तहसीलदार होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते |तुमच्या तहसीलदार बनण्याच्या स्वप्नाची संपूर्ण व परिपूर्ण माहिती देणारा लेख.

माहिती शेअर करा.

तहसीलदार होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते

तहसीलदार होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

तहसीलदार होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल.या पोस्टमध्ये तुम्हाला तहसीलदार बनण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मिळणारे वेतन,अभ्यासक्रम,अभ्यासक्रमामधील विषय व घटक तसेच पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा आणि मुलाखत याची सविस्तर माहिती मिळणार आहे.कृपया ती माहिती व्यवस्थित वाचून व अभ्यासक्रम समजून घेऊन नियोजन करा.तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

तहसीलदार होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते

तहसीलदार होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) अंतर्गत घेण्यात येणारी राज्यसेवा हि परीक्षा द्यावी लागते.या परीक्षेमध्ये एकूण तीन टप्पे असतात.

  • पूर्व परीक्षा (Preliminary Exam ):-
  • मुख्य परीक्षा (Mains Exam ):-
  • मुलाखत (Interview) :-

पूर्व परीक्षा (Preliminary Exam ):-पूर्व परीक्षा एकूण ४०० गुणांची असते.पूर्व परीक्षेमध्ये एकूण २ पेपर असतात. प्रत्येक पेपरसाठी २०० गुण व प्रत्येक पेपरसाठी २ तास एवढा वेळ दिला जातो.

  1. पेपर क्रमांक १:- सामान्य अध्ययन
  2. पेपर क्रमांक २:- C-SAT (Civil Services Aptitude Test)

मुख्य परीक्षा (Mains Exam ):- पूर्व परीक्षा एकूण ८०० गुणांची असते.पूर्व परीक्षेमध्ये एकूण ६ पेपर असतात. .

  1. मराठी भाषा
  2. इंग्रजी भाषा
  3. सामान्य अध्ययन- १
  4. सामान्य अध्ययन-२
  5. सामान्य अध्ययन -३
  6. सामान्य अध्ययन-४

हि माहिती आपण थोडक्यत घेतली आहे सविस्तर माहिती खाली दिलेली आहे त्यामध्ये प्रत्येक पेपर व त्या पेपरचा घटक समजून सांगितलेला आहे.

तहसीलदार होण्यासाठी पात्रता

तहसीलदार होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील प्रमाणे,

  • शैक्षणिक पात्रता :-
    • तहसीलदार पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
    • उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधार असावा असा नोकरी विभागाचा नियम आहे.
    • तुम्ही किमान आवश्यक गुणांनी जरी तुमची पदवी उत्तीर्ण झालेले असाल तरी या पदासाठी अर्ज करू शकता.
  • वयोमर्यादा :-
    • तहसीलदार पदासाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा सर्वांसाठी सारखी नसल्यामुळे, प्रवर्गानुसार किती वयोमर्यादा असते ते खालील प्रमाणे,
      • सर्वसाधारण/जनरल प्रवर्ग :- किमान 19 वर्ष ते कमाल 33 वर्ष
      • राखीव प्रवर्ग :- किमान 19 वर्ष ते कमाल 38 वर्ष
      • खेळाडू :- किमान 19 वर्ष ते कमाल 38 वर्ष
      • अपंग :- किमान 19 वर्ष ते कमाल 45 वर्ष
        • पद भरती जाहिरात आल्यानंतर शासन निर्णयानुसार वयोमर्यादेमध्ये बदल होऊ शकतो त्याबद्दल जाहिरातीमध्ये माहिती दिलेली असेल.
तहसीलदार होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते
तहसीलदार होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते

तहसीलदार परीक्षा अभ्यासक्रम

तहसीलदार होण्यासाठी जी परीक्षा घेतली जाते त्याची वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. या मुद्द्यामध्ये आपण MPSC मार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा परीक्षा याचा अभ्यासक्रम पाहणार आहोत.

पूर्व परीक्षा (Preliminary Exam ):-

तहसीलदार होण्यासाठीच्या पूर्व परीक्षा हि एकूण ४०० गुणांची असते.यामध्ये दोन विषय असतात.दोन्ही विषयांचे मिळून एकूण १८० प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात व परीक्षेमध्ये मिळणारा एकूण वेळ २ तास प्रत्येकी असा असतो.

  1. पेपर क्रमांक १:- सामान्य अध्ययन
  2. पेपर क्रमांक २:- C-SAT (Civil Services Aptitude Test)
अ.नं.विषय प्रश्न गुण वेळ
1सामान्य अध्ययन 100 प्रश्न 200 गुण 2 तास
2C-SAT (Civil Services Aptitude Test)80 प्रश्न 200 गुण 2 तास
एकूण 180 प्रश्न 400 गुण 2 तास

मुख्य परीक्षा (Mains Exam ):-

मुख्य परीक्षेमध्ये एकूण सहा पेपर असतात.

अ.नं.विषयगुणवेळ
1मराठी भाषा100 गुण 3 तास
2इंग्रजी भाषा100 गुण 3 तास
3सामान्य अध्ययन- १
(इतिहास,भूगोल,कृषी)
150 गुण 2 तास
4सामान्य अध्ययन-२
(भारतीय संविधान,भारतीय राजकारण आणि कायदे)
150 गुण 2 तास
5सामान्य अध्ययन -३
(मानवी संसाधन,मानवी हक्क)
150 गुण 2 तास
6सामान्य अध्ययन-४
(विज्ञान आणि तंत्रज्ञान,अर्थव्यवस्था)
150 गुण 2 तास
एकूण 800 गुण

मुलाखत (Interview) :-

तहसीलदार या पदासाठी एकूण १०० गुणांची मुलाखत नोकरी विभागाकडून घेण्यात येते.यानंतर मुख्य परीक्षा व मुलाखत यांच्याआधारे फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाते.सर्व पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाते.यानंतर ट्रेनिंग व नियुक्ती अशी प्रक्रिया असतात.

तहसीलदार कामे तहसीलदार कसे बनायचे

राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार या प्रमाणे नियुक्ती करते.त्यानुसार तहसीलदार यांना खालील जबाबदाऱ्या व कामे पार पाडावी लागतात.

  • तालुक्यातील महसूल वसुली व प्रशासन याच्याशी निगडित कामे करणे.
  • तालुक्यामध्ये शांतता व सुव्यवथा संबंधित कामे पाहणे.
  • भूमी अभिलेखासंबंधित निर्णय घेणे.
  • शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणे.
  • नुकसान भरपाई तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित कामे करणे इत्यादी.

तहसीलदार पगार

महाराष्ट्रामध्ये तहसीलदार या पदावरील अधिकारी यांना 55,110 – 1,75,500 रुपये प्रतिमाह या दरम्यान पगार दिला जातो.परंतु हा पगार मूळ पगार आहे या व्यतिरिक्त महागाई भत्ता व इतर भत्ते देखील मिळतात.

तहसीलदार होण्यासाठी आवश्यक टिप्स

  • तहसीलदार पदासाठी असणारा अभ्यासक्रम समजून घ्या.
  • तहसीलदार पदाचा अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर त्या अनुषंगाने अभ्यासाचे योग्य नियोजन करा.
  • जुन्या प्रश्नपत्रिकांचे बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण करा तसेच पेपरचा पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न करा.
  • जुन्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवून पहा.
  • ज्या विषयांमध्ये गुण कमी येत आहेत किंवा अडचणी येत आहेत त्या विषयांकडे जास्त लक्ष द्या आणि त्या विषयांचा जास्त अभ्यास करा.
  • कठीण वाटणाऱ्या विषयांची आणि घटकांची उजळणी करा म्हणजेच चांगला सराव करा.
  • परीक्षेला मिळणाऱ्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करायला शिका.
  • परीक्षेचा अभ्यास करण्यासोबतच मुलाखतीची तयारीही करा.
  • परीक्षेचा अभ्यास करतांना चालू घडामोडींचा अभ्यास करा.
  • गरजेनुसार आवश्यक असल्यास कोचिंग लावा.
  • शारीरिक स्वास्थ्याची आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या.
  • गरज वाटल्यास आवश्यक विश्रांती आणि झोप घ्या.
  • स्वतःप्रती आणि स्वतःच्या स्वप्नांप्रती शंका बाळगू नका, नेहमी स्वतःवर आणि स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) च्या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

FAQ’s :-

तहसीलदार पदासाठी कोणती परीक्षा द्यावी?

तहसीलदार पदासाठी MPSC मार्फत घेतली जाणारी राज्य सेवा हि परीक्षा द्यावी लागते.

महाराष्ट्रात तहसीलदार कसे व्हायचे?

महाराष्ट्रात तहसीलदार होण्यासाठी MPSC द्वारे घेण्यात येणारी राज्य सेवा हि परीक्षा द्यावी लागते.जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही हि परीक्षा देऊन महाराष्ट्रात तहसीलदार होऊ शकता.

तहसीलदार पगार किती असतो?

तहसीलदार या पदावरील अधिकारी यांना 55,110 – 1,75,500 रुपये प्रतिमाह या दरम्यान पगार असतो.या व्यतिरिक्त महागाई भत्ता व इतर भत्ते देखील शासनाकडून दिले जातात.

तहसीलदारांचे काम काय?

तहसीलदारांचे काम : आपत्ती व्यवस्थापन आणि नियोजन,भूमी अभिलेख संदर्भातील कामे,कायदा व सुव्यवस्थेशी निगडित कामे,तालुक्यामध्ये शासनाच्या योजनांची अंमलबजावणी इत्यादी.

बारावी सायन्स नंतर तहसीलदार कसे व्हायचे?

बारावी सायन्स नंतर तहसीलदार होण्यासाठी सर्वप्रथम कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधर होणे आवश्यक आहे.त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणारी राज्य सेवा हि परीक्षा देऊन तहसीलदार होता येते.

कोण जास्त ताकदवान, बीडीओ की तहसीलदार?

जास्त ताकदवान बीडीओ आहे कारण ,बीडीओ आणि तहसीलदार या दोन पदांमध्ये बीडीओ हे तहसीलदारापेक्षा उच्च पद आहे.बीडीओ हे विकास अधिकारीचे पद असते.

तहसीलदाराची मुख्य जबाबदारी काय असते?

शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, जमिनीच्या नोंदी ठेवणे, महसूल जमा करणे आणि तो शासनाला पाठवणे, आपत्ती व्यवस्थापन करणे अशा अनेक जबाबदाऱ्या तहसीलदार यांना पार पाडाव्या लागतात.

तहसीलदार होण्यासाठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे?

तहसीलदार होण्यासाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा हि परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात त्यानंतर कागदपत्र पडताळणी हि प्रक्रिया पार पाडली जाते.

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment