अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम । सामान्य ज्ञान विषयातील हे आहेत महत्वाचे घटक जे ठरवतात तुमचं मेरिट…!

माहिती शेअर करा.

अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम

अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. या पोस्टमध्ये आपण अंगणवाडी सुपरवायझर/अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाच्या अभ्यासक्रमासोबतच खालील महत्वपूर्ण गोष्टींची माहितीदेखील घेणार आहोत. यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश असेल.

अशा प्रकारच्या अनेक गोष्टींची माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये मिळणार आहे जी वाचून तुम्हाला सदर पदाची तयार करण्यासाठी मदत मिळणार आहे.म्हणून हि पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करून तुमच्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती करा.

तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

नवीनतम प्रकाशित भरती :-

अंगणवाडी स्पेशल पोस्ट्स :-

अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम

अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम :- अंगणवाडी सुपरवायझर ज्याला अंगणवाडी पर्यवेक्षिका असेही म्हणतात या पदाची भरती जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात येते. हि भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवायची असल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सुपरवायझरच्या रिक्त पदांची भरती राज्य स्तरावर सयुंक्तपणे घेतली जाते. अशी सयुंक्तपणे भरती सन २०१९ मध्ये घेण्यात आलेली आहे यावेळी एकाच कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सुपरवायझर पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

अंगणवाडी सुपरवायझर/ पर्यवेक्षिका या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये एकूण १०० प्रश्न विचारले जातात यामधील प्रत्येक प्रश्न २ मार्कांसाठी विचारला जातो अशा प्रकारे एकूण परीक्षा २०० गुणांची असते. या परीक्षेम एकूण ४ विषय असतात ते खालीलप्रमाणे,

anganwadi supervisor syllabus in marathi

अंगणवाडी सुपरवायझर/अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता हे चार विषय असतात. प्रत्येक विषयावर आधारित २५ प्रश्न विचारले जातात , यामधील प्रत्येक प्रश्न २ गुणांसाठी विचारला जातो. अशारितीने चार विषयांवर आधारित १०० प्रश्नांची आणि २०० गुणांची परीक्षा घेतली जाते.

  • मराठी :- मराठी या विषयासाठी २५ प्रश्न विचारले जातात ज्यांना प्रत्येकी २ गुण याप्रमाणे एकूण ५० गुण असतात. हे प्रश्न मराठीमधून विचारले जातात ज्यांची काठिण्य पातळी इयत्ता १२ वी असते.
  • इंग्रजी :- इंग्रजी या विषयावर आधारित २५ प्रश्न ५० गुणांसाठी विचारले जातात. हे प्रश्न साहजिकच इंगजीमधून विचारले जातात ज्यांची काठिण्य पातळी पदवी इतकी असते.
  • सामान्य ज्ञान :- या विषयावर आधारित २५ प्रश्न विचारले जातात ज्यांना ५० गुण दिलेले असतात. या विषयाचे प्रश्न मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा माध्यमांमधून विचारले जातात ज्यांची काठिण्य पातळी पदवी इतकी असते.
  • गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी :- गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर देखील २५ प्रश्न ५० गुणांसाठी विचारलेले असतात ज्यांचे भाषा माध्यम मराठी आणि इंग्रजी दोन्ही असते आणि काठिण्य पातळी पदवी इतकी असते.

anganwadi supervisor syllabus maharashtra

आता पर्यंत आपण अंगणवाडी सुपरवायझर/अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाच्या परीक्षेमध्ये किती विषय असतात आणि किती गुणांसाठी असतात हे पाहिले आता अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती पाहू,

आपण पाहिले कि, अंगणवाडी सुपरवायझर/अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी वरील प्रमाणे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान , गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे चार विषय असतात. यामधील सामान्य ज्ञान या विषयाबद्दल बहुतेक उमेदवारांना अडचण असते म्हणून आपण सामान्य ज्ञान या विषयामधील अश्या महत्वपूर्ण घटकांची माहिती घेणार आहोत ज्यावर तुमचं मेरिट आणि सिलेक्शन अवलंबून असतं.

अंगणवाडी सुपरवायझर/अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सामान्य ज्ञान म्हंटल कि बहुतेक उमेदवाराना असं वाटत कि यामध्ये इतिहास,भूगोल,नागरिकशास्त्र,राज्य शास्त्र, विज्ञान, संगणक, चालू घडामोडी अशा प्रकारचे विषय असतील जे तलाठी भरती, पोलीस भरती , ग्रामसेवक भरती अश्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना असतात. परंतु सामान्य ज्ञानाच्या या विषयांसोबतच आणखीन काही महत्वाच्या घटकांचा अभ्यास देखील अंगणवाडी सुपरवायझर/अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची तयारी करणाऱ्या उमेदवारांना करावा लागतो.

तलाठी भरती, पोलीस भरती , ग्रामसेवक भरती यांसारख्या स्पर्धापरीक्षांना विचारल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञानाचा अभ्यास तर तुम्ही करायलाच हवा परंतु या विषयासोबतच तुम्हाला सामान्य ज्ञानाच्या पुढील काही महत्वपूर्ण घटकांचा देखील अभ्यास करणे फायदेशीर ठरते कारण हाच अभ्यास तुम्हाला इतर उमेदवारांपेक्षा सरस ठरवण्यात मदत करतो.

अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम
अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम

सामान्य ज्ञान विषयातील हे आहेत महत्वाचे घटक जे ठरवतात तुमचं मेरिट…!

अंगणवाडी सुपरवायझर/अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाच्या परीक्षेमध्ये खालील घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

वरील माहिती संबंधित विषयातील तज्ञ शिक्षक यांच्या मागील झालेल्या प्रश्नपत्रिका विश्लेषणावरून घेण्यात आलेली आहे. याचा फायदा तुम्हाला नक्की होईल परंतु आगामी परीक्षांमध्ये यामध्ये थोडासा बदल आढळू शकतो किंवा बदल होऊ शकतो.

अंगणवाडी पर्यवेक्षिका अभ्यासक्रम

आता पर्यंत आपण अंगणवाडी सुपरवायझर/अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती घेतली आता त्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असणारी पुस्तके यांची माहिती घेऊ,

अंगणवाडी पर्यवेक्षिका पात्रता

अंगणवाडी पर्यवेक्षिका पात्रता:- अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी उमेदवाराकडे खालील २ पर्याय उपलब्ध असतात.

  1. अंतर्गत भरतीमार्फत अंगणवाडी सुपरवायझर होणे.
  2. सरळसेवा भरतीमार्फत अंगणवाडी सुपरवायझर होणे.

आता आपण वरील दोन्ही पर्यायांची थोडक्यात माहिती घेऊ.

अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरतीने अंगणवाडी सुपरवायझर होणे :- अंतर्गत भरतीने अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी संबंधित अर्जदार महिला किमान पदवीधर असणे आवश्यक आहे त्यासोबतच त्या महिलेला अंगणवाडी सेविका या पदावर काम केल्याचा किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याबद्दलची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे,

पात्रता :-

  • अंगणवाडी सुपरवायझर/पर्यवेक्षिका पदासाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
  • अंगणवाडी सुपरवायझर/पर्यवेक्षिका या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित महिला उमेदवार कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • अंगणवाडी सेविका असलेली महिला उमेदवार सरळसेवा भरती आणि अंतर्गत भरती दोन्ही पद्धतीने फॉर्म भरू शकते.
  • अंगणवाडी सुपरवायझर/पर्यवेक्षिका पदासाठी अंतर्गत भरतीमधून अर्ज करण्यासाठी उमेदवार महिलेला अंगणवाडी सेविका या पदावर काम केल्याचा किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. जर १० वर्षांचा अंगणवाडी सेविका पदाचा अनुभव नसेल तर अशा वेळी सरळसेवा पद्धतीने फॉर्म भरता येऊ शकतो.
  • अंगणवाडी सुपरवायझर/पर्यवेक्षिका या पदासाठी अंतर्गत भरतीमार्फत अर्ज करणारी महिला उमेदवार त्याच जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर/पर्यवेक्षिका या पदासाठी अर्ज करू शकते ज्या जिल्ह्यामध्ये सदर महिलेने अंगणवाडी सेविका म्हणून काम केले आहे आणि या पदावर काम केल्याचा किमान १० वर्षांचा अनुभव आहे.
  • संगणक ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा:-

  • किमान १८ वर्ष ते कमाल ४५ वर्ष.

सरळसेवा भरतीने अंगणवाडी सुपरवायझर होणे :- सरळसेवा भरतीने अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी उमेदवाराला अंगणवाडी सुपरवायझर पदाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आवेदन अर्ज करावा लागतो आणि अंगणवाडी सुपरवायझर पदाची परीक्षा द्यावी लागते. हि परीक्षा कोणत्याही शाखेमधून पदवीधर झालेली महिला उमेदवार देऊ शकते. सरळसेवा पदभरतीने अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी आवश्यक पात्रता खालील प्रमाणे,

पात्रता :-

  • फक्त महिला उमेदवार अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी अर्ज करू शकतात.
  • अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी सरळसेवा भरतीमधून अर्ज करण्यासाठी महिला उमेदवार कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा :-

  • खुला प्रवर्ग – १८ वर्ष ते ३८ वर्ष
  • OBC प्रवर्ग – १८ वर्ष ते ४३ वर्ष
  • Ews प्रवर्ग – १८ वर्ष ते ४३ वर्ष
  • अपंग/प्रकल्पग्रस्त/स्वातंत्र्यसैनिक – १८ वर्ष ते ४५ वर्ष
  • अंशकालीन कर्मचारी – १८ वर्ष ते ५५ वर्ष

टीप:- जर उमेदवार समाजशास्त्र / गृहविज्ञान / शिक्षण / बालविकास / आहार पोषण यामधून पदवीधर असेल तर अशा उमेदवारास प्राधान्य दिले जाते.

वरील पात्रतेमध्ये शासन निर्णयानुसार बदल होत असतात त्यामुळे पदभरती जाहीर झाल्यानंतर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-

महाराष्ट्रात अंगणवाडी पर्यवेक्षकाची पात्रता काय आहे?

महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार महिला कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.

अंगणवाडी पर्यवेक्षक म्हणजे काय?

अंगणवाडी पर्यवेक्षक हे एक महत्वाचे पद आहे ज्याला अंगणवाडी सुपरवायझर असेही म्हंटले जाते. यांचे मुख्य काम अंगणवाडी केंद्रांचे कामकाज तपासणे हे असते. त्यासह इतरही अनेक जबाबदाऱ्या असतात.

अंगणवाडी पर्यवेक्षिकेचे कामकाज काय असते?

अंगणवाडी पर्यवेक्षिकेला कामाच्या अनेक जबाबदाऱ्या असतात ज्यामध्ये अंगणवाड्यांना भेटी देणे, त्यांचे कामकाज तपासणे, त्यांना प्रशिक्षण देणे, सरकारी योजनांची माहिती देणे इत्यादी कामकाजांचा समावेश होतो.

अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून काम करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद जबाबदारीचे पद आहे. त्यामुळे यामध्ये अनेक आव्हानेही आहेत जसे कि ग्रामीण भागामध्ये कनेक्टिव्हिटीची समस्या, समाजातील रूढीवादी मानसिकता त्यासोबतच अंगणवाड्यांची आणि कर्मचाऱ्यांची असणारी कमतरता यांचा समावेश होतो.

अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून स्वतःला कसे सुधारू शकते?

यासाठी तुम्हाला देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये नियमितपणे सहभागी होत राहा, तुमच्याहून अनुभवाने वरिष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करा.

अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून आपण समाजासाठी काय करू शकता?

शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांची माहिती आणि समाजामध्ये त्याची अंमलबजावणी करून तुम्ही समाजासाठी खूप काही करू शकता.

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

3 thoughts on “अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम । सामान्य ज्ञान विषयातील हे आहेत महत्वाचे घटक जे ठरवतात तुमचं मेरिट…!”

Leave a Comment