वकील होण्यासाठी काय करावे
Table Of Content
Table of Contents
वकील होण्यासाठी काय करावे:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. सदर पोस्टमध्ये आपण वकील होण्यासाठी काय करावे लागते याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हि पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वकील कसे होता येईल याची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला वकील होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबींबद्दल माहिती मिळणार आहे जसे कि ,
- वकील होण्यासाठी किती शैक्षणिक पात्रता आवश्यक असते?
- बारावी नंतर वकील बनता येते का?
- वकील बनण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते?
- महाराष्ट्रामध्ये कोणती कायदा महाविद्यालये आहेत जेथे वकील बनण्यासाठी प्रवेश घेता येईल?
- वकिलीचा कोर्स (LLB / BA. LLB ) पूर्ण केल्यानंतर वकील बनण्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते?
- LLB आणि BA. LLB यामध्ये नेमका फरक काय आहे?
- वकिलीमध्ये कोणकोणती क्षेत्रे आणि शाखा आहेत ज्यामध्ये उत्तम करिअर करता येऊ शकते?
- वकिलीच्या विविध क्षेत्रांची आणि करिअर संधींची माहिती इ.
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पोस्टमध्ये कमी शब्दामध्ये आणि तुमचा जास्त वेळ न घेता कळणार आहेत. त्यासोबतच महाराष्टातील काही प्रतिष्ठित व नामांकित कायदा महाविद्यालयांच्या अधिकृत संकेतस्थळांची यादी देखील मिळणार आहे ज्यामुळे तुम्हाला कायदा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे आणि त्या कायदा महाविद्यालयांची माहिती मिळणे सोपे होणार आहे त्यामुळे हि पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि वकील बनण्याच्या तयारीला लागा.
वकील होण्यासाठी काय करावे ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल.
वकील होण्यासाठी काय करावे
वकील होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता:-
जर तुम्ही इयत्ता बारावीच्या शैक्षणिक पात्रतेवर वकील बनू इच्छित असाल तर तुम्ही BA. LLB म्हणजेच Bachelor of Arts and Bachelor of Legislative Law या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. हा कोर्स/अभ्यासक्रम 5 वर्ष कालावधीचा असतो.
जर तुम्ही पदवीधर असाल आणि पदवीच्या बेसिसवर वकील बनू इच्छित असाल तर तुम्ही LLB म्हणजेच Bachelor of Legislative Law हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता आणि वकील बनू शकता. हा अभ्यासक्रम एकूण 3 वर्ष कालावधीचा असतो.
LLB आणि BA. LLB यामध्ये काय फरक आहे.

LLB आणि BA. LLB यामध्ये नेमका काय फरक आहे हे आपण तक्त्याच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेऊ.
llb course information in marathi | ba llb information in marathi
घटक | LLB | BA. LLB |
पूर्ण रूप | Bachelor of Legislative Law | Bachelor of Arts and Bachelor of Legislative Law |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर | 12 वी पास |
डिग्री | सिंगल डिग्री मिळते. | डबल डिग्री मिळते. |
विषय | फक्त Law | Humanities + Law |
अभ्यासक्रमाचा कालावधी | 3 वर्ष | 5 वर्ष |
वकील माहिती
आता पर्यंत आपण वकील होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पाहिली. आता त्यापुढची प्रक्रिया म्हणजे प्रवेश कसा घ्यायचा या बद्दल माहिती घेऊ,
वकील होण्यासाठी तुम्हाला CLAT म्हणजेच Common Law Admission Test हि प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तुम्ही या प्रवेश परीक्षेमध्ये मिळवलेल्या निकालाच्या आधारावर Law कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ शकता. महाराष्ट्रामधील काही प्रतिष्ठित लॉ कॉलेजेस खालील प्रमाणे.
महाराष्टामधील 6 प्रतिष्ठित विधी महाविद्यालये.
अ.नं. | महाविद्यालयाचे नाव | अधिकृत संकेतस्थळ |
---|---|---|
1. | सरकारी विधी महाविद्यालय, मुंबई. | वेबसाईट पहा |
2. | इंडियन लॉ सोसायटी कॉलेज, पुणे. | वेबसाईट पहा |
3. | Symbiosis लॉ स्कुल, पुणे. | वेबसाईट पहा |
4. | भारती विद्यापीठ न्यु लॉ कॉलेज, पुणे. | वेबसाईट पहा |
5. | सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, मुंबई. | वेबसाईट पहा |
6. | माणिकचंद पाहाडे लॉ कॉलेज, छत्रपती संभाजी नगर. | वेबसाईट पहा |
महाराष्ट्रामध्ये इतरही महाविद्यालये आहेत जेथेही उत्तम विधी/कायदे शिक्षण दिले जाते. आपण आपल्या सोयीनुसार आणि आवडीनुसार महाविद्यालयाची निवड करू शकता.
वकील होण्यासाठी काय करावे लागते
तुम्ही वकील होण्यासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम / कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र बार काउन्सिल मध्ये नोंदणी करण्यास पात्र असता. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य बार काउन्सिल विभागाची वेबसाईट पुढे देत आहोत.
महाराष्ट्र बार काउन्सिल अधिकृत संकेतस्थळ
vakil honyasathi kay karave
वकील होण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक प्रकारच्या क्षेत्रांमध्ये आणि शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते ज्यामध्ये खाजगी आणि सरकारी दोन्ही पर्यायांचा समावेश होतो. तुम्ही महाराष्ट्र बार काउन्सिल मध्ये नोंदणी केल्यानंतर स्वतंत्रपणे काम करू शकता किंवा नामांकित फर्ममध्ये देखील काम करू शकता आणि कामाचा अनुभव घेऊ शकता.
वकील होण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते
वकीलाचे क्षेत्र हे एक विस्तृत क्षेत्र आहे आणि जर या क्षेत्रामध्ये तुम्हाला शिखरापर्यंत पोहचायचं असेल आणि यशस्वी वकील व्हायचं असेल तर, त्यासाठी तुम्हाला एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा विस्तृत अभ्यास, अनुभव आणि प्रभुत्व असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी वकील क्षेत्रातील खाली काही शाखांची माहिती खाली देत आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शाखा निवडू शकता आणि त्यामध्ये यशस्वी वकील बनू शकता.
- क्रिमिनल लॉ वकील :-
- गुन्हेगारी प्रकरणामधील आरोपी किंवा पीडित व्यक्ती यांच्यावतीने न्यायालयीन काम करणे.
- सिव्हिल लॉ वकील :-
- व्यक्तिगत किंवा व्यावसायिक प्रकारच्या वादांमध्ये मध्यस्थी राहून न्यायालयीन काम करणे.
- कॉर्पोरेट लॉ वकील :-
- कंपन्यांच्या कायदेशीर प्रकरणांचे काम पाहणे.
- फॅमिली लॉ वकील :-
- कौटुंबिक वादांमधे मध्यस्थी करणे आणि न्यायालयीन कामकाज पाहणे.
- इतर –
- टॅक्स लॉ वकील
- पेटंट अँड कॉपीराईट लॉ वकील
- सायबर लॉ वकील इ.
vakil information in marathi
आता पर्यंत आपण वकील होण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती पाहिली ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, प्रवेश परीक्षा, विधी महाविद्यालये , वकील क्षेत्रातील पदव्या, नोंदणी / रजिस्ट्रेशन प्रक्रिया, वकील क्षेत्रामधील शाखा इ. माहिती पाहिली आता या क्षेत्रामधील काही आव्हाने पाहुयात.
प्रत्येक क्षेत्राचे जसे फायदे , तोटे आणि आव्हाने असतात त्याचप्रमाणे वकील या क्षेत्रामध्येही आहेत. यातील 5 महत्वाची आव्हाने खालील प्रमाणे,
- कायदेविषयक नियमित अभ्यास करणे.
- कायद्यामधील बदल, अपडेट, नवीन कायदे या संबंधित माहिती ठेवणे.
- न्यायालयीन निर्णयांची आणि प्रकरणांची माहिती ठेवणे.
- विविध परिस्थिती आणि लोकांचा सामना करणे.
- तणावाच्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे. इ.
निष्कर्ष:- वकील हे एक प्रतिष्ठेचे, आदराचे आणि जबाबदारीचे पद आहे. हे पद तुम्हाला समाजामध्ये अनेक महत्वपूर्ण बदल घडवून आणण्याची संधी देते. जर तुम्ही या संधीचा, तुमच्या अभ्यास आणि अनुभवाचा, तुमच्या पूर्ण क्षमतेचा वापर केलात आणि न्याय आणि समानता यावर विश्वास ठेवलात तर वकील हे क्षेत्र तुमच्यासाठी एक उत्तम क्षेत्र आहे. . .!
तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
FAQ’s :-
वकील किती प्रकारचे असतात?
वकील विविध असतात जसे कि, क्रिमिनल लॉ वकील, सिव्हिल लॉ वकील, कॉर्पोरेट लॉ वकील,
फॅमिली लॉ वकील इ.
वकिलांसाठी कोणती प्रवेश परीक्षा आहे?
महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वकील होण्यासाठी CLAT म्हणजेच Common Law Admission Test हि परीक्षा द्यावी लागते.
वकील होण्यासाठी काय अभ्यास करावा?
वकील होण्यासाठी LLB आणि BA. LLB यांसारख्या कोर्सेसचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
भारतात वकील होण्यासाठी किती वर्षे लागतात?
भारतामध्ये वकील होण्यासाठी LLB साठी 3 वर्ष तर BA. LLB होण्यासाठी 5 वर्ष इतका कालावधी लागतो.
बारावीनंतर वकील होण्यासाठी काय करावे?
बारावीनंतर तुम्ही 3 वर्षांचा LLB हा कोर्स करून वकील शकता.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"