लक्षात राहण्यासाठी काय करावे
Table of Contents
लक्षात राहण्यासाठी काय करावे:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
लक्षात राहण्यासाठी काय करावे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
लक्षात राहण्यासाठी काय करावे
लक्षात राहण्यासाठी काय करावे:- आज-कालच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वांची स्मरण शक्ती कमी होत चालली आहे.अशा खूप काही गोष्टी आहेत ज्यामुळे स्मरण शक्ती कमी होत आहे.त्यातील काही महत्वांच्या मुद्यांबद्दल माहिती खाली दिलेले आहे, ते मुद्दे वाचून व त्या मुद्यांवर अंमलबजावणी करून तुम्ही तुमची स्मरणशक्ती वाढवू शकता.
स्मरण शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्या देखील सक्षम बनावे लागेल.कारण शारीरिक व मानसिक संतुलनाने व त्यांच्या व्यवस्थापनामुळे तुमची स्मरण शक्ती वाढण्यास मदत मिळते.
खूप ताणतणाव असणाऱ्या व नकारात्मक मानसिकता असणाऱ्या लोकांना स्मरणाच्या समस्या लवकर जडतात.त्याचे कारण म्हणजे जेव्हा कामाची किंवा महत्वाची गोष्ट घडत असते तेव्हा जास्त विचार करणारे व नकारात्मक मानसिकता असणारे लोक त्यांच्या विचारांच्या जाळ्यात अडकलेले असतात.म्हणून जर तुम्हालाही अशी सवय असेल तर तुम्हाला तुमची सवय सोडावी लागेल, तरच तुमची एकाग्रता वाढेल व गोष्टी लक्षात राहण्यासाठी मदत होईल.
लक्षात राहण्यासाठी उपाय
लक्षात राहण्यासाठी उपाय:- विसरभोळ्या स्वभावापासून सुटका मिळवण्यासाठी व महत्वाच्या गोष्टी लक्षात ठवण्यासाठी तुम्ही काही उपाय-योजना करू शकता त्या खालीलप्रमाणे.
- एकाग्रता वाढवा :- जी गोष्ट किंवा घटना तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायची आहे त्या गोष्टीला करतांना तुम्ही एकाग्र असणे फार महत्वाचे आहे.एकाग्रतेने एखादी घटना पाहिल्यास किंवा वाचल्यास ती तुमच्या स्मरणामध्ये दीर्घकाळ टिकून राहते.म्हणून तुम्ही एकाग्रता वाढवणे गरजेचे आहे यामध्ये खालील मुद्दे तुम्हाला मदत करतील.
- व्यायाम करा :- व्यायाम केल्याने तुमची नकारात्मकता कमी होण्यास मदत होते.ज्यामुळे तुमची सकारात्मकता वाढते व त्यासोबतच एकाग्रताही वाढते.
- ध्यान करा:- ध्यान केल्यानेही तुमची एकाग्रता वाढते व बुद्धी तेज होते जेणेकरून स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते.
- गोष्टी लिहून ठेवायची सवय लावा : जर तुम्ही महत्वाच्या व कामाच्या गोष्टी लिहून ठेवायची सवय लावून घेतली तर, तुम्ही त्या गोष्टीची आपोआपच तीन वेळा रिव्हिजन करत असता.
- ती गोष्ट घडतांना पाहता/वाचता.
- लिहिण्याआधी त्या गोष्टीचा विचार करता.
- लिहितांना परत ती गोष्ट आठवता व लिहिता.
- कामांमधून ब्रेक घ्या :- वैज्ञानिक दृष्ट्या पाहिल्यास तुम्ही काम करतांना ब्रेक / आराम घेतला पाहिजे ज्यामुळे तुम्ही फ्रेश होता व तुमची कार्यक्षमता वाढते.सरासरी ४५ मिनिटे किंवा ६० मिनिटे काम केल्यावर तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे.ब्रेकच्या वेळेमध्ये तुम्ही चालू शकता किंवा स्ट्रेचिंग करू शकता.
लक्षात राहण्याची क्षमता कमी होण्याची कारणे :-
लक्षात न राहणे याची अनेक कारणे आहेत त्यापैकी काही महत्वाची कारणे खालील प्रमाणे आहेत ज्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ,
- कामाचा किंवा वैयक्तिक आयुष्याचा तणाव असल्यास एकाग्रतेची कमी होते आणि लक्षात राहण्याची क्षमता कमी होते.
- अपुरी झोप आणि विश्रांतीची कमतरता असल्यास गोष्टी लक्षात ठेवण्यास अवघड जातात.
- जास्त वय झालेले असल्यास, अयोग्य जीवनशैली असल्यास, मेडिकल प्रॉब्लेम असल्यास किंवा पोषक आहार न घेतल्यास देखील लक्षात राहण्याची क्षमता म्हणजेच स्मरण शक्ती कमी होते.

अभ्यास लक्षात राहण्यासाठी काय करावे
अभ्यास लक्षात राहण्यासाठी काय करावे :- बहुतेक मुलं व पालक यांना एक समस्या असते ती म्हणजे “अभ्यास लक्षात न राहणे”.अशा वेळेस पालक किंवा मुलं जास्तीत जास्त अभ्यास करणं यावर भर देतात.पण फक्त एवढे केल्यानेच अभ्यास लक्षात राहायला लागेल असे नसते.असे केल्याने अभ्यासाबद्दल कंटाळा निर्माण होऊ शकतो.असे होऊ नये यासाठी तुम्ही खालील गोष्टींचा अवलंब करू शकता ज्याने अभ्यास लक्षात राहण्यास मदत होईल.
- अभ्यासाचे योग्य नियोजन करा : तुमच्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवले पाहिजे.अभ्यासाचे वेळापत्रक बनवल्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यास सोपे जाते व नियोजनबद्ध अभ्यास केल्यामुळे अभ्यास लक्षात राहण्यास मदत होते.
- एका वेळी एकाच विषयाचा अभ्यास करा : एका वेळी एकाच विषयाची निवड करा व फक्त त्याच विषयाबद्दल वाचन करा.ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करत आहात त्याचाच विचार करा, असे केल्याने तुमचे लक्ष्य विचलित होणार नाही व अभ्यास लक्षात राहण्यास मदत होईल.
- नोट्स बनवण्याची घाई करू नका : बहुधा आपण पहिल्याच वाचनामध्ये नोट्स बनवण्याची घाई करतो, असे करू नये.कारण पहिल्या वाचनामध्ये तुम्हाला खूप काही मुद्दे महत्वाचे वाटतील व असे वाटेल कि हे मुद्दे तुम्ही विसरू शकता.पण तसे नसते तुम्ही सहज ते मुद्दे लक्षात ठेवू शकता.
- नोट्स अवश्य बनवा : तुम्ही नोट्स बनवण्याची घाई करू नका पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या वाचनानंतर नोट्स अवश्य बनवा.कारण तुमच्या आता बनवलेल्या नोट्स ह्या महत्वाच्या असतील.
- जास्तीत जास्त वाचन करा : नोट्स काढल्यानंतर त्या नोट्स ची रिव्हिजन करणे फार महत्वाचे आहे.काही वेळा आपण फक्त नोट्स काढतो पण त्या वेळोवेळी वाचत नाही.म्हणून जर अभ्यास लक्षात ठेवायचा असेल तर नोट्सचे वाचन करणे देखील आवश्यक आहे.
- समजून घेऊन अभ्यास करा : कोणताही विषय समजून घेतांना, तुम्ही जो पॉईंट वाचताय त्याला व्हिजुअलाईज करत तो पॉईंट वाचा.म्हणजेच त्या मुद्द्याची कल्पना करत तो मुद्दा वाचा.असे केल्याने तो मुद्दा तुमच्या स्मरणामध्ये राहण्यास मदत मिळते.
- कल्पना शक्तीचा वापर करा : वर सांगितल्याप्रमाणे वाचन करतांना कल्पनाशक्तीचा वापर करा.
- तुमच्या आवडीनुसार अभ्यास करा : काही लोक तुम्हाला सांगतील ती ग्रुपमध्ये (सामूहिक) अभ्यास केल्यास अभ्यास लक्षात राहतो.कोणी म्हणेल कि एकट्याने एकांतात केलेला अभ्यास लक्षात राहतो.तर असे काही नसते प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो.कोणाला सामूहिक अभ्यास केल्याने लक्षात राहते तर कोणाला एकांतामध्ये अभ्यास केल्याने लक्षात राहते.तुम्ही तुमची आवड ओळख व त्यानुसार अभ्यास करा.
- अभ्यासाची योग्य वेळ निवडा : कोणाला सकाळी लवकर उठून अभ्यास केल्यास लक्षात राहते तर कोणाला रात्री जागून अभ्यास केल्याने लक्षात राहते.म्हणून तुमच्या योग्य वेळेनुसार तुम्ही अभ्यास करा. तसे पाहता सकाळी लवकर उठणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
- अभ्यासाची जागा व्यवस्थित व स्वच्छ ठेवा : ज्या विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याच विषयाच्या संबंधित सामग्री तुम्ही समोर ठेवा.
- मैदानी खेळ खेळा : तुम्ही अभ्यासाचे वेळापत्रक बनवता तेव्हा त्यामध्येच तुमच्यासाठी ठराविक वेळ मैदानी खेळ खेळण्यासाठी द्या.यामुळे तुमचा अभ्यासाचा कंटाळा कमी होईल व अभ्यासामध्ये तुमचे मन लागेल.
वाचलेले लक्षात राहण्यासाठी काय करावे
वाचलेले लक्षात राहण्यासाठी काय करावे :-
- सक्रिय पद्धतीने वाचन करा : वाचन करताना सक्रिय पद्धतीने वाचन केले पाहिजे.म्हणजे तुम्ही कधीही झोपून किंवा अव्यवस्थित मुद्रेमध्ये वाचन करू नका. असे केल्याने वाचलेले दीर्घकाळ तुमच्या लक्षामध्ये राहणार नाही.
- वाचनामध्ये एकाग्रता ठेवा : वाचन करत असतांना मन शांत व एकाग्र ठेवा. आजूबाजूचा येणार आवाज ,इत्यादी गोष्टींकडे लक्ष देऊ नका.
- इअर बर्ड्स वापरा : जर तुमच्या परिसरामध्ये गोंगाट किंवा आवाज येण्याची समस्या असेल.तर तुम्ही इअर बर्ड्स वापरू शकता.कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला हे बर्ड्स अंदाजे २० रुपयांपर्यंत मिळून जातील.जर तुम्हाला इअर बर्ड्स वापरायचे नसतील तर तुम्ही कापसाचा किंवा सुती कापडाचा बोळा कानामध्ये लावू शकता.याने तुम्हाला येणारा आवाजाचा डिस्टर्बन्स कमी होईल
- महत्वाचे मुद्दे रेखांकित करा : दुसऱ्या किंवा तिसऱ्या वाचनानंतर महत्वाचे मुद्दे रेखांकित करा व सराव करतांना ह्या मुद्यांना वाचा.
- नाटकीय पद्धतीने विचार करत वाचन करा : जर तुम्ही इतिहासासारखे विषय वाचत असाल, तर ते वाचतांना त्यांचा नाटकीय पद्धतीने विचार करा,याने त्या गोष्टी लवकर तुमच्या लक्षात राहतील.
- भरपूर रिव्हिजन करा : केलेल्या अभ्यासाचा भरपूर सराव करा . सराव केल्यानेच तुमचे वाचलेले लक्षात राहण्यात तुम्हाला मदत मिळणार आहे.
जर तुम्हाला जास्त विचार करण्याची किंवा नकारात्मक विचार करण्याची सवय असेल तर तुम्ही आमचा “नकारात्मक विचार मराठी | हे आहेत काही उत्तम उपाय जे खात्रीशीर थांबवतील तुमचे नकारात्मक विचार !“ हा लेख अवश्य वाचा.
FAQ’s :-
जीवनात यश मिळवण्याची गुरुकिल्ली काय आहे?
जीवनात यश मिळवायचे असेल तर ध्येयनिष्ठ होऊन आपल्या ध्येयाचा पाठलाग केला पाहिजे.हि यशाची गुरुकिल्ली आहे.
जीवनात यशस्वी होणे म्हणजे काय?
जीवनात यशस्वी होणे, म्हणजे आपल्या कौटुंबिक,मानसिक व वैयक्तिक आयुष्यामध्ये समाधानी,आनंदी व यशस्वी असणे.
यशस्वी जीवनाचे मोजमाप काय आहे?
समाधानी व आनंदी असणे हे यशस्वी असल्याचे मोजमाप आहे असे म्हणतात.
तुमच्या कामात यश कसे दिसते?
जेव्हा तुम्ही नवीन गोष्टी शिकत राहता, तुमचं काम लॉजिकल पद्धतीने करायला चालू करता , व काम वेळेमध्ये पूर्ण करता तेव्हा तुमच्या कामामध्ये यश दिसते.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"
अभ्यास लक्षात राहत नाही.
english अर्थ समजत नाहीत
मला खूप टेन्शन येते
अभ्यासात लक्ष लागत नाही
Please tell me solutions
🙏🙏🙏🙏🙏
अभ्यास लक्षात राहत नाही यासाठी :-
1.टाइम टेबल नुसार अभ्यास करा.
2.सतत अभ्यास केल्याने कंटाळा येतो. त्यामुळे अभ्यासाचा 60 मिनिटांचा एक स्लॉट बनवा त्यामध्ये 45 मिनिटे अभ्यास केल्यानंतर 10-15 मिनिटांचा ब्रेक घ्या.
3.अभ्यास समजून घ्या, पाठांतर करू नका. एखादी गोष्ट समजल्यावर ती स्वतःच्या शब्दात नोट्सच्या स्वरूपात लिहा. आज बनवलेल्या नोट्स उद्या त्यानंतर एक आठवड्यानंतर आणि त्यानंतर एका महिन्यानंतर रिवाईज करा.
4.अभ्यासासोबत शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. आणि दररोज स्वतःशी सकारात्मक बोला: “मला हे जमेल.”
english अर्थ समजत नाहीत:- .1. ऑनलाईन किंवा ऑफलाईन मराठी-इंग्रजी डिक्शनरी वापरा. 2. चित्रपट, मालिका किंवा व्हिडिओ आधी हिंदी डबमध्ये पहा त्यानंतर त्याचे इंग्रजी सबटायटल वाचत पहा आणि त्यानंतर त्याचे इंग्रजी सबटायटल बंद करून मूळ इंग्रजी भाषेमध्ये पहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. 3. सुरुवातीला सोप्या इंग्रजी पुस्तकांपासून वाचन सुरू करा जसे कि लहान मुलांसाठी असलेल्या इंग्रजी गोष्टींची पुस्तके.4.अडलेला शब्द लगेच डिक्शनरीतून शोधून त्याचा अर्थ समजून घ्या आणि तो शब्द लिहून ठेवा. या शब्दाचा वापर वाक्यामध्ये कारण्याचा प्रयत्न करा. 5. आपल्या मनामध्ये विचार मराठीमधून येतात ते विचार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला उपयुक्त ठरतील अशा आमच्या खालील पोस्ट वाचू शकता.
मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे | ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मिळतील भीती मुक्त जीवन जगण्याचे 17 मूलमंत्र व 1 स्पेशल टीप !
नकारात्मक विचार मराठी | हे आहेत काही उत्तम उपाय जे खात्रीशीर थांबवतील तुमचे नकारात्मक विचार !
जास्त विचार करणे कसे थांबवायचे | हे आहेत काही वास्तविक उपाय, जे केल्याने तुम्ही विचार करू शकता तुमच्या इच्छेनुसार….!
धन्यवाद….!