महिला पोलीस भरती ग्राउंड । महिला पोलीस भरती विषयी सर्व माहिती । नाही राहणार एकही शंका..! नक्की वाचा.

माहिती शेअर करा.

महिला पोलीस भरती ग्राउंड

Table Of Content

महिला पोलीस भरती ग्राउंड:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

महिला पोलीस भरती ग्राउंड ” ह्या पोस्टमध्ये आपण मुख्यतः महाराष्ट्रामध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी काय करावे लागते याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. याआधीच्या पोस्टमध्ये आपण पोलीस शिपाई म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल पदाची भरती कशी घेतली जाते याची संपूर्ण माहिती पाहिली होती. जर तुम्ही ती पोस्ट अजून वाचली नसेल तर खालील लिंक वर क्लीक करून ती पोस्ट वाचू शकता 👇.

पोलीस होण्यासाठी काय करावे लागते | संपूर्ण माहिती एकाच पोस्टमध्ये…! वर्दीचं स्वप्न होईल नक्की पूर्ण…!

तसेच या पोस्टच्या शेवटी महिला भरती विशेष या घटकामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका कसे होता याचीही माहिती देण्यात आलेली आहे, त्या पोस्टही नक्की वाचा. जर तुम्ही त्या पदांमध्ये इच्छुक असाल तर तुम्हाला त्या संबंधित पदांची तयारी करण्यासाठी आमच्याकडून मार्गदर्शन मिळेल.

तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

नवीनतम प्रकाशित भरती :-

महिला पोलीस भरती ग्राउंड

पोलीस भरती महिला शैक्षणिक पात्रता

  • किमान इयत्ता 12 वी उत्तीर्ण किंवा त्या समतुल्य.

महिला पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी अर्ज करू इच्छिणारी महिला उमेदवार किमान इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ,किंवा शासनाने त्या समतुल्य म्हणून मान्य केलेले शिक्षण पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे.

पोलीस भरती महिला शारीरिक पात्रता

महाराष्ट्रामध्ये महिला पोलीस शिपाई होण्यासाठी संबंधित महिला उमेदवार खालील शारीरिक पात्रता निकषांमध्ये पात्र असणे आवश्यक आहे.

पोलीस भरतीसाठी मुलींची उंची किती लागते

शारीरिक पात्रता (महिला)

  • उंची :- किमान 155 सें.मी..
  • छाती :- -//-
    • लागू नाही

पोलीस भरती महिला वयोमयादा

पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी संबंधीत महिला उमेदवाराने खालील प्रमाणे प्रवर्गानुसार देण्यात आलेल्या वयोमर्यादेची पूर्तता करणे आवश्यक आहे.

police bharti ground information in marathi

पोलीस भरती महिला प्रवर्गानुसार वयोमयादा

  • खुला प्रवर्ग – 18 वर्ष ते 28 वर्ष
  • मागास प्रवर्ग – 18 वर्ष ते 33 वर्ष
  • प्रकल्पग्रस्त – 18 वर्ष ते 45 वर्ष
  • भूकंपग्रस्त – 18 वर्ष ते 45 वर्ष
  • अनाथ – 18 वर्ष ते 33 वर्ष

समांतर आरक्षणांतर्गत येणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा

  • महिला उमेदवार
    • खुला प्रवर्ग – 18 वर्ष – 28 वर्ष
    • मागास प्रवर्ग – 18 वर्ष – 33 वर्ष
  • खेळाडू उमेदवार
    • खुला प्रवर्ग – 18 वर्ष – (28+5) वर्ष
    • मागास प्रवर्ग – 18 वर्ष – (33+5) वर्ष
  • पोलीस पाल्य उमेदवार
    • खुला प्रवर्ग – 18 वर्ष – 28 वर्ष
    • मागास प्रवर्ग – 18 वर्ष – 33 वर्ष

महाराष्ट्रामध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी तुम्हाला खालील 4 पायऱ्या / प्रक्रिया पार कराव्या लागतात.

police bharti information in marathi

महिला पोलीस भरती ग्राउंड
महिला पोलीस भरती ग्राउंड

आता आपण एकेक करून वरील सर्व प्रकिया समजून घेऊ,

पोलीस भरती ट्रेनिंग मुली

पायरी 1- लेखी परीक्षा :-

महिला पोलीस होण्याची पहिली पायरी / पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा. पोलीस शिपाई होण्यासाठी तुमची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये एकूण 4 मुख्य विषय असतात. या परीक्षेसाठी एकूण दीड तास म्हणजेच 90 मिनिटे इतका वेळ देण्यात येतो. हि परीक्षा ऑफलाईन घेतली जाते आणि यामधील प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत अवलंबली जात नाही तरीही परीक्षेमध्ये अंदाजे उत्तर देऊ नये अचूक पर्याय निवडण्याचा पुरेपूर प्रयत्न करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवावे कारण शेवटी गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी यांच्या गुणांचे एकत्रीकरण करून अंतिम निवड यादी जाहीर केली जात असते. हीच माहिती खालील तक्त्याच्या माध्यमातून समजून घेऊ,

police bharti all information in marathi

अ.क्र.विषयएकूण गुणएकूण प्रश्नएकूण वेळ
१.मराठी२५ गुण२५ प्रश्न
२.अंकगणित२५ गुण२५ प्रश्न
३.बुद्धिमत्ता चाचणी२५ गुण२५ प्रश्न९० मिनिटे
४.सामान्यज्ञान+चालू घडामोडी२५ गुण२५ प्रश्न
एकूण१०० गुण १०० प्रश्न

महिला पोलीस भरती विषयी माहिती

वरील विषयांची योग्य तयारी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुस्तके निवडू शकता किंवा खाली देण्यात आलेल्या महत्वाच्या पुस्तकांच्या यादीमधील पुस्तकांमधून लेखी परीक्षेचा अभ्यास करू शकता.

महत्वाची पुस्तके

police bharti books। पोलीस भरती महत्वाची पुस्तके

पोलीस भरतीसाठी मुलींची उंची किती लागते

पायरी 2- शारीरिक चाचणी परीक्षा

तुम्हाला पोलीस शिपाई व्हायचे असेल तर तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि तंदुरुस्त असायलाच हवे कारण, शारीरिक चाचणी मध्ये तुम्हाला धावणे आणि गोळाफेक हे इव्हेंट्स असतात. खालील तक्त्याच्या माध्यमातून आपण शारीरिक चाचणी परीक्षेचे स्वरूप समजून घेऊ,

पोलीस भरतीसाठी वजन किती लागते

  • पोलीस भरती मध्ये महिलांचे वजन ४५ किलो पेक्षा कमी नसावे.

पोलीस भरती गोळा वजन

  • पोलीस भरती मध्ये महिला उमेदवारांसाठी गोळा ४ किलो ग्रॅम एवढ्या वजनाचा असतो.

police bharti mahila physical test information

पायरी 3- कागदपत्र पडताळणी

वरील दोन्ही पायऱ्या यशस्वीपणे पूर्ण करून पात्र ठरलेल्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच मूळ कागदपत्र पडताळणी केली जाते. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश होतो,

पोलीस शिपाई भरती महत्वाची कागदपत्रे

पोलीस भरती कागदपत्रे

police bharti sathi lagnare documents

police bharti full information in marathi

पायरी 4- वैद्यकीय तपासणी

वरील तीनही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिम निवड यादीमध्ये आलेल्या पात्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते. या वैद्यकीय तपासणीमध्ये मुख्यतः खालील चाचण्या केल्या जातात.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल या पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर तुम्हाला 5200 रु. – 20200 रु. इतका पगार दिला जातो या व्यतिरिक्त ग्रेड पे 2000 रु आणि इतर भत्तेही दिले जातात. हा पगार जिल्ह्या नुसार बदलू शकतो.

mahila police bharti information in marathi

महत्वाच्या टिप्स

पोलीस भरतीची तयारी करत असतांना शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्ती यासोबतच मानसिक आरोग्य आणि संयमही महत्वाचा आहे.त्यासाठी खाली काही मार्गदर्शन टिप्स देत आहोत त्या नक्की वाचा आणि जर तुम्हाला तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता वाटत असेल तर त्यावर काळजीपूर्वक काम करा.

  • पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी लाखोंमध्ये आवेदन अर्ज येत असतात त्यामुळे या भरतीमध्ये इतर भरतींपेक्षा जास्त स्पर्धा असते त्यासाठी तुम्ही मानसिकरित्या तयार असायला हवे.
  • पोलीस शिपाई / पोलीस कॉन्स्टेबल हि अशी पोस्ट आहे ज्यामध्ये तुम्ही मानसिकरीत्या त्यासह शारीरिकरीत्या तंदुरुस्त असायला हवं.
  • तुम्ही जेवढी जास्त मेहनत या पदासाठी करू शकता तेवढी नक्की करा परंतु, निकाल आल्यानंतर यश न मिळाल्यास खचून न जाता जोमाने परत तयारीला लागायची मानसिकता नक्की अवलंबवा.
    • (चुकीचे पाउल कधीही उचलू नका कारण अपयश हा शेवट कधीच नसतो तुम्ही अजून मोठे कार्य करू शकता.)
  • जमल्यास स्वतःला एक निश्चित वेळ ठरवून द्या त्यानंतर जमत नसेलच तर तुमचा प्लॅन B तयार ठेवा खचून जाऊ नका.
  • ज्या गोष्टी / सवयी तुम्हाला चुकीच्या वाटत आहेत त्या लगेच किंवा हळूहळू सोडत चला. त्या गोष्टी किंवा सवयी एकदाच नाही पण एकदा नक्की सुटतील.

“I wish you all the best for your exam!”

महिला भरती विशेष :-

महत्वाच्या लिंक्स 👇

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-


पोलीस भरतीसाठी मुलींची उंची किती लागते?

पोलीस भरतीसाठी मुलींची उंची किमान 155 सें.मी. असावी लागते.

पोलीस भरती गोळा किती किलोचा असतो?

पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये गोळ्याचे वजन महिला उमेदवारांसाठी ४ किलो ग्रॅम आणि पुरुष उमेदवारांसाठी ७.२६० किलो ग्रॅम इतके असते.

पोलीस भरतीसाठी मुलींचे वजन किती पाहिजे?

पोलीस भरतीसाठी मुलींचे वजन ४५किलो पेक्षा कमी नसावे.

पोलीस भरतीसाठी महिलांची उंची किती असावी?

पोलीस भरतीसाठी महिलांची उंची 155 सें.मी. पेक्षा कमी नसावी.

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment