indian navy in marathi | भारतीय नौदलाच्या इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत संपूर्ण माहिती.

माहिती शेअर करा.

indian navy in marathi

indian navy in marathi:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. “indian navy in marathi“या पोस्टमध्ये आपण भारताच्या ज्या तीन सशस्त्र सेना आहेत ज्यामध्ये भारतीय लष्कर,भारतीय नौदल आणि भारतीय वायूदल ज्यांना आपण Indian Army, Indian Navy आणि Indian Air Force या नावाने संबोधतो. त्यापैकी एक असणाऱ्या भारतीय नौदल या सशस्त्र दलाबद्दल आपण माहिती घेणार आहोत तसेच उर्वरित भारतीय लष्कर आणि भारतीय वायुदल या दोन दलांबद्दल देखील पुढील पोस्टमध्ये माहिती घेणार आहोत.

indian navy in marathi

भारतीय नौदल हे जगातील 4 थ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे नौदल म्हणून ओळखले जाते.आपल्या भारतीय नौदलामध्ये अनेक प्रकारची विमाने,पाणबुड्या आणि युद्धनौका आहेत ज्यांचा वापर भारतीय नौदलामार्फत देशाच्या सागरी संरक्षणासाठी केला जातो.भारतीय नौदल देशाचे आणि नागरिकांचे आणि आपल्या सागरी हद्दीमध्ये येणाऱ्या संसाधनांचे रक्षण करते.तसेच शत्रूंना सागरी/समुद्री हल्ले करण्यापासून रोखण्यास आणि नैसर्गिक आपत्ती आल्यास नागरिकांना मदत करण्यास भारतीय नौदल नेहमी तयार आणि तत्पर असते.

भारतीय नौदलाची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली.भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्य “शं.नो.वरुण” हे आहे ज्याचा मराठीमध्ये अर्थ “जलाचा देवता आपल्यासाठी शुभ असो” असा होतो.भारतीय नौदलाचे प्रमुख भारताचे राष्ट्रपती असतात ज्यांना भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर असे म्हणतात.भारतीय नौदलामध्ये अंदाजे 300 विमाने, 64,000 कर्मचारी तर जवळपास 50,000 राखीव कर्मचारी आहेत.

सन 1971 मध्ये भारत – पाकिस्तान मध्ये झालेल्या युद्धामध्ये पाकिस्तानमधील कराची येथील बंदरावर भारताकडून करण्यात आलेला हल्ला भारतीय नौदलामार्फत करण्यात आला होता.या कराची येथील बंदरावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे विध्वंसक जहाज “PNS खैबर” हे नष्ट करण्यात आले होते यामध्ये भारतीय नौदलाचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.त्याचप्रमाणे सन 1961 मध्ये गोवा राज्याला पोर्तुगीजांपासून मुक्त कारण्यामध्येही भारतीय नौदलाची कामगिरी आणि योगदान उल्लेखनीय आहे.

भारतीय नौदल माहिती मराठी

आपण खूप वेळेस ऐकलं असेल किंवा बातम्यांमध्ये पाहिलं असेल कि आपल्या सैन्याने ऑपरेशन्स यशस्वीरीत्या पूर्ण केले.हे ऑपरेशन्स विविध दलांमध्ये राबवले जात असतात त्याचप्रमाणे भारतीय नौदलामध्येही अशा प्रकारचे अनेक सिक्रेट ऑपरेशन्स राबवले जात असतात आणि ते यशस्वी झाल्यांनतर त्याबद्दलची थोडी आणि कामाची माहिती प्रसिद्ध केली जात असते.

कोणतेही सिक्रेट ऑपरेशन्स राबवण्यासाठी किंवा पार पाडण्यासाठी कठोरपणे प्रशिक्षित सैनिकांची गरज असते त्याच प्रमाणे भारतीय नौदलामध्येही अशा प्रशिक्षित सैनिकांची गरज असते.भारतीय नौदलामध्ये अशा सैनिकांना मरीन कमांडो / मार्कोस (MARCOS Commando) असे म्हणतात.

मरीन कमांडो / मार्कोस (MARCOS Commando) हे देशाच्या सागरी संरक्षणामध्ये अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची भूमिका बजावत असतात.

नौदल म्हणजे काय

भारतीय नौदलामध्ये अनेक प्रकारच्या ऑपरेशन्सचा समावेश असतो. यामध्ये अनेक प्रकारच्या युद्धांचा त्याच प्रमाणे नागरिकांशी निगडित असणाऱ्या गोष्टींचा समावेश देखील असतो.त्यामुळे वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार ऑपरेशन्सची तीव्रता बदलते आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या बदलानुसार लढण्याची रणनीती सुद्धा बदलावी लागते.

भारतीय नौदलाच्या सैन्याचे मुख्य कार्य हे समुद्री मार्गाने येणाऱ्या संकटांना आणि शत्रूंना आपल्या बल प्रयोगाने रोखणे आणि विफल करणे हे असते त्याच बरोबर समुद्री हालचालींवर लक्ष आणि नियंत्रण ठेवणे, समुद्री हल्ल्यांसाठी तयार राहणे, पाणबुडी माध्यमाने होणाऱ्या हल्ल्यांना रोखणे हि प्रमुख संरक्षण जबाबदारी देखील भारतीय नौदलावर असते.

Naudal information in marathi

आता आपण हे पाहू कि Indian Navy / भारतीय नौदलामध्ये जर तुम्हाला नौकरी /सर्व्हिस करायची असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया असते.

भारतीय नौदल नोकरीच्या रिक्त जागेसंबंधी देशाच्या विविध प्रसिद्ध आणि नामांकित वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देत असते. भारतीय नौदल विभागाची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूज तसेच सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध केली जात असते. भारतीय नौदल विभागामध्ये नोकरी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शिक्षण त्याच बरोबर वयानुसार विविध पदांसाठी अर्ज करता येतो त्याबद्दल माहिती खालीलप्रमाणे,

Indian Navy in Marathi
Indian Navy in Marathi

UPSC (Union Public Service Commision) द्वारे घेण्यात येणारी एंट्री लेव्हल परीक्षा :-

UPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या खालील परीक्षांमधून विद्यार्थ्यांना भारतीय नौदल अकादमीमध्ये प्रवेश दिला जातो.

Undergraduate Level Entry द्वारे घेण्यात येणारी डायरेक्ट एंट्री लेव्हल परीक्षा

indian navy information in marathi

इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट द्वारे भरण्यात येणारी पदे व त्याबद्दलची आवश्यक माहिती खालीलप्रमाणे,

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-

भारतीय नौदलाचे जनक कोण आहेत?

छत्रपती शिवाजी महाराज” यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जाते.

भारतीय नौदलाचे ब्रीद वाक्य काय आहे ?

भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्य “शं.नो.वरुण” हे आहे ज्याचा मराठीमध्ये अर्थ “जलाचा देवता आपल्यासाठी शुभ असो” असा होतो.

भारतीय नौदलाच्या प्रमुखाला काय म्हणतात?

भारतीय नौदलाच्या प्रमुखाला ॲडमिरल असे म्हणतात.

नौदलाचे पूर्ण नाव काय आहे?

नौदल म्हणजेच NAVY चे पूर्ण नाव किंवा रूप Nautical Army of Volunteer Yeomen हे आहे.

भारतीय नौदलाचे पहिले प्रमुख कोण होते?

भारतीय नौदलाचे पहिले प्रमुख जे.टी.एस. हॉल हे होते.

मर्चंट नेव्हीचे काम काय आहे?

मर्चंट नेव्हीचे मुख्य कार्य मालाची आयात-निर्यात आणि वाहतूक करणे हे आहे.

भारतीय नौदलात कोणत्या प्रकारची पदे असतात?

भारतीय नौदलामध्ये टेक्निकल, मेडिकल यांसारख्या विविध विभागांमध्ये अधिकारी, जवान, सैनिक यांसारखी पदे असतात तर काही पदे कौशल्यावर आधारित असतात जसे कि, विमान चालक (पायलट),संगीतकार इ.

हाइड्रो मध्ये काय काम करावे लागते?

हायड्रो या क्षेत्रामध्ये मुख्यतः पाण्याचा, समुद्राचा आणि समुद्री जीव सृष्टीचा अभ्यास केला जातो आणि या गोष्टींशी निगडित असणारी इतर कामे केली जातात.

नौदल जॉईन केल्यानंतर काय सुविधा मिळतात?

भारतीय नौदलामध्ये नियुक्त झाल्यानंतर चांगले वेतन,भत्ते, वैद्यकीय सोयी सुविधा, नोकरीची सुरक्षितता इ. सुविधा मिळतात त्यासोबतच सामाजिक प्रतिष्ठाही मिळते.

भारतात नौदलाचे किती तळ आहेत?

भारतीय नौदलाचे मुबई, गोवा, कोलकाता, कोची, चेन्नई, विशाखापट्टणम, कारवार आणि पोर्ट ब्लेयर असे 8 तळ आहेत.

भारतीय नौदलाचे किती फ्लिट्स आहेत?

भारतीय नौदलाचे वेस्टर्न फ्लिट आणि इस्टर्न फ्लिट असे दोन फ्लिट्स आहेत. यापैकी वेस्टर्न फ्लिट हे मुंबईमध्ये स्थित आहे तर इस्टर्न फ्लिट हे विशाखापट्टणम येथे स्थित आहे.

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment