३.गणित.

JEE सत्र 1 आणि 2 मध्ये काय फरक आहे?

JEE Mains मधील सत्र क्रमांक 1 हे B.E./B.tech मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी घेतले जाते तर JEE Mains मधील सत्र क्रमांक 2 हे B.Arch./B.Plan मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी घेतले जाते

जेईई परीक्षा कोण घेते?

जेईई ची परीक्षा NTA म्हणजेच National Testing Agency मार्फत घेतली जाते.

JEE Advanced देणे सक्तीचे आहे का?

हो,जर तुम्ही JEE Mains परीक्षा उत्तीर्ण असाल आणि JEE Advanced परीक्षेसाठी पात्र असाल तर IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला JEE Advanced हि परीक्षा देणे सक्तीचे आहे. जर तुम्ही JEE Advanced हि परीक्षा दिली नाही तर, तुम्ही IIT मध्ये प्रवेश घेऊ शकत नाही.

जेईई कोचिंग कधी सुरू करावे?

तज्ज्ञांच्या मते, जेईई ची कोचिंग इयत्ता 11 वी पासून सुरु करायला हवी.कारण, जेईई ची प्रवेश परीक्षा कठीण असते. जर तुम्ही या परीक्षेची तयारी आधीपासून करत असाल तर तुम्हाला JEE चा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो.

JEE परीक्षा काय आहे?

ज्या विद्यार्थी किंवा उमेदवारांना भारतामधील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी JEE हि राष्ट्रीय स्तरीय प्रवेश परीक्षा घेतली जाते .

JEE परीक्षेचे चे प्रकार कोणते?

JEE हि प्रवेश परीक्षा दोन मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे त्यापैकी JEE Mains हा पहिला भाग आहे तर JEE Advanced हा दुसरा भाग आहे .

JEE परीक्षेसाठी कोणते कोचिंग क्लासेस जॉईन करावेत?

JEE च्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कोचिंग घ्यावी कि नाही आणि कोचिंग घ्यायची असल्यास कोणती कोचिंग घ्यावी हा निर्णय पूर्णतः तुमच्या वैयक्तिक गरजेवर आणि तुमच्या बजेटवर अवलंबून आहे .

JEE परीक्षेची तयारी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

JEE परीक्षेची तयारी करतांना अभ्यासक्रमानुसार नियोजितपणे अभ्यास करा , अभ्यासामध्ये सातत्य ठेवा , पुरेशी विश्रांती आणि झोप घ्या, तणावापासून दूर राहा, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या इ.

JEE च्या परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे का?

हो , JEE Mains आणि JEE Advanced या दोन्ही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे .

JEE मेन्स आणि एडवांस परीक्षांमध्ये कट ऑफ मार्क्स किती असतात?

JEE मेन्स आणि एडवांस परीक्षांचे कट ऑफ मार्क्स दरवर्षी बदलत असतात त्यामुळे अचूक कट ऑफ मार्क्स सांगणे शक्य नाही .

JEE परीक्षेत अपयश आल्यास काय करावे?

JEE परीक्षेमध्ये अर्ज केलेले सर्वच्या सर्व उमेदवार कधीच उत्तीर्ण होत नसतात, त्यामुळे जर तुम्ही अनुत्तीर्ण झालात तर स्वतःला एकटे समजून खचून न जाता इतर प्रवेश परीक्षांच्या तयारीला लागा किंवा पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची तयारी चालू करा .

JEE परीक्षेत यश मिळाल्यास काय करावे?

JEE परीक्षेमध्ये तुम्ही यश प्राप्त करून उत्तीर्ण झाल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या शाखेमध्ये आणि आवडत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ शकता .

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment