परिचारिका म्हणजे काय
Table Of Content
Table of Contents
परिचारिका म्हणजे काय:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.
परिचारिका म्हणजेच नर्स या संबंधित असलेल्या या पोस्टमध्ये तुम्हाला नर्स होण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती मिळणार आहे, आम्ही आशा करतो कि तुम्हाला ह्या पोस्टचा नक्कीच फायदा होईल.
तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
परिचारिका म्हणजे काय
परिचारिका म्हणजे काय ? :-
paricharika meaning in marathi
परिचारिका म्हणजेच नर्स. परिचारिका हा आरोग्यसेवेतील अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे. जन्मापासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत “परिचारिका” या व्यक्तीची समाजाला गरज भासत असते.परिचारिका यांच्या योगदानाशिवाय आरोग्य सेवा क्षेत्र अपूर्ण आहे.कारण , परिचारिका यांची भूमिका केवळ उपचारापुरती मर्यादित नसून ती मानसिक आधार आणि सहानुभूती प्रदान करणारी आहे.
परिचारिका हि अशी व्यक्ती असते जी रुग्णांना औषधोपचार देणे, त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याची काळजी घेणे, त्यांना मानसिक आणि भावनिक आधार देणे यांसारखी महत्वपूर्ण कामे करत असते.
परिचारिकांची जबाबदारी

परिचारिकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये काय असतात ? :-
परिचारिकांची मुख्य भूमिका काय आहे? | परिचारिकांची जबाबदारी
- रुग्णांना औषधे देणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे आणि तपासणी करणे.
- डॉक्टरांना रुग्णांना औषधोपचार देण्यात आणि शस्त्रक्रिया करण्यात मदत करणे.
- डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णांना वेळेवर औषधे देणे त्यासोबतच संबंधित रुग्णाला देण्यात आलेल्या औषधोपचार संबंधित नोंदी ठेवणे.
- रुग्णाच्या प्रकृतीमध्ये होत असलेल्या बिघाड/सुधार बद्दलची माहिती डॉक्टरांना देणे आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार रुग्णांना पुढील उपचार देणे.
- रुग्णाला तसेच त्याच्या कुटुंबियांना उपचारांबद्दल सल्ला आणि मार्गदर्शन करणे.
नर्स होण्यासाठी काय करावे लागते
परिचारिका होण्यासाठी काय करावे लागते ? :-
आरोग्य परिचारिका पात्रता
जर तुम्हाला परिचारिका (नर्स) व्हायचे असेल तर तुम्ही परिचारिकेचा डिप्लोमा अभ्यासक्रम / पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून परिचारिका क्षेत्रामध्ये उत्तम करिअर करू शकता. परिचारिकेचा डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रम यासंबंधीची माहिती खालीलप्रमाणे,
कोर्सचे नाव | कोर्सचे पूर्ण रूप | कोर्सचा कालावधी |
---|---|---|
ANM | Auxiliary Nursing Midwifery | 02 वर्षांचा डिप्लोमा कोर्स |
GNM | General Nursing and Midwifery | 03 वर्षांचा डिप्लोमा कोर्स |
B.Sc in Nursing | Bachelor of Science in Nursing | 04 वर्षांचा पदवी कोर्स |
“जर तुम्हाला वरील कोर्सेसची संपूर्ण आणि सविस्तर माहिती हवी असेल तर आमची खालील पोस्ट नक्की वाचा!“
paricharika information in marathi
परिचारिका क्षेत्रामध्ये कोणती आव्हाने असतात? :-
- दीर्घ कार्यसमय (ड्युटी):- परिचारिकेचे काम हे जबाबदारीचे काम आहे त्यामुळे आपत्कालीन (Emergency) परिस्थितीमध्ये सतत किंवा दीर्घकाळ काम करावे लागू शकते.
- नाईट ड्युटी :- आरोग्यसेवा हि 24×7 चालू असणारी सेवा आहे, त्यामुळे परिचारिकेच्या क्षेत्रामध्ये नाईट ड्युटी करावी लागते. बहुतेक हॉस्पिटल्समध्ये रोटेशन पद्धतीने शिफ्ट चेंज दिली जाते.
- मानसिक ताण :- बहुधा हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या मृत्यूच्या , अपघाताच्या केसेस येत असतात अशा परिस्थितीमध्ये करिअरच्या सुरुवातीला भावनिक आणि मानसिक ताण येऊ शकतो.
- शारीरिक श्रम :- इथे शारीरिक श्रम याचा अर्थ, परिचारिकेच्या कार्यशैलीमध्ये ड्युटीदरम्यान दीर्घकाळ उभे राहणे, जिन्याने चढ-उतार करणे असा आहे. त्यामुळे शारीरिक श्रम करण्याची मानसिकता ठेवावी लागते
scope of nursing in marathi
परिचारिका क्षेत्रामधील उपलब्ध करिअर संधी कोणत्या ? :-
- प्राथमिक आरोग्य केंद्र
- सरकारी रुग्णालये
- खाजगी रुग्णालये
- प्रायव्हेट क्लिनिक
- नर्सिंग सुपरवायझर
- नर्सिंग क्षेत्रामध्ये प्राध्यापक/शिक्षक/लेखक.
नर्सिंग व्याख्या मराठी
उत्तम परिचारिका होण्यासाठी आवश्यक गुण कोणते आहेत ? :-
- सहानुभूती आणि संयम.
- आपत्कालीन परिस्थिती मध्ये जलद आणि अचूक निर्णय क्षमता.
- रुग्ण आणि डॉक्टर यांच्यासोबत उत्तम संभाषण कौशल्य.
- कामामध्ये शिस्त,अचूकता, तत्परता आणि व्यवस्थितपणा. इत्यादी..
नर्स विषयी माहिती
महाराष्ट्रामध्ये परिचारिकेला अंदाजे किती पगार / वेतन दिले जाते ? :-
महाराष्ट्रामध्ये परिचारिकेला अंदाजे 15,000 रुपये ते 20,000 रुपये इतके वेतन दिले जाते. हे वेतन जिल्हा / तालुका / शहर यानुसार बदलू शकते. परंतु अनुभव आणि कौशल्यानुसार या वेतनामध्ये वाढ होते तसेच नोकरी बदलल्यास देखील वेतनामध्ये वाढ मिळू शकते.
- इतर महत्वपूर्ण माहिती.
जागतिक परिचारिका दिन | परिचारिका दिवस | आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन | paricharika din
- जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day) प्रत्येक वर्षी १२ मे रोजी साजरा करण्यात येतो.
- फ्लोरेंस नाइटिंगेल यांना “नर्सिंगच्या जननी” म्हणून ओळखले जाते.
- परिचारिका दिनाचे मुख्य उद्दिष्ट हे परिचारिका म्हणजेच नर्सेसच्या कामाची प्रशंसा करणे आणि त्यांचे योगदान मान्य करणे हे आहे.
nurse mahiti marathi
निष्कर्ष :-
परिचारिका हे क्षेत्र केवळ उत्पन्नाचे किंवा नोकरी मिळवण्याचे साधन नसून हि समाजासाठी करण्यात येणारी सेवाभावना आहे. या क्षेत्रामधील आव्हाने पाहता हे क्षेत्र आव्हानात्मक असले तरी या क्षेत्रामध्ये तुमची आवड असल्यास समाधान आणि सन्मान देखील आहे..!
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
विचारण्यात आलेले काही संबंधित प्रश्न :-
नर्सिंग म्हणजे काय?
नर्सिंग म्हणजे अशी आरोग्य सेवा ज्यामध्ये रुग्णाच्या आजारासोबतच त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची देखील काळजी घेतली जाते.
परिचारिकांची मुख्य भूमिका काय आहे?
रुग्णांची काळजी घेणे,त्यांना औषधोपचार देणे, त्यांच्या प्रकृचीचे निरीक्षण करून नोंद ठेवणे, रुग्णांना आरोग्यविषयक शिक्षण देणे इ.
नर्स होण्यासाठी काय करावे लागेल?
नर्स होण्यासाठी तुम्ही ANM,GNM, B.Sc. Nursing हे कोर्स पूर्ण करून परिचारिका म्हणजेच नर्स बनू शकता.
परिचारिका रुग्णांसोबत सर्वाधिक वेळ घालवतात का?
हो, “द अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिन” मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार परिचारिका डॉक्टरांपेक्षा जवळपास दुप्पट वेळ रुग्णांसोबत घालवतात.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"